प्रथम तुज पाहता........!!!
प्रथम तुज पाहता.......!!!-२
तिच्या समोर आता प्रश्न होता तो; हे खूळ त्या येड्या सुझीच्या डोक्यातुन बाहेर कसे काढायचे हा! अर्थात सुझी भेटली की दोनचार प्रश्नात हा प्रश्न आपण निकालात काढु शकु असा आत्मविश्वास तिला नक्कीच होता. पण सुझीपेक्षाही या दिसायला धडधाकट ग्रेगने सुझीत काय पाहिले हा होता. इतका टेकीला येइल असा तर तो नक्कीच दिसत नव्हता. मग का?
पुढे...
बारच्या बाहेर येउन तिने रस्त्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. बाहेर अजुनही तसेच गरम वारे वहात होते. बारपासुन थोड्या अंतरावर पार्कींग मध्ये तिला ग्रेगरी २ दिसली. पण नुसतच कार जवळ जाउन उभे रहाण्यात तिला काही अर्थ दिसला नाही. तिने आणि एकवार रस्त्याच्या दोहोबाजुस नजर फिरवली. एका बाजुला थोड्या आतमध्ये तिला ग्रेग असावा असा एक माणुस दिसला अन तिने तिकडे चालायला सुरवात केली. तो ग्रेगेच होता. शॉपिंग ट्रॉलीमध्ये काहीबाही गोष्टी दिसत होत्या. त्यातच दोन सुरुची रोपटी तिला दिसली. ग्रेग स्वतः जुन्या पुस्तकांच्या ढिगार्यात काहीतरी हुडकत होता. नुसत बाजुला उभारण्याऐवजी ती त्याच्याजवळ गेली.
"काय शोधतो आहेस?" तिने विचारले
"इव्हॉर गर्नि" त्याने डोकं खाली घालुनच उत्तर दिले.
" हा कोण? "
आता मात्र त्याने तिच्याकडे पाहीलं.
"इव्हॉर गर्नि हा वॉर पोएट-युध्द कवि होता. मी थोड्या कविता वाचल्या होत्या त्याच्या, पण सुझीला तो अतिशय आवडतो. त्याची "सेव्हन मेडोज" तर तिची अतिशय आवडती कविता आहे. इव्हॉन गर्निच संगीत तर तिच्याकडे आहेच, पण ते ऐकताना तिच्या चेहर्यावरचे भाव पहाणं हेच मुळी एक दुसर संगीत होउन जातं. तुला माहीती नाही?"
"मला नाही एव्हढा संगीतात रस." कॅरी जरा वरमुन म्हणाली," अन एव्हढा फुकट घालवायला वेळही नाही." तिने पुस्ती जोडली. "माझा जॉब फार स्ट्रेसफुल आहे, वर चार्लसला असल्या गोष्टीत अजिबात रस नाही."
"हं!" ग्रेग उद्गारला.
"पण कॅरी सुझी लिहीते किती छान! वाचल असशीलच ना? तिचा ब्लॉग असा कवितांनी, मुक्तकांनी भरुन गेलाय. किती तरल, हृदयस्पर्शी लिहीते ती. आणि त्या लिखाणाची कोठेही जाहीरात सुद्धा नाही केली आहे त्या वेडाबाईने. इतकी टॅलेंटेड व्यक्ती, इतकी साधी असु शकते? अजिबात गर्व नसलेली असु शकते? यावर माझा तर विश्वासच नाही बसत."
"लिखाण?" कॅरी मनातच उद्गारली, " हे आणि कधीपासुन? मला कसं माहीत नाही?"
"तू काय वाचते? सुझीचं आणि माझं वाचनाच्या बाबतीत अगदी जमतं. मलाही फार लहाणपणापासुन वाचनाची आवड आहे. मी अॅलीस स्प्रिंग सोडल नाही ते याचसाठी. येथे मी खाणीवर जाउन ठराविक शिफ्टस काम करतो, अन बाकि सारा वेळ मी माझा मालक! सुझीसुद्धा तशीच, जीवनाला शांत लयीत घेणारी आहे. फार डामडौलाची, फार धावपळीची गरज नाही वाटत तिला."
त्याच्या आवाजात सुझी या शब्दासरशी एक हळुवारपणा येत होता.
कॅरीने जरा स्मरणशक्तीला ताण दिला. त्या दोघी लहाण होत्या तेंव्हा सुझीने एक कुत्र्याच पिल्लु आणल होतं मैत्रीणीच्या घरुन. आईचा काहीही आक्षेप नव्हता, त्या कुत्र्याच्या पिल्लावर अन सुझी त्याच सगळं करायला तयार होती. पण ....त्या कुत्र्याच्या जवळ असण्याने सुद्धा कॅरीला अंगाला खाज सुटु लागली अन मग ते पिल्लु परत कराव लागलं सुझीला. त्या नंतर तिने एकदा "पपी" म्हणुन एक चार ओळी खरडलेल्या अन त्या चार ओळीवर आपण मनसोक्त हसलेलं तिला आठवलं. तिच्या आठवणीतली ती एकमेव वेडपट कविता किंवा लिखाण होतं सुझीने केलेलं. अन आज हा कोण कोठचा ग्रेग तिच्या लिखाणाची तारीफ करतोय! अर्थात करणारच . सुझीला गळाला लावायच आहे ना? मग ते लिखाण चांगल असो वा वाईट! चढवल्यावर चढणारी सुझीसारखी खुळसट व्यक्ती समोर असेल तर का नाही? नाही का?
"चला मेव्हणीबाई निघुया. सुझी वाट पहात असेलं." ग्रेगच्या आवाजाने ती भानावर आली.
"सुझीचा ग्रीन थंब आहे म्हणे" ग्रेगच अजुन सुझीपुराण संपल नव्हते. "असं?" काहीतरी विचारायच म्हणुन कॅरीने विचारलं.
घरात कायम पडुन असणारी सुझी बागकाम करायची हे तिला माहीत होतं अन त्याकडे लक्ष द्यायला कॅरीला कधीच वेळ नसायचा. नाही म्हणायला, घरासमोरच लॉन कधी वाढलेलं नसायच, अन चार घरांपेक्षा जरा त्यांची बाग कायमच फुललेली असायची हे मात्र खरं. पण त्याच फारस महत्त्व तिला कधीच नव्हतं वाटलं.
त्यांनी अॅलीस स्प्रिंग सोडल तेंव्हा संध्याकाळचे चार वाजायला आले होते. सुर्य पश्चीमेच्या दिशेला तळपत होता. त्याची किरण डायरेक्ट डोळ्यात घुसत होती. एक भला मोठा काळा गॉगल ग्रेगने ग्लव्ज कंपार्टमेंट मधुन काढला अन तिला देउ केला. त्याच्या भल्यामोठ्या पंजात तो गॉगल! त्याच्या हातावरची सोनेरी लव्..हातातली गळ्यातल्या साखळीशी मॅच होणारी; रुंद मनगटावर शोभुन दिसणारी सोन्याची जाडजुड चेन्...अन त्याचा अंगगंध्....आपल्याला बिअर चढली की काय असं कॅरीला वाटु लागलं.
शहराच्या बाहेर पडल्यावर त्यांनी वेग पकडला. ताशी ११० ने त्यांची गाडी धावत होती. आजुबाजुला वैराण वाळवंट!! अधे मधे "कांगारुंपासुन सावध"अश्या पाट्या.रस्त्याचे कडेने,अधेमधे खुरटी झुडपं वा एखाद दुसरा झाडांचा समुह्...आपण कोणत्यातरी दुसर्या जगात आहोत अस कॅरीला वाटु लागल्..अन काय कळायच्या आत " जिझस्..."असा उद्गार तिने ऐकला. पाठोपाठ गाडी प्रचंड वेगाने वळली अन बेसावध कॅरी दाणकन समोरच्या डॅशबोर्डवर आदळली.
साधारण जाणिव आली अन तिने डोळे उघडायचा प्रयत्न केला. बाजुला पुन्हा तो अंगगंध दरवळला, "आर यु ऑलराईट?"ग्रेग बोलत होता."मला वाटतयं यु आर! जरा कपाळावर टेंगुळ आहे पण दोन दिवसात जाइल तो. केव्हढा मोठा कांगारु! माझ्या गाडीने उडवला असता तर बिचारा काही वाचला नसता." कॅरीने डोकं हलवायचा प्रयत्न केला. "थांब मी गाडीत फ्रीझर मध्ये बर्फ आहे ते आणतो"
तिने मान वळवुन पाहिले, ग्रेगची गाडी रस्त्याच्या कडेला खड्ड्यात कलंडली होती. तिच्या बाजुची खिडकी जमिनीत घुसली होती.
ग्रेग परत तिच्याकडे आला. ती तशीच विस्फारलेल्या नजरेने कारकडे पहात होती." काळजी नको करु. इंश्युरन्स आहे माझा" ग्रेग बोलतच होता. येव्हढा मोठा अॅक्सीडंट होउनही तो अजुनही बोलतच होता अन तेही अगदी नॉर्मली! " मी फोन केलाय इमर्जन्सीला. येथे हे होतच असतं. बरेच कांगारु मरतातपण! पण माझ्या गाडीखाली नाही अजुन कोणता आला. गाडी घेउन जायला अन आपल्याला घरी पोहोचवायला अश्या दोन गाड्या येतील इतक्यात RACVच्या. " बोलता बोलता तो तिच्याजवळ बसला. तिच्या खांद्याभोवती हात लपेटत त्याने तिला सरळ बसती केली. "थोड कनकशन आहे, पण तुला तुझं नाव आठवतयं का?" तिने मान हलवली,"माझ नावं आठवतयं का?" तिने मान हलवली "गुड!" त्याने हाताने तिचे कपाळावरचे केस बाजुला सरकवले अन तिचा चेहरा आपल्या बाजुला वळवला......कॅरीने मान कलती करत, हनुवटी वर उचलली...तिला माहीत होतं...आता काय होणार आहे...कॅरी सारख्या स्त्रीचा ...इतका शारिरीक जवळीक असताना मोह न पडणे...तिने..कॅरी सारख्या स्त्रीने...अशी...मागणी करणे...हे परम भाग्य त्या पुरुषाचे...
....
काहीच झाले नाही. तिच्या आसक्त ओठांना कोणताच स्पर्श जाणवला नाही....तिने डोळे उघड्ले...अजुनही ग्रेग जवळच होता, पण त्याच्या नजरेत.....!!!!! तिरस्कार?????
त्याने तिच्या खांद्याभोवतालचा हात काढुन घेतला. कॅरी सावध होत सरळ बसली, त्याने हातातले आईस पॅक तिच्याकडे फेकले. "लाव ते कपाळाला.." त्या आवाजात काय नव्हतं?
कॅरी थरारली!!!! नकार ! तो ही या अश्या खाणकामगाराकडुन? कॅरीसाठी पुढे मागे झुलणार्या पुरुषांच्या रांगांत हा गांवढळ? नाही म्हणतो? कोणासाठी? त्या ८० किलोच्या जडशीळ सुझीसाठी?
ग्रेग गाडीकडे निघुन गेला. त्याने तिच्याकडे नजरही न टाकता गाडीतुन सामान काढायला सुरवात केली. थंडपणाने तिची बॅग, बाकिचे घेतलेले सामान, पुस्तकं , सारं त्याने एका बाजुला काढुन ठेवलं. तोवर एक पोलिसांची गाडी, एक ट्रक तिथे हजर झाला होता. त्यांच्याशी बोलत त्याने आपल सामान उचललं. कॅरीने निमुटपणे आपली बॅग उचलली.
एका पत्र्याच्या शेडसमोर पोलीसांची गाडी थांबली. मागे घराचा थोडा भाग दिसत होता..पण समोर होते ते पत्र्याचे शेड!
त्यातुन सुझी अगदी धावत बाहेर आली..."काय झाल? पोलीस गाडीतुन का आलात?" तिच्या प्रश्नांना तोंड द्यायला कॅरीकडे तोंडच नव्हत उरलं. तोवर पोलीसांना निरोप देउन ग्रेग वळला अन त्याने सुझीला अगदी लिलया बाहुत ओढली. आजवर आवजड भासणार्या सुझीच्या चालीत एक डौल आला होता. पावलात एक चपळता! हालचालीत एक हल्लकपणा! त्याच्या हातावर रेलत ती अनेक प्रश्न विचारु लागली अन तो ही तेव्हढाच उत्तरात गुंतुन गेला. घरात कुठेतरी सुझीच्या आवडीच संगीत झरत होतं. तिच्या चेहर्यावर एक समाधान, आनंद अन आत्मविश्वासाचं वेगळच विश्व नांदत होतं. सुझीच्या कमरेभोवती हात गुंफत ग्रेगने कॅरोलिनकडे पाहिलं. कॅरीला मेल्याहुन मेल्यासारख झालं. तिच्या नजरेत एक अगतिक भाव उमटला..एक विनवणी... तिच्याकडे पुन्हा एक दृष्टीक्षेप टाकत ग्रेगने सुझीच हळुवार चुंबन घेतल अन त्या दोघींना सोडुन तो घराकडे वळला.
"कॅरी...मी इतकी आनंदात आहे....ग्रेगच्या घरचे सगळे येथेच रहातात्..मोठी फॅमीली आहे...ग्रेगने हे घर स्वतः विकत घेतलय दहा वर्षापुर्वी...आत्ता तुला शेड दिसतय, पण आत खुप छान आहे घर.
ये ना. ये ना...ओह! सुरुची झाडं? आपल्या बागेत आहेत ना? मी लावलेली? मी फक्त म्हंटल होतं, तर हा घेउनच आला...अग ग्रेग ना....त्याच्या चर्चमध्येपण खुप आवडतो सगळ्यांना...कॉयर मध्ये गातो तो. तू थकली आहेस का? तुला फार लागलं का? तू आलीस? माझ्या अतिशय आनंदाच्या क्षणी तू माझ्याबरोबर असणार... ग्रेगने मला स्वतंत्र बेडरुन दिलीय्..अन्...तो माझ्या खोलीत आला नाही अजुन... वेडींग नंतर्...तुला कळतय ना? पण मी व्हाईट नाही घालु शकत वेडींग ड्रेस्...मी सांगीतल त्याला..हसला तो. आज वाटतयं थोडी थांबले असते तर चालल असतं... चल ना! घरात चल ना. मी दाखवते तुला..आम्ही येथे पार्टीशन घालणार आहोत्..सो फॅमीली रुम वेगळी मिळेल्...मी आईच ते डेस्क आणु का येथे ठेवायला...मला फार आवडत ते....आई बर्याचदा तेथे बसुन असायची..."
कॅरी सारं ऐकत होती पण तिला काऽऽही उमगत नव्हत. या सगळ्यात एकट्याने अपराधी असण्याची तिची पहिलीच वेळ होती. सुझीचा निर्भेळ आनंद्..ग्रेग तिला देत असलेला मान्..महत्व..! हे सगळ नवं होतं तिला... सुझीला "हं!' "हुं" असे हुंकार भरण्या व्यतिरीक्त दुसर काहीही करण्याची ताकद तिच्यात उरली नव्हती.
आज पासुनच रोज मेजवान्यांना सुरवात होणार होती. आज ग्रेगच्या घरचे त्या तिघांना जेवायला घेउन जाणार होते, उद्या एका मित्राकडे लंच मग चर्च ग्रुपतर्फे पार्टी, ग्रेगच्या ऑफीस कलिग्जकडुन सेलेब्रेशन्...फॅमीली फ्रेंडस्...एकुण ते लहाणस खेडं त्यांच्या आनंदात सहभागी झालं होतं. आठ दिवस असे वार्यासारखे सरले. रविवारी सकाळी चर्चच्या आवारात उभारलेल्या शामियानात ग्रेगेने सुझनला जन्मभर साथ देण्याचे वचन दिले. तिच्याशी एकनिष्ठ रहाण्याचे ...तिच्या सुख दु:खात सहभागी होण्याचे! अन ते देताना त्याची नजर फक्त आणि फक्त सुझीच्याच चेहर्यावर खिळली होती. किंचीत ऑफ व्हाईट गाउन मध्ये सुझी अशी फुलासारखी दरवळत होती. कॅरी वारंवार ग्रेगकडे पहात होती. त्याच्याशी नजरानजर होताच तिच्या नजरेत पुन्हा पुन्हा एकच विनवणी उमटत होती. आठ दिवसात सुझनच्या वागण्यात अजिबात बदल न जाणवल्याने ग्रेगने तिला काऽऽही सांगितले नसल्याचे कॅरीने ओळखले होते...पण त्यात तिला जाणवला होता तो सुझनला न दुखवण्याचा हेतू...नाहीतर कॅरीला काय वाटेल याचा विचार त्याच्या मनालाही न शिवल्याचे जाणवले तिला. शी वॉज नो बडी फॉर हिम. असलाच तर होता तिरस्कार..अन ती त्याही लायकीची नसल्याचा अविर्भाव्....पॅथेटीक कॅरी! असा अविर्भाव!
लग्न झाल्यावर त्या संध्याकाळीच नवदांपत्य न्युझीलंडला रवाना झाले अन थकलेली कॅरी सिडनेत पोहोचली. शहर्...त्याची धावपळ्...अनोळखी गर्दी...ओळखीचे रस्ते...रोजच्या रात्रीच्या जेवण्यासाठीचे रेस्टॉरंटस्...महागातले महाग जेवण जेवायचा तिचा चार्ल्स! आठवड्यातुन तिन दिवस न चुकता जीम मध्ये जाणारा चार्ल्स! पैश्याच्या बाबतीत रोख ठोक व्यवहार ठेवणारा चार्ल्स. हेच बरं ! तिच्या मनाने ठरवले...लग्न तर ते दोघे करणारच होते..पण पहिला अपार्ट्मेंटच कर्ज फिटायला हव होतं. सिडनीच्या समुद्रावर मोठ्या काचेच्या खिडक्या असणारं घर होतं त्या दोघांच्यात मिळुन! तिने किती पैसे फेडायचे; त्याने किती, याचा व्यवस्थीत हिशोब होता.
तिच्या ऑफीस बिल्डींगमध्ये भेटले होते ते पहिल्यांदा..किती वर्ष झाली?.....सात? आठ?...
विचार करता करता कॅरीने घराची चावी फिरवली अन दार उघडलं. आत ड्रॉईंगरुम मध्ये चार्ल्स बसला होता.....बिन चष्म्याचा.....तिने अचंब्याने त्याच्याकडे पाहीलं. हसत हस तो उठुन उभा राहीला.."सरप्राइज....! मी काल लेझर सर्जरी केली....ऑस्ट्रेलियाच्या नामवंत सर्जनकडुन! आता चष्मा नाही......सहा महिने लागले ही अॅपॉइंट्मेंट मिळायला...चल ये इकडे"
मना शरीराने थकलेल्या कॅरीला ते आमंत्रण हवच होतं. सुझीचे आनंद सोहळे पहाताना स्वतःला काहीही महत्व नसल्याच्या तिच्या भावनेने तिला पुरतं पराभुत करुन टाकलं होतं. सुझी सारखे सोहळे आपलेही व्हावेत ही भावना मनात दाटुन आली होती. आसुसुन जाउन तिने अंगावरच जॅकेट काढुन भिरकावलं, पाठोपाठ शुज अन स्टॉकिंग्ज् .......तोवर चार्ल्स तिच्या पर्यंत पोहोचला होता.
"मी दोन दिवस मेडीकल लिव्हवर आहे. म्हंट्ल तु येणार आहेस तर थांबाव घरी...."बोलता बोलता त्याने तिला जवळ घेतली अन त्याचे हात तिच्या स्कर्टवर पोहोचले...गुडघ्यावर बसत त्याने तिचा स्कर्ट उतरवायला सुरवात केली. कॅरी अशी अनावर झाली..
"हे काय? काय पहातोय मी?...सेल्युलाईट्..???".तिच्या मांडीवर हात फिरवत चार्ल्स निरखुन पहात होता...तो काय बोलतोय हे समजायला कॅरीला नाही म्हंटलतरी क्षण दोन क्षण लागले...
"काय? " ती भानावर येत म्हणाली, तिने स्कर्ट सरळ करत स्वतःला झाकायचा प्रयत्न केला.पण चार्ल्सने तिचे हात दुर केले आणखी झुकुन त्याने तिच्या पायांकडे लक्षपुर्वक पाहीले.." हो ! हे सेल्युलाईटच आहे. मला एव्हढे दिवस दिसत नव्हत म्हणुन काहीही फरक पडत नाही का काय? तुला जमत नाही स्वतःकडे लक्ष द्यायला? चल मी उद्याच तुला ब्युटीक्लिनिकची व्हाउचर्स आणुन देतो. थोडी कंपनीची आहेत, थोडी मी माझे पैसे घालुन देतो पण उद्याच्या उद्या क्लिनीकमध्य जाउन या वर उपाय पहा...मला कोणतीही कमी आवडत नाही...पाहीजेत तेव्हढे पैसे आहेत माझ्याकडे...!!!"
(समाप्त)
__/\__
अपर्णा
प्रतिक्रिया
6 Aug 2013 - 11:22 am | आतिवास
कथेचा शेवट काहीसा अपेक्षित आणि काहीसा अनपेक्षित!
अनुवाद चांगला जमला आहे
6 Aug 2013 - 12:12 pm | बॅटमॅन
एकदम नेमकेपणी जे म्हणायचे होते ते मांडले आहे.
अनुवाद बाकी जबराच जमला आहे!
6 Aug 2013 - 11:33 am | यशोधरा
ह्म्म..
6 Aug 2013 - 12:20 pm | प्रभाकर पेठकर
खुप उत्सुकता वाढली होती पण कथेच्या शेवटाने अपेक्षाभंग केला. कथा वाईट आहे असे म्हणत नाही. अनुवादही मुळ कथानकाशी प्रामाणिक वाटतो आहे. पण मूळ कथानकातील समारोप फार सपक वाटला.
7 Aug 2013 - 2:34 am | आनन्दिता
+१
कथेच्या शेवटाने निराशा केली.... बाकी अनुवाद मात्र प्रामाणिक वाटतोय..
7 Aug 2013 - 9:10 am | किसन शिंदे
+२
अनुवाद फस्सक्लास्स!!
6 Aug 2013 - 12:39 pm | अनिरुद्ध प
कथेचा शेवट जरा अनपेक्षीत वाटला तरिही अनुवाद उत्तम आणि शेवट्परयन्त खिळवुन ठेवणारा होता.
7 Aug 2013 - 7:25 pm | सखी
हेच म्हणते.
6 Aug 2013 - 10:51 pm | प्रचेतस
साधाश्याच पण सुरेख कथेचा तितकाच छान अनुवाद
6 Aug 2013 - 11:17 pm | पैसा
अनुवाद छान जमला आहे! कथेची मांडणीही उत्तम.
7 Aug 2013 - 12:29 am | मिसळलेला काव्यप्रेमी
अगदी हेच म्हणतो....
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
7 Aug 2013 - 12:34 am | मिसळलेला काव्यप्रेमी
खरं तर अजून पुढे काही असेल असेच वाटत राहते.
7 Aug 2013 - 4:13 am | सस्नेह
शेवट जरा नाट्यमय बनवता यावा.
7 Aug 2013 - 4:44 am | स्पंदना
एकुण मी जरा मुळ कथेचा गाभा बदलला असता तर चाललं असत असा सुर दिसतोय सगळ्यांचा.
काय आहे, जर तुम्ही दोन बहिणी पहात असाल तर एक साधारण ईर्षेचा सूर असु शकतो त्यांच्यात, अन वेळीच पालकांनी सावरल नाही तर एक भावंड दुसर्यासाठी त्रासदायक ठरु शकत.
एकुण कथेत सुझीच्या प्रत्येक गोष्टीची टर उडवत तिला कायमच स्वतःपेक्षा कमी दर्जावर ठेवण्याची, तिचे छोटे,छोटे आनंद काढुन घेण्याची एक अज्ञात उर्मी तिच्या बहिणीच्या ठायी असावी असे जाणवते.
अर्थात शिर्षक..लव्ह अॅट फर्स्ट साइट...च्या विरुद्ध आहे.
येथे या शिर्षकाचा दुहेरी उल्लेख आहे...एक ग्रेगच कॅरीबद्दलच प्रथमदर्शनी अथवा प्रथम भेटीत घडलेले मत..अन चार्ल्स्,,जो चष्म्याशिवाय व्यवस्थीत पाहु नाही शकत..त्याचं तिला प्रथमच निरखून पाहणं अन तो जे काही पाहतो त्याबद्दल त्याची नाराजी..असा आहे.
अर्थात अगदी टो़काची व्हॅम्प बनवु शकत नाही आपण कॅरीला कारण तिचे वागणे हे छुपे आहे. भावंडात जे काही घडतं ते फक्त त्यांनाच जाणवतं, अन ते तिथवरच असत. बाकी मला स्वतःला कथा वेगळी वाटली ती या कंगोर्यामुळे.
धन्यवाद!
7 Aug 2013 - 4:37 pm | पिशी अबोली
उलगडून मस्तच दाखवलीत. कथा याच कारणांसाठी आवडली. :)
8 Aug 2013 - 7:37 pm | सामान्य वाचक
अनुवाद जबरदस्त झाला आहे. कथा फारशी नाट्यमय & twist वाली नाही. अर्थात ती मुळ कथा जशी आहे, तशीच ती आमच्यापर्यंत पोहाचवलीत , तेच छान आहे.
7 Aug 2013 - 10:38 am | मदनबाण
लेखन आवडले... शेवट अनपेक्षित वाटला.
7 Aug 2013 - 12:45 pm | स्वाती दिनेश
अपेक्षित शेवट, अनुवाद छान जमला आहे.
स्वाती
7 Aug 2013 - 5:47 pm | स्वाती२
मस्त अनुवाद. कथा आवडली.
7 Aug 2013 - 6:19 pm | विटेकर
असेच म्हणतो ..
फक्त कथेतील नावे एतद्देशीय वापरता आली असती का ? नै, फोरीन्वाली नावे लक्षात ठेऊन मग कथेचा प्लोट ध्यानात घ्यावा लागतो. आणि इंग्रजी नावे मराठीत टंकताना त्रास ही होत असेल?
7 Aug 2013 - 6:33 pm | कपिलमुनी
पांडुरंगच्या गाडीने कांगारू उडवला असता तर....
7 Aug 2013 - 6:38 pm | कपिलमुनी
मुळ कथा आणि त्याला अधिक सुंदर बनवणारा स्वैर अनुवाद !
छान कथा वाचायला मिळाल्यच समाधान लाभला..
अजून काही कथा येउ द्या
9 Aug 2013 - 12:20 pm | ज्ञानोबाचे पैजार
सुंदर कथा आणि तिचा नितांतसुंदर अनुवाद, दोन्ही अतिशय आवडले. आता एवढ्यावरच थांबु नका
और आनेदो.