फार-फार पूर्वी अयोध्येत सत्यव्रत नावाचा राजा राज्य करीत असेल. त्याचा राज्यात सुख, समाधान आणि शांतता नांदत होती. त्याला काहीही कमी नव्हते. एकदा नारद मुनीं कडून स्वर्गाचे वर्णन ऐकले होते. त्या दिवसापासून एकदा तरी स्वर्गाची वारी केली पाहिजे, देवराज इंद्रासोबत सोम पान करावे, रंभा, उर्वशी यांचा नृत्याचा आनंद घ्यावा. वेळ मिळाला तर इतर देवतांसोबत आपल्या पुण्यवान पूर्वजांचे दर्शन घेऊन जीवन कृतार्थ करावे. ही इच्छा त्याचा मनात घर करू लागली. पण स्वर्गात जाणे सोपे नव्हते. एखादा पुण्यात्मा मृत्युनंतर स्वर्गात जातो. पण त्या वेळी ही आपल्या तपोबलाच्या शक्तीने काही ऋषि-मुनी सदेह स्वर्गात येत-जात असे. असाच एखादा ऋषि आपली इच्छा पूर्ण करू शकतो, असे सत्यव्रताचे ठाम मत होते.
एक दिवस राजा सत्यव्रताला वार्ता मिळाली, ऋषि विश्वामित्र हिमालयात कठोर तपस्या करून काही काळ राहण्यासाठी अयोध्येत येत आहे. सहज चालून आलेला मौका सोडणार तो राजा कसला. सत्यव्रताने विश्वामित्रला पटवायचे ठरविले. राजने राजसी वस्त्रांचा त्याग केला, सामिष भोजन आणि मद्यपान सोडले. पीत वस्त्र धारण करून विश्वमित्राच्या सेवेस उपस्थित झाला. त्याचा सेवेने विश्वामित्र प्रसन्न झाले व म्हणाले राजन कठोर तपस्या करून मी अनेक सिद्धी प्राप्त केल्या आहे. तुझी इच्छा असेल तर एक अमोघ शक्ती तुला प्रदान करतो. जो पर्यंत ही शक्ती तुझ्या हातात असेल तुला कुणीही पराजित करू शकणार नाही. अश्या शक्त्या प्राप्त करणाऱ्या लोकांचे शेवटी काय होते हे सत्यव्रतास चांगलेच ठाऊक होते आणि सत्यव्रत मूर्ख ही नव्हता. सत्यव्रत म्हणाला, मुनि श्रेष्ठ मी क्षत्रिय आहे, मला आपल्या भुजांवर विश्वास आहे, युद्धात शत्रूशी लढताना मरण आले तरी मी सहज स्वीकार करेल, पण अशा शक्तीचे मी काय करणार जी प्राप्त झाल्यावर माणसाला राक्षस बनायला वेळ लागत नाही. मला अमोघ शक्ती नको, माझ्या मनात एकच इच्छा आहे, एकदा सदेह स्वर्गात जाऊन आपल्या पुण्यात्मा पूर्वजांचे आणि देवतांचे दर्शन करून जीवन कृतार्थ करावे.
ऋषि विश्वामित्र म्हणाले राजा, देवराज तुझ्या साठी स्वर्गाचे द्वार उघडणार नाही. त्या साठी मला तपोबल वापरावे लागेल. राजाने सरयू तटावर एकांत जागी विश्वामित्रांची कुटी बांधली, तपस्येची तैयारी सुरू झाली. सकाळी स्नान-संध्या करून राजा विश्वामित्र समोर उभा राहला. ऋषि विश्वामित्राने अभिमंत्रित काही त्याचा शरीरावर शिंपडले व उरलेले जल त्यास पिण्यास दिले. ऋषि म्हणाले राजा , तपस्येला सुरुवात झाल्या बरोबर, स्वर्गाच्या दिशेने तुझी कूच सुरू होईल. त्यास काही दिवस किंवा मास ही लागू शकतात. अभिमंत्रित जळामुळे तुझे शरीर वज्रापेक्षा ही कठोर झाले आहे. या जळाच्या प्राशन केल्याने भूक-तहान, ज्वर-व्याधी एवढेच नव्हे तर स्वर्गाची यात्रा पूर्ण हवेस्तव तुझे वय ही वाढणार नाही. विश्वामित्राने तपस्या सुरू केली आणि सत्यव्रताने स्वर्गाच्या दिशेने प्रयाण केले.
स्वर्गात एकाच खळबळ माजली. देवाधिदेव इंद्राने, इंद्रसभेचे विशेष अधिवेशन बोलविले. चर्चा सुरु झाली – माणूस मेल्यानंतर स्वर्गात येतो किंवा आपल्या तपस्येने देवतांना प्रसन्न करून, स्वर्गात येण्याचा परवाना मिळवितो. पण राजा सत्यव्रत तर, दुसर्याच्या तपोबलाच्या साह्याने स्वर्गात येत आहे. असे झाले तर कुणी ही दुष्टात्मा ऋषि विश्वामित्र सारख्यांच्या सहाय्याने स्वर्गात येईल. स्वर्गाचे, नर्क बनायला मग किती वेळ लागेल. स्वर्गाचे महत्व संपुष्टात येईल. हे देवतांना सहन होणे शक्य नव्हते. दीर्घ चर्चे नंतर देवतांनी प्रस्ताव पारित केला - सत्यव्रत महामूर्ख आहे. कुठल्या ही परिस्थितीत त्याला येऊ द्यायचे नाही. या विश्वामित्राला ही चांगलाच धडा शिकविला पाहिजे. पण धडा कोण शिकविणार, महान तपस्वी विश्वामित्रांशी पंगा घेण्याची हिम्मत ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादी कुठल्या ही देवतेत नव्हती. शेवटी ही जवाबदारी इंद्राने स्वीकारली. अखेर राजा होता तो. चित्रगुप्त कडून इंद्राने विश्वामित्रांचा संपूर्ण ‘बायोडाटा मागविला’. पण कुठली ही कमजोर कडी त्याला दिसली नाही.
सोमरस प्राशन केल्याशिवाय काही डोक्यात प्रकाश पडणार नाही असे इंद्रास वाटले. तो रंगमहालाच्या दिशेने निघाला. रंगमहालात मेनका नावाच्या एका अप्सरेचे नृत्य सुरू होते. इंद्राचे नृत्यात लक्ष लागत नव्हते. पण दोन –दिन पेग सोम रस घशात गेल्यावर इंद्राला हलके-हलके वाटू लागले, तो लक्ष देऊन नृत्य बघू लागला. मेनका दिसायला खरोखरच सुंदर आहे, गौर वर्ण, काळेभोर लांबसडक केस, मासोळी सारखे डोळे, सरळ नाक, बिंबफळा सारखे ओठ, ....(कालिदास ने केलेले शकुंतलेचे वर्णन वाचावे ) आजच्या भाषेत म्हणाल तर मिस वर्ड पेक्षा ही भारी सुंदर होती. मेनकेला पाहता-पाहता इंद्राच्या डोक्याची ट्यूब लाईट पेटली. अखेर विश्वामित्रांची कमजोर कडी सापडली. विश्वामित्र ब्रह्मचारी आहे. त्यांनी स्त्री ला कधी ही स्पर्श केलेला नाही. या मेनकेला विश्वामित्रांच्या समोर उभी केले तर काय होईल, हा विचार करता करता इंद्राच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या.
प्रतिक्रिया
9 Apr 2013 - 2:20 pm | श्री गावसेना प्रमुख
......आणी अशा तर्हेने मेनकेने विश्वमित्राचे तप भंग केले
9 Apr 2013 - 6:17 pm | अमोल केळकर
क्रमशः असे राहिले आहे का ? :)
अमोल केळकर
10 Apr 2013 - 12:49 pm | घाशीराम कोतवाल १.२
+१ अमोल भौ शी सहमत