या भेटायला... अर्थात् मिपा कट्टा - फेब्रुवारी २०१३!

इनिगोय's picture
इनिगोय in जनातलं, मनातलं
26 Jan 2013 - 1:28 pm

तमाम मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण.. भेटीचे.

इथे खफ-खव-व्यनि-मधून मनसोक्त गफ्फा हाकल्यानंतर आता प्रतेक्क्श भेटीचा घाट घालत आहो.
कट्ट्याचा (तुर्तास नक्की झालेला) तपशील असा..

दिवस :- रविवार ३ फेब्रुवारी २०१३
स्थळ :- चर्चगेट, मुंबई
वेळ :- सकाळी ११ वाजता

यावेळेस नेहमीप्रमाणे बैठा कट्टा न करता चर्चगेट-नरिमन पॉईंटचा फेरफटका आणि मग खादाडी असा जरा वेगळा बेत ठरवण्याची फर्माईश जुन्याजाणत्या मिपाकरांकडून झाली आहे, तद्वत यावेळचा कट्टा हा 'चालता-फिरता' असणार आहे.

कट्ट्याला हजेरी लावू इच्छिणार्‍यांनी किसन शिंदे, विश्वनाथ मेहेंदळे आणि मला एकत्रित व्यनि करावा..

मुंबईस्थित आणि त्यावेळी मुंबईत असू शकणार्‍या समस्त मिपाकर मंडळीचं कट्ट्यावर स्वागत आहे, हेवेसांनल :)

तर मंडळी, पुरेऽऽऽसे आधी कळवले असल्याने धमाल करायला जरूर या. भेटूच.

.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

बाबा पाटील's picture

26 Jan 2013 - 1:54 pm | बाबा पाटील

पुणेकर आपण कधी ??? पुन्यात कट्टा कधी असेल तर कळवा आवर्जुन हजेरी लावु.....

सस्नेह's picture

26 Jan 2013 - 2:11 pm | सस्नेह

पुण्यातून मुंबई खूप जवळ आहे..

दादा कोंडके's picture

26 Jan 2013 - 2:14 pm | दादा कोंडके

प्रवासाच्या वेळेत पोरांना सांभाळण होईल की. ;)

बाबा पाटील's picture

26 Jan 2013 - 3:22 pm | बाबा पाटील

पन तुमच्या मुंबईत गाडी चालवायला गळ्याला फास लागतो की वो,मागच्या महिन्यात चर्नी रोडला एका लग्नाला निघालो पन सी एस टी ला पोहचलो...

कवितानागेश's picture

26 Jan 2013 - 3:03 pm | कवितानागेश

चालण्यासाठी कॅनव्हास शूज घालून यायचं का हो ताई? ;)

मुक्त विहारि's picture

26 Jan 2013 - 3:05 pm | मुक्त विहारि

च्यायला भारतात असतो तेंव्हा कट्टे भरवायला काय होते?

आता जरा घरा बाहेर पडलो, तर लगेच कट्टे चालू झाले...

मजा करा..

चुचु's picture

26 Jan 2013 - 5:15 pm | चुचु

ह्म्म

टवाळ कार्टा's picture

27 Jan 2013 - 1:08 am | टवाळ कार्टा

हेच म्हन्तो

उपास's picture

27 Jan 2013 - 3:09 am | उपास

सहमत..

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jan 2013 - 3:15 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/happy/clicking-your-heels-smiley-emoticon.gif

प्रचेतस's picture

26 Jan 2013 - 4:16 pm | प्रचेतस

कट्ट्यास येण्याचा प्रयत्न अवश्य केला जाईल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Jan 2013 - 4:56 pm | निनाद मुक्काम प...

मुंबईकरांचा कट्टा क्या बात हे.
रामदास काका जर टूर लीडर असतील तर फोर्ट व नरिमन पोइंत चा समग्र इतिहास मिपाकरांना समजून सांगतील.
भटकंती करत रमतगमत कट्टा करण्याची कल्पना आवडली.

किसन शिंदे's picture

26 Jan 2013 - 4:59 pm | किसन शिंदे

अर्थातच काका असणार. :)

यशोधरा's picture

26 Jan 2013 - 6:30 pm | यशोधरा

कट्ट्याला शुभेच्छा.

अग्निकोल्हा's picture

26 Jan 2013 - 6:45 pm | अग्निकोल्हा

.

क्लिंटन's picture

26 Jan 2013 - 6:58 pm | क्लिंटन

कट्ट्याला शुभेच्छा.

(गेल्या साडेपाच वर्षात दोनच कट्ट्यांना हजेरी लावलेला) क्लिंटन

सुनील's picture

26 Jan 2013 - 7:35 pm | सुनील

शुभेच्छा!

फोटोसहीत वृतांत टाकायाला विसरू नका!

पैसा's picture

26 Jan 2013 - 8:36 pm | पैसा

३ तारखेला येणं शक्य नाही पण कट्ट्याला शुभेच्छा! वृत्तांताच्या बाबतीत अर्धवटाचा आदर्श ठेवा ही विनंती. रामदास काका नक्की असतील तर जमल्यास व्हिडो काढून ठेवा. आणि वृत्तांत लिहायला विसरू नका!

नंदन's picture

27 Jan 2013 - 1:43 am | नंदन

३ तारखेला येणं शक्य नाही पण कट्ट्याला शुभेच्छा! वृत्तांताच्या बाबतीत अर्धवटाचा आदर्श ठेवा ही विनंती. रामदास काका नक्की असतील तर जमल्यास व्हिडो काढून ठेवा. आणि वृत्तांत लिहायला विसरू नका!

तंतोतंत!

३ तारखेला येणं शक्य नाही पण कट्ट्याला शुभेच्छा! वृत्तांताच्या बाबतीत अर्धवटाचा आदर्श ठेवा ही विनंती. रामदास काका नक्की असतील तर जमल्यास व्हिडो काढून ठेवा. आणि वृत्तांत लिहायला विसरू नका!

बाडीस!

सूड's picture

26 Jan 2013 - 9:00 pm | सूड

मी येईनच !!

पैसा's picture

26 Jan 2013 - 9:43 pm | पैसा

तुझी दादरची चुलतबहीण?

किसन शिंदे's picture

26 Jan 2013 - 9:49 pm | किसन शिंदे

पण ती तर आता आॅस्ट्रेलियात एमबीए करतेय म्हणे!?

पैसा's picture

26 Jan 2013 - 9:51 pm | पैसा

परवा ५० ने तिने काढलेले सी एस टी चे फोटो पाहिले म्हणे!

५० फक्त's picture

28 Jan 2013 - 10:27 am | ५० फक्त

नुसते सिएसटीचे नाही तर सिडनीतुन काढलेले सिएसटिचे, कसला भारी क्यामेरा घेतला आहे म्हाति का ?

सारखी आठवण निघताना बघून स्वाक्षरीत खालील प्रमाणे बदल करावा की काय असा प्रश्न पडलाय.
नवी स्वाक्षरी:
आठवण तुझी सारखी निघे सदस्यांची पालखी
रोज ओले मिपाचे चार डोळे.

सूड's picture

27 Jan 2013 - 9:39 am | सूड

वाचताय ना विमेकाका ? ('बघताय ना बापू?' च्या चालीवर वाचावे.)

अभ्या..'s picture

26 Jan 2013 - 10:05 pm | अभ्या..

यायला जमणार नाही तरीपण आम्हा पामरांना फटूसहित चोख वृत्तांताद्वारे कट्ट्याचा लाभ घडवा.
कट्ट्याला शुभेच्छा

जोशी 'ले''s picture

26 Jan 2013 - 10:32 pm | जोशी 'ले'

कट्ट्यास शुभेच्छा :-)

येण्याचा प्रयत्न करेन . अब्या ये कि , गुर्जि तुमीपण .. मजा येइल .

अभ्या..'s picture

26 Jan 2013 - 10:55 pm | अभ्या..

अब्या ये कि , गुर्जि तुमीपण

आता तू एवढे प्रेमाने बोलावतेस तर यीवू की. ;) गुर्जी करा तयारी आता. उचलतो तुम्हाला पुण्यातून. :)

जेनी...'s picture

26 Jan 2013 - 10:59 pm | जेनी...

यु आ चो च्वीट अब्या :D

तुझी येण्याची गॅरंटी नाही देता येत... ;)

- पिंगू

कुणाची रं कुणाची रं .. त्याची का माझी ?? :)

लाजु नकु लाजु नकू =))

पिंगू's picture

26 Jan 2013 - 10:56 pm | पिंगू

मी येऊ शकेन असे वाटतयं.. बघुया..

- पिंगू

दिल्गिर आहे .. चुकुन १३ वाचलं :-/

नै जमनार म्ग :(

शुभेच्छा :)

अभ्या..'s picture

26 Jan 2013 - 11:43 pm | अभ्या..

आता काय? तू दिलगीरी व्यक्त करुन बसलीस मग आम्ही काय करायचं?
आसं नादी लावणं लै वैट्ट बघ. :(

जेनी...'s picture

26 Jan 2013 - 11:47 pm | जेनी...

तु ये कि १४ ला बँड्रा स्टेशनाव भेटु ... तिथनं मग शारुक खानचा बंगला बगाय जाउ
माउंट मेरीच्या चर्च मध्ये जाऊ .. :)

बँड स्टँड ला नक्को बै :-/ ... खुप घाण करुन ठेवलिय तिकडं ... :(

किसन शिंदे's picture

27 Jan 2013 - 12:24 am | किसन शिंदे

कृपया धाग्याचा खरडफळा करू नये.

जेनी...'s picture

27 Jan 2013 - 1:11 am | जेनी...

ब्वॉर्र्र्र्र :-/

प्रभाकर पेठकर's picture

27 Jan 2013 - 12:44 am | प्रभाकर पेठकर

३ फेब्रू? नाही जमायचे. वाईट वाटते आहे पण नाईलाज आहे. तुमच्या कट्ट्यास शुभेच्छा.
मी येईन तेंव्हा पुण्यात किंवा मुंबईत कट्टा करू.

प्रभाकर पेठकर
(बैठ्या कट्ट्याचा पुरस्कर्ता)

इष्टुर फाकडा's picture

27 Jan 2013 - 4:18 am | इष्टुर फाकडा

कट्ट्यासाठी सुभेच्छा :) पुण्यातल्या कट्ट्याची एप्रिल मध्ये वाट बघणारा फाकडा !

आनन्दिता's picture

27 Jan 2013 - 7:49 am | आनन्दिता

अमेरिकेत कदि असनार वो कट्टा?

शैलेन्द्र's picture

27 Jan 2013 - 9:28 am | शैलेन्द्र

अरे वा, जमवायचा प्रयत्न केला जाइल..

अमोल केळकर's picture

27 Jan 2013 - 11:49 am | अमोल केळकर

कट्ट्याला शुभेच्छा :)

अमोल केळकर

आसलं बारकं बारकं कट्टं कराच, पन कंदीतरी मिपाकरांच येक महासंमेलन बी करा. लै आवडंल.
सद्या तरी म्हमई कट्ट्याला माज्या सुबेच्चा.

५० फक्त's picture

28 Jan 2013 - 10:27 am | ५० फक्त

सहकुटुंब यायचं आहे का कसं ?

किसन शिंदे's picture

28 Jan 2013 - 12:31 pm | किसन शिंदे

सहकुटुंब यायचं आहे का कसं ?

सहकुटूंब आलात तरी चालेल. त्यानिमित्ताने २५फक्तची भेट तरी होईल. :)

आदूबाळ's picture

30 Jan 2013 - 2:39 am | आदूबाळ

पुरुष-वर्चस्ववादी प्रतिसाद! :))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2013 - 10:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कट्ट्याला शुभेच्छा. वृत्तांत तपशिलवार लिहायला विसरु नका.

-दिलीप बिरुटे

घाशीराम कोतवाल १.२'s picture

28 Jan 2013 - 10:51 am | घाशीराम कोतवाल १.२

नरिमन पॉईंट मग आपण तयार है........

स्पंदना's picture

28 Jan 2013 - 12:06 pm | स्पंदना

मी "स्पा" च्या वतीने अनुमोदन देत आहे.

मी "स्पा" च्या वतीने अनुमोदन देत आहे.

ऑ ?

कट्ट्याला शुभेच्छा :)

नक्शत्त्रा's picture

28 Jan 2013 - 12:44 pm | नक्शत्त्रा

सहकुटुंब कट्ट्याला शुभेच्छा.
तपशिलवार फोटो सहीत वृत्तांत लिहायला विसरु नका.
भारताबाहेर पण एकदा भरावा ना ....... कट्टा !!!
मिसळ पावच्या मेनू सोबत!!!!!!!!!!!!!!!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Jan 2013 - 4:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

याव म्हणतो... प्रयत्न करतो नक्की.

सानिकास्वप्निल's picture

29 Jan 2013 - 4:52 am | सानिकास्वप्निल

कट्ट्याला शुभेच्छा
फोटो व वृतांताच्या प्रतिक्षेत :)

श्रीरंग_जोशी's picture

29 Jan 2013 - 6:49 am | श्रीरंग_जोशी

माझी मुंबईमध्ये पायी फिरायची संधी हुकली...

सुर's picture

29 Jan 2013 - 12:05 pm | सुर

मी पण सहकुटुंब येणार...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Jan 2013 - 12:54 am | विश्वनाथ मेहेंदळे

वेळ जमत नसल्याने कट्ट्याला शुभेच्छा !!!

प्रभाकर पेठकर's picture

30 Jan 2013 - 12:58 am | प्रभाकर पेठकर

हो नं! रविवारी पहाटे पहाटे ११ वाजता पोहोचायचं म्हणजे जरा अतीच होते आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Jan 2013 - 1:25 am | विश्वनाथ मेहेंदळे

मला तर पहाटे पहाटे १० ला मुंबईच्या दुसऱ्या टोकाला जायचे आहे.

स्पा's picture

30 Jan 2013 - 9:21 am | स्पा

ऑ?

हे रा म

वेळ जमत नसल्याने कट्ट्याला शुभेच्छा !!!

आँ? आयोजकच गळायला सुरुवात??

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Jan 2013 - 11:24 am | विश्वनाथ मेहेंदळे

आयोजकांमध्ये माझे नाव क्लेरिकल मिष्टेकमुळे गेले आहे. खुद्द देवाधिदेव किसनदेव करी शस्त्र धरून युद्ध करीत असताना आम्ही युक्तीच्या चार काय एकही गोष्ट सांगायची गरज नाही.

आतापर्यंत ही नावं नक्की झाली आहेत.

  1. अन्या
  2. ग्लिफ
  3. घाशींराम कोतवाल
  4. तीरशिंगराव माणूसघाणे
  5. निखिल देशपांडे
  6. निम
  7. पिंगू
  8. प्रथम फडणीस
  9. मस्त कलंदर
  10. मिसळलेला काव्यप्रेमी
  11. रामदास काका
  12. लिमाऊजेट
  13. शैलेंद्र
  14. सुझे
  15. सुड
  16. सुर
  17. स्नेहांकिता
  18. किसन
  19. इनिगोय

या सर्वांना तपशीलाचा व्यनि करत आहोत.
यात तुमचं नाव राहून गेलं असेल तर प्लीज उद्या दुपारपर्यंत (१ फेब) व्यनिमधून भ्रमणध्वनि क्रमांकासकट कळवा..

अक्षया's picture

31 Jan 2013 - 12:30 pm | अक्षया

कट्ट्याला शुभेच्छा :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

31 Jan 2013 - 5:41 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

गवि नाहीत??
गवि हा अन्याव आहे!!! :(

इनिगोय's picture

1 Feb 2013 - 7:27 pm | इनिगोय

घोर अन्याव, आमच्यावर पण!

श्रावण मोडक's picture

31 Jan 2013 - 6:57 pm | श्रावण मोडक

शुभेच्छा... रामदासांना अधिक. ;-)

शुचि's picture

31 Jan 2013 - 7:54 pm | शुचि

जळवा जळवा :(
कट्ट्याला अनेकानेक शुभेच्छा.

मस्त कलंदर's picture

31 Jan 2013 - 11:57 pm | मस्त कलंदर

एकाच वेळेस "नक्की येतो" असं सांगूनही निखिल आणि माझ्यामध्ये निम,पिंगू,प्रथम फडणीस ही मंडळी कशी काय मध्येच कडमडली असा विचार करतेय..

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Feb 2013 - 3:33 pm | बिपिन कार्यकर्ते

अगदी अगदी... मी पण हाच विचर करत होतो... आणि मी तर म्हणतो, उगाच दोन दोन नावं टंकायची काय गरज? नुसतं, मस्त कलंदर एवढं लिहिलं असतं तरी भागलं असतं की! ;)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

1 Feb 2013 - 1:05 pm | घाशीराम कोतवाल १.२

पॉईंटला नक्कि कुठे भेटु ते जरा सांगाल का ?

प्रभाकर पेठकर's picture

2 Feb 2013 - 2:07 am | प्रभाकर पेठकर

वा..वा... एवढे जणं जमत आहेत ह्याचे कौतुकच आहे. अजुनही येतील.
फिरत्या कट्ट्याला 'मोर्चा'चे स्वरूप येत असेल तर पोलीसांची पूर्व परवानगी घेऊन ठेवलेली बरी.

इरसाल's picture

31 Jan 2013 - 2:03 pm | इरसाल

आम्चं नाव कदी येनार लिस्टात ?

शुभेच्छा राहिल्याच की.
ह्या घ्या शुभेच्छा.

मी-सौरभ's picture

31 Jan 2013 - 4:37 pm | मी-सौरभ

चालण फिरण काम नाय आपलं
पेठकर काका आले की बैठ्या कट्ट्याला हजेरी लावली जाईल

गवि's picture

31 Jan 2013 - 4:41 pm | गवि

अगदी अगदी..

पण पेठकरकाकांच्या हातचे पदार्थ मिळणार असतील आणि त्यासाठी चालत्याफिरत्या कट्ट्याच्यी पूर्वअट असेल तर मात्र तयारी आहे.... कारण ती संधी सोडणे नाही.. :)

सह लेंगे थोडाबहुत.. (उदय शेट्टी (नाना पाटेकर): "वेलकम" सिनेमा)

५० फक्त's picture

31 Jan 2013 - 5:31 pm | ५० फक्त

कंसाच्या उल्लेखाने, एक हातगाडी घेउन मिपाकर नरिमन पॉईंटला ' कांदा ले लो, आलु ले लो' असे ओरडत फिरत आहेत, किंवा फोर्टच्या वन वे टु वे च्या घोळात घोड्यावरुन फिरता फिरता बाकी मिपाकर दिसले की, ' वो रुकता नही है ना ' अशी तक्रार करत आहेत असे दृश्य दिसले,

आनंद घारे's picture

31 Jan 2013 - 11:32 pm | आनंद घारे

मी बहुतेक कोणालाच भेटलेलो नाही, त्यामुळे प्रत्यक्ष भेटायला आवडेल, पण काही शंका आहेत.
१.वयोमर्यादा. माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश मिळेल का? की आमची अडचण होईल?
२.चालता फिरता म्हणजे किती पायपीट असेल?
३.चर्चगेट स्टेशनावर मिपाकरांना कसे ओळखायचे?
४.आयत्या वेळी आले तर चालेल की आधीपासून बुकिंग करायलाच पाहिजे?
गेले काही दिवस काही कारणांमुळे मला इंटरनेटवर मिपापर्यंत पोचायलाच मिळाले नाही. त्यामुळे संपर्क कसा साधायचा ते समजत नव्हते.

कवितानागेश's picture

1 Feb 2013 - 12:00 am | कवितानागेश

किसन/इनिगोय्/मी यांच्यापैकी कुणालाही व्यनि करुन तुमचा फोन नम्बर कळवा. तिथे पोचल्यावर फोनवरुन बोलता येइल आणि भेटता येइल.
बाकी नरिमन पॉइंटपासून गिरगाव चौपाटीपर्यंत अखंड कट्टा आहे, दमल्यावर बसण्यासाठी. :)

आनंद घारे's picture

1 Feb 2013 - 10:07 am | आनंद घारे

मी जरूर प्रयत्न करीन. मी मिपाचा जुना सदस्य असल्यामुळे इथे माझे काही मित्र आहेत, पण त्यांची नावे यादीत दिसली नाहीत. कदाचित त्यांनी मुखवटे बदललेले असणे शक्य आहे किंवा त्यांनीही माझ्यासारखा आळस केला असेल.
माझा भ्रमणध्वनी इनिगोय यांना व्यनिने क्ळवला आहे.

तुमच्या व्यनिला प्रतिसादवले आहे, माझा क्रमांकही कळवलाय.

दादा कोंडके's picture

1 Feb 2013 - 1:07 am | दादा कोंडके

येंजोय माडी.

सूड's picture

1 Feb 2013 - 11:26 am | सूड

आमचा आपला साधा चालता फिरता कट्टा आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Feb 2013 - 12:00 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हाहाहाहा !!!!

सुर's picture

1 Feb 2013 - 1:02 pm | सुर

येंजोय माडी. म्हणजे :- येंजोय करा..

दादा कोंडके's picture

1 Feb 2013 - 1:02 pm | दादा कोंडके

आमचा आपला साधा चालता फिरता कट्टा आहे.

बरं, येंजॉय ताडी. :)

यसवायजी's picture

1 Feb 2013 - 10:57 pm | यसवायजी

:-))

श्रावण मोडक's picture

1 Feb 2013 - 3:38 pm | श्रावण मोडक

ही खंत आहे का?