तमाम मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण.. भेटीचे.
इथे खफ-खव-व्यनि-मधून मनसोक्त गफ्फा हाकल्यानंतर आता प्रतेक्क्श भेटीचा घाट घालत आहो.
कट्ट्याचा (तुर्तास नक्की झालेला) तपशील असा..
दिवस :- रविवार ३ फेब्रुवारी २०१३
स्थळ :- चर्चगेट, मुंबई
वेळ :- सकाळी ११ वाजता
यावेळेस नेहमीप्रमाणे बैठा कट्टा न करता चर्चगेट-नरिमन पॉईंटचा फेरफटका आणि मग खादाडी असा जरा वेगळा बेत ठरवण्याची फर्माईश जुन्याजाणत्या मिपाकरांकडून झाली आहे, तद्वत यावेळचा कट्टा हा 'चालता-फिरता' असणार आहे.
कट्ट्याला हजेरी लावू इच्छिणार्यांनी किसन शिंदे, विश्वनाथ मेहेंदळे आणि मला एकत्रित व्यनि करावा..
मुंबईस्थित आणि त्यावेळी मुंबईत असू शकणार्या समस्त मिपाकर मंडळीचं कट्ट्यावर स्वागत आहे, हेवेसांनल :)
तर मंडळी, पुरेऽऽऽसे आधी कळवले असल्याने धमाल करायला जरूर या. भेटूच.
.
प्रतिक्रिया
2 Feb 2013 - 5:15 pm | सूड
सदर प्रतिसादक मराठीतल्या नक्की कोणत्या माडीबद्दल बोलतोय ते कळलं नव्हतं, शेवटी ही मराठीतली माडी नाही असं कळून ज्ञानात भर पडली.
1 Feb 2013 - 1:07 pm | घाशीराम कोतवाल १.२
कधी माडी कधी ताडी नक्कि चाललय काय ?
1 Feb 2013 - 3:50 pm | आनंद घारे
येंजॉय(इंग्रजी एंजॉय ) = मजा करा
माडि (कानडी) = करा .... या शब्दाची खरे तर गरज नाही 'एंजॉय' यात 'करा' आले
ताडी .. मराठीतलाच शब्द .. पिण्याच्या माडीचा पर्याय .. बहुधा आणखी कुठल्या माडीची आठवण येऊ नये म्हणून दिलेला
1 Feb 2013 - 7:23 pm | इनिगोय
कट्ट्याचा नक्की झालेला कार्यक्रम असा आहे. -
चर्चगेट स्टेशनवरून येणारे मिपाकर्स सकाळी ११ वाजता इरॉस सिनेमापाशी जमतील.
सीएसटीहून येणारे मिपाकर्स सकाळी ११ वाजता स्टेशनबाहेर बृमनपासमोरच्या एक्झिटला भेटतील.
हे दोन्ही ग्रुप्स तिथून पुढे एकत्र भेटून भटकंती करणार आहेत.
विशेष नोंद.. उद्याच मुंबईचा फेमस काळा घोडा फेस्टिव्हल सुरू होतोय.
त्यामुळे आपल्यासाठी KGAF ची व्हिजिट हा बोनस असणार आहे.. B)
1 Feb 2013 - 8:26 pm | नानबा
एक शंका.. सीएसटी वरून अजून कोण येणार आहे कळू शकेल का? आणि त्यांपैकी कुणाचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळू शकेल का?
2 Feb 2013 - 10:40 am | स्पा
प्लान जमवायचा प्रयत्न सुरु आहे...
होप फॉर दि बेस्ट
2 Feb 2013 - 11:10 am | ५० फक्त
मा. मिस्पाजी, कुठल्या मजल्यावरचा प्लॅन जमवता आहात ?
2 Feb 2013 - 11:30 am | स्पा
मा. श्री. ५० आणे जी
तुम्हाला भारीच चवकशा हो
3 Feb 2013 - 11:27 pm | टवाळ कार्टा
कट्टा रिपोर्ट???
3 Feb 2013 - 11:32 pm | जेनी...
कट्ट्याला आल़ होतं का कुणी का उगाच ???
( अवांतर : अजुन काहि धागा आला नाहि म्हुन म्ह्न्ल ... गविंसारखा लाइव का नै केला
तेवढीच मज्जा कराय मिळाली असती धाग्यावर .... :-/ )
3 Feb 2013 - 11:42 pm | टवाळ कार्टा
4 Feb 2013 - 12:00 am | सुहास झेले
कट्टा जोरदार झाला... मज्जा आली.
आदीजोशींनी वृतांत लिहायचे मनावर घेतलंय. थोडा वेळ देऊया की त्याला ;-)
4 Feb 2013 - 12:08 am | अभ्या..
सुझे उगी तुम्ही सांगताव म्हणून थांबतो बघा.
पण वेळ म्हण्जे किती? उद्या सकाळपर्यंत करा जुळणी कायतरी आन टाका.
मन लै अधीर झालय. एकतर जमलं नाय कट्ट्याला यायला. :(
4 Feb 2013 - 1:11 pm | गवि
अभ्याशी सहमत. तातडीने कट्टा वृत्तांत यावा.
आता उत्तमसा शिनेमा रिलीज व्हायच्या आधी टीजर्स आणि ट्रेलर्स असतात त्याप्रमाणे हा एक फोटो इथे डकवत आहे. हा फोटो सूत्रांकडून मिळालेला असून हे सूत्र कोण हे वृत्तांतात कळेलच असे वाटते.
या प्रकाशचित्रामुळे धागा येण्यापूर्वी वातावरणनिर्मिती व्हावी आणि धागा लिहीणार्यास अधिकचे मोटिव्हेशन मिळावे..
4 Feb 2013 - 1:24 pm | अभ्या..
अहो गविराज ह्याच ट्रेलरमुळे उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे.
बादवे फटूतले दिलखुलास हसणारे सूत्रधार किसन, रामदासकाका आणि निदेसाहेब यांना सोडून बाकी सर्वजण अनोळखी वाटतायत आत्तातरी. कृपया नामनिर्देशनासहित फोटो असलेल्या वृत्तांताची पूर्तता करावी.
4 Feb 2013 - 1:35 pm | गवि
हो तर. मलाही तुमच्याइतकीच उत्सुकता आहे. सर्वच अनोळखी नसले तरी काहीकाही आहेत.
कट्ट्याला गेलेल्यांपैकी जे कोणी हा वृत्तांत लिहीत आहेत त्यांनी तो लवकर लिहावा अशी विनंती करत आहे.
4 Feb 2013 - 1:48 pm | सूड
कसा झाला कट्टा ते लवकर लिहा !!
4 Feb 2013 - 5:17 pm | इरसाल
ह्या सगळ्यांना पोलीसांनी का पकडुन ठेवले होते ? (नाय म्हटल बाजुलाच गाडी आहे म्हणुन हे विवंचना)
4 Feb 2013 - 5:19 pm | गवि
बृमुंपोच्या दंगलविरोधी पथकाचं वाहन आहे का ते? मग बरोबर.. "घटनास्थळी" आले असतील.
4 Feb 2013 - 9:25 pm | सुनील
एक रामदास सोडून कूणालाच ओळखता आले नाही! जुने कट्टेकरी कुठे गायबले?
बाकी रामदासांच्या बाजूला उभे असलेल्यांना पाहून आनंद दिघेंची आठवण आली!
5 Feb 2013 - 9:37 am | घाशीराम कोतवाल १.२
te braazil return vilasrao aahet
5 Feb 2013 - 10:26 am | चौकटराजा
ते कडेवरचे मिपाकर सर्वात आवडले बॉ आपल्याला !
5 Feb 2013 - 7:39 pm | मालोजीराव
सगळे अनोळखी हायेत राव....पटकन ओळखी टाका कि !
ऋषीमुनी पण आले होते काय कुंभमेळा सोडून कट्ट्याला ? :P
4 Feb 2013 - 12:13 am | जेनी...
आदी काकांना म्हणावं ज्यादा शीरेस लिवु नका .. स्टार्ट टू येंड
कसं कट्ट्यात असल्यावाणी वाटाय पायजेलाय ....
एकदम खुम्खुमित लिवा व आदीकाका ... पण वाइस लव्कर ...
मला बै मौ इन्नो आणि माझ्या गिल्फुकाकांना बघायचय ......
:)
4 Feb 2013 - 2:09 am | शुचि
आदिजोशींचे लेख वाचलेत का तू? खूप विनोदी असतात. ते गंभीर नाही लिहीणार! डोंट वरी.
4 Feb 2013 - 2:13 am | किसन शिंदे
ह्या ह्या ह्या..
अपेक्षेप्रमाणे तुमचे गिल्फुकाका आलेच नाहीत. :D
4 Feb 2013 - 2:19 am | अभ्या..
भारीच ब्वा तुमच्या अपेक्षा.
तुम्ही तर होतात ना. बस्स मग. ;)
4 Feb 2013 - 9:49 am | मिसळलेला काव्यप्रेमी
किसनद्येवही भोज्जा करुन पळून गेले. :-|
4 Feb 2013 - 11:14 am | घाशीराम कोतवाल १.२
+ १
सहमत आहे
4 Feb 2013 - 2:29 am | जेनी...
:( ...
:-/
5 Feb 2013 - 5:47 am | टवाळ कार्टा
"आदिकाका"???
आयला...पहिला बॉम्ब तुझ्यावरच फुटणार =))
4 Feb 2013 - 9:40 am | नक्शत्त्रा
पूजासारखी मी हि वाट पाहत आहे ..
कसा जाहला कट्टा ........
फोटो आणी सविस्तर व्व्तांताची वाट पाहत आहे. आदिजोशींचे लेख....
वाचकांसाठी मेजवानीच तारणार तर.
4 Feb 2013 - 2:23 pm | आनंद घारे
का आणि किती आली ते वृत्त्तांतात वाचायला मिळेलच.
4 Feb 2013 - 2:40 pm | प्रतिज्ञा
मला तर जमणारच नव्हत ..... पुढच्या वेळी नक्की यीन ... :(
4 Feb 2013 - 3:03 pm | निवेदिता-ताई
कट्ट्याला शुभेच्छा.:)
5 Feb 2013 - 12:38 am | चिंतामणी
कट्ट होउन गेला.
३ तारखेला.
5 Feb 2013 - 12:43 am | दादा कोंडके
आता पुढचा कट्टा आला तरी या वृत्तांताचा धागा आलाच नाही.
4 Feb 2013 - 4:15 pm | यशोधरा
अॅड्या लिही की लवकर!
4 Feb 2013 - 4:25 pm | यशोधरा
अॅड्या लिही की लवकर!
4 Feb 2013 - 5:15 pm | इरसाल
अॅड्या लिही की लवकर!
4 Feb 2013 - 5:20 pm | यशोधरा
LOL! :D
4 Feb 2013 - 5:30 pm | पैसा
लिही की लवकर!
4 Feb 2013 - 5:36 pm | इरसाल
ये लगा पैसा चौका (बीएसएनएल च्या तालावर) पैसा सबसे आगे.
4 Feb 2013 - 5:45 pm | गवि
अॅडीभाऊ, लिहा बुवा लवकर.. ५
4 Feb 2013 - 5:56 pm | जेनी...
जोशी काका लिवावो लवकर ...
वैसे फोटु मे डावेबाजुसे फश्ट मे उभे हय वो बहुत स्मार्ट हय ...
सोच्री हु उन्कू काका बोलु कि नकु :(
द्विधा मनश्तितिमे हय मय :-/
4 Feb 2013 - 11:04 pm | कवितानागेश
फोटोची डावी बाजू की तुझी?
दोघाम्ना काका म्हणू नकोस. तेच तुला काकू म्हणू शकतात. :)
5 Feb 2013 - 12:36 am | चिंतामणी
5 Feb 2013 - 12:42 am | जेनी...
ए मौ .. असं कै नसतं हं ! :-/
माझा एक काका माझ्यापेक्षा ३ वर्षाने लहाने .... तरी मी त्याला काकाच म्हणते :-/
त्याच्या मैत्रीणींसमोर तर मुद्दाम " ए काका ! " असं म्हणते =))
सो मोरलोफ्देस्टोरी ... मी त्या दोघानाहि काका ... कक्काजान असं म्हणु शकते ... :)
बायदवे मी फोटु बघताना माझ्या डाव्या बाजुला असणारा काका सॉल्लिड स्मार्टे :)
काका यु लूक्किन स्मार्ठ हं ! :)
आता बोल :-/
:P
4 Feb 2013 - 5:59 pm | यशोधरा
इनिगोय, तू खरं तर वृ लवकर यायची जाबदारी घ्यायला हवीस. आमच्यावेळी असं नव्हतं बै! बंगलुरात मोजून ३ कट्टे केले आम्ही. (भौतेक) वृ लग्गेच लिहिला होता :P
4 Feb 2013 - 6:16 pm | इनिगोय
:D :D
पण येतोय, वृत्तांत येतोय.. कसंय ना, दिवसभऽऽर चाललेल्या कट्ट्याचा वृत्तांत लिहायचा तर वेळ जास्त लागणारच ना!
4 Feb 2013 - 6:19 pm | जेनी...
जोशी काका व्रुत्तांत पण चालत चालत लिवतायेत काय ??? :D
:P
4 Feb 2013 - 6:50 pm | आदिजोशी
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, लवकरच वॄत्तांत टाकतोय मी.
4 Feb 2013 - 8:12 pm | शुचि
लवकर ची आपली व्याख्या? :(
4 Feb 2013 - 7:52 pm | ऋषिकेश
श्री आदीजोशी यांना किती वेळ लागणार आहे ते सांगावे म्हंजे हा धागा सारखा आशेने उघडायला नको ;)
4 Feb 2013 - 7:53 pm | जेनी...
.
4 Feb 2013 - 9:07 pm | नानबा
नाही.. उलट आम्हीच त्या बिचार्या बंदोबस्तावरच्या पोलिसांची कुचंबणा करत होतो.. त्यांना गाडीमध्ये सावलीत बसून सुखाने बंदोबस्त करायला द्यायचा सोडून उलटे त्यांच्याच गाडीसमोर उभे राहून फोटु काढत होतो.. :)
5 Feb 2013 - 1:25 am | पिवळा डांबिस
ते रामदासकाकांच्या शेजारी उभे असलेले जटा-दाढीवाले कोण आहेत?
ते श्रीगुरुजी तर नव्हेत?
:)
5 Feb 2013 - 1:32 am | जेनी...
अरे देवा !
मी तर त्या जटा दाढीवाल्या काकांनाच रामदास काका समजतेय :(
ओ लवकर टाकावो व्रुत्तांत .... फुक्कट डोकं खाजवायला का लावताय :-/
5 Feb 2013 - 1:35 am | श्रीरंग_जोशी
दाराज कट्टा
5 Feb 2013 - 1:42 am | जेनी...
ऑव ... गॉडिठ!!!!!
थेंक्य्हु वॅर्ही माच्छ रॅंंन्घा ़ खॅखा !!! :D
5 Feb 2013 - 2:12 am | श्रीरंग_जोशी
पोरी, भारतात परत गेल्यावर अमेरिकेत राहणार्या मराठी जनांचा उद्धार होईल असे बोलायचा सराव सुरू केलास की काय?
5 Feb 2013 - 2:29 am | जेनी...
ऑव नॉ खॅखॅ .... म्ह्यि अॅज्युन एयिथीच हाय ... भॅर्थॅथ येला अॅज्युन्ह डॉन ड्यिवॅश बॅखी
हाय :-/
5 Feb 2013 - 1:48 am | पिवळा डांबिस
मी तर त्या जटा दाढीवाल्या काकांनाच रामदास काका समजतेय
हा हा हा!
नाही नाही, रामदासकाकांचा आणि जटांचा दूरान्वयानेही काही सबंध नाही!!! हां आता छोटीशी हनुवटीवरची दाढी ठेवतात ते, पण ते आपलं सहज हौस म्हणून!!!! :)
(हाणतात आता मला रामदासकाका!!)
5 Feb 2013 - 1:54 am | जेनी...
=))
पिंडा काका ... रामदास काकांचा आणि जटांचा दुरान्वये संबण्ध नाहि आणि
आता तो कधी येणारहि नाहि हे दाराज कट्टा बघितल्याव लक्षात आलं =))
आणि हनुवटीवरच्या चिनुकल्या दाढीच्या लंबी उमर साठी मिल्के दुवा मांगेंगे ):D
( रामदास काका हलकं घ्या हं ! )
5 Feb 2013 - 5:25 pm | सूड
पिडां..डां वर अनुस्वार !!
5 Feb 2013 - 6:50 pm | पैसा
भाषाभक्षक वाल्गुदेय आपली भाषा मराठी आणि लिपी देवनागरी हे विसरून गेलाय या पिडेमुळे :|
5 Feb 2013 - 7:25 pm | सूड
पुप्स के आगे रोना और अपना शुद्धलेखन खोना!! ;)
5 Feb 2013 - 8:27 pm | अत्रुप्त आत्मा
@वाल्गुदेय आपली भाषा मराठी >>> =)) वाल्गुदेयस्य बाजार उठयीत: =))
5 Feb 2013 - 8:27 pm | श्रीरंग_जोशी
कुठे तरी अनुस्वार द्यावा लागतो हे तिने ध्यानात ठेवले ही खरंच कौतुकाची बाब आहे...
5 Feb 2013 - 7:14 pm | रामदास
इलीयास महाराज आहेत.
5 Feb 2013 - 7:20 pm | शुचि
मला स्वाती, निदे, रामदास व किसन शिंदे माहीत आहेत. माझा कयास - नीळ्या शर्टात मध्यभागी तिमा असावेत.
5 Feb 2013 - 7:46 pm | इनिगोय
कट्ट्याचा वॄत्तांत येईतो असे अंदाज अजून येऊदेत.. :D
नक्की माहीत असलेली नावं फोडू नका फक्त ;)
5 Feb 2013 - 7:52 pm | शुचि
नाही फोडत. :)
पिवळ्या टॉप मधली तू आहेस का इनिगोय? मला वाटतय तसं.
5 Feb 2013 - 7:35 pm | सानिकास्वप्निल
वृतांत कुठे आहे??
कधी लिहिणार??
5 Feb 2013 - 7:57 pm | शुचि
विमेंनी मागे उभे राहूनही मोठे स्मितहास्य दिले आहे. पुढचे सर्व अगदी छान हसताहेत. विमे सोडता मागची फळी का अशी (म्हणजे विशेष हासरी नाही अशी)? :P
6 Feb 2013 - 12:43 am | विश्वनाथ मेहेंदळे
आयला, मी झोपेत कट्ट्याला गेलो की काय ??
6 Feb 2013 - 11:08 am | गवि
सूक्ष्मदेहाने कट्ट्याला गेला असाल आणि शुचिताईंच्या सूक्ष्मदृष्टीला फोटोत दिसले असाल. बाकीच्यांची तितकी साधना नसल्याने दिसला नाहीत इतकंच.. ;)
5 Feb 2013 - 7:59 pm | यशोधरा
अॅड्याच्या मागची इनि आहे असं वाटतंय. :)
5 Feb 2013 - 8:18 pm | शुचि
अच्छा ते पिवळे शर्ट्वाले अॅडी जोशी का?
5 Feb 2013 - 8:31 pm | यशोधरा
मी असं कायच म्हटलेलं नाही ह्याची नोंद घे शुचि! :d
5 Feb 2013 - 8:35 pm | शुचि
:) ओक्के
5 Feb 2013 - 8:41 pm | अभ्या..
खर तर हा फोटो आधीचाच जुना आहे. आता फक्त वृत्तांताच्या नावाने शेंड्या चालू आहेत.
5 Feb 2013 - 8:44 pm | रेवती
हैला! मी इनिगोय म्हणून बुवा एक्सपेक्ट करत होते. आता नक्की बुवा की बै हे सपष्ट करा बुवा! ;)
5 Feb 2013 - 8:56 pm | शुचि
वाच तीत इनिगोयला ताई म्हणून संबोधले आहे.
5 Feb 2013 - 9:15 pm | श्रीरंग_जोशी
किमान लेखन विषय व शैलीवरून तरी असा गैरसमज व्हायला नको...
5 Feb 2013 - 8:53 pm | दादा कोंडके
मला सगळे ओळखू आले पण बाइकजवळ दिसणारं धुरकट बोट कुणाच आहे हे ओळखायचा प्रयत्न करतोय.