किवी आणि कांगारूंच्या देशांत ०४ : रोतोरुआ - ख्राईस्टचर्च - माऊंट कुक राष्ट्रीय उद्यान

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
4 May 2013 - 10:56 pm

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...

====================================================================

...एक पंजाबी आणि एक हिमाचली असे मालक असलेल्या, न्यूझीलंडच्या रोतोरुआमधिल भारतीय रेस्तरॉमध्ये, हे अस्सल मराठमोळे चित्र पाहून आश्चर्यमिश्रित आनंद झाला नसता तरच नवल!

आज सहलीचा चवथा दिवस. प्रथम थोडी रोतोरुआची सफर करून मग ११:५० चे न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावरच्या ख्राईस्टचर्चला जाणारे विमान पकडायचे होते. त्यामुळे आज साडेसहालाच बॅगा खोलीबाहेर ठेवा असे सहल निर्देशकाने सांगितले होते. त्याप्रमाणे जरा लवकरच आटपून बॅग खोलीबाहेर ठेवून न्याहारीला गेलो. बस साडेसातला निघणार होती त्यामुळे आरामात सहप्रवाशांबरोबर गप्पा मारत न्याहारी झाली. बस ठरलेल्या वेळेवर रोतोरुआच्या सरकारी बागेकडे (Government gardens) निघाली.

ह्या बागेच्या जागेवरून मावरी व ब्रिटिशांमध्ये अनेक लढाया झाल्यानंतर मग अठराव्या शतकाच्या अखेरीस मावरींनी येथील ५० एकर जागा ब्रिटिशांना देऊ केली. या जागेचे वैशिष्ट्य असे की येथे अनेक गंधकयुक्त गरम पाण्याचे झरे आहेत. या भागात गंधकाच्या (नासलेल्या अंड्यासारख्या) वासाने नवीन माणसाला मात्र नकोसे होते. या वासामुळे रोतोरुआला सल्फर सिटी असेही म्हणतात. तरीसुद्धा रोतोरुआच्या या भागात बरीच वस्ती आहे. १९०८ मध्ये न्यूझीलंड सरकारने येथे गरम गंधकयुक्त पाण्याची कुंडे असणारे स्नानगृह (bath house) बनवले. १९३३ मध्ये त्याच्या शेजारी Blue Baths नावाचे अजून एक स्नानगृह सुरू झाले. नंतर व्यापारीकरणात रोतोरुआमध्ये अशी अनेक व्यावसायिक स्नानगृहे बनल्यावर १९८० मध्ये ही सरकारी स्नानगृहे बंद केली गेली. नंतर १९८८ मध्ये त्या इमारतींचे नूतनीकरणा करून तेथे एका संग्रहालय बनवले गेले. आता त्या इमारतींच्या विस्तीर्ण हिरवळींचा उपयोग क्रॉके (croquet) नावाचा इंग्लिश खेळ खेळण्यासाठी होतो...

बागेच्या दक्षिण टोकाला अजूनही एक Sulphur Point नावाचा गरम पाण्याचा जिवंत झरा आहे. तेथे त्याच्या "सुवासाचा" आनंद देण्यासाठी प्रत्येक सहल आर्जवाने नेली जाते!

मात्र गंमत अशी की पहिला दोनतीन मिनिटांत 'नाकाचे केस जळून गेले' की त्या वासाचे काहीच वाटेनासे होते. विमानाची वेळ होत आली म्हणून सहल निर्देशकाला प्रवाशांना तेथून अक्षरशः ढकलून बसकडे परत न्यावे लागले... बसमध्ये बसल्यावर मात्र या कारणासाठी एक दुसर्‍याचे पाय ओढण्यासाठी सगळ्यांची चढाओढ सुरू झाली!

परत जाताना बागेतल्या साधारण ३०-४० सेमी उंचीच्या या झुडुपांच्या गटाने माझे लक्ष वेधून घेतले. याचा वरून घेतलेला फोटो विमानातून काढलेला जंगलाचा फोटो म्हणून सहज खपून जाईल!

रोतोरुआचा विमानतळ लहानसा पण नीटनेटका आहे. पंखेवाल्या (propellers) माऊंट कुक एअरलाईनच्या विमानाने वेळेवर आकाशात भरारी घेतली आणि देखण्या रोतोरुआला टाटा करताना उगाचच कसेसे वाटले...

.

थोड्या वेळातच आमचे विमान न्यूझीलंडच्या अजून एका खास व्यवसायावरून उडू लागले... तो म्हणजे जंगल शेती...

.

.

गोर्‍या स्थलांतरीतांनी न्यूझीलंडची जंगले तोडून लाकडावर अवलंबून असणारे व्यवसाय सुरू केले. मात्र नंतर त्यांच्या ध्यानात आले की अशी जंगले बेफाटपणे तोडणे म्हणजे सोन्याचे अंडे देणार्‍या कोंबडीला मारण्यासारखे होईल. मग सरकारी पुढाकाराने १८९९ पासून तेथे जंगल शेतीचा उपक्रम राबवला गेला. सुरुवातीला अनेक प्रयोग करून मग १९३० साली रोतोरुआ जवळच्या व्हाकारेवारेवा प्रदेशात १८८,००० हेक्टर क्षेत्रफळावर जंगलाची लागवड केली गेली... हा या प्रकारचा जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. सध्या तेथे Monterey Pine (Pinus radiata) या मूळ कॅलिफोर्नियांतील झाडांची लागवड करतात. न्यूझीलंडच्या हवामानात आणि ज्वालामुखीने बनलेल्या गंधकयुक्त आम्ल जमिनीत ही झाडे कॅलिफोर्नियांतील झाडांपेक्षा जास्त वेगाने वाढत २७ वर्षांत कापणीस योग्य होतात असे आढळून आले आहे. क्रमाक्रमाने तोडलेल्या जागी परत लागवड करण्याचे नियोजन करून आता हा व्यवसाय स्थिर अवस्थेस पोचला आहे. या प्रयोगापासून भारतासारख्या देशाने खूप काही शिकण्यासारखे आहे.

६७३ किमी चे अंतर एक तास चाळीस मिनिटात तोडून आमचे विमान दक्षिण बेटावरील ख्राईस्टचर्चला उतरायची तयारी करू लागले...

.

एकेकाळी न्यूझीलंडचे भूषण असलेल्या आणि दक्षिण बेटावरील सर्वाधिक लोकसंख्येच्या या शहराला ०४ सप्टेंबर २०१० ते ०३ सप्टेंबर २०१२ या कालावधीत ४,४२३ भूकंपाच्या मोठ्या आणि छोट्या झटक्यांनी झंझोडून त्यातील १०,००० पेक्षा जास्त घरे जमीनदोस्त केली किंवा राहायला धोकादायक बनवली. यामुळे अनेक लोकांनी येथून कायमचे स्थलांतर करून इतर ठिकाणी राहणे पसंत केले. अर्थातच पर्यटनाचे एक मुख्य केंद्र असलेले हे शहर आता बहुतेक सहलींमधून वगळले गेले आहे. ग्लोबसच्या या सहलीत पूर्वी ख्राईस्टचर्चमध्ये एक रात्र वास्तव्य असायचे. पण धोका टाळण्यासाठी आणि अनेक चांगली हॉटेल्स बंद झाल्यामुळे सध्या ख्राईस्टचर्च विमानतळावरून सरळ बसने औराकी / माऊंट कुक राष्ट्रीय उद्यानाची वाट पकडायची होती.

हा बसप्रवास नयनरम्य परिसरातून होता. या भागाचे अजून एक वैशिष्ट्य असे की इथल्या नद्या उथळ आणि रुंद पात्राच्या आहेत. उन्हाळ्यात वितळणार्‍या हिमनद्यांच्या पाण्याने त्या दुथडी भरून वाहतात. पण इतर काळात त्यांचे उपप्रवाह उथळ तळातल्या वाळूत वेण्या घालताना केलेल्या केसांच्या लड्यांसारखे दिसतात. म्हणून या प्रवाहाच्या प्रकाराला ब्रेडिंग असे म्हणतात...

रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेकडो एकरांच्या हिरव्यागार गवताळ शेतांत मेंढ्या आणि गुरे चरताना दिसत होती...

.

वरच्या पहिल्या चित्रात दिसणारे उंच झाडांचे कुंपण ही या भागाची खासियत आहे. अशी ही उंच आणि मजबूत कुंपणे मेंढ्या आणि गुरांचे दक्षिणेकडून अंटार्क्टिकावरून येणार्‍या बोचर्‍या अतिशीत वार्‍यापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहेत.

मधूनच टुमदार घरांच्या छोट्या छोट्या वस्त्या लागत होत्या...

.

.

नयनरम्य निसर्गसौंदर्य पाहत बसप्रवासाचा वेळ कसा गेला ते कळले नाही...

.

.

औराकी / माऊंट कुक राष्ट्रीय उद्यानात पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. त्या संध्याछायेतही कुक पर्वत आपल्या हिमाच्छादित शिखरांचे दिमाखात प्रदर्शन करत होता... या पर्वतराजीला दक्षिण आल्प्स असेही ओळखतात.

राष्ट्रीय उद्यानाच्या जसजसे जवळ जाऊ लागलो तसे नदीत प्रतिबिंबित होणारी हिमाच्छादित पर्वतराजी त्या अंधुक प्रकाशात अधिकाधिक आकर्षक दिसू लागली...

आजची आमची वस्ती औराकी / माऊंट कुक राष्ट्रीय उद्यानातील हॉटेलमध्ये होती.

(क्रमशः )

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

4 May 2013 - 11:22 pm | मुक्त विहारि

आवडला..

बॅटमॅन's picture

4 May 2013 - 11:43 pm | बॅटमॅन

मस्त मस्त मस्त!!!! "टुमदार" या एका शब्दात सर्व फोटोंचे वर्णन करता येईल. :)

बाकी तो ३०-४० सेमीवाल्या झाडांचा फटू लैच खल्लास!!!

प्यारे१'s picture

5 May 2013 - 12:37 am | प्यारे१

छान. (हे पाकृंसारखं व्हायला लागलंय आता. नेहमी नवे शब्द आणावे कुठून?

मस्त मस्त. टुमदार घरे तर लै मस्त. :)

जुइ's picture

5 May 2013 - 6:12 am | जुइ

सर्व भाग वाचत आहे :)

मदनबाण's picture

5 May 2013 - 9:10 am | मदनबाण

मस्त ! :)
समुद्र आणि किनार्‍यावर येणार्‍या लाटांचा फोटु फार फार आवडला. :)

माहिती , फोटू नेहमीप्रमाणेच!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 May 2013 - 10:47 am | डॉ सुहास म्हात्रे

मुक्त विहारि, बॅटमॅन, प्यारे१, अभ्या.., जुइ, मदनबाण आणि रेवती : आपणा सर्वांना उत्साहवर्धक प्रतिक्रियांसाठी अनेक धन्यवाद ! आपल्या सहभागाने पुढची सहल अधिक रंगत जाईल अशी खात्री आहे.

गौरव जमदाडे's picture

5 May 2013 - 12:20 pm | गौरव जमदाडे

सहलीचा आनंद घेत आहे . पु.भा.प्र.

सुहास झेले's picture

5 May 2013 - 1:25 pm | सुहास झेले

मस्त... आमचीही मस्त सफर घडतेय :) :)

तुमचा अभिषेक's picture

5 May 2013 - 1:53 pm | तुमचा अभिषेक

तुमचे लिखाण चांगले की फोटोग्राफी हे समजत नाही, पण एकंदरीत सारेच मस्त मस्त मस्त..

अवांतर - तुमची ही प्रवासवर्णने एकमेवच अशी असावीत ज्यात क्रमशः डोक्यात न जाता बरे वाटते .. :)

कोमल's picture

5 May 2013 - 10:24 pm | कोमल

पुन्हा एकदा, लै भारी. सर्वच.. :)
वाचतीये, पु.भा.प्र.

स्पंदना's picture

6 May 2013 - 5:43 am | स्पंदना

मस्त. जाउन आल्यावर लिहिण्यासाठी इतकी स्मरणशक्ती म्हणजे खरच सल्युट!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2013 - 11:43 am | डॉ सुहास म्हात्रे

गौरव जमदाडे, सुहास झेले, तुमचा अभिषेक, कोमल आणि aparna akshay : आपणा सर्वांना सहभागाबद्दल अनेक धन्यवाद !

स्पा's picture

6 May 2013 - 11:56 am | स्पा

मस्त सुरुये सफर :)

फोटो निव्वळ अप्रतिम

महेश नामजोशि's picture

6 May 2013 - 12:30 pm | महेश नामजोशि

खरच तुम्ही कुठे जाउन आल्यावर नोंदवही ठेऊन सर्व नोंदी करता का ? नक्कीच, अन्यथा हे शक्य नाहि. असे नसेल तर मात्र तुमची स्मरण शक्ती असामान्यच आहे. तसेच तुमची माहिती काढण्याची, तेथील भौगोलिक, ऐतिहासिक, प्राचीन संदर्भ देण्याची सवयही अतिशय उत्तम आहे. अशीच सुंदर प्रवास वर्णने वाचायला मिळोत. मी काही वर्षांपूर्वी खोपोलीस असतांना तेथील लायब्ररीत असलेली बहुतक पुस्तके वाचली, त्यात प्रवास वर्णनेहि वाचली. पण खरे सांगतो त्या बर्याच मोठ्या लेखकांची प्रवास वर्णनेही इतकी सुंदर नव्हति. वाचताना सतत उत्कंठा असते. तीच मजा आहे.
महेश नामजोशी

सानिकास्वप्निल's picture

6 May 2013 - 12:30 pm | सानिकास्वप्निल

वाचायला मजा येत आहे :)
पुभाप्र

मस्तच.. सगळे भाग वाचते आहे.. :)

स्मिता.'s picture

6 May 2013 - 2:25 pm | स्मिता.

प्यारे१ ने लिहिलंय तसं हे पाकृंसारखं व्हायला लागलंय. प्रत्येकवेळी नवीन शब्द कुठून आणायचे? आमच्या नेहमीच्या शब्दांतूनच भावना समजून घ्या.
नयनरम्य फोटो आणि सोबतीला माहितीपूर्ण वर्णन यामुळे प्रत्येक भाग अगदी वाचनीय होतोय. तुम्ही लेखांमधून जी माहिती लिहिताय ती कदाचित जालावर शोधली तर सापडेलही. पण असं काय काय शोधून वाचणार? म्हणूनच तुमच्या सहलीच्या अनुशंगाने येणारी माहिती आम्हाला संपन्न करतेय.

पु.भा.प्र..

चेतन माने's picture

6 May 2013 - 5:14 pm | चेतन माने

खरच तो झाडांचा फोटू आफ्रिकेतल्या घनदाट वनांसारखा दिसतोय. बाकी सर्व फोटू एकदम झक्कास आलेत.
पुभाप्र :):):)

मोदक's picture

6 May 2013 - 5:27 pm | मोदक

भारी!!! वाचतोय!!!!

:-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2013 - 9:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्पा, महेश नामजोशि, सानिकास्वप्निल, Mrunalini, स्मिता., nishant, चेतन माने आणि मोदक : आपणा सर्वांना उत्साहवर्धक प्रतिक्रियांसाठी धन्यवाद !

तुम्ही ज्या बशीतून प्रवास केला तिचा फोटो आहे का..?

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2013 - 10:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

संपूर्ण बसचा एवढा एकच फोटो सापडला... लांब बस, पुढे मागे दारे, खाली पोटात सामान आणि वर २ X २ आरामदायक खुर्च्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2013 - 10:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

आणखी एक... बसमध्ये टॉयलेटची व्यवस्था असते.

मोदक's picture

8 May 2013 - 3:21 am | मोदक

धन्यवाद!

पैसा's picture

8 May 2013 - 9:48 am | पैसा

अतीव सुंदर!

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 May 2013 - 9:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !