आज नेताजी सुभाष जयंती

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
23 Jan 2013 - 2:50 pm

akherJPG

भारतीय स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या व परकिय सत्तेवर निर्णायक घाव घालण्यासाठी 'आजाद हिंद सेनेला' घेउन शत्रूवर निर्णायक हल्ला करायला निघालेल्या व दुर्दैवाने स्वप्न साकार होण्याआधीच अनंतात विलिन झालेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आज त्यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त सादर वंदन.

इतिहासप्रकटनसद्भावना

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

23 Jan 2013 - 2:57 pm | सोत्रि

सुभाषबाबूंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

-(सुभाषबाबूंचा भक्त) सोकाजी

धमाल मुलगा's picture

23 Jan 2013 - 3:34 pm | धमाल मुलगा

अरे हो की. आज २३ जानेवारी!
धन्यवाद साक्षीदेवा..साफ विसरुन गेलो होतो मी.

एक देशप्रेमानं पार वेडं झालेलं वादळ ह्याशिवाय दुसरी उपमाच सुचत नाही सुभाषबाबूंसाठी.

देश स्वतंत्र करण्यासाठीच्या त्यांच्या अपरिमित कष्टांची तुलनाच करवत नाही.

स्वतंत्र राष्ट्राची घोषणा करुन, एक दोन नव्हे, नऊ राष्ट्रांची मान्यता मिळवून, आझाद हिंदचे निराळे चलन. वापरात आणण्यासारख्या गोष्टी करण्यासाठी खरंच हिम्मत लागते. अन् तेही अश्या परिस्थितीत, जेव्हा जनमतचा कौल असलेली सर्वात मोठी देशी शक्ती पुर्या ताकदीनिशी विरोधात असताना!

अत्यंत कर्तबगार, परंतु तितकाच दुर्दैवी सेनानी.

काय बोलु अन काय नको अशी अवस्था होते नेताजींचा विषय निघाला की. तेवदहा इथेच थांबतो.

आजानुकर्ण's picture

24 Jan 2013 - 2:34 am | आजानुकर्ण

जेव्हा जनमतचा कौल असलेली सर्वात मोठी देशी शक्ती पुर्या ताकदीनिशी विरोधात असताना!

कोणती बरे ही शक्ती? महात्मा गांधी तर नव्हे? (की ज्यांना राष्ट्रपिता या अभिधानाने सर्वप्रथम गौरवणारे सुभाषबाबूच होते. (दुवा))

असो सुभाषचंद्र बोस यांची महती सिद्ध करण्यासाठी इतर कोणत्याही नेत्याचे अवमूल्यन करण्याची गरज नाही असे वाटते. नेताजींच्या स्मृतीला अभिवादन.

पुण्याचे वटवाघूळ's picture

25 Jan 2013 - 7:59 am | पुण्याचे वटवाघूळ

कोणती बरे ही शक्ती? महात्मा गांधी तर नव्हे?

अहो महात्मा गांधीच. आपला नेता किती महान होता हे सांगताना महात्मा गांधींना चार-दोन टपल्या मारल्याशिवाय यांना समाधान मिळत नाही.

मृत्युन्जय's picture

25 Jan 2013 - 2:28 pm | मृत्युन्जय

आपला नेता किती महान होता हे सांगताना

एकुणात तुम्ही वेगळे काय केलेत? " नेताजींना त्यांचा नेता ठरवुन मोकळे झालात. म्हणजे तुमचा त्यांचा काहीच संबध नाही. गांधी तुमचे, नेताजी त्यांची असेच ना? दुर्दैव आहे देशाचे.

पुण्याचे वटवाघूळ's picture

28 Jan 2013 - 1:37 pm | पुण्याचे वटवाघूळ

नाही हो. गांधीजी किती महान होते हे सांगताना इतर नेत्यांच्या टपलीत मारायची आमची पध्दत नाही.

नितिन थत्ते's picture

28 Jan 2013 - 1:45 pm | नितिन थत्ते

>>इतर नेत्यांच्या टपलीत मारायची आमची पध्दत नाही.
ते बहुतेक इतर नेते डोक्यावर काहीतरी घालत (टोपी/हॅट/पगडी) असत त्यामुळे टपलीत मारता येत नसावी.

पुण्याचे वटवाघूळ's picture

28 Jan 2013 - 3:31 pm | पुण्याचे वटवाघूळ

ते बहुतेक इतर नेते डोक्यावर काहीतरी घालत (टोपी/हॅट/पगडी) असत त्यामुळे टपलीत मारता येत नसावी.

याला म्हणतात थत्तेचाचांचा प्रतिसाद. वल्लभभाई पटेल आणि गांधीजी सोडल्यास इतर सर्वच महत्वाच्या नेत्यांच्या डोक्यावर टोपी/पगडी/हॅट इत्यादी काहीतरी असायचे :)

कशावरुन महात्मा गांधी आणि कशावरुन त्यांना टपल्या मारल्या? एकतर सिध्द करा नाहीतर विधान मागे घ्या!

माझ्या माहितीप्रमाणे बॅ.भुलाभाई देसाई, राजेंद्रप्रसाद, आचार्य कृपलानी, राजाजी, एके काळचे अत्यंत जवळचे मित्र असे जवाहरलाल नेहरु ही मातबर मंडळी आणि महात्मा मोहनदास करमचंद गांधी हे दोन्ही वेगवेगळे आहेत. अर्थातच काँग्रेसही माझ्यामाहितीप्रमाणे केवळ काँग्रेस=गांधी असं नसावं.

आणि आपला नेता-दुसर्‍याचा नेता? आनंद आहे! त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनाला आज किती वर्षं उलटली? अजुनही हे दुहीचं विष तसंच पोखरतं आहे. आनंद आहे.
गांधीवादाची हत्या गांधीअनुयायांनीच केली हे पदोपदी किती सार्थ ठरतंय ते पटतंय.

धमाल मुलगा's picture

28 Jan 2013 - 4:08 pm | धमाल मुलगा

मी शक्ती असं लिहिलंय. व्यक्ती असं दिसतंय का ते?

>>कोणती बरे ही शक्ती?
देशामध्ये असलेला तत्कालीन सर्वात मोठा पक्ष कोणता बरे होता? काँग्रेस ना? मग तीच तर शक्ती म्हणतोय मी.
नौजवानसभा, अनुशीलन समिती, युगंतर, अभिनव भारत, हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी ह्या आणि अश्या कित्येक शक्ती आपापल्या परीनं स्वातंत्र्यासाठी झगडत होत्याच. परंतू सर्वात मोठी असलेली आणि जनमताचा अनुनय असलेली शक्ती कोणती बरे होती? :)

>>महात्मा गांधी तर नव्हे?
ते तर काँग्रेस नावाच्या एका संघटनेचा एक भाग होते ना? त्यांनाच जर काँग्रेस असं म्हणणं असेल तर काँग्रेसमध्ये कार्यरत राहून कित्येक कामं करणार्‍या इतर कर्तबगार नेते/कार्यकर्त्यांचं श्रेय हिरावण्याचा प्रकार नाही का बरे ठरत? निदान माझी तरी तशी भूमिका नाही.

>>(की ज्यांना राष्ट्रपिता या अभिधानाने सर्वप्रथम गौरवणारे सुभाषबाबूच होते. (दुवा))
अलबत!
गांधी आणी बोस ह्यांचे वैयक्तिक पातळीवरचे संबंध कसे घनिष्ट होते त्याबद्दल प्रत्यवाय असण्याचं काही कारणच दिसत नाही. :)

सुभाषचंद्र बोस यांची महती सिद्ध करण्यासाठी इतर कोणत्याही नेत्याचे अवमूल्यन करण्याची गरज नाही असे वाटते

केवळ एका महात्माने दाखवलेल्या मार्गाऐवजी इतर मार्गांनी स्वातंत्र्यासाठी रक्ताचं पाणी करणार्‍यांबाबत विषय निघताच हा गांधींचा उपमर्द आहे असे वाटण्याची अथवा येनकेनप्रकारे ओढूनताणून तो गांधीद्वेष सिध्द करण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही असे वाटते.

महेश हतोळकर's picture

28 Jan 2013 - 4:29 pm | महेश हतोळकर

केवळ एका महात्माने दाखवलेल्या मार्गाऐवजी इतर मार्गांनी स्वातंत्र्यासाठी रक्ताचं पाणी करणार्‍यांबाबत विषय निघताच हा गांधींचा उपमर्द आहे असे वाटण्याची अथवा येनकेनप्रकारे ओढूनताणून तो गांधीद्वेष सिध्द करण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही असे वाटते.

you said it!

आजानुकर्ण's picture

28 Jan 2013 - 5:46 pm | आजानुकर्ण

तुमचे दोन्ही प्रतिसाद जोडले तर साधारण हे असे दिसते.

पहिला प्रतिसादः

जेव्हा जनमतचा कौल असलेली सर्वात मोठी देशी शक्ती पुर्या ताकदीनिशी विरोधात असताना!

दुसरा प्रतिसादः

देशामध्ये असलेला तत्कालीन सर्वात मोठा पक्ष कोणता बरे होता? काँग्रेस ना? मग तीच तर शक्ती म्हणतोय मी.
नौजवानसभा, अनुशीलन समिती, युगंतर, अभिनव भारत, हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी ह्या आणि अश्या कित्येक शक्ती आपापल्या परीनं स्वातंत्र्यासाठी झगडत होत्याच. परंतू सर्वात मोठी असलेली आणि जनमताचा अनुनय असलेली शक्ती कोणती बरे होती?

ते तर काँग्रेस नावाच्या एका संघटनेचा एक भाग होते ना? त्यांनाच जर काँग्रेस असं म्हणणं असेल तर काँग्रेसमध्ये कार्यरत राहून कित्येक कामं करणार्‍या इतर कर्तबगार नेते/कार्यकर्त्यांचं श्रेय हिरावण्याचा प्रकार नाही का बरे ठरत? निदान माझी तरी तशी भूमिका नाही.

आता या दोन्ही प्रतिसादांवरुन तुम्हाला असे म्हणायचे आहे की काँग्रेस ही जनमताचा कौल असलेली शक्ती as a party सुभाषबाबूंच्या विरोधात होती.ते सुद्धा पूर्ण ताकदीनिशी. म्हणजे ब्रिटिशांविरोधात लढण्याऐवजी आपली पुरी शक्ती सुभाषबाबूंच्या विरोधात लढण्यात खर्च करण्यात काँग्रेसला रस होता. याबाबत तुम्हाला कुठे वाचायला मिळाले हे कळाल्यास बरे होईल. सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष निवडणुकीतून निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेस हा पक्ष त्यांच्या विरोधात होता हे विधान बिनबुडाचे आहे.

केवळ एका महात्माने दाखवलेल्या मार्गाऐवजी इतर मार्गांनी स्वातंत्र्यासाठी रक्ताचं पाणी करणार्‍यांबाबत विषय निघताच हा गांधींचा उपमर्द आहे असे वाटण्याची अथवा येनकेनप्रकारे ओढूनताणून तो गांधीद्वेष सिध्द करण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही असे वाटते.

धमाल मुलगा's picture

28 Jan 2013 - 6:16 pm | धमाल मुलगा

केवळ वितंडवादापुरतं शब्दच्छल करणे किंवा एखाद्यानं न केलेलं विधान त्याच्याशी जुळवणं ह्यात आपल्याला तरी काही मझा वाटत नाही. वस्तुस्थिती नाकारुन किंवा तिला वळसा घालून घडलं त्यात फरक पडत नाही.

ज्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाबद्दल बोलता आहात..ते एकदा नव्हे, सलग दोनदा सुभाषबाबूंकडेंच होतं. दुसर्‍या निवडणूकीला विजयश्री ही पुर्‍या विरोधातूनही खेचून आणली होती त्यांनी. ते ही असोच. एकुणच काँग्रेस+सुभाषचंद्र बोस हा इतिहास पुन्हा एकदा नीट पाहिला तर मी म्हणालो ते नक्की काय, ते लक्षात न येण्याजोगं बिलकुलच नाही. पण असोच.
मी म्हणालो ते आरोप वाटले तर वाटोत बापुडे.
बिनबुडाचे म्हणाल तर तसं तर तसं! चर्चेमध्ये शब्दच्छलामध्ये अन विवादामध्ये सहज हरण्याजोगाच आमचा एकुण आवाका. पण त्यानं वस्तुस्थिती लपेल काय? :)

आजानुकर्ण's picture

28 Jan 2013 - 7:47 pm | आजानुकर्ण

मी काहीही शब्दच्छल केलेला नाही. तुमचे दोन्ही प्रतिसाद मी कॉपी पेस्ट केले आहेत. त्यात तुम्ही न केलेले विधान येण्याची शक्यता नाही. तुम्हाला गांधींजींऐवजी काँग्रेस अभिप्रेत होते हे तुम्ही स्पष्ट केल्याने काही शंका उपस्थित झाल्या. काँग्रेस ही जनमताचा कौल असलेली शक्ती जर सुभाषबाबूंच्या विरोधात असेल तर काँग्रेसच्या प्रतिनिधिंपुरताच मर्यादित असलेल्या मताधिकाराने सुभाषबाबू काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून येतात यात काही विरोधाभास दिसत नाही का तुम्हाला? दुसऱ्या निवडणुकीची विजयश्री कोणाच्या विरोधातून खेचून आणली होती ते मला कळले नाही. तिथे काही नॉन काँग्रेसींनी मतदान करुन काँग्रेसींचा पुरा विरोध मिटवण्याइतकी मते सुभाषबाबूंना देऊन त्यांना विजयी केले? निदान काँग्रेस ही शक्ती विरोधात आहे म्हणजे नक्की कोण विरोधात आहे तेवढे स्पष्ट केले तरी चालेल. शिवाय काँग्रेस पक्ष पुरता विरोधात असूनही सुभाषबाबूंना काँग्रेसच्याच अध्यक्षपदी का निवडून यावेसे वाटते आणि काँग्रेसी प्रतिनिधी पुरते विरोधात असूनही सुभाषबाबूंना का निवडून देतात तेही कळले तर बरेच होईल.

धमाल मुलगा's picture

28 Jan 2013 - 8:00 pm | धमाल मुलगा

एंजाॅय. द ट्रोलिंग!

आजानुकर्ण's picture

28 Jan 2013 - 8:20 pm | आजानुकर्ण

a troll (pron.: /ˈtroʊl/, /ˈtrɒl/) is someone who posts inflammatory,[1] extraneous, or off-topic messages in an online community, such as a forum, chat room, or blog, with the primary intent of provoking readers into an emotional response[2] or of otherwise disrupting normal on-topic discussion.[3]

नेताजींच्या अभिवादनपर प्रस्तावात 'कोणीतरी' त्यांना विरोध केला होता वगैरे विषयाशी बिलकुल संबंधित नसलेले वाक्य माझे नव्हते. असे वाक्य पोस्ट करुन वाचकांना त्या कोणाविरोधात भडकवणे हा माझा हेतू नव्हता. त्यामुळे निदान मी तरी ट्रोलिंग करत नाही असे दिसते. मी केवळ विषयाशी संबंधित नसलेल्या उपचर्चेवर 'असे कोणीतरी नव्हतेच' एवढेच सिद्ध करुन अशा स्वरुपाच्या ट्रोलिंगला विरोध केला इतकेच. तरीही मला ट्रोल म्हणण्यास माझी हरकत नाही कारण ते खरे नाही. इथे चर्चेतही नसलेल्या गोष्टी सिद्ध करण्याचा प्रयत्न झालाच आहे.

सर्वसाक्षी's picture

28 Jan 2013 - 11:23 pm | सर्वसाक्षी

१९३९ च्या निवडणुकीत कॉग्रेसच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षपदासाठी निवडणुक झाली. नेताजींनी ती निवडणुक लढविणे गांधी महाशयांना पसंत नव्हते. त्यांनी पट्टाभींना आपला उमेदवार म्हणुन उभे केले आणि निवडणुक प्रतिष्ठेची केली. तरीही नेताजींचाच विजय झाला. दणदणीत विजय. मात्र लोकशाही प्रक्रियेने निवडुन आलेल्या नेताजींना मतदारांचा कौल मिळाला हे गांधी महाशयांना पचविता आलं नाही. त्यांनी पट्टाभींचा पराभव फारच व्यक्तिश: घेतला आणि 'हा माझाच पराभ मानतो' अशी जाहिर भूमिका घेतली. ते इतकेच करुन थांबले नाहीत तर त्यांनी आपला नापसंतीचा सूर आळवतच ठेवला. स्वत:पेक्षा पक्ष आणि ध्येय मोठे मानणार्‍या नेताजींनी अखेर राजिनामा दिला.

जे आपल्याला सोयीचे नाही ते खोटे व द्वेषग्रस्त असा अनेकांचा खाक्या असतो. एखाद्या व्यक्तिला आदरस्थानी ठेवल्यावर त्या व्यक्तिच्या उणीवा दाखविलेल्या त्यांना सहन होत नाहीत. त्यामुळेच तु केलेले परिस्थितीचे वर्णन करणारे विधान यांना झोंबले. सत्य कथनाला मग 'टपल्या मारणे' वगैरे स्वरुप दिले गेले. असो.

चेतन's picture

29 Jan 2013 - 5:57 pm | चेतन

नेताजींना आदरांजली आणी आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद साक्षिदेवा
>> जे आपल्याला सोयीचे नाही ते खोटे व द्वेषग्रस्त असा अनेकांचा खाक्या असतो.
सहमत पण ते दोन्ही बाजुंना सारखेच लागु आहे.

येथे गांधी आणि बोस यांच्यातील वादाबद्दल थोडिफार संग्रहीत माहिती वाचायला मिळेल.
http://middlab.middlebury.edu/files/2012/05/Woodworth_VictoriesReversed1...

राहुन राहुन एकाच गोष्टीचं वाईट वाटतं ते नेतांजींना मिळालेलं भारतरत्न वादाच्या भोवर्‍यात अडकण्याबद्दल.

अवांतरः थोडेसे गुढ नेताजींच्या म्रूत्युच्या चौकशीसमितीच्या (तिसर्‍या) अहवाला बद्दल जो कोणतेही ठोस कारण न देता नाकारला. आणि अहवालात नाकारुन देखिल एका टिव्ही मुलाखतित मुखर्जी साहेबांनी गुमनामी बाबांना नेताजी मानणं
RTI चा उपयोग करुन अनुज धर यांनी मिळ्वलेली माहिती देखील संभ्रमात टाकणारी आहे
http://en.wikipedia.org/wiki/Mission_Netaji
तसेच ब्रिटीशांनी देखिल माहिती २०२१ पर्यंत उघड करण्यास दिलेला नकार सगळच कस गुढ.

आजानुकर्ण's picture

29 Jan 2013 - 6:31 pm | आजानुकर्ण

तुमचाही माझ्याप्रमाणेच गैरसमज झाला आहे. प्रस्तुत सदस्याला कोठेही गांधीजी अपेक्षित नव्हते त्यामुळे त्याच्याच शब्दात सांगायचे म्हणजे-

कशावरुन महात्मा गांधी आणि कशावरुन त्यांना टपल्या मारल्या? एकतर सिध्द करा नाहीतर विधान मागे घ्या!

असो.

आता राहिली गोष्ट अशा स्वरुपाच्या चर्चांची. क्रांतिकारकांच्या कार्याबद्दल येथे सर्वांनाच आदर असावा. मात्र असे विषय चर्चेला घेऊन हळूच गांधी किंवा काँग्रेसला टपली मारण्यात मला कोणतेही हशील दिसत नाही. गांधींचा सुभाषबाबूंना एवढा विरोध असूनही सुभाषबाबूंनी त्यांना राष्ट्रपिता म्हटले तेव्हा स्वतः नेताजींना गांधींबाबत असलेला आदर अधोरेखित झाला. सुभाषबाबूंबाबत असलेला आदर अधोरेखित केल्याने गांधींना टपल्या मारण्याचा हक्क मिळत नाही. सुभाषबाबूंच्या नावाखाली आपल्या मनातील गांधींविषयीचा किंतू येथे बाहेर काढणे हे गांधीइतकेच सुभाषबाबूंसाठीही अवमानकारक आहे. मुळात तुमच्या-माझ्यासकट सर्व सदस्यांचे स्वातंत्र्य किंवा राजकारण याबाबत काडीचेही योगदान नसताना दिवंगत क्रांतिकारकांचे अभिवादनाचे प्रस्ताव चघळायला घेऊन त्याआडून क्रांतिकारकांइतकेच योगदान असलेल्या गांधी आणि काँग्रेसची नालस्ती करणे हा मूळ हेतू असल्यास तो आपल्या क्रांतिकारकांसाठी अपमानकारक आहे. गांधींचे जे काही तथाकथित अपराध होते त्याचा बदला गांधींचा खून करुन गांधीविरोधकांनी घेतला. आता तरी त्यांचे कर्तृत्व समजून घ्यायला हरकत नसावी. गांधींचे कर्तृत्त्व समजून घेण्याची इच्छा नसली तरी क्रांतीकारकांच्या स्मृतीचे पावित्र्य राखण्यासाठी अशा अभिवादनांतून गांधींवर चिखलफेक करण्याची गरज नसावी.

पुण्याचे वटवाघूळ's picture

29 Jan 2013 - 9:00 pm | पुण्याचे वटवाघूळ

नेताजींनी ती निवडणुक लढविणे गांधी महाशयांना पसंत नव्हते. त्यांनी पट्टाभींना आपला उमेदवार म्हणुन उभे केले

तुम्हाला नेताजी पसंत होते म्हणून गांधीजींनाही ते पसंत असावेत आणि नेताजी निवडणुकीला उभे राहणार म्हटल्यावर गांधींनी आपला उमेदवार उभा करूच नये हा अट्टाहास का?

त्यांनी पट्टाभींचा पराभव फारच व्यक्तिश: घेतला आणि 'हा माझाच पराभ मानतो' अशी जाहिर भूमिका घेतली. ते इतकेच करुन थांबले नाहीत तर त्यांनी आपला नापसंतीचा सूर आळवतच ठेवला.

लोकशाही पध्दतीतही शेवटचा उपाय म्हणून अशा 'डिस्क्रिशनरी पॉवर' कोणाकडे तरी दिलेल्या असतात.अमेरिकन अध्यक्षाच्या हातात व्हेटो असतो तर भारतीय राष्ट्रपती एखादे बिल एकदा नाकारू शकतो.त्याकाळी गांधींजींना अशी 'डिस्क्रिशनरी पॉवर' कोणी आपणहून दिलेली नसली तरी इतर कोणाही नेत्यापेक्षा गांधींच्या मागे जनाधाराचे व्यापक समर्थन होते त्यातून 'स्वयमेव मृगेन्द्रता' या न्यायाने ती पॉवर आपोआप गांधीजींकडे आली.आणि त्यांनी उठल्यासुटल्या कसलाही विचार न करता अशी पॉवर वरचेवर वापरली असती तर त्यांना मिळत असणारे समर्थन कमी झाले असते.

काँग्रेसची भूमिका पहिल्यापासून नाझी-फॅसिस्ट-जपान या अक्ष देशांना विरोध करायची होती.पण आतल्या खलबतांमध्ये सुभाषबाबूंचा जपान-जर्मनीकडे असलेला कल महात्मा गांधींच्या लक्षात कशावरून आला नसेल?असा अध्यक्ष बनणे म्हणजे संघटनेच्या एका मुख्य तत्वाला हरताळ फासणे आणि कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करणारे कशावरून ठरले नसते?कदाचित या कारणावरून सुभाषबाबू अध्यक्ष म्हणून गांधीजींना कशावरून नको असतील्?आणि अशा कारणावरून त्यांनी डिस्क्रिशनरी पॉवरचा वापर कशावरून केला नसेल?

स्वत:पेक्षा पक्ष आणि ध्येय मोठे मानणार्‍या नेताजींनी अखेर राजिनामा दिला.

हे म्हणजे मेकिंग व्हर्च्यु ऑफ नेसेसिटी झाले. शेवटी काँग्रेसमध्ये गांधीजींचाच शब्द प्रमाण होता आणि आपल्या मागचा जनाधार कमी होत आहे हे लक्षात येऊन अध्यक्ष म्हणून काम करायला अडचण येऊ नये म्हणून कशावरून नेताजींनी आधीच राजीनामा दिला नसेल?

जे आपल्याला सोयीचे नाही ते खोटे व द्वेषग्रस्त असा अनेकांचा खाक्या असतो. एखाद्या व्यक्तिला आदरस्थानी ठेवल्यावर त्या व्यक्तिच्या उणीवा दाखविलेल्या त्यांना सहन होत नाहीत.

+१. नेमके असेच जे क्रांतिकारक समर्थक गांधीजींना नावे ठेवतात त्यांच्याविषयी वाटते.

सर्वसाक्षी's picture

29 Jan 2013 - 10:33 pm | सर्वसाक्षी

"लोकशाही पध्दतीतही शेवटचा उपाय म्हणून अशा 'डिस्क्रिशनरी पॉवर' कोणाकडे तरी दिलेल्या असतात.अमेरिकन अध्यक्षाच्या हातात व्हेटो असतो तर भारतीय राष्ट्रपती एखादे बिल एकदा नाकारू शकतो"
काय सांगता काय? म्हणजे अमेरीकेचा पराभूत राष्ट्राध्यक्ष जेत्या राष्ट्राध्यक्षाला पदच्युत करु शकतो? अरे वा. ही माहिती नव्यानेच मिळाली. पण काय हो, जर पडला तर तो सत्तेवरच नाही, मग त्याला व्हेटो पॉवर कशी मिळणार?

एखाद्या लोकशाही राष्ट्रात बहुमताने निवडुन आलेला नेता स्वतःला पसंत नाही म्हणुन एखाद्या राष्ट्रपतीने वा राष्ट्राध्यक्षाने या कारंणास्तव पदच्युत केल्याचे एखादे उदाहरण द्याल काय?

हे म्हणजे मेकिंग व्हर्च्यु ऑफ नेसेसिटी झाले. शेवटी काँग्रेसमध्ये गांधीजींचाच शब्द प्रमाण होता आणि आपल्या मागचा जनाधार कमी होत आहे हे लक्षात येऊन अध्यक्ष म्हणून काम करायला अडचण येऊ नये म्हणून कशावरून नेताजींनी आधीच राजीनामा दिला नसेल? फारच विनोदी:))))))). पुढची निवडणुक तर पुढच्या वर्षी होती हो, मग ते तडकाफडकी जनाधार संपल्याच्या कारणास्तव राजिनामा का देतील? आणि नेताजी आपली मते आपले विचार स्पष्ट मांडुन व ते लोकांना आदरणीय वाटल्यानेच त्यांना निवडुन दिले गेले होते. एकाएकी तो जनादार कसा काय नाहीसा होइल?

मूळ मुद्याला तुम्ही सोयिस्कर बगल दिल्याचे लक्षात आले आहे, लपले नाही. 'माझ्या उमेदवाराचा पराभव म्हणजे माझा पराभव पराभव' या त्राग्याचे काय? निदान लोकशाहीत तरी पराभव स्विकारायची प्रांजल वृत्ती आणि हिंमत असावी. आपल्या उमेदवाराचा पराभव का झाला यावर आत्मपरिक्षण व्हायला हवे होते. याउलट 'लोकांना कोणाचे नेतृत्व मान्य असावे हे मी ठरविणार' हा अहंकार उघड झाला.

म्हणजे थोडक्यात काय तर 'मला लोकशाही हवी, नेता मतदानाने निवडला जावा मात्र मतपत्रिकेवर कुणाचे नाव असावे हे मी ठरविणार !'

पुण्याचे वटवाघूळ's picture

30 Jan 2013 - 12:58 pm | पुण्याचे वटवाघूळ

काय सांगता काय? म्हणजे अमेरीकेचा पराभूत राष्ट्राध्यक्ष जेत्या राष्ट्राध्यक्षाला पदच्युत करु शकतो? अरे वा. ही माहिती नव्यानेच मिळाली.

भारतातही १९९० च्या दशकात शिवसेना आणि भाजपच्या अनेक आमदारांची निवडणुक कोर्टाने रद्द केली होती हे तुमच्या लक्षात असेलच.त्याचे कारण होते?कारण त्यांनी हिंदुत्वाच्या नावावर मते मागितली होती.कोणत्याही धर्माच्या नावावर मते मागणे हे आपल्या राज्यघटनेच्या मूळ तत्वात बसत नसल्यामुळे कायद्यात त्या प्रकारावर बंदी आहे.हे सगळे आमदार बहुमताने अगदी लोकशाही पध्दतीने निवडून आले होते का?अगदी १००%. पण जर त्यांच्या कृतीतून ते राज्यघटना आणि कायदा यांचे उल्लंघन करत असतील तर त्यांची निवड रद्द करायचा अधिकार कोर्टाला आहे. त्याचप्रमाणे फॅसिझमला विरोध हे काँग्रेसचे अगदी पहिल्यापासूनचे तत्व होते.कदाचित १९३९ मध्ये नेताजींचा कल त्याबाजूला आहे हे गांधीजींच्या लक्षात आले असेल आणि त्यामुळे अगदी बहुमताने निवडला गेलेला अध्यक्षही जर मुळातल्या काँग्रेसच्या तत्वांना हरताळ फासत असेल तर असा मनुष्य काँग्रेस अध्यक्षपदी नको असे गांधींना वाटले असेल तर त्यात मला तरी काहीही चूक वाटत नाही.

जर पडला तर तो सत्तेवरच नाही, मग त्याला व्हेटो पॉवर कशी मिळणार?

गांधीजींना ही पॉवर त्यांना असलेल्या व्यापक जनाधारातून आपोआप मिळाली होती.आणि त्या पॉवरचा त्यांनी दुरूपयोग केला असता तर त्यांच्या मागचा जनाधार कमीच झाला असता.

एखाद्या लोकशाही राष्ट्रात बहुमताने निवडुन आलेला नेता स्वतःला पसंत नाही म्हणुन एखाद्या राष्ट्रपतीने वा राष्ट्राध्यक्षाने या कारंणास्तव पदच्युत केल्याचे एखादे उदाहरण द्याल काय?

अत्यंत विनोदी आणि बादरायण संबंध लावलेला प्रश्न.गांधीजींचा सुभाषबाबूंना एक व्यक्ती म्हणून नव्हे तर त्यांच्या कार्यपध्दतीला विरोध होता. आणि दुसरे म्हणजे १९३८ च्या हरिपुरा काँग्रेसचे नेताजीच अध्यक्ष होते.त्यावेळी गांधीजींनी कोणा नेत्याला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते "I know Subhash is unstable. But nobody other than he should be the President of Congress" (तत्सम काहीतरी). मग १९३९ मधील गांधीजींच्या भूमिकेवर गळे काढणारे १९३८ च्या भुमिकेवर मौन का बाळगतात? एक उगवता आणि प्रॉमिसिंग नेता म्हणून गांधीजींनी १९३८ मध्ये सुभाषबाबूंना जरूर पाठिंबा दिला असेल पण असा पाठिंबा देऊन आपली चूक झाली हे लक्षात येताच नंतरच्या वर्षी त्यांनी ती सुधारली तर त्यात चूक काय?

पुढची निवडणुक तर पुढच्या वर्षी होती हो, मग ते तडकाफडकी जनाधार संपल्याच्या कारणास्तव राजिनामा का देतील? आणि नेताजी आपली मते आपले विचार स्पष्ट मांडुन व ते लोकांना आदरणीय वाटल्यानेच त्यांना निवडुन दिले गेले होते. एकाएकी तो जनादार कसा काय नाहीसा होइल?

याचे कारण सुरवातीला गांधीजींना सुभाषचंद्रांना असलेला विरोध सगळ्यांना माहित नसावा म्हणून त्यांना मतेही मिळाली.पण नंतरच्या काळात गांधीजींचा त्यांना असलेला विरोध कळताच जनाधार कमी व्हायची शक्यता आहेच.कारण शेवटी काँग्रेसमध्ये महात्मा गांधीच हे सर्वात जास्त जनाधार असलेले नेते होते.

याउलट 'लोकांना कोणाचे नेतृत्व मान्य असावे हे मी ठरविणार' हा अहंकार उघड झाला.

म्हणजे गांधीजी वाटेल ते लोकांवर लादणार आणि लोक ते ऐकून घेणार? लोक इतके मूर्ख होते का?

सर्वसाक्षी's picture

30 Jan 2013 - 11:07 pm | सर्वसाक्षी

कोर्ट की राष्ट्रप्रमुखाचा नकाराधीकार?
चूक झाली होती तर त्यांची स्वत:ची. मतदान सदस्यांनी केले होते, गांधींनी नाही.
नेताजी विजयी झाले ते गांधी पुरस्कृत उमेदवाराला हरवुनच. म्हणजेच नेताजींना अधिक जनाधार मिळाला होता.
लोक काय होते ते सोडा. गांधींनी झोंडशाही केली हे सत्य.

गांधींनी झोंडशाही केली हे सत्य

गांधींचे समकालीन असलेल्या सुभाषबाबूंनी कुठेही 'मी गांधींचा तिरस्कार करतो' किंवा 'गांधी माझा तिरस्कार किंवा द्वेष करतात' किंवा 'माझ्यासंदर्भात गांधींनी झोंडशाही केली' वगैरे म्हटल्याचे वाचले नाही. त्यामुळे या एकंदर प्रकरणात गांधींच्या अधिकाराबाबत सुभाषबाबूंना शंका नसावी.

मात्र आता साठसत्तर वर्षांनंतर हे मुद्दे घेऊन सुभाषबाबूंची कड घेऊन गांधींना झोडपणे हे सुभाषबाबू आणि गांधी दोघांसाठी अपमानास्पद आहे.

पुण्याचे वटवाघूळ's picture

31 Jan 2013 - 3:59 pm | पुण्याचे वटवाघूळ

मात्र आता साठसत्तर वर्षांनंतर हे मुद्दे घेऊन सुभाषबाबूंची कड घेऊन गांधींना झोडपणे हे सुभाषबाबू आणि गांधी दोघांसाठी अपमानास्पद आहे.

+१. पण हे स्वयंघोषिक क्रांतिकारकांच्या समर्थकांना कोण समजावणार?

क्लिंटन's picture

31 Jan 2013 - 8:13 am | क्लिंटन

सरदार पटेलही सुभाषचंद्र बोसांच्या अध्यक्षपदाच्या विरोधात होते आणि त्यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी व्हावी असे त्यांनाही वाटत होते हे इथे समजतेच.

पण कसे असते श्रेय द्यायची वेळ आली की ते पटेलांचे आणि दोष असला की तो गांधी-नेहरूंचा ही सोयीची विभागणी आधीच करून ठेवलेली असते.

सर्वसाक्षी's picture

31 Jan 2013 - 10:49 pm | सर्वसाक्षी

सरदार पटेल हे नेताजींनी निवडणुक लढविण्याच्या विरोधात होते ते केवळ अध्यक्ष बिनविरोध निवडणुक यावा म्हणुन. नेताजींना विरोध होता म्हणुन नव्हे. आपल्या दुव्यातही तसा स्पष्ट उल्लेख आहे. शिवाय सरदार पटेलांनी उभे राहण्याला विरोध केला, निवडुन आल्यावर 'मला तुम्ही पसंत नाही तेव्हा राजिनामा द्या' असा नव्हे.

पटेलांचा उल्लेख धम्याने केला नसावा तो यामुळेच.

तुम्ही दिलेल्या दुव्यातच सरदार पटेलांनी एका घटनेत गांधींनाही विरोध केल्याचेच नव्हे तर त्यांचे कृत्य 'मूर्खपणाचे असल्याचा' निर्वाळाही दिल्याचाही उल्लेख आहे. ते सांगायचे आपण सोयिस्कर रित्या टाळलेत.

क्लिंटन's picture

1 Feb 2013 - 8:29 am | क्लिंटन

शिवाय सरदार पटेलांनी उभे राहण्याला विरोध केला, निवडुन आल्यावर 'मला तुम्ही पसंत नाही तेव्हा राजिनामा द्या' असा नव्हे.

या लेखातील क्रोनोलॉजी थोडक्यात चोप्य-पस्ते करतो:On January 29 he was re-elected Congress president by 203 votes, defeating Sitaramayya. म्हणजे सुभाषचंद २९ जानेवारी १९३९ रोजी अध्यक्ष म्हणून निवडून गेले. पुढे Patel wanted Bose ousted from the presidentship of the Congress and suggested to Dr Rajendra Prasad, in a letter on July 12, 1939, to issue a show cause notice to Netaji for violating the All-India Congress Committee decision on prohibition. म्हणजे हे पत्र लिहायची घटना १२ जुलै १९३९ रोजीची.यातील पहिले वाक्य--Patel wanted Bose ousted from the presidentship of the Congress हे नक्की कधीचे हे तितकेसे स्पष्ट होत नसले तरी "ousted from the presidentship of the Congress" यावरून मला पामराला तरी असे वाटते की पटेलांना अध्यक्षपदी निवडून गेलेल्या सुभाषचंद्रांची उचलबांगडी करायची होती. तसेच मुंबईच्या प्रांत सरकारने जारी केलेल्या दारूबंदीच्या आदेशाला नेताजींनी विरोध केला हे पण त्यात लिहिले आहे.दारूबंदी हा काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये एक महत्वाचा कार्यक्रम होता हे सर्वज्ञात आहे.त्यालाच अध्यक्षांनी (किंवा कोणाही कार्यकर्त्यानेही) विरोध करणे कितपत योग्य आहे?

याच लेखात म्हटले आहे की मे १९३९ मध्ये सुभाषचंद्रांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली आणि पटेलांचे राजेंद्रप्रसांदांना लिहिलेले पत्र जुलै १९३९ चे आणि त्यात सुभाषचंद्रांना "शो कॉज" नोटिस बजावायची गोष्ट नमूद केली होती.यावरून तरी असे दिसते की सुरवातीच्या काळात फॉरवर्ड ब्लॉक हा काँग्रेस पक्षांतर्गत गट होता आणि त्याचे स्वतंत्र पक्ष म्हणून अस्तित्व जुलै १९३९ मध्ये नव्हते.नाहीतर पटेलांचे पत्र आणि सुभाषचंद्रांना "शो कॉज नोटिस" वगैरे गोष्टी अर्थहिन ठरतात.

तुम्ही दिलेल्या दुव्यातच सरदार पटेलांनी एका घटनेत गांधींनाही विरोध केल्याचेच नव्हे तर त्यांचे कृत्य 'मूर्खपणाचे असल्याचा' निर्वाळाही दिल्याचाही उल्लेख आहे. ते सांगायचे आपण सोयिस्कर रित्या टाळलेत.

नाही सोयीस्कर रित्या अजिबात टाळले नाही.त्याच लेखात स्पष्ट उल्लेख आहे--"....Gandhi admitting 'the step would have been suicidal'." म्हणजे गांधीजींनीही आपली चूक मान्य केली.आपल्या हातून कोणत्या चुका झाल्या हे नुसते मान्यच नाही तर पुस्तके लिहून जगाला सांगायचा प्रांजळपणा गांधींमध्ये होता आणि ते महात्मा बनले यात या प्रांजळपणाचा वाटा मोठा आहे.जी गोष्ट गांधीजींनीच स्वतःच चुकीची असे म्हटले त्यावर आणखी टिप्पणी करून काय मिळणार होते?

सर्वसाक्षी's picture

1 Feb 2013 - 12:43 pm | सर्वसाक्षी

आपला दुवा म्हणतो की सरदारांनी जुलै मध्ये नेताजींना पदच्युत करायचा प्रस्ताव आणला, मात्र नेताजींनी राजिनामा २९ एप्रिल ला दिला होता! मग हे कसे काय शक्य आहे? फॉत्वर्ड ब्लॉकची स्थापना ३ मे १९३९ ची आहे. २२ जुन १९३९ च्या मुंबई सत्रात पक्षाची घटना ठरविली गेली. आपण म्हणता जुलै १९३९ मध्ये तो अस्तित्वात नव्हता?

सरदार पटेलांचाही नेताजींना विरोध होता असा मुद्दा आपण मांडलात तेव्हा तसाच विरोध गांधींनाही होता हे नमूद केले नाहीत. विरोधाचे कारण व त्यानंतर काय घडले ही नंतरची घटना.

क्लिंटन's picture

1 Feb 2013 - 1:51 pm | क्लिंटन

आपला दुवा म्हणतो की सरदारांनी जुलै मध्ये नेताजींना पदच्युत करायचा प्रस्ताव आणला, मात्र नेताजींनी राजिनामा २९ एप्रिल ला दिला होता! मग हे कसे काय शक्य आहे?

वर लिहिलेलाच प्रतिसाद चोप्य-पस्ते करतो:

हे पत्र लिहायची घटना १२ जुलै १९३९ रोजीची.यातील पहिले वाक्य--Patel wanted Bose ousted from the presidentship of the Congress हे नक्की कधीचे हे तितकेसे स्पष्ट होत नसले तरी "ousted from the presidentship of the Congress" यावरून मला पामराला तरी असे वाटते की पटेलांना अध्यक्षपदी निवडून गेलेल्या सुभाषचंद्रांची उचलबांगडी करायची होती.

फॉत्वर्ड ब्लॉकची स्थापना ३ मे १९३९ ची आहे. २२ जुन १९३९ च्या मुंबई सत्रात पक्षाची घटना ठरविली गेली. आपण म्हणता जुलै १९३९ मध्ये तो अस्तित्वात नव्हता?

परत एकदा चोप्य-पस्ते:
याच लेखात म्हटले आहे की मे १९३९ मध्ये सुभाषचंद्रांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली आणि पटेलांचे राजेंद्रप्रसांदांना लिहिलेले पत्र जुलै १९३९ चे आणि त्यात सुभाषचंद्रांना "शो कॉज" नोटिस बजावायची गोष्ट नमूद केली होती.यावरून तरी असे दिसते

की सुरवातीच्या काळात फॉरवर्ड ब्लॉक हा काँग्रेस पक्षांतर्गत गट होता आणि त्याचे स्वतंत्र पक्ष म्हणून अस्तित्व जुलै १९३९ मध्ये नव्हते.

नाहीतर पटेलांचे पत्र आणि सुभाषचंद्रांना "शो कॉज नोटिस" वगैरे गोष्टी अर्थहिन ठरतात.

काँग्रेसपक्षांतर्गत स्वराज्य पक्ष होताच ना?जुलै १९३९ मध्ये त्याचप्रमाणे फॉरवर्ड ब्लॉक हा पंक्षातर्गत गट होता का हा प्रश्न आहे.१२ जुलै १९३९ रोजी सरदार पटेलांनी राजेन्द्र प्रसादांना लिहिलेले पत्र पुढीलप्रमाणे (http://books.google.co.in/books?id=_1HoB8i0EQYC&printsec=frontcover&dq=D...)

My dear Rajendra Babu,

I have received your circular letter of the 11th July. I agree with you that we cannot decide this question finally in the absence of Mahatmaji and Jawaharlal. Both of them will be returning back from their respective places in the first week of August and we can keep the Working Committee meeting at the time of their returning. I am however strongly of the opinion that a prompt and clear indication of our attitude is necessary to prevent the rot. In August when we meet we can take no action against him, unless we finish the preliminaries beforehand. I would therefore suggest that a notice asking Subhas Babu to explain about his conduct in organising a country-wide agitation and a revolt against the decisions of the A.I.C.C., which he as the President of the Bengal Provincial Congress Committee is bound to respect and execute.So far as the Bengal Provincial Executive is concerned, it would be better to give notice to it as well. They had also disregarded your advice and committed a flagrant breach of discipline. Let them sent their explanation and we shall consider the question of action to be taken in the next meeting. Any weakness on our part at this stage is bound to spread indiscipline and weaken our organisation.You must have seen Subhas Babu's statement on the prohibition policy of the Bombay Government. He has done worse than what our enemies could do. He is now issuing another statement in reply to Mahatmaji's statement.

यापूर्वी ९ जुलैला राजेन्द्रप्रसादांनी (सुभाषचंद्रांनी राजीनामा दिल्यानंतर राजेन्द्रप्रसाद अध्यक्ष झाले होते) ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सर्व सदस्यांना पत्र पाठविले होते. त्यात सुभाषचंद्रांनी ए.आय.सी.सी च्या ठरावाविरूध्द (नक्की कोणता ठराव हे अधिक वाचन करून लिहितो) ९ जुलैला "डे ऑफ प्रोटेस्ट" ठेवला होता त्यासंबंधी नक्की काय करावे यासंबंधी सदस्यांची मते मागविली होती.त्या पत्रात गांधीजी आणि नेहरू दोघेही परगावी असताना यासंबंधीचा निर्णय घ्यावा की नाही याविषयीची मते राजेन्द्रप्रसादांनी मागितली होती. त्याला उत्तर म्हणून १२ जुलैला पटेलांनी पाठविलेले पत्र आहे.या पत्रात पटेलांनी तर म्हटले आहे---" He has done worse than what our enemies could do." तर गांधीजींना असलेल्या विरोधासंबंधात मात्र त्यांची भाषा--हा मूर्खपणा आहे असे म्हटले आहे. आता यात डिग्री ऑफ इन्टेन्सिटी नक्की कोणत्या केसमध्ये अधिक आहे याचा निर्णय मी वाचकांवरच सोडतो. दुसरे म्हणजे या पत्रव्यवहाराचे वरवरचे वाचन करूनही समजते की सुभाषबाबूंच्या कृतीला हरेकृष्ण मेहताब, आचार्य कृपलानी आणि प्रफुलचंद्र घोष या कार्यकारिणी सदस्यांनीही विरोध केला होता.तेव्हा सुभाषचंद्रांविरूध्द गांधींनी झोंडशाही केली वगैरे आरोपात काही तथ्य नाही. आणि दुसरे म्हणजे जुलै १९३९ मध्ये सुभाषचंद्र काँग्रेसचेच सदस्य होते हे पण त्यावरून स्पष्ट होते.

ही चर्चा अधिक रंगल्यास आणखी लिहेनच.

सर्वसाक्षी's picture

1 Feb 2013 - 11:52 pm | सर्वसाक्षी

चर्चा होती नेताजींना अध्यक्षपदावरुन हटविण्याच्या पत्राची आणि आपण दाखला देत आहात तो नेताजी कॉग्रेसचे सदस्य अस्ल्याचा. मला वाटते अध्यक्ष आणि सदस्य यात फरक असतो.

सात सदस्यांनी राजीनामे दिले, पण पट्टाभींचा पराभ हा माझा पराभव असे निवडणुकीत पराभूत झाल्यावर म्हणणारे गांधी नेताजींना अध्यक्षपदावर राहु देण्याच्या विरोधात होते. नेताजींची तडफ व काँग्रेसवरचा वाढता प्रभाव (जो निवडणुकीत सप्रमाण सिद्ध झाला) हे गांधींना सहन झाले नाही हेच खरे. 'आहे त्या मार्गाने काँग्रेस जात राहिल्यास स्वातंत्र्य मिळ्णे दुरापास्त आहे' हे नेताजींचे म्हणणे होते, जर अधिकाधीक सदस्यांना हे मत पटले तर आपला प्रभाव व सर्व सत्ता हातुन जाईल याची गांधीना धास्ती वाटली असावी. जर गांधींना नेताजींची मते पटत नव्हती तर गांधीनी नेताजींना निवडणुक लढविण्यासाठीच विरोध का केला नाही? कार्यकारीणीतर्फे त्यांनी नेताजींना निवडणुक लढवु न देणे व बिनविरोध अधय्क्ष निवडुन आणणे यास भाग का पाडले नाही? 'कोंग्रेस मध्ये माझा शब्द प्रमाण व सगळे लोक मी म्हणेन त्यालाच मते देतील' हा अवाजवी आत्मविश्वास त्यांचा उमेदवार चारी मुंड्या चीत झाल्यावर धुळीस मिळाला व त्यांनी कुठल्याही परिस्थितीत नेताजींना अध्यक्षपद सोडायला लावायचेच असा चंग बांधला व कार्यकारिणीसही आपल्या दबावाखाली आणले हे सत्य आहे.

आजानुकर्ण's picture

2 Feb 2013 - 1:03 am | आजानुकर्ण

चर्चा चालू द्या पण एक शंका आहे.
नेताजींनी काँग्रेस सोडून फॉरवर्ड ब्लॉक हा वेगळा पक्ष सुरु केल्यावर पूर्वाश्रमीच्या कॉँग्रेसमधील किती कार्यकर्ते व कार्यकारिणी सदस्य त्यांच्यासोबत आले याबाबत काही कल्पना आहे काय. त्यावरुन नेताजींची धोरणे पटणारे किती काँग्रेसी होते याबाबत माहिती मिळू शकते का?

क्लिंटन's picture

2 Feb 2013 - 7:50 am | क्लिंटन

जर गांधींना नेताजींची मते पटत नव्हती तर गांधीनी नेताजींना निवडणुक लढविण्यासाठीच विरोध का केला नाही? कार्यकारीणीतर्फे त्यांनी नेताजींना निवडणुक लढवु न देणे व बिनविरोध अधय्क्ष निवडुन आणणे यास भाग का पाडले नाही? 'कोंग्रेस मध्ये माझा शब्द प्रमाण व सगळे लोक मी म्हणेन त्यालाच मते देतील' हा अवाजवी आत्मविश्वास त्यांचा उमेदवार चारी मुंड्या चीत झाल्यावर धुळीस मिळाला व त्यांनी कुठल्याही परिस्थितीत नेताजींना अध्यक्षपद सोडायला लावायचेच असा चंग बांधला व कार्यकारिणीसही आपल्या दबावाखाली आणले हे सत्य आहे.

याविषयी वरील चर्चेत वटवाघूळ्/सिंह्/हत्ती यांनी मांडलेल्या मतांशी मी सहमत आहे त्यामुळे परत वेगळे लिहित नाही.

बाकी सुभाषचंद्र हे अत्यंत महान दर्जाचे देशभक्त होते तरीही एक व्यक्ती म्हणून मला (मी कोणीही नसलो तरी) सुभाषचंद्रांच्या जपानबरोबर जाऊन आझाद हिंद सेनेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवायच्या प्रयत्नांना पाठिंबा नाही (कारण त्यातून इंग्रज जाऊन अधिक खुनशी जपानी मानगुटीवर यायची शक्यता होती--निदान भारताच्या काही भागात तरी). तसेच सुभाषचंद्र फॅसिस्ट शक्तींची बाजू घेणे, दारूबंदीला विरोध करणे अशा प्रकारे जर काँग्रेसच्या मुख्य कार्यक्रमातील महत्वाच्या गोष्टींनाच हरताळ फासू बघत असतील तर गांधीजींनी स्वतःची जनमानसातील प्रतिमा पणाला लाऊन सुभाषचंद्रांना विरोध केला असेल तर त्यात मला तरी काही चुकीचे वाटत नाही.आणि दुसरे म्हणजे आजानुकर्ण यांनी विचारल्याप्रमाणे किती नेते काँग्रेस सोडून सुभाषचंद्रांबरोबर गेले?गांधीजींनी विरोध केल्यावरही कोणी त्या विरोधाला विरोध केला नसेल तर एकट्या गांधीजींनी झोंडशाही केली वगैरे या गोष्टींना अर्थ राहत नाही.

क्लिंटन's picture

2 Feb 2013 - 10:17 pm | क्लिंटन

<blockquote>गांधींनी झोंडशाही केली हे सत्य.</blockquote>

हा विषय विनाकारण ताणायचा नाही.तरीही उगीचच गांधीजींना 'टपल्या' मारायच्या प्रवृत्तीला शक्य होईल तितके प्रत्युत्तर द्यायला हवे या उद्देशाने जरा जुने पेपर आणि पुस्तके इंटरनेटवर वाचली. त्यातील सर्वात योग्य असे दोन संदर्भ मिळाले ते इथे देतोच.पण गांधीद्वेष्ट्यांच्या प्रचारामुळे माझेही मत बनले होते की गांधीजींनी सुभाषचंद्रांना राजीनामा द्यायला भाग पाडले.पण ते त्यांचे जपान्यांविषयीचे मत माहित असल्यामुळे असेल अशा प्रकारची स्वतःचीच समजूत काढून घेत होतो. पण <a href="http://news.google.com/newspapers?id=1bE-AAAAIBAJ&sjid=QkwMAAAAIBAJ&pg=1... ११ मे १९४० </a> रोजीच्या इंडिअन एक्सप्रेसमध्ये सरचिटणीस आचार्य कृपलानींचा काँग्रेसमधील तत्कालीन परिस्थितीवर अहवाल दिला अशी बातमी आहे.तो अहवाल म्हणतो---

Even after the Tripuri session was over, says the Report, the trouble which began with the election of Mr. Subhas Bose as President continued. It centred round the resolution moved by Pandit Pant at Tripuri, the operative clause of which related to the formation of the Working Committee in accordance with Mahatma Gandhi's wishes. Various interpretations were given to by Mr. Bose and Mahatma Gandhi, the former taking it to be unconstitutional and a vote of 'no confidence' in him.
Mr. Bose, continues the Report, proposed a composite Working Committee to which he would nominate seven members and the General Secretary and would allow Sardar Patel to nominate the remaining seven members. Mahatam Gandhi, on the other hand suggested a homogeneous Cabinet of the President's own choice to enable him to go forward with his programme if it received the AICC. <strong><ins>Mahatma Gandhi declined to suggest the names to the Working Committee in terms of Pandit Pant's resolution holding that it would be an imposition on the President.</ins></strong> Mr. Bose felt that the only course open to him was to reign and he tendered his resignation at the AICC meeting at Calcutta, which elected Dr. Rajendra Prasad as the President in his place.

तसेच गांधीजींच्या शंकर घोष यांनी लिहिलेल्या <a href="http://books.google.co.in/books?id=5l0BPnxN1h8C&pg=PA271&lpg=PA271&dq=pa... चरित्रात </a> म्हटले आहे:

At Tripuri Govind Ballabh Pant moved a resolution expressing confidence in the old Working Committee, reiterating faith in Gandhi, who had led the Congress for the last twenty years, and calling upon Bose to 'nominate the Working Committee...in accordance with the wishes of Gandhiji'. This resolution was passed in the Subjects Committee by 218 to 133 votes and by an overwhemling majority by a show of hands in the open session.......

To resolve the crisis over the formation of the Working Committee, on 17 April 1939 Nehru wrote to Gandhi that Bose should permit Gandhi to suggest the names of the members of the Working Committee and if Bose agreed to this and was allowed to fill two vacancies, which were likely to happen, then 'the responsbility rests with you and...you should accept Subhas as president. To try to push him out seems to me an exceedingly wrong step.'

But Gandhi, who was not in Tripuri when the Pant resolution was passed wrote to Bose,<strong><ins>'The more I read it (the resolution), the more I dislike it'.</ins></strong>At the AICC at Calcutta on 29 April Gandhi told Bose,'You are free to choose your own Committee'. Knowing your own views and knowing how most of the members differ in the fundamentals, it seems to me,'said Gandhi,'<strong><ins>that if I give you the names it would be an imposition on you.</ins></strong>' While Bose wanted to form a coalition, Gandhi now insisted that Bose should form a homogeneous cabinet of his own, and so he refused to give any name for the Working Committee.

आता यात गांधीजींनी सुभाषचंद्रांना राजीनामा द्यायला कसे भाग पाडले?मी पण अगदी शाळेत असल्यापासून 'पट्टाभी सितारामय्यांचा पराभव हा माझा पराभव' असे गांधीजींनी म्हणून सुभाषचंद्रांना राजीनामा द्यायला कसे भाग पाडले याच्या रसभरीत कहाण्या मी ऐकत आलो आहे. या निमित्ताने त्या प्रकरणाची सत्यासत्यता पडताळून बघायची संधी मिळाली. हे प्रकरणही गांधीजींच्या ५५ कोटी प्रकरणीच्या उपोषणासारखाच गांधीविरोधकांचा प्रपोगांडाचा भाग दिसतो आहे. आणि सुभाषचंद्र कसे मोठे होते हे सांगतानाच गांधीजींनी त्यांना राजीनामा द्यायला कसे भाग पाडले या कहाण्या त्याच वेळी सांगून गांधीजींना 'टपल्या' मारायचे कामही साधले गेले याचेही वाईट वाटते. असो.

आता सुभाषचंद्रांना गांधीजींनी राजीनामा द्यायला भाग पाडले का याचा निर्णय वाचकांनीच घ्यावा.

मालोजीराव's picture

5 Feb 2013 - 3:28 pm | मालोजीराव

आझाद हिंदचे निराळे चलन. वापरात आणण्यासारख्या गोष्टी करण्यासाठी खरंच हिम्मत लागते

a

ऋषिकेश's picture

5 Feb 2013 - 3:35 pm | ऋषिकेश

दोन शंका..
१. या चलनाचे नाव काय होते? या नोटेवर 'रुपया किंवा टका' यापैकी काही दिसलं नाही.
२. 'बँक ऑफ एन्डिपेन्डन्स'चं पुढ काय झालं?

मूकवाचक's picture

23 Jan 2013 - 3:35 pm | मूकवाचक

_/\_

अभ्या..'s picture

23 Jan 2013 - 3:38 pm | अभ्या..

विनम्र अभिवादन सुभाषबाबूंना.

आणि धमुला धन्यवाद.

मनराव's picture

23 Jan 2013 - 4:00 pm | मनराव

सुभाषबाबूंना अभिवादन...

विसुनाना's picture

23 Jan 2013 - 4:27 pm | विसुनाना

नेताजी सुभाषचंद्र बोस या महान नेत्याला विनम्र अभिवादन.
आधुनिक शिवाजी.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सविनय आदरांजली

स्पंदना's picture

23 Jan 2013 - 4:59 pm | स्पंदना

अगर आजादी इनके तरीकेसे मिलती तो कुछ और ही रंग लाती!

पैसा's picture

23 Jan 2013 - 5:38 pm | पैसा

नेताजींना विनम्र आदरांजलि!

आज दुसर्‍या एका लढाऊ नेत्याची, बाळासाहेब ठाकर्‍यांचीही जयंती आहे. त्यांनाही विनम्र अभिवादन.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Jan 2013 - 12:58 am | निनाद मुक्काम प...

महानायकाला विनम्र श्रद्धांजली
हि ४ भागाची डॉक्युमेंट्री जरूर पहावी.

अत्रन्गि पाउस's picture

5 Feb 2013 - 9:44 am | अत्रन्गि पाउस

ति लिन्क जर पुन्हा देता का?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Jan 2013 - 1:04 am | निनाद मुक्काम प...
निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Jan 2013 - 9:31 pm | निनाद मुक्काम प...

नेताजींच्या 116 व्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
ह्या लेखाच्या खाली दिलेली क्लिप तमाम देश भक्तांनी जरूर पहावी.
ह्यात सुभाष चंद्र बोसं ह्यांचे जर्मनी मधील वास्तव्य , आझाद हिंद सेनेची स्थापना व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नाझी राजवटी सोबत संबंध ह्यावर प्रकाश झोत टाकते.
ह्यात त्यांची जर्मन नागरिकत्व असणारी कन्या अनिता बोसं व नेताजींच्या सोबत काम केलेल्या अनेक जर्मन नागरिकांच्या मुलाखती आहेत.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हिटलर व एस एस चा प्रमुख हिमलर सोबत च्या मुलाखतीचे व पाणबुडीची ज्यातून नेताजींनी जर्मनी ते जपान असा प्रवास अशी अनेक दुर्मीळ दृश्ये ह्यात पाहायला मिळतात.
अनेक जाणकारांची मते ह्या क्लिप मधून ऐकायला मिळतात.
जर्मन लोकांची नेताजींच्या बद्दल , त्या काळी तेथील वास्तव्यात असलेल्या भारतीय सैनिकांच्या बद्दल असलेली मते ऐकायला मिळतात.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अनिता बोसं ह्यांची गांधीजी ह्यांच्या विषयी मते सुद्धा कळतात.
जर्मन लोकांनी नेताजींच्या बद्दल जे मत व्यक्त केले तेच महानायक ह्या कादंबरीत मला वाचायला मिळाले होते.
नेताजींचे भारत स्वतंत्र झाल्यावर
एक स्वतंत्र भारत म्हणून अनेक योजना , त्यांनी आखल्या होत्या ,थोडक्यात भारताच्या विकासाची सुसूत्र ब्लू प्रिंट त्यांनी तयार केली होती.
दुर्दैवाने देशाची कमान त्यांच्या हातात आली नाही ,

पुण्याचे वटवाघूळ's picture

25 Jan 2013 - 7:57 am | पुण्याचे वटवाघूळ

नेताजींविषयी आदर आहेच.पण आमच्याच एका फेसबुक मित्राच्या फेसबुक भिंतीवर नेताजींनी जपानची मदत घेतली हे चुकीचे केले कारण तो लढा यशस्वी झाला असता तर जपान्यांनी चीनमध्ये केले तसे अत्याचार भारतात घडायची शक्यता होती आणि म्हणून मुद्दामून जपान्यांबरोबर जाणे हे चुकीचे होते म्हणून नेताजींची भक्ती म्हणजे "वरशिपिंग फॉल्स गॉड्स" असे वाचले.तो मुद्दाही मला चुकीचा वाटला नाही.तेव्हा याविषयी थोडा गोंधळ उडत आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Feb 2013 - 11:24 pm | निनाद मुक्काम प...

खुनशी जपानी भारताच्या मानगुटीवर बसले असते हा सगळ्यात मोठा विनोद आहे.
भारतावर अनेक परकीय आक्रमण झाली पण फक्त इंग्रज राज्यकर्ते झाले
कारण त्यांनी राज्यकर्ते होण्याआधी व्यापारी बनून भारताच्या समाजव्यवस्थेचा अभ्यास केला , भारतातील जाती , धर्म व्यवस्था त्यांनी जाणल्या तेव्हा कुठे संस्थानिक व भारतातील इतर वर्गाला फोडा आणि राज्य करा ही नीती वापरून भारत आपल्या कब्जात आणला. जेथे फोडाफोडी जमली नाही तेथे म्हणजे अफगाण , नेपाळ भागात अधिकार न गाजवता संबंध ठेवले ,
जपानी नेतृत्वाला भारत किती मोठा आहे , व भारतीय लोकांची मानसिकता ह्याबाबत एवढी माहिती नव्हती.
जर ते भारतात एक आक्रमक राज्यकर्ते म्हणून आले असते , तर सिकंदर , किंवा इतर परकीय आक्रमकांच्या सारखे परत केले असते ,
इंग्रजांना भारतातून घालवल्यानंतर भारतीय जनतेचा आत्मविश्वास वाढला असता.
हिंदू व मुस्लिम राज्यकर्ते व संस्थानिक व जनता ह्यांना जपान विषयी ममत्व नव्हते.
गोवा हि वसाहत भारतीय जनता व लष्करी बळावर भारताने सोडवली तेव्हा पोर्तुगीज भारताचे काहीही वाकडे करू शकले नाही ,
सुभाषचंद्र बोस ह्यांना परिस्थितीची कल्पना होती.
हिंदू , मुस्लिम , शीख त्यांच्या आझाद हिंद सेनेत एकत्र आले होते ,
त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता सुद्धा एकत्र आली असती.
जेथे औरंगजेब मराठा साम्राज्य लष्करी ताकदीवर संपवू शकला नाही ,
जेथे सध्या अमेरिका अफगाणिस्तान लष्करी बळावर जिंकू शकला नाही ,
तेथे भारत लष्करी बळावर दूरवरून येउन जिंकणे केवळ अशक्य
आणि जपान ने अशी आगळीक केलीच असती तर नेताजींनी वेळप्रसंगी अमेरिकेची सुद्धा मदत घेतली असती.
एक आंतरराष्ट्रीय राजकारण जाणणारा नेता म्हणून नेताजी ह्यांची त्यावेळी जगात ओळख होती.
एक माणूस एकटा भारताच्या बाहेर जातो व इंग्रजी साम्राज्याला आव्हान देतो ,
जे टिळक व गांधी ह्यांच्या काळात घडले नाही ते तो घडवतो.
म्हणजेच
भारतीय लष्कर जे इंग्रजांशी १८५७ नंतर कायम एकनिष्ठ होते ते त्यांच्या विरोधात
उभे ठाकले, हा करिश्मा नेताजींच्या होता ,
महिलांना ह्यां देशात सैन्यात वाव देणारे नेताजी ह्या देशात पंतप्रधान झाले असते तर ह्या देशात महिलांचे वेगळे चित्र दिसले असते.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे
सध्याच्या बांगलादेशात व पाकिस्तान हिंदू , शीख , सिंधी मारण्याच्या आधी
जीना ह्यांच्या पक्षाने गाठ नेताजींची आहे. हे लक्षात घेऊन अशी कारवाई केली नसती.
कारण ह्यांचे काय परिणाम होऊ शकतात ह्यांची त्यांना चांगलीच कल्पना आली असती.
मुळात भारतीय लष्कर हे इंग्रज भारतातून गेल्यावर नेताजींची एकनिष्ठ राहिले असते.
आणि भव्य दिव्य भारत उभा ठाकला असता.
फाळणीची अजिबात शक्यता उरली नसती.

क्लिंटन's picture

4 Feb 2013 - 10:00 am | क्लिंटन

खुनशी जपानी भारताच्या मानगुटीवर बसले असते हा सगळ्यात मोठा विनोद आहे.

हो बरोबर आहे.जपानी केवळ फिलीपाईन्स, इंडोचायना, मलाया यांच्याच मानगुटीवर बसले.पण भारताला मात्र त्यांनी गपगुमान स्वातंत्र्य मिळवून दिले असते. ते कशाला भारताच्या मानगुटीवर बसायला जातील?

भारतावर अनेक परकीय आक्रमण झाली पण फक्त इंग्रज राज्यकर्ते झाले

बरोबर आहे. ग्रीक (मिनँडर उर्फ मिलिंद हा ग्रीक राजा होता. आणि बौध्द भिक्षू नागसेन याच्याबरोबर त्याच्या बौध्द धर्मावरील प्रश्नोत्तरांचा ग्रंथ आहे मिलिंदपन्ह), कुशाण (राजा कनिष्क), हूण, मोंगल (बाबर), फ्रेंच (पाँडेचेरी), पोर्तुगीज (गोवा) इत्यादी कोणीच भारताच्या कुठल्याच भागात कधीच राज्यकर्ते झाले नव्हते.परकीय आक्रमकांपैकी पहिल्यांदा राज्यकर्ते झाले ते इंग्रजच.

जेथे सध्या अमेरिका अफगाणिस्तान लष्करी बळावर जिंकू शकला नाही ,
तेथे भारत लष्करी बळावर दूरवरून येउन जिंकणे केवळ अशक्य

या आणि इतर अनेक मुद्द्यांवर मी २ वर्षांपूर्वी नितिन थत्ते यांच्या थिअरी या धाग्यावर लिहिले आहे.तेव्हा त्याची पुनरावृत्ती टाळतो.

जपान ने अशी आगळीक केलीच असती तर नेताजींनी वेळप्रसंगी अमेरिकेची सुद्धा मदत घेतली असती.

हो बरोबर आहे.भारताला कोण मदत करतो यासाठी इतर सगळ्या देशांचे नेते रांगा लावूनच उभे होते.

भारतीय शांतीसेना श्रीलंकेत होती.त्या देशातल्या अनेकांना शांतीसेना म्हणजे परकीय सेनाच आपल्या देशात आली आहे असे वाटत होते.समजा शांतीसेनेला घालवायला श्रीलंकेने पाकिस्तानची मदत घेतली असती आणि शांतीसेनेला घालविल्यावर पाकिस्ताननेच तिथे तळ ठोकला असता.अशा परिस्थितीत जर श्रीलंकेने पाकिस्तानला तिथून घालवायला परत भारताची मदत मागितली असती तर कोणाही रिअल पोलिटिशअन ने दोन पैकी एक गोष्ट केली असती-- एक तर श्रीलंकेला आपल्या कर्माची फळे भोगू दे म्हणून वार्‍यावर सोडले किंवा मदत केली असती तरी पूर्वीपेक्षा अधिक जोमाने आपले पाय श्रीलंकेत घट्ट रोवले असते.

आता या उदाहरणात भारतीय शांतीसेनेऐवजी जपान,श्रीलंकेऐवजी भारत आणि भारताऐवजी अमेरिका/इंग्लंड असे रिप्लेस केले तरी हा माझा मुद्दा अजिबात बदलत नाही.

अहो प्रत्येक देशाला आपला स्वार्थ साधायचा होता. इंग्लंडचा स्वार्थ भारतात स्वतःचे वर्चस्व असावे यात होताच तसा जपानचाही स्वार्थ इंग्रजांना आपल्या वर्चस्वाच्या क्षेत्रापासून (पॅसिफिक आणि दक्षिण-पूर्व एशिया) जास्तीतजास्त दूर ठेवण्यात होताच.तसेच जपानने फिलीपाईन्स वगैरे देशांना स्वातंत्र्य दिले नव्हते, अगदी अंदमानातही कत्तली केल्या होत्या.तेव्हा जपान्यांनी भारताच्या मुख्य लँडमध्ये वेगळे काही केले असते हे म्हणायला तुम्हाला वाटतो तितका आधार आहे असे वाटत नाही.

असो.हा मुद्दा मी अगदी शंभर वेळा मांडला आहे.तेव्हा अधिक काही लिहित नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Feb 2013 - 1:47 am | निनाद मुक्काम प...

फिलीपाईन्स, इंडोचायना, मलाया ह्या देशांची भारताशी
भौगोलिक दृष्ट्या व लष्करी दृष्ट्या तेव्हा सुद्धा बरोबरी नव्हती व आज तर अजिबात नाही आहे , पण सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे भारताकडे इंग्लिश शिस्तीत वाढलेले सैन्य होते ज्यातील वरिष्ठ अधिकारी पहिले व दुसरे महायुद्ध लढले होते.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारतीय सैन्याला भारताच्या स्थानिक जनतेची साथ होती.
क्लिंटन
तुम्ही थत्ते ह्यांच्या धाग्यावर जी काही मते मांडली आहेत त्यावर अनेक मिपाकरांनी प्रतिवाद केला आहे , तरीही तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात तेव्हा ह्या पुढे अजून मी काय लिहू ,
पण जपान्यांची मदत नेताजींनी चूक केली व पुढे कदाचित जपान ने भारतावर अत्याचार केले असते अश्या नावीन्यपूर्ण कल्पना मी तुमच्याकडून येथे मिपावर पहिल्यांदा वाचल्या ह्या आधी आंजा वर ह्या संबंधी इतर कोणी विद्वान व तज्ञ व्यक्तींनी लिहिल्याचे आठवत नाही ,
पण जे रहस्य तुम्हाला कळले तेच खरे कारण बहुदा नेताजी ह्यांना भारत रत्न न मिळण्यासाठी असावे.
आणि राहिला भाग भारताला मदतीसाठी इतर देश रांग लावून बसले होते का
ह्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या दुर्दैवाने होय असेच आहे ,
दुसरे महायुद्ध संपले आणी ह्या युद्धातील जेते देश रशिया व अमेरिका ह्यांनी आपल्या आपल्या मित्र राष्ट्रांच्या फळ्या उभारल्या , व समाजवाद विरुद्ध भांडवल शाही असे जगाचे चित्र झाले ,
नवीन स्वतंत्र झालेला भारत मात्र नेहरू ह्यांच्या नेतृत्वाखाली ह्या दोन बलाढ्य देशांना
शांततेचे बोधान्मृत पाजण्यासाठी आपल्यासारखे छोटे देश एकत्र आणून तिसरी फळी बनवून बड्या राष्ट्रांना अक्कल शिकवत होते ,
नेताजी ह्यांचा कम्युनिस्ट रशिया कडे कधीच ओढा नव्हता .त्यांनी
तेव्हा भांडवलशाही राष्ट्रांना अनुकूल धोरण स्वीकारले असते तर अमेरिकेने भारताला नक्कीच मदत केली असती ,
स्वतंत्र भारतात आपली आय ,आय टी सारखी विद्या मंदिर अमेरिकेने च्या सहाय्याने भारतात उभारली , आज भारताची व अमेरिकेची उद्दिष्टे समान आहेत व सगळ्यात महत्त्वाचे भारताच्या राजकारणात भांडवलशाही व खुली बाजारपेठ असे दोन परवलीचे शब्द आले व अचानक भारत अमेरिकेचा नैसर्गिक दोस्त बनला.
हे दोन परवलीचे शब्द नेताजी ह्यांनी भारताच्या अर्थ शास्त्रात जमा केले असते तर
आज जो भारतात गेल्या वीस वर्षात मध्यमवर्ग व त्यांचा चंगळवाद दिसत आहे तो पाचपटीने जास्त दिसला असता. सगळ्यात म्हणजे अमेरिकेची सुरवातीपासून मैत्री भारताला फायदेशीर ठरली असती.
मात्र नेहेरु ह्यांनी तिसरी फळी निर्माण करून भारताला दोन्ही बलाढ्य राष्ट्रांहून दूर केले.
पुढे शीतयुद्धात पाकिस्तान ने अमेरिकन मदत घेऊन त्यांचे मित्र राष्ट्र झाला तर इंदिरा गांधी ह्यांनी रशिया ची जवळीक वाढवली.
,अवांतर असे
भारतात जपान्यांनी नाही मात्र भारतीयांनी खुद दंगलीत एकमेकांवर हिंसाचार केला ,
आझाद हिंद सेनेत एकत्र लढणारे सर्व धर्मीय भारतीय ही नेताजींची देणगी होती.

शांती सेनेचे उदाहरण हा एक विनोद आहे ,
मुळात पाकिस्तान हा श्रीलंकेपासून लांब त्यात त्यांची नेव्ही भारतापेक्षा कंपूवत
जे पाकिस्तान बांगलादेश वाचवू शकले नाही कारण मूळ पाकिस्तान पेक्षा ते भौगोलिक दृष्ट्या लांब होते ते श्रीलंकेत कश्याला येईल ,
माझा मुद्दा खोडण्यासाठी तुम्ही कल्पनेचे मोठे मनोरे रचत आहात.
मुळात दुसर्या महायुद्धाचा इतिहास पहिला तर जर्मनी चे रशियात जे झाले ते पाहून
जपान ने आपल्या मित्र राष्ट्र भारतात अशी आगळीक केली नसती.
इंग्रजांच्या तालमीत तयार झालेले भारत व पाकिस्तान व बांगलादेश ह्यांचे सैन्य त्यावेळी सुद्धा जगात लढाऊ म्हणून प्रसिद्ध होते.
पठाण ,गुरखा ,शीख , राजपूत , मराठा , महार अश्या आपल्या रेजिमेंट ज्या नुकत्याच युरोपातून भारतात परत आल्या असत्या ,
जपान ने कोणत्या तोंडाने आगळीक केली असती.

क्लिंटन's picture

5 Feb 2013 - 1:33 pm | क्लिंटन

पण जपान्यांची मदत नेताजींनी चूक केली व पुढे कदाचित जपान ने भारतावर अत्याचार केले असते अश्या नावीन्यपूर्ण कल्पना मी तुमच्याकडून येथे मिपावर पहिल्यांदा वाचल्या ह्या आधी आंजा वर ह्या संबंधी इतर कोणी विद्वान व तज्ञ व्यक्तींनी लिहिल्याचे आठवत नाही

अहो या नावीन्यपूर्ण कल्पना नाहीत.जपान्यांनी अंदमान-निकोबार बेटे ताब्यात घेतली होती (नेताजींनी त्यांचे नामकरण शहिद आणि स्वराज्य केले होते). त्या दरम्यान तिथेही जपान्यांनी भारतीयांना मारलेच होते.सुदैवाने अंदमान-निकोबार हा दाट लोकवस्तीचा प्रदेश नसल्यामुळे आपले ७५० (दुसर्‍या महायुध्दातील स्टॅन्डर्डप्रमाणे त्या मानाने बरेच कमी) लोक मारले गेले. याविषयी थत्ते यांच्या थिअरी या धाग्यातही उल्लेख केलाच आहे. जपान्यांना भारतीयांविषयी विशेष प्रेम होते असे तुम्हाला वाटत असेल तर तसे वाटायला फारशी जागा नाही हे तर त्यातून नक्कीच समजून येईल. जे जपान्यांनी चीन्,फिलीपाईन्स, मलाया, इंडोचायना वगैरे प्रदेशात तर सोडाच तर अंदमानातही केले तेच बंगालमध्ये केले नसते हे नक्की कोणत्या आधारावर वाटते हेच मला समजत नाही.

राहिला भाग भारताला मदतीसाठी इतर देश रांग लावून बसले होते का
ह्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या दुर्दैवाने होय असेच आहे ,

खरं की काय? मग इंग्लंडने भारताला त्यावेळीच स्वातंत्र्य का दिले नाही? महायुध्दाच्या दरम्यान "अटलांटिक कार्टर" प्रसिध्द झाली तेव्हा चर्चिलने भारताला स्वातंत्र्य देणार नाही असे निक्षून जाहिर केले.त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनाही भारताला स्वातंत्र्य द्यावे असे वाटत होते असे वाचनात आले आहे.पण चर्चिलपुढे त्यांनी हा मुद्दा लावून धरला नाही. म्हणजेच त्याकाळी भारत हा रूझवेल्ट आणि चर्चिलच्या दृष्टीने तुम्हाला वाटतो तितके महत्व देण्यायोग्य देश अजिबात नव्हता.मग भारताला मदत करायला नक्की कोण रांगा लावून उभे होते?जर्मनीत सुभाषचंद्रांनीही हिटलर आणि रिबेन्ट्रॉपची भेट घेतली पण जर्मनीनेही भारताला मदत करायला तशी टोलवाटोलवीच केली म्हणून सुभाषचंद्र नंतर जपानला गेले, बरोबर?

शांती सेनेचे उदाहरण हा एक विनोद आहे ,

उत्तम. विनोदाचा आस्वाद घ्या.पण त्यापेक्षा बराच मोठ्या विनोदाचा आस्वाद घ्यायची संधी तुम्ही मला दिलीत त्याबद्दल आभारी आहे.तो विनोद म्हणजे-- पहिल्यांदा भारताने इंग्लंडला हाकलायला जपानची मदत घ्यायची आणि जर जपानने आगळिक केली असती तर जपान्यांना हाकलायला परत अमेरिकेची मदत घ्यायची आणि ती अमेरिकेने गपगुमान दिली असती ही कल्पनाच मला भयंकर विनोदी वाटते.

इंग्रजांच्या तालमीत तयार झालेले भारत व पाकिस्तान व बांगलादेश ह्यांचे सैन्य त्यावेळी सुद्धा जगात लढाऊ म्हणून प्रसिद्ध होते.
पठाण ,गुरखा ,शीख , राजपूत , मराठा , महार अश्या आपल्या रेजिमेंट ज्या नुकत्याच युरोपातून भारतात परत आल्या असत्या ,जपान ने कोणत्या तोंडाने आगळीक केली असती.

अहो वैयक्तिक शौर्याच्याच बळावर युध्द जिंकायचे दिवस १९४५ मध्ये बरेच मागे पडले होते.पहिल्यांदा इंग्रजांशी वाकडे केलेच आणि नंतर जपान्यांशीही वाकडे केले असते तर त्यांच्याविरूध्द लढायला लागणार्‍या तोफा, बंदुका, रणगाडे, विमाने, युध्दनौका आकाशातून पडणार होत्या का? आणि खुद्द इंग्लंड आणि अमेरिकेच्या सैन्याचा जपानने काही महिन्यात दक्षिण-पूर्व एशियात पराभव केला होता.तेव्हा इंग्रजांच्या तालमीत तयार झालेल्या सैन्याची काय कथा? आणि तुम्ही नंतर आय.आय.टी ची स्थापना, शीतयुध्द वगैरे भविष्यातले संदर्भ दिलेच आहेत म्हणून मी पण फार नाही पण ३-४ वर्षे नंतरचा संदर्भ देतो. त्याच इंग्रजांच्या तालमीत तयार झालेल्या भारतीय सैन्याला (स्वातंत्र्य मिळाल्यावर इंग्रजांच्या सैन्यातील विमाने आणि शस्त्रास्त्रे दिमतीला असताना) १९४७-४८ मध्ये १४ महिन्यात पाकिस्तानी घुसखोरांना काश्मीरात ५०-६० किलोमीटरपेक्षा जास्त मागे पिटाळता आले नव्हते.पण दुसर्‍या महायुध्दाच्या काळात जपान उलटला असता तर अशी शस्त्रे हातात नसताना जपान्यांचा आपण चुटकीसरशी पराभव कसा करणार होतो (थिअरी चर्चेतील शब्द) हे त्या भगवंतालाच ठाऊक.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Feb 2013 - 2:42 pm | निनाद मुक्काम प...

जपानी लोकांनी जे अंदमान येथे केले ते बंगाल मध्ये का केले नसते असा प्रश्न तुम्हाला फक्त पडला पण ह्याआधी कुठल्याही राजकीय विचारवंताला का बरे पडला नसावा ,
आतापर्यंत आपल्या देशात कुणीच बरे हा मुद्दा धसास लावला नाही ,
का तुमच्या डोक्यात जी ही अभूतपूर्ण कल्पना आली ती ह्या आधी इतर लोकांच्या का बरे आली नाही , कदाचित नेताजी ह्यांचा करिश्मा एवढा असावा की तुम्हाला जी तयंची चूक वाटते ती आधी कोणतही राजकीय विचारवंताला म्हणजे कोणाला सुद्धा वाटली नाही.
आणि तुम्ही किती विनोद करता राव
चर्चिल व इंग्लंड ने भारताला स्वातंत्र्य का दिले नाही ,
अहो साहेब जर विचार करा
समजा जपानच्या मदतीने इंग्रज देशाबाहेर गेला असता म्हणून काही जर्मनी चा रशियात पराभव व त्याचं बरोबर रशिया ,अमेरिका , इंग्रज अशी युती होणे काही टळले नसते , जपान ने जर्मनी ला मदत केली नाही व ती ते रशियात करू शकले नसते.
तेव्हा जरा विचार करा दुसर्या महायुद्ध नंतर अमेरिका व इंग्लंड मध्ये आलेला मजूर पक्ष वसाहत वादाच्या विरोधात होता, चर्चिल विरोधी पक्षाच्या बाकावरून भारताला स्वतंत्रता देऊ नका असे बजावत असतांना सुद्धा हा निर्णय घेतला गेला ,
प्रत्यक्ष दुसरे महायुद्ध चालू होते तेव्हा देश गांधी ह्यांच्या अहिंसेच्या मार्गावर चालत होता , व गांधी ह्यांचा बोस ह्यांच्या सशस्त्र क्रांती ला विरोध होता म्हणूनच अमेरिका व जर्मनी ने बोस ह्यांना महत्व दिले नाही ,
पण आपण येथे चर्चा करत आहोत जर जपानच्या मदतीने आझाद हिंद सेना इंग्रजांना पराभूत करून भारतात दाखल झाली असती व मग जपान ने बंगाल मध्ये अत्याचार ,...
येथे एक मुद्दा लक्षात घ्या ,
एक नेता भारता बाहेर जातो , सशस्त्र सैन्य उभारतो व भारतात विजेता म्हणून परत येतो व पराभूत राष्ट्रे त्यावेळचे बलाढ्य इंग्लंड असते अश्यावेळी सुभाष चंद्र ह्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा काय असती , व वसाहती भारताचे अमेरिकेला महत्व वाटत नसेल पण स्वतंत्र देश म्हणून अमेरिकेला भारताचे महत्व नक्कीच वाटले असते.
किंबहुना अमेरिकेला भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे महत्व पटले होते ,
त्यांच्या एम आय टी च्या धर्तीवर आपली आय आय टी स्थापन करण्यात त्यांनी
पुढाकार घेतला , भारतने मिश्र अर्थ व्यवस्था स्वीकारली , पण नरसिंह राव ह्यांनी जी अर्थव्यवस्था भारतात अंमलात आणली त्या धर्तीवर जर अर्थव्यवस्था भारत स्वतंत्र झाल्यावर स्वीकारणार असेल तर अमेरिकेला आपल्याला मदत करणे काहीच अशक्य नव्हते ,
ज्यू राष्ट्रे प्रगत देशांच्या मदतीने स्थापन झाले , तेव्हा ह्या राष्ट्राने प्रगत राष्ट्रांची
सुरवातीपासून सुसंगत धोरणे राबविली म्हणून अमेरिका व ज्यू राष्ट्रांशी मैत्री अभेद्य आहे,
जर बांगलादेश , पाकिस्तान सह आजचा भारत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला आले असते तर आणि त्यांनी अमेरिकेशी सुसंगत धोरण स्वीकारणार असते तर अमेरिकेने भारताला नक्कीच मदत केली असती.

The CIA succeeded the Office of Strategic Services (OSS), formed during World War II to coordinate espionage activities against the Axis Powers for the branches of the United States Armed Forces. The National Security Act of 1947 established the CIA, affording it "no police or law enforcement functions, either at home or abroad".[१
दुसर्या महायुद्धानंतर अमेरिकेने ह्या हेर संस्थेंची स्थापना केली व आपल्या सहकारी असलेल्या रशिया विरुद्ध कारवाया सुरु केल्या.
कारण आता लढाई दोन राष्ट्रांच्या मध्ये नव्हती तर समाजवाद ,भांडवशाही च्या मध्ये होती , जेथे अमेरिका आपल्या एकेकाळच्या सहकारी राष्ट्रे रशिया विरुद्ध शीत युद्ध घोषित करू शकतो तेथे त्यांचा भारताशी वैयक्तिक असा काहीच वाद नव्हता ,
किंबहुना मजूर पक्षाचे सरकार इंग्लंड मध्ये आले तेव्हा स्वतंत्र भारताशी त्यांनी संबंध तोडले नाही.
तेव्हा अमेरिकेने जर अणु बॉंब बनवला नसता तर त्यांचे जपानशी युद्ध सुरूच असते ,
ते इतक्यात निकाली लागणे शक्य नव्हते , तेव्हा कुठे जपानला भारतात येणे शक्य झाले असते.
तेव्हा अश्यावेळी जर जपानने भारतात अत्याचार केला असता ,तर जपानशी युद्ध चालू असलेल्या अमेरिकेने भारताला का बरे मदत केली नसती.
जपानला भारतात प्रस्थापित होणे हे भविष्यात अमेरिकेला जड गेले असते कारण आशियात सर्वत्र जपान चा बोलबाला झाला असता , एवढे अमेरिकेला कळत होते ,
दुसर्या महायुद्धात जर्मनी व रशिया ह्यांचा करार झाला होता , पुढे जर्मनी ह्याने जेव्हा रशिया वर हल्ला केला तेव्हा रशिया ने जर्मनींच्या शत्रू राष्ट्रे इंग्लंड व अमेरिकेशी मैत्री केली ,
जे रशिया ने जर्मनी उलटल्यावर केले ते भारताने जपान उलटल्यावर केले असते
एवढे लॉजिक पुरेसे आहे.

क्लिंटन's picture

5 Feb 2013 - 10:49 pm | क्लिंटन

आणि तुम्ही किती विनोद करता राव

हे वाचून तर अगदी परमसंतोष जाहला.मिसळपाववर गेल्या साडेपाच वर्षांत अनेक चर्चांमध्ये मी भाग घेतला.पण माझी एकूणच प्रतिमा थोडीशी (किंवा बरीचशी) गंभीर लिहिणारा अशी होती असा माझा गैरसमज होता.तो दूर केल्याबद्दल आपला आभारी आहे.

चर्चिल विरोधी पक्षाच्या बाकावरून भारताला स्वतंत्रता देऊ नका असे बजावत असतांना सुद्धा हा निर्णय घेतला गेला

बरं मग?चर्चिलने विरोधी बाकांवरून कितीही बजावले तरी त्याला अजिबात गांभीर्याने घ्यायची गरज नाही.

तेव्हा अमेरिकेने जर अणु बॉंब बनवला नसता तर त्यांचे जपानशी युद्ध सुरूच असते ,
ते इतक्यात निकाली लागणे शक्य नव्हते , तेव्हा कुठे जपानला भारतात येणे शक्य झाले असते.

जपान्यांचा इंटरेस्ट इंग्लंड आणि अमेरिकेला स्वत:च्या प्रभावक्षेत्रापासून जास्तीत जास्त दूर ठेवण्यात होता. तसेच १९४२ च्या शेवटी-१९४३ च्या सुरवातीला जपानी ब्रम्हदेशातून भारताच्या दिशेने वेगाने वाटचाल करतच होते.आणि त्या दृष्टीने जपान्यांना भारताच्या निदान काही भागात तरी तळ ठोकून राहण्यात नक्कीच इंटरेस्ट होता.आणि सुदैवाने जपानी भारतात फार आत घुसू शकले नाहीत.तसे ते घुसले असते तर त्या प्रदेशात त्यांनी इंग्रजांना उखडून फेकले असते हे अगदी १००% मान्य.पण त्यांनी सत्ता भारतीयांच्या हातात दिली असती हे मला तरी अशक्य वाटते.जपान्यांनी फिलीपाईन्स,इंडोनेशिया या देशांना स्वातंत्र्य दिले नव्हते तर तिथे कत्तलीच केल्या होत्या.तेव्हा भारतात आल्यानंतर त्यांना अचानक प्रेमाचे भरते आले असते असे अजिबात वाटायची गरज नाही.

तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे अणुबॉम्ब वगैरे बऱ्याच पुढच्या गोष्टी झाल्या जपानी भारतात थोडे घुसलेही होते. त्यांना तसेही भारतात घुसायचेच होते आणि त्यांना घुसायला आपल्याच लोकांना मदत केली आणि अशा मदतीचे समर्थन तुमच्यासारखे लोक करतात.

ज्यू राष्ट्रे प्रगत देशांच्या मदतीने स्थापन झाले , तेव्हा ह्या राष्ट्राने प्रगत राष्ट्रांची
सुरवातीपासून सुसंगत धोरणे राबविली म्हणून अमेरिका व ज्यू राष्ट्रांशी मैत्री अभेद्य आहे,

खरं की काय? मला आपले उगीचच वाटत होते की ज्यू समाजाची आर्थिक ताकद अमेरिकेत असल्यामुळे अमेरिका इस्राएलविरूध्द जाऊ शकत नाही.हा गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद.

जर बांगलादेश , पाकिस्तान सह आजचा भारत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला आले असते तर आणि त्यांनी अमेरिकेशी सुसंगत धोरण स्वीकारणार असते तर अमेरिकेने भारताला नक्कीच मदत केली असती.

कमाल आहे.पहिल्यांदा आपला कट्टर शत्रू टोजोच्या जपानची मदत घ्यायची, आपल्याच मित्रदेशाला भारतातून हाकलायचे हे प्रकार केल्यानंतर अमेरिकेने भारताला मदत केली असती?

दुसर्या महायुद्धात जर्मनी व रशिया ह्यांचा करार झाला होता , पुढे जर्मनी ह्याने जेव्हा रशिया वर हल्ला केला तेव्हा रशिया ने जर्मनींच्या शत्रू राष्ट्रे इंग्लंड व अमेरिकेशी मैत्री केली ,
जे रशिया ने जर्मनी उलटल्यावर केले ते भारताने जपान उलटल्यावर केले असते

यात दोन गोष्टी आहेत.पहिली म्हणजे १९३९-जून १९४१ दरम्यान जर्मनी आणि रशिया यांच्यात अनाक्रमणाचा करार असला तरी कधीनाकधी जर्मनी आणि रशिया दरम्यान युध्द होणार हे वत: स्टॅलिनलाही माहित होते.तसेच या काळात रशियाने फिनलंड आणि पोलंडवर हल्ला केला होता पण कुठेही ब्रिटिश हितसंबंधांना प्रत्यक्षपणे धोका निर्माण केला नव्हता. तेव्हा इंग्लंड-अमेरिकेला १९४१ मध्ये रशियाला मदत करण्यात काहीच अडचण नव्हती. जर जपानची मदत घेऊन इंग्रजांना भारतातून मागे रेटले असते तर तो इंग्रजांच्या अगदी जिव्हारी लागणारा घाव ठरला असता.ब्रिटिश साम्राज्यात भारताचे स्थान काय होते हे वेगळे सांगायलाच नको.असा घाव भारतीयांनी दिल्यानंतरही जपान्यांविरूध्द इंग्लंड-अमेरिका भारताच्या मदतीला आले असते असे वाटणे अत्यंत भाबडेपणाचे आहे.

दुसरे म्हणजे १९४१ मध्ये रशियाला जेव्हा इंग्लंड-अमेरिकेने मदत सुरू केली तेव्हा रशिया एक बऱ्यापैकी बलाढ्य देश होता. निदान स्वतंत्रपणे शस्त्रे नाहीत, विमाने नाहीत, रणगाडे नाहीत अशी रशियाची परिस्थिती नक्कीच नव्हती (जी भारताची होती). तसेच लाखभर इंग्रज ३० कोटींच्या भारतावर १५० वर्षे राज्य करू शकले म्हणजे भारतीय समाज हा फारसा लढवय्या नाही हे काही त्यांना कळले नसेल का? तेव्हा भारताला मदत करणे म्हणजे भारताचे युध्द आपणच लढण्यासारखे आहे हे इंग्लंड-अमेरिकेला कळणार नाही का?अशी मदत करून इंग्लंड-अमेरिकेला काय मिळणार होते?परराष्ट्रसंबंधात स्वत:ला काही मिळाल्याशिवाय कोण कशाला इतरांना मदत करायला जातो?

ऋषिकेश's picture

5 Feb 2013 - 2:45 pm | ऋषिकेश

क्लिंटना मानले रे बाबा तुला.. चिकाटी थोर आहे! आम्ही पूर्वी असा प्रयत्न करायचो हल्ली (वय झाल्यावर ;) ) २-४ प्रतिसादानंतर सोडून देतो :)

या धाग्यांवर निव्वळ आदरांजली वहाणार होतो पण राहवले नाही म्हणून हा प्रतिसाद दिला.
लगे रहो!

मी-सौरभ's picture

25 Jan 2013 - 7:00 pm | मी-सौरभ

आदरांजली

सहज's picture

30 Jan 2013 - 2:01 pm | सहज

नेताजींना आदरांजली

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना वंदन व भावपूर्ण श्रद्धांजली.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Feb 2013 - 2:39 pm | बिपिन कार्यकर्ते

_/\_

सोत्रि's picture

2 Feb 2013 - 12:26 am | सोत्रि

अर्रर्र, वरची काही चर्चा ह्या धाग्यावर झाली नसती तर ह्या धाग्याचे पावित्र्य आबाधित राहिले असते असे उगाच वाटून गेले.

-(सुभाषबाबूंचा भक्त) सोकाजी

विकास's picture

5 Feb 2013 - 2:15 am | विकास

हे खरे आहे का?

मध्यंतरी असे वाचनात आले होते की, स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान नेहरूंनी आझाद हिंद सेनेतील इच्छूक सैनिकांना स्वतंत्र भारताच्या सैन्यात घेण्यास नकार दिला. (त्याच बरोबर हे देखील लक्षात ठेवायला हवे की आझाद हिंद सेनेतील पकडलेल्या सैनिकांवर लाल किल्ल्यामधील राजद्रोहाच्या खटल्यात, त्यांच्या बचावासाठीच्या काँग्रेसने नेमलेल्या समितीत नेहरू देखील एक वकील होते.)

सुनील's picture

5 Feb 2013 - 8:14 am | सुनील

मध्यंतरी असे वाचनात आले होते की, स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान नेहरूंनी आझाद हिंद सेनेतील इच्छूक सैनिकांना स्वतंत्र भारताच्या सैन्यात घेण्यास नकार दिला

सरसकट नकार नसावा.

कारण एअर कमोडर रमेश सखाराम बेनेगल नावाचे आझाद हिंद सेनेतील एक अधिकारी नंतर भारतीय सैन्यात दाखल झाले. ६५ आणि ७१ च्या युद्धात भाग घेतला. त्यांना अति विशिष्ठ सेवा पदक तसेच महा वीर चक्र यांनी गौरवले गेले होते.

विकास's picture

5 Feb 2013 - 9:06 am | विकास

त्यांच्या (कमोडर बेनेगल) मरणोत्तर प्रकाशीत झालेल्या आठवणींच्या पुस्तकात, BURMA to JAPAN with Azad Hind: A War Memoir (1941–1945) म्हणल्याप्रमाणे: The end of the war finds Benegal being shipped to India to be imprisoned by the British - ironically the first time he actually set foot in India. Released a few weeks later - thanks to the prevailing atmosphere at that time - Benegal decided to join the Indian Air Force . His hopes would be dashed when the IAF rejected his application citing his INA links! Not content with that response, Benegal would try again, this time successfully to get commissioned in the IAF in 1952.

सुनील's picture

5 Feb 2013 - 9:13 am | सुनील

बरोबर पण १९५२ सालीदेखिल नेहरू होतेच की! तेव्हा नेहरूंनी नकार दिला ह्यात तसे काही तथ्य दिसत नाही!

सरसकट संपूर्ण आझद हिंद सेनेचे भारतीय सैन्यात विलीनीकरण अशक्यच होते. परंतु, केस बाय केस प्रवेश दिला गेला, असेच दिसते.

विकास's picture

5 Feb 2013 - 9:21 am | विकास

पण त्यात जे His hopes would be dashed when the IAF rejected his application citing his INA links! म्हणले आहे त्यासंदर्भात मूळ प्रश्न होता. असे काय कारण होते की आझाद हिंद सेनेशी संबंधीत म्हणल्यावर त्यांना सैन्यापासून दूर ठेवले गेले? त्यातील अनेकांना होमगार्ड वगैर तत्सम (अलाईड) पेशासाठी घेतले गेले. त्यात दोन शक्यता आहेतः (१) त्यांच्यावर (आझाद हिंद फौजेवर) अविश्वास दाखवला गेला असे वाटते. (२) ब्रिटीशांचे निर्णय हे तात्काळ रदबातल केले गेले नसल्याने त्यांना राजद्रोहीच समजले गेले. जसे पांडूरंग सदाशीव खानखोज्यांच्या बाबतीत झाले तसेच काहीसे.

सुनील's picture

5 Feb 2013 - 9:34 am | सुनील

शक्य आहे. १५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० पर्यंत भारताचा कारभार हा १९३५ च्या गवर्मेन्ट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अंतर्गत सुरू होता.

त्यानंतर भारताची घटना लागू झाली.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Feb 2013 - 2:22 am | निनाद मुक्काम प...

विकासजी हे दुर्दैवाने खरे आहे ,
महानायक ह्या नेताजींच्या पुस्तकात ह्याचा सविस्तर उल्लेख आहे.
नेहरू ह्यांनी वकीलपत्र घेतले खरे मात्र स्वतंत्रता मिळाल्यावर मात्र त्यांनी आझाद हिंद सेनेच्या जवानांना सैन्यात घेतले नाही ,ह्याहून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आझाद हिंद सेनेतील जे मुस्लिम अधिकारी पाकिस्तानात गेले ते पाकिस्तानी सैन्यात रुजू झाले ,
आज ज्या मनोज कुमार चा सिनेमा काही सध्याच्या काही मध्यमवर्गीय लोकांचा चेष्टेचा विषय ठरतो , खरे तर त्या सिनेमातून अशोक कुमार ला निवृत्त आझाद हिंद सेनेचा जवान दाखवून त्याने खरे भारताच्या सर्व निव्रूत जवानाची शोकांतिका दाखवली आहे ,
आझाद हिंद सेनेतील महिला अधिकारी लक्ष्मी ह्यांनी म्हणूनच पुढे सरकारने पुढे
पुरस्कार देत होते ते नाकारले ,

आजानुकर्ण's picture

5 Feb 2013 - 3:25 am | आजानुकर्ण

आझाज हिंद सेनेतील जवानांना भारताच्या सैन्यात घेतले नाही म्हणून लक्ष्मी सैहगल यांनी पुरस्कार नाकारला असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?

विकास's picture

5 Feb 2013 - 6:03 am | विकास

आझाद हिंद सेनेतील महिला अधिकारी लक्ष्मी ह्यांनी म्हणूनच पुढे सरकारने पुढे पुरस्कार देत होते ते नाकारले

तसे नसावे. त्यांना १९९८ साली राष्ट्रपती वेंकटरामन यांच्या हस्ते पद्मविभूषण देण्यात आले होते.

मन१'s picture

5 Feb 2013 - 3:12 pm | मन१

१९९८ ?? १९९८ला शंकरदयाळ शर्मा किंवा के आर नारायणन हे राष्ट्रपती होते. वेंकटरामन हे राजीव गांधींच्या काळात् १९८८च्या आसपास त्या पदावर होते.(ते त्यांचे पंतप्रधानांविरुद्ध सुप्रसिद्ध वाद व घटनात्मक पेच वगैरे त्याच वेळेसचे.)

विकास's picture

5 Feb 2013 - 5:20 pm | विकास

चुकून वेंकटरामन लिहीले होते. ते आर के नारायणन होते. धन्यवाद!

मन१'s picture

7 Feb 2013 - 4:40 pm | मन१

आर के नारायण हे दिग्गज व्यंगचित्रकार्.टाइम्स मधील "कॉमन मॅन" हे त्यांचेच अपत्य.
.
के आर नारायणन हे भारताचे माजी राष्ट्रपती.

विकास's picture

7 Feb 2013 - 5:38 pm | विकास

ते आर के लक्ष्मण! :-) के आर नारायण हे राष्ट्रपती - धन्यवाद!

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Feb 2013 - 9:39 am | श्री गावसेना प्रमुख

आर के नारायण हे मालगुडी डे वाले आहेत,

आजानुकर्ण's picture

5 Feb 2013 - 11:05 pm | आजानुकर्ण

लक्ष्मी सहगल यांनी पुरस्कार नाकारला होता हे खरे. मात्र त्याचा आझाद हिंद सेना आणि भारत सरकार यांच्यातील तथाकथित वादाशी काहीही संबंध नसून, कॅ. सहगल यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीशी संबंध असावा असा दावा त्यांच्या कम्युनिष्ट पक्षाने केला होता.
येथे वाचा.
http://www.hindustantimes.com/News-Feed/India/Politicking-over-the-Bhara...

Pandhe pointed out that CPI(M) members in West Bengal and Kerala were known to reject even the freedom fighters’ pension as they viewed it as a government dole.

“Our Presidential candidate Laxmi Sehgal is one such freedom fighter who refused the pension and the (Padma) award,” said Pandhe.

CPI general secretary A.B. Bardhan had his own take on the debate.

“We are anti-establishment and are fighting the state to attain a socialist society. So, we are against any state awards,” he said.

कदाचित आझाद हिंद सेनेला सरसकट भारतीय सेनेत स्थान न देण्यामागे सुभाषबाबू व आझाद हिंद सेनेचे इतर पदाधिकारी यांच्या साम्यवादी विचारसरणीच्या प्रेमाची नेहरुंना लागलेल्या कुणकुणीचे काही स्थान असावे काय?

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2013 - 4:33 pm | पिंपातला उंदीर

कृपया महानायक ला इतक महत्व देऊ नका. ती 'कादांबरी' आहे. ऐतिहासिक दस्ताएवज नाही.आणि क्लर्क हा तुमचा टेकु असेल तर मग बोलनेच संपले

नितिन थत्ते's picture

5 Feb 2013 - 12:17 pm | नितिन थत्ते

दुसर्‍या एका धाग्यावर गांधींच्या मृत्युदिनाचे 'पावित्र्य' राखावे असे मत कुणीतरी व्यक्त केले होते. तेच या धाग्यालाही लागू व्हायला हरकत नाही.