ट्यूब लाईट खाणे, केसाने ट्रक ओढणे वगैरे

संचित's picture
संचित in जनातलं, मनातलं
22 May 2013 - 8:44 pm

तस प्रकरण नवीन नाही. इतक्यात youtube वर विडीओ पहिला आणि विषय परत आठअला. आपण उस खात नाही तेव्हढ्या सहज पणे हा मनुष्य ट्यूब लाईट खातो हे बघा https://www.youtube.com/watch?v=vQXhpqkg8WY. आपण दाताने जिभेला चावले तर २-४ दिवस दुसर काही खाणे जमत नाही. आपल्याला फक्त नासलेले दुध पिले म्हणून फूड पोइझनिन्ग होते. पण हे असले अघोरी माणस कसे काय कोण जाणे काहीही करण्याची तयारी ठेवतात, या अवलीयांच्या पोटात काय लोखंड, अलुमिनियम वितळवणाऱ्या भटया असतात कि काय कोण जाणे? तस पाहिलं तर हे लोक काहीपण पचवण्याची ताकद ठेवतात. मागे एका एकदा वाचले होते एका माणसाने म्हणे अक्खे ट्रक चे चाक खाल्ले. बकासुरालाही लाज वाटावी अशी या मनुष्यांची भूक आणि पचन शक्ती कुठून तयार होते?
ह्या माणसांमध्ये नक्की काय दोष असतो? यातले सगळेच लोक गरीब असतात आणि भुकेसाठी करतात अस वाटत नाही. तर गिनीज बुक आणि तत्सम पारितोषिकासाठी हे प्रकार जास्त होताना दिसतात. AXN, स्टार या इंग्रजी वाहिन्या यांना खास वातावरण उपलब्ध करून देतात. जबरदस्त सेट, महागडे कॅमेरे, आणि गिनीज बुक चे सुटा-बुटातील रेकॉर्ड ठेवणारे, याच लोकांसारखी वेड लागलेली जनता यांना प्रोत्साहन द्यायला हि असते. मग हे लोक दाताने १००० टनाचे जहाज वाहून नेतात, कधी केसाने ट्रक ओढतात, अजस्त्र विमान स्वत:च्या शरिरावारून नेतात, साप, विंचू यात स्वत:ला फसवतात इ. आपल्याकडे असणारा कडक लक्ष्मी प्रकारही असाच. रेकॉर्ड करायचे ते करा पण स्वत:ला असला अघोरी त्रास का देता? ऑलिम्पिक मध्ये आपल्याकडे काय कमी गेम आहे? ते पाहणाऱ्या जनतेला तरी त्यातून काय मिळते कोण जाणे?
बाकी आपल्याकडेही आता हे कार्यक्रम सुरु झाले आहेत. आणि गम्मत अशी कि परीक्षकांना सुद्धा हे पहावल्या जात नाही. आपली किरण खेर तर पदराआडून लपत बघते. तर मला पडलेले हे काही प्रश्न :
• नेमके के कारण असावे असले प्रयोग करण्यामागे?
• भौतिक शास्त्राच्या नियमाना बाजूला आव्हान देऊन हे कसे काय राक्षसी प्रयोग करू शकतात?
• या प्रयोगानंतर या माणसांच्या शरीराचे काय हाल होतात?
• या सर्वांची सुरुवात होते ती कशी?
• असले काही प्रयोग करणे म्हणजे १-२ महिन्यात येणारे नव्हे. तर लोक १०-१० वर्ष सराव करून शिकतात(?). आपल्या आयुष्याची इतकी वर्षे हे असल्या कामात का घालवतात?

जीवनमानअनुभवमत

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

22 May 2013 - 9:57 pm | पिवळा डांबिस

ही लोकं हे प्रकार कसे करतात आणि का करतात ते माहिती नाही. ते इथले जाणकार सांगतीलच. पण आम्हाला बुवा असे शोज बघायला आवडतात. ते काहीतरी बकवास चर्चा किंवा फुटकळ नाच-गाण्याचे प्रोग्राम बघण्यापेक्षा हे खूप बरं!!!
:)

सौंदाळा's picture

23 May 2013 - 9:59 am | सौंदाळा

जादुगार हौदीनी म्हणे छोटी तलवारसुद्धा गिळायचा.
डॉ. खरे यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

सुबोध खरे's picture

24 May 2013 - 11:48 am | सुबोध खरे

अहो
आजकाल सगळे लोक इंडोस्कोपी करतात ते काय आहे? एवढेच कि लोकांना घशात बधिर करण्याच्या औषधाचा फवारा मारला जातो. हौदिनी सवयीने लपकणारी तलवार गिळत असे. बाकी काचा खाणे किंवा दगड गिळणे हे एक मी पण कोणीतरी आहे हे सिद्ध करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. मी सर्वात लांब थुकू शकतो किंवा मी सर्वात लांब मुतू शकतो हा त्यातलाच प्रकार.
घटम भिंद्यात पटं छिंद्यात कुर्यात रासभ रोहणम
येनकेन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत.

परिकथेतील राजकुमार's picture

25 May 2013 - 3:58 pm | परिकथेतील राजकुमार

बाकी काचा खाणे किंवा दगड गिळणे हे एक मी पण कोणीतरी आहे हे सिद्ध करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. मी सर्वात लांब थुकू शकतो किंवा मी सर्वात लांब मुतू शकतो हा त्यातलाच प्रकार.

जबरदस्त !
साला तत्वज्ञान तत्वज्ञान म्हणतात ते हेच. चला, ह्या धाग्याच्या निमित्ताने आम्हाला साक्षात्कार झाला.

काही काही लोकं, मी अर्धे जग हिंडलोय, आणि मी फलान्या फल्याना ठिकाणी आयुष्य घालवलय, मी अमक्या तमक्याचे आयुष्य वाचलवलंय, मी अमक्या तमक्या हापिसराला नडलोय असे काय काय सांगत / लिहित हिंडत असतात. तो पण ह्यातलाच प्रकार असणार असे आता वाटायला लागले आहे.

तुमचा अभिषेक's picture

23 May 2013 - 9:50 pm | तुमचा अभिषेक

कौतुक असते लोकांना, आपल्याला काही जगावेगळे जमते याचे.

नाकाल जीभ लावणे, कान हलवणे, भुवया उडवणे किंवा एकावेळी एकच भुवई उडवणे, हाताची बोटे कडाकडा मोडणे, नाकातून सिगारेटचा धूर काढणे वगैरे वगैरे गोष्टींचे लोकांना कौतुक असते, तर ज्या एखाद्याला साक्षात्कार होतो की आपण यापेक्षाही काहीतरी भव्यदिव्य करू शकतो तर माणसे आयुष्तातील वेळ अन शक्ती खर्च करतात या साठी .. अन यात काही वावगे नाही, माझ्या अंगात असा एखादा अमानवीयान अचाट कलागुण असता तर मी देखील याच मार्गाला लागलो असतो..

बाकी जेव्हा हे लहानपणी पहिल्यांदा केले जाते तेव्हा पाठीत आईचा धपाटा पडतो की बापाची कौतुकाची थाप हे देखील मॅटर करते.

प्रकाश घाटपांडे's picture

24 May 2013 - 9:50 am | प्रकाश घाटपांडे

माझा अंधश्रद्धा निर्मुलन समितीत असलेला मित्र महेश भागवत असे ट्युब च्या काचा खाण्याचा जाहीर कार्यक्रम करीत असे. या मागे कोणतीही दैवी शक्ती नाही असा संदेश या कार्यक्रमातून देत असे. सध्या तो हैद्राबाद चा जॉईंट पोलिस कमिशनर आहे.

चिरोटा's picture

24 May 2013 - 10:57 am | चिरोटा

लहानपणापासून त्यांच्या मनावर जगात अशक्य असे काहीही नाही हे ठसवण्यात येत असावे.

टवाळ कार्टा's picture

24 May 2013 - 9:39 pm | टवाळ कार्टा

अशा लोकांना दुसर्या दिवशी सकाळी त्रास होतो का ? :)

रामपुरी's picture

24 May 2013 - 10:12 pm | रामपुरी

"साप, विंचू यात स्वत:ला फसवतात".
कॄपया या वाक्याचा अर्थ कुणी सांगू शकेल का????
बाकी काचा, तलवारी खाल्लेल्या प्रत्यक्ष बघितलेल्या आहेत. आणि ते लोक सगळे गरीब, रस्त्यावर खेळ करणारे होते. कुणीही गिनीज बुकात वगैरे जाण्यासाठी करत नव्हते.
असो.
वरच्या वाक्याचा अर्थ कुणी सांगितला तर अनंत उपकार होतील. तेवढीच आमच्या ज्ञानात भर.

जे.जे.'s picture

25 May 2013 - 8:16 am | जे.जे.

फसवतात च्या ऐवजी अडकवून घेतात - असे असावे असे वाटते.

'साप, विंचू यामध्ये स्वत:ला अडकवून घेतात'

सूड's picture

27 May 2013 - 1:53 pm | सूड

>>"साप, विंचू यात स्वत:ला फसवतात".

हिंदाळलेलं मराठी बाकी काही नाही...;)

संचित's picture

27 May 2013 - 10:57 am | संचित

फसवतात च्या ऐवजी अडकवून घेतात - असे असावे असे वाटते.

हो तसेच म्हणायचे होते

मदनबाण's picture

27 May 2013 - 3:25 pm | मदनबाण

हे सर्व करुन सुद्धा जिवंत राहतात हे विशेष आहे.खालचा व्हिडीयो पाहिला तर जराशी चूक झाली तर काय होईल याचा अंदाज येईल...