पुस्तक

विश्वेश's picture
विश्वेश in जनातलं, मनातलं
22 Jan 2013 - 11:11 am

आपण एखाद्या लांबच्या प्रवासाला निघालो आणि गाडीत बसलो कि राखून ठेवलेले एखादे पुस्तक काढतो वाचायला अन त्याच वेळी आपला शेजारी देखील त्याचे पुस्तक काढतो तेव्हा आपले लक्ष आपल्या पुस्तकापेक्षा त्याच्या पुस्तकात डोकावण्यात जास्त असते.

नवरा बायकोचे पण तसेच असते काहीसे असे मला वाटते. म्हणजे दोघेही आपापली पुस्तक वाचत असतात पण दुसर्याच्या पुस्तकाबद्दल एक आकर्षण, ओढ आणि हळू हळू हक्क वाटू लागतो. आपण त्यात डोकावू लागतो, मग स्वताच्या पुस्तकामाधली पानं कधी सवयीने तर कधी दुसर्याला कळू नये म्हणून तर कधी आपोआप उलटली जातात. संसारात खरी मज्जा तेव्हा आहे जेव्हा दोघेही एकच पुस्तक वाचाल. एकाच सुखी शेवटाच्या ओढीने ... मग आपोआपच दुसर्याचे वाचून होईपर्यंत थांबणे, एखाद्या विनोदाला दोघांनी एकत्र हसणे, एखाद्या गहीवरणाऱ्या प्रसंगी हात हातात घट्ट धरणे ह्या सगळ्याची मजा येते.

आज अनेक नवरा बायको आपापली वेगळी पुस्तके वाचत आहेत, आपापल्या गोष्टीमध्ये रममाण आहेत. मग ते मधेच खुदकन हसणे, डोळ्यांचे ओलावणे हे सगळे त्याला अनोळखीच ना ... कारण त्यावेळी तो दुसर्याच गावी ... त्याच्या त्याच्या पुस्तकात मग्न ... दोन्ही पुस्तकांचे शेवट गोड असतीलही कदाचित पण ते एकटयानेच चाखायचे यात काय सुख. त्याच्या किंवा तिच्या पुस्तकात डोकावून तर बघा आवडेल तुम्हालाही ते कदाचित. हळूहळू त्या पुस्तकाबद्दलची ओढ कमी होण्याच्या आत तुमचे पुस्तक बदला. मग दोघांना एकाच गोष्टीची ओढ, एकसारखी हुरहूर अन दोघांची वाटचाल एकाच सुखी शेवटाकडे असेल.

बर हे पुस्तक संपले तरी दोघांकडे एकसारख्या आठवणी असतील ... चर्चेला दोघांच्या आवडीचा विषय असेल आणि यातूनच संवाद वाढेल. संवादाला लय प्राप्त झाली कि त्याचा सुसंवाद होतो. आणि यासारखे सुरेख जीवनगाणे नाही.

तेव्हा एकदा वाचून बघा एखादे पुस्तक एकत्र ...
तुमचा लांबचा प्रवास सुखकर होईल हे नक्की ...

मांडणीविचारआस्वाद

प्रतिक्रिया

विश्वेश's picture

22 Jan 2013 - 11:21 am | विश्वेश

पहिल्यांदाच असे 'पुस्तकी' लिखाण केले आहे,

अभ्या..'s picture

22 Jan 2013 - 11:26 am | अभ्या..

काही कळले नाही हो. :(
नवरा बायको, पुस्तक मिळून वाचणे, लांबचा प्रवास, दुसर्‍याच्या पुस्तकात डोकावणे, नंतर चर्चा, सुखकारक शेवट.
काय म्हणजे काय ते शेवटपर्यंत कळले नाही.
बाकी लि़खाण उत्तम. सुद्दलेकनाचे मार्क पैकीच्या पैकी.

विश्वेश's picture

22 Jan 2013 - 12:37 pm | विश्वेश

अहो पुस्तक हे प्रातिनिधिक आहे, हल्ली नवरा बायकोने स्वताचे वेगळे करियर, पर्सनल आयुष्य, त्याचा आलेख असे स्वताशीच आणि स्वतासाठीचे एक वेगळे गोष्टीचे पुस्तकठरवलेले असते. माझे म्हणणे इतकेच कि अश्या वेगळ्या वेगळ्या पुस्तकांपेक्षा दोघांनी मिळून एकाच पुस्तक वाचा :)

अभ्या..'s picture

22 Jan 2013 - 2:51 pm | अभ्या..

स्वताचे वेगळे करियर, पर्सनल आयुष्य, त्याचा आलेख

ओके ओके. आता पोहोचल्या बघा भावना. म्हणजे एकाच कालेजात शिकून, एकाच ऑफीसात, एकाच डिपार्टमेंटमध्ये नोकरी करुन, एकाच गाडीतून घरी यायचे ना? वॉव. मस्तच रोमँटीक आयडीया आहे.
पब्लिक ट्रान्स्पोर्ट, ऑफीस पॉलिटिक्स, करीअर क्रायसेस, आणि अशा कीतीतरी गोष्टींवर हे उत्तम समाधान आहे.

स्पा's picture

22 Jan 2013 - 12:43 pm | स्पा

मस्तच लिहिलंय

- ( लायब्ररी लावलेला ) स्पा

स्पंदना's picture

22 Jan 2013 - 12:47 pm | स्पंदना

स्पावड्या ? तुला एकत्र पुस्तक कुठ वाचायला गावल? ट्रेनीत?

मनराव's picture

22 Jan 2013 - 2:57 pm | मनराव

+१

पैसा's picture

22 Jan 2013 - 7:30 pm | पैसा

एक तरी पुस्तक विकत घे आधी!

एक तरी पुस्तक आहे त्याच्याकडे... हा बघ पुरावा.

पुस्तकाचे नाव : फास्टरफेणे टोला हाणतो.

.

पैसा's picture

23 Jan 2013 - 8:53 am | पैसा

पण मला वाटते ते गिफ्ट दिलेले आहे.

संजय क्षीरसागर's picture

23 Jan 2013 - 10:45 am | संजय क्षीरसागर

प्रश्न पुस्तकाचा नसून एकत्र वाचण्याचा आहे. `वाचणारी कुठून आणायची' हे महत्त्वाचय...पुस्तक काय कसंही मिळवता येईल.

धमाल मुलगा's picture

23 Jan 2013 - 11:44 am | धमाल मुलगा

मग ते स्पपवपवड्डा इतकावेळ कशाबद्दल बोलतंय म्हणे?

पैसा's picture

23 Jan 2013 - 1:26 pm | पैसा

स्पावड्याला खफ, चेपु सगळीकडे सध्या पुस्तकेच पुस्तके दिसतायत!

मी सध्या बरीच पुस्तके चाळतोय
काही मित्रांनी 'त्यांची' दिलेली आहेत
काही वाचनालयातून घेतली आहेत
त्यावर जात आहेत दिवस

नेत्रेश's picture

22 Jan 2013 - 2:26 pm | नेत्रेश

जरा सांभाळुन

स्पा's picture

22 Jan 2013 - 2:31 pm | स्पा

:D

स्पंदना's picture

22 Jan 2013 - 2:56 pm | स्पंदना

स्वर्गवासी.....

स्पंदना's picture

22 Jan 2013 - 12:49 pm | स्पंदना

मला वाटत, नोटबुक, किंवा टॅबलेट अस म्हणायच असाव लेखकाला. आय जस्ट डोन्ट अंडरस्टॅंड फुस्तख..

स्पा's picture

22 Jan 2013 - 12:50 pm | स्पा

चालायचंच

किसन शिंदे's picture

22 Jan 2013 - 1:14 pm | किसन शिंदे

चांगलं लिहलंय.

ऋषिकेश's picture

22 Jan 2013 - 1:17 pm | ऋषिकेश

नै जम्या! :(

= दोघं एकत्र असताना `पुस्तक' कशाला वाचायच?

२) तुमचा लांबचा प्रवास सुखकर होईल हे नक्की

= लांबच्या प्रवासात तर पुस्तक अजिबात वाचू नये. खिडकीबाहेर पहावं किंवा एकमेकांशी गप्पा माराव्या.

३) पहिल्यांदाच असे 'पुस्तकी' लिखाण केले आहे

= तरीच! दोघांनी आपापल्या आवडीची पुस्तकं वाचावी आणि मग ती एकमेकांशी शेअर करावी. त्यानं एकमेकांशी नव्यानं जवळीक होते.

स्पा's picture

22 Jan 2013 - 5:25 pm | स्पा

=)) =))

पैसा's picture

22 Jan 2013 - 7:42 pm | पैसा

खिडकीबाहेर जास्त बघू नका. बायको वैतागेल.

शिवाय प्रवास लांबचा आहे.... आणि आपल्याला तर मुक्कामाला पोहोचल्यावर काय करायच ते खिडकीबाहेर बघितल्यावर एकसोएक सुचायला लागतं (खरं तर दिसायला लागतं)!

पैसा's picture

22 Jan 2013 - 8:01 pm | पैसा

:)

शुचि's picture

22 Jan 2013 - 7:09 pm | शुचि

मला आवडलं हे मुक्तक.

उद्या सुट्टि आहे या कल्पनेत एखादं मस्त पुस्तक डोक्याला डोके लाउन वाचत बसणे खरोखर एक सुंदर अनुभव आहे!

खुप छान लिहयलं.

अग्निकोल्हा's picture

22 Jan 2013 - 7:23 pm | अग्निकोल्हा

मग दोघांना एकाच गोष्टीची ओढ, एकसारखी हुरहूर अन दोघांची वाटचाल एकाच सुखी शेवटाकडे असेल.

एक्सलंट!

जोडीने चित्रपट बघताना दुर्दैवाने मानसिक गुंतवणूक कमी अन शारिरीक गुंतवणूकच जरा जास्त होतें. पण पुस्तक वाचताना मात्र तसं होतं नाही. We allways remains on same page by all mean :) अर्थात यासाठी दोघांना समान आवडीची पुस्तके मात्र जरुर हवीत.

अर्धवट's picture

23 Jan 2013 - 11:47 am | अर्धवट

गवी,
लायसील ची जाहिरात आठवली.. ;)

लायसिलची जाहिरात आठवली तो खैर समजे, लेकिन गविंची आठवण का झाली इथे ?? :)

अग्निकोल्हा's picture

24 Jan 2013 - 11:16 pm | अग्निकोल्हा

;)

पैसा's picture

22 Jan 2013 - 7:43 pm | पैसा

कल्पना चांगली आहे. पण सगळ्यांची आवड सारखी नसते हो!

श्रिया's picture

23 Jan 2013 - 11:41 am | श्रिया

पुस्तकाची उपमा आवडली. पण दोघांनी प्रत्येक वेळेस वेगळी पुस्तके वाचवीत असे आहे का? दोघांची आवडनिवड सारखीच असेल तर एकच पुस्तक दोघांनी वाचण्याचा आनंद घ्यावा किंवा एकाने वाचून दाखवावे आणि दुसर्‍याने ऐकावे.

संजय क्षीरसागर's picture

23 Jan 2013 - 11:54 am | संजय क्षीरसागर

आहो, प्रत्येक वेळी दोघांची आवड सारखी नसते. आणि...
ज्या वेळी दोघांची आवड एक असते तेंव्हा ते पुस्तक वाचण्यात वेळ घालवत नाहीत.

तर्री's picture

23 Jan 2013 - 11:45 am | तर्री

पेस्तनकाका भाई-सुनिता बाई ना विचारतात " ए भाऊसाहेब घरी पण तुम्ही असे पुस्त्काकामाधी डोके घालून बसते काय रे " ?
त्याची आठवण झाली.

आमच्या घरी मी साहित्य वाचतो आणि सौ. "मायक्रोवेव्ह मधील १०० पाकृ " इ . वाचते आणि त्यामुळेच शेवट गोड होतो हे.वे.सा.न.

तिमा's picture

23 Jan 2013 - 11:57 am | तिमा

येथ म्हणे श्री 'विश्वेशरावो',
हा होईल दानपसावो ||

आम्ही किनई, दोघे मिळून फक्त 'ज्ञानेश्वरी' हेच पुस्तक वाचतो.

संजय क्षीरसागर's picture

23 Jan 2013 - 12:06 pm | संजय क्षीरसागर

याचं उत्तम उदाहरण!

कवितानागेश's picture

24 Jan 2013 - 10:55 pm | कवितानागेश

आम्ही मिसळपाव वाचतो! :)