एरन स्वार्त्झ काळाच्या पडद्या आड?? आत्महत्या??

कापूसकोन्ड्या's picture
कापूसकोन्ड्या in जनातलं, मनातलं
14 Jan 2013 - 1:57 pm

या जगात काय चाललेले आहे?
गदिमांच्या भाषेत " पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा" हेच खरे.
इंटर्नेट वर Really Simply Sindcation किंवा Rish Site Summary (RSS) सारखा एक खुप उपयुक्त अ‍ॅप्लिकेशन वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी तयार करणारा तरूण काळाआड झाला हे वाचून खुप दु:ख झाले. वास्तविक कुणाचा कोण स्वात्झ्र (ज्याला काळा की गोरा बघितला तर नाहीच पण त्याच्या नावाचा धड उच्चार ही करता नाही), पण आत कुठे तरी कळ येउन गेली. जास्त वाईट वाटले ते आत्महत्या केली हे वाचून.
i
मिपा परिवाराला त्याची सर्व हिस्टरी माहिती तरी असेलच ( हिस्ट्री तर कसे म्हणावे, अवघे २६ वर्षे आयुष्य).
काही वैशिष्ठ्ये अशी.
फक्त टेक्नोक्रॅट नव्हे. तर एक विचारवंत
ओपन सोर्स चा खंदा समर्थक.
कायदेशीर आणि सरकारी कडक कारवाईच्या भितीने आत्महत्या केली असण्याची शक्यता.(त्याने बरीच बेकायदेशीर क्रुत्ये केली असली तरी त्याची कणव का यावी असे वाटते.)
काहीही डायरेक्ट संबंध नसताना उगाच यकूची आठवण आली!
काही लिन्का
.
.

शिक्षणबातमी

प्रतिक्रिया

धन्या's picture

14 Jan 2013 - 2:13 pm | धन्या

RSS च्या निर्मात्याला श्रद्धांजली.

सायबर गुन्हे हे सायबर विश्वाचं ज्ञान असलेल्यांकडूनच होण्याची शक्यता जास्त असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. कहर म्हणजे जालावर लिहिल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाची, हातून घडलेल्या जालासंबंधीत प्रत्येक कृतीची नोंद करता येऊ शकते, किंबहूना बरेच वेळा तशी नोंद होत असतेच ही अंतरजालासंबंधीची मुलभूत बाब सायबर गुन्हे करणारे विसरतात. अर्थात गुन्हा जालावरचा असो वा वास्तव जीवनातला, इथून तिथून गुन्ह्यांमागचं मानसशास्त्र तेच असतं.

समयांत's picture

14 Jan 2013 - 9:37 pm | समयांत

वाईट वाटतंय.
श्रध्दांजली RSS निर्मात्याला.
(यकूची आठवण आली!)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jan 2013 - 10:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

क्रिएटिव्ह माणुस गेला एक.

माफ करा..मी इथे तसा नविन आहे..हे यकु काय आहे समजेल का?

कापूसकोन्ड्या's picture

16 Jan 2013 - 1:19 pm | कापूसकोन्ड्या

यकु नावाचा एक आय डी होत. काही मिपाकरांनी त्याना प्रत्यक्ष पाहीले होते. त्यांनी दुदैवानी आत्म्हत्या केली. त्यामुळे हळहळ वाटते.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

16 Jan 2013 - 12:38 pm | घाशीराम कोतवाल १.२

हे यकु काय आहे समजेल का?
यकु म्हणजे मिपा आणि आंतर जालावरिल लेखक यशवंत कुलकर्णी होय
दुर्दैवाने आज ते हयात नाहीत

चेतन's picture

16 Jan 2013 - 1:03 pm | चेतन

http://www.thehindu.com/opinion/op-ed/pushed-into-the-abyss/article43101...

एरन स्वार्त्झ हा को-ऑथर Rish Site Summary (RSS) १.० चा
RDF Site Summary, the first version of RSS, was created by Dan Libby and Ramanathan V. Guha at Netscape.
http://en.wikipedia.org/wiki/RSS

असो...

धन्याशी सहमत

कापूसकोन्ड्या's picture

16 Jan 2013 - 1:20 pm | कापूसकोन्ड्या

सहमत

त्याच्यासाठी हॅकर्स संघटनेने एम. आय. टी. ची वेबसाइटसुद्धा हॅक केली होती असे दिसते.

अग्निकोल्हा's picture

16 Jan 2013 - 7:09 pm | अग्निकोल्हा

अनाधिक्रुत प्रकारे मिळवलेले डॉक्युमेट्स त्याने कोणतीही आर्थीक कमाइ न करता शिक्षणासाठी सर्वाना उपलब्ध्द करुन दिले या कारणास्तव त्याच्यावर $१०००००० चा दंड व सोबतीला ३५ वर्षे कारावासाची शिक्षा पध्दतशीरपणे लादली जाणार होती, जो सायबर गुन्हे संदर्भातील कायदेशीर तरतुदींचा गैर वापर होता. (अशा स्वरुपाची शिक्षा अतीशय गंभीर स्वरुपाच्या सायबर गुन्ह्यालाच सुनावली जाते), कारण त्याने पायरसी विरोधातील लढाइमधे सरकार (व खाजगी कंपन्या) यांच्या अमेरीकन घटनेने दिलेल्या मुलभुत व्यक्ती स्वातंत्राच्या तत्वांवर गदा आणनार्‍या कायदेशीर तरतुदींना (SOPA) यशस्वी विरोध करुन दाखवला होता. १ मिलीयन त्याच्यासाठी सहज जमाही केले गेले असते, पण ३५ वर्षे तुरुंगवास ? इथे दोन आठवडे कॉम्प्युटर शिवाय जात नाहीत :(

काय चूक आहे काय बरोबर आहे याचे ज्याचे त्याचे निकष वेगळे असतात. विशेषतः आर्थिक हितसंबंध गुंतले असताना. आपली बौद्धीक मालमत्ता (इंटलेक्चुअल प्रॉपर्टी) जगाला पैसे घेऊन वापरु द्यायची की फुकट वापरु द्यायची हा सर्वस्वी त्या व्यक्तीचा प्रश्न असतो.

बिल गेटस विंडोज ही ऑपरेटींग सिस्टीम विकून मालामाल झाला तर त्याच विंडोजच्या तोडीची किंबहूना सरस अशी लिनक्स फुकटात वापरायला मिळते.

अनाधिक्रुत प्रकारे मिळवलेले डॉक्युमेट्स त्याने कोणतीही आर्थीक कमाइ न करता शिक्षणासाठी सर्वाना उपलब्ध्द करुन दिले

हे म्हणजे एखादया दरोडेखोराने गावातील सावकाराला लुटून त्याचा पैसा गोरगरीबांना वाटण्याचा प्रकार आहे.

अग्निकोल्हा's picture

16 Jan 2013 - 8:34 pm | अग्निकोल्हा

काय चूक आहे काय बरोबर आहे याचे ज्याचे त्याचे निकष वेगळे असतात. विशेषतः आर्थिक हितसंबंध गुंतले असताना.

$१०००००० + वयाच्या सव्विसाव्या वर्षी ३५ वर्षे कारावासाची शिक्षा पायरसिचे व्यावसायीक रॅकेट चालवणार्‍याला रेकमेंड करणे समजु शकते, उगाच फुटकळ प्लॅस्टीक गॉगलवर आपली परवानगी न घेता का चित्र छापलं म्हणुन उद्या ऐश्वर्या रायने गरीब अशा जत्रेतल्या खेळणी विक्रेत्याला कोर्टात खेचलं व कोर्टाने त्याला लाखांचा दंड व उमरकैद दिली तर तुम्ही दोष कोणाला देणार ? विशेषतः जर शिक्षेमागील संदर्भ त्याने कधीकाळी अण्णा हजारेला सक्रीय पाठींबा दिला होता हा ठरत असेल तर ?

हे म्हणजे एखादया दरोडेखोराने गावातील सावकाराला लुटून त्याचा पैसा गोरगरीबांना वाटण्याचा प्रकार आहे.

नाही रॉबीनहुडचा संदर्भ वेगळा आहे. एरनच्या इथे गुन्हा/दोष स्वेच्छेने मान्य करुन त्यामागची भावना जगासमोर आणुनही जी शीक्षा त्याला देण्याची तयारी होत होती त्यामागे संदर्भ त्याने केलेला गुन्हा हा नसुन "सोपा" कायद्याला केलेला यशस्वी विरोध हा मानला जात होता. आता "सोपा" म्हणजे कसं सगळ्या जगालाच अवघड जागचं दुखणं ठरणार होतं हा एक वेगळाच विषय आहे.

धन्या's picture

16 Jan 2013 - 8:58 pm | धन्या

$१०००००० + वयाच्या सव्विसाव्या वर्षी ३५ वर्षे कारावासाची शिक्षा पायरसिचे व्यावसायीक रॅकेट चालवणार्‍याला रेकमेंड करणे समजु शकते, उगाच फुटकळ प्लॅस्टीक गॉगलवर आपली परवानगी न घेता का चित्र छापलं म्हणुन उद्या ऐश्वर्या रायने गरीब अशा जत्रेतल्या खेळणी विक्रेत्याला कोर्टात खेचलं व कोर्टाने त्याला लाखांचा दंड व उमरकैद दिली तर तुम्ही दोष कोणाला देणार ? विशेषतः जर शिक्षेमागील संदर्भ त्याने कधीकाळी अण्णा हजारेला सक्रीय पाठींबा दिला होता हा ठरत असेल तर ?

याचं उत्तर "म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो आहे" असंही असू शकेल. अर्थात हा पोकळ अंदाज झाला. त्यांची गणितं वेगळी असू शकतात. गुन्ह्याचं स्वरुप खुपच छोटं असलं तरी प्रचलीत बौद्धिक संपदेच्या वापरासंबंधीच्या निकषांनुसार गुन्हा झाला आहे ही वस्तूस्थिती आहे.

नाही रॉबीनहुडचा संदर्भ वेगळा आहे. एरनच्या इथे गुन्हा/दोष स्वेच्छेने मान्य करुन त्यामागची भावना जगासमोर आणुनही जी शीक्षा त्याला देण्याची तयारी होत होती त्यामागे संदर्भ त्याने केलेला गुन्हा हा नसुन "सोपा" कायद्याला केलेला यशस्वी विरोध हा मानला जात होता. आता "सोपा" म्हणजे कसं सगळ्या जगालाच अवघड जागचं दुखणं ठरणार होतं हा एक वेगळाच विषय आहे.

इथे माझ्या मुळच्या प्रतिसादात जे म्हटलंय तेच लागू होतं. आर्थिक हितसंबंध गुंतले असले की नीती - अनीती, चुक आणि बरोबर असण्याच्या व्याख्या खुप लवचिक असतात. आणि जो बलवान असतो त्याला अभिप्रेत असलेलेच अर्थ गृहीत धरले जातात.

गुन्ह्याचं स्वरुप खुपच छोटं असलं तरी प्रचलीत बौद्धिक संपदेच्या वापरासंबंधीच्या निकषांनुसार गुन्हा झाला आहे ही वस्तूस्थिती आहे.

आपल्याला एरनचा संदर्भ समजण्यात अजुनही चुक होतेय, इथे कोणताही गुन्हा वगैरे झालेला नाही, तर हेतुतः केलेला आहे. पळवाटा माहीत असुनही त्याचा मुद्दाम वापर केला गेला नाही. एक अतिशय उत्क्रुष्ठ हॅकर असुनही कृती लपवण्याचा प्रयत्न नाही. कदाचीत भारतीय मनाला या गोश्टी याक्षणि सहजतेने पटणेही अवघड आहे. जसे कधीकाळी इंग्रजांना भारतीय सत्याग्रह म्हणुन इंग्रज अधीकार्‍यांचा मृत्यू सोडा तर साधा अहिंसक सत्याग्रहही पटणे अशक्य होतं, म्हणूनच जेव्हा आपण म्हणालात "काय चूक आहे काय बरोबर आहे याचे ज्याचे त्याचे निकष वेगळे असतात." तेव्हांच "म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो आहे" हे पटलं.

तसचं इथे आपल्या मुळच्या प्रतिसादात जे म्हटलंय ते कदापी लागू होतं नाही कारण आपला प्रतीसाद गुन्हा घडला आहे हे नाकारता येणार नाही हे ठरवण्या इतपतच मर्यादीत आहे. गुन्हा कसा, कोणत्या परीस्थितीत, कशासाठी घडला, थोडक्यात "मोटीव्ह" ज्याला कायद्यामधे शिक्षा ठरताना सर्वोच्च महत्व आहे याकडे संपुर्ण दुर्लक्ष करतो, आणी एरनच्या अस्वस्थतेचे एक प्रमुख कारण माहीती तंत्रज्ञान कायद्याचा गैरवापर हे होतं. सरकारने जी सर्वोच्य शिक्षेची तयारी चालवली होती त्यामुळे तो व्यथीत झाला होता. अशी शिक्षा हार्डकोअर क्रिमीनल अथवा सुरक्षेसंबधी गुन्ह्यामधे दिली जाते. मुन्शीपालटीच्या शाळेतुन डस्टर पळवलं म्हणुन न्हवे ;)

आणि तरीही गुन्हा घडला आहे या माझ्या मताशी मी अजूनही ठाम आहे. मग तो गुन्हा जाणूनबुजून केला असला, त्याचे मोटीव्ह चांगले असले तरीही. :)

उदय's picture

16 Jan 2013 - 10:32 pm | उदय

आणि तरीही गुन्हा घडला आहे या माझ्या मताशी मी अजूनही ठाम आहे. मग तो गुन्हा जाणूनबुजून केला असला, त्याचे मोटीव्ह चांगले असले तरीही.

गुन्हा अजून सिद्ध् झाला नाही. त्याने मी निरपराधी आहे असे सांगितले होते. संदर्भः विकिपीडिया तळटीप ४९: Swartz surrendered to authorities, pleading not guilty on all accounts, and was released on US$100,000 unsecured bail.

तळटीप ५४: After Swartz's death, his attorney Marty Weinberg told press that he "nearly negotiated a plea bargain in which Swartz would not serve any time", but that bargain failed because "JSTOR signed off on it, but MIT would not."

अग्निकोल्हा's picture

16 Jan 2013 - 10:38 pm | अग्निकोल्हा

आपण गुन्हा घडला होता या सौम्य मतापेक्षाही एरनने गुन्हा केला होता/ त्याचे मोटीव्हही चुकीचेच होते असे कठोर मत जरी व्यक्त केले तरीही फरक पडत नाही कारण, एरनच्या अस्वस्थतेचे प्रमुख कारण त्याने गुन्हा केला होता की घडला होता वगैरे सिध्दांत नसुन त्या आधारे अमेरिकन सरकारने त्याच्या विरोधात अवास्तव शिक्षेचे जे कारस्थान रचले हे आहे. (system manipulation/कायद्याचा दुरुपयोग).

नगरीनिरंजन's picture

16 Jan 2013 - 7:40 pm | नगरीनिरंजन

सो मच फॉर द फ्री वर्ल्ड!
यावरून हे आठवले:
If voting changed anything, they'd make it illegal.
-Emma Goldman

विकास's picture

16 Jan 2013 - 8:21 pm | विकास

एरन स्वार्त्झ ला श्रद्धांजली....

त्याने जे केले ते प्रस्थापित कायद्याप्रमाणे बेकायदेशीर होते. ज्या प्रकारे त्याच्यावर एम आय टी मधील शोध निबंध चोरले, ते तत्व म्हणून बरोबर का बेकायदेशीर म्हणून चूक हे ठरवणे अवघड वाटले तरी किमान काही अंशी चूक असण्याची शक्यताच जास्त आहे. मात्र त्यावरून सरकारी वकील (प्रॉसिक्यूटर आणि टिम) तसेच एम आय टी मधून जे कोणी तक्रार करण्यात पुढे होते त्यांनी त्यावर कसे प्रेशर आणले असेल ज्याची परीणिती ह्या दु:खद घटनेत झाली, ते पूर्णपणे अयोग्य वाटते. वास्तवीक हा प्रसंग (जेस्टर मधील शोधनिबंध चोरणे) पुढची धोरणे आणि कायद्यात बदल करण्यासाठी उपयुक्त ठरू शकला असता आणि त्यात एरन सारख्या हुशार आणि विचारी व्यक्तीचा योग्य उपयोग होऊ शकला असता...

पण तसे होणे नव्हते... तुमच्या(कापूसकोन्ड्या) प्रमाणेच मला देखील गदीमांच्या इतर ओळी आठवल्या: वाईट तितके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले, या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार...
_______
ओपन सोअर्स म्हणजे फुकट असे स्पष्ट समिकरण त्यातूनही उद्योग वाढीस लागू शकतात. अँड्रॉईड ऑपरेटींग सिस्टीम हे त्याचे चांगले उदाहरण आहे.

उदय's picture

16 Jan 2013 - 8:31 pm | उदय

एरन बद्दल माहिती
एरन स्वार्त्झ

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Jan 2013 - 12:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

एरन स्वार्त्झ च ज्ञान सर्वाना द्यायचं हा मुद्दा बरोबर होता पण बौद्धिक संपदा हक्क नावाचा प्रकार अस्तित्वात आहेच की.
तुम्ही एखाद्या गोश्टिवर बरंच संशोधन करत आहात आणि तुम्हाला यश सुद्धा मिळालयं, तुम्हाला तुमच्या कष्टाचा मोबदला मिळायलाच हवा की. आणि कष्ट एकाचे आणि त्याचा फायदा काही न करता दुसर्यालाच हे काही बरोबर नाही. केलेल्या कष्टावर डल्ला मारणार्या आयतोबाला लोकं विरोध करणारच आणि ते योग्यच आहे. एम.आय.टी. चे जे जर्नल्स त्यानी हयाक केले ते कितीतरी संशोधकांची रात्र-दिवसांची मेहनत होती. त्याच्यावर फुकटात डल्ला मारायचा त्याला काही एक अधिकार नव्ह्ता.

असो. पण एक डोकेबाज तरुण अश्या भेकड पद्धतीनी जायला नाही पाहीजे होता हे मात्र खरं. रेस्ट इन पिस अ‍ॅरन स्वर्त्झ.