(हे असलं कधी श्रावणच्या संदर्भात लिहीन याची कल्पनाही केली नव्हती! :( )
***
श्रावण गेला. सत्य बलवान असते आणि ते स्वीकारणे भागच असते. गेल्या काही वर्षात तो सगळ्यांनाच माहित झाला. पण तो त्या ओळखीच्याही बाहेर खूप होता. किंबहुना, त्याच्यासारखा हरहुन्नरी, चतुरस्त्र, लोकसंग्रह असणारा माणूस असा कोणत्याही एका पैलूत सामावू शकत नाही. सामाजिक कार्यकर्ता, विचारवंत, लेखक, पत्रकार, अभ्यासक, विद्यार्थी, कलाप्रेमी, साहित्यप्रेमी, माणूस, मित्र... हे सगळे आपल्याला त्याच्यात दिसत होतेच.
या आपल्या मित्राचं हे बहुपेडी व्यक्तित्व साजरं करण्यासाठी आपण सगळे मिळून एक छोटासा कार्यक्रम करत आहोत. कार्यक्रमाचं स्वरूप गप्पांचं असेल. सगळे मिळून बसू, आपल्याला दिसलेला, भावलेला श्रावण याबद्दल एकमेकांना सांगू. आपल्या या असाधारण मित्राला हीच खरी श्रद्धांजली.
तारिख : सोमवार, दिनांक, ३ जून २०१३
स्थळ : रावसाहेब पटवर्धन विद्यालयाचं अंगण, साने गुरुजी स्मारक, दांडेकर पूल परिसर, सिंहगड रस्ता, पर्वती, पुणे ३०.
वेळ : संध्याकाळी ६ वाजता.
पुण्याच्या बाहेरील मित्रमैत्रिणींनीसुद्धा या कार्यक्रमाला यायचे जमवावे अशी मनोमन इच्छा आहे. मुंबईतील काही जणांशी बोलणे झाले आहे. तिथून काही लोक येत आहेत.
प्रतिक्रिया
31 May 2013 - 7:50 pm | धमाल मुलगा
सोमवारऐवजी शनिवार्/रविवार नाही का रे जमायचं? निदान आमच्यासारख्यांना फोनवरुन तरी हजर राहता आलं असतं.
31 May 2013 - 7:56 pm | बिपिन कार्यकर्ते
अरे लवकरात लवकर करावं असं चालु आहे. फोन कर. बोलू.
31 May 2013 - 8:36 pm | प्रभाकर पेठकर
वाईट वाटतय पण काय करणार उपस्थित राहू शकत नाहीए.
सगळ्यांच्या आठवणींचे संकलन करून एक धागा टाका. आम्हालाही उपस्थिती लावल्याचे समाधान मिळेल.
31 May 2013 - 9:38 pm | दशानन
येतो आहे.
1 Jun 2013 - 7:16 am | साती
एका बहुआयामी व्यक्तीमत्त्वाच्या काही आयामांवर फार चांगले लिहिलेत!