(आता कशाला उड्याची बात!)

श्रीकृष्ण सामंत ह्यांचे काव्य 'आता कशाला उद्याची बात' वाचले मात्र आमचा मेंदू उड्या मारु लागला आणि एक काव्य टुणकन उडी मारुन बाहेर पडले! Wink

आज काल ह्या उड्या असतात
आणि
आजच्या उड्या कालच्याच कोलांट्या
मग
आज जेव्हा उड्या माराल
आणि
उद्या त्यांच्या कोलांट्या होतील
तेव्हा
त्या उद्याच्या उड्यांना
आजच्या कोलांट्याच म्हटलं जाईल
आता
आज ज्या उड्या चालू राहिल्यात
त्याच
उद्या कोलांटउड्या म्हणून होणार
ज्या
उद्या कोलांटउड्या म्हणून असणार आहेत
त्याला
आज उड्या म्हणून म्हटलं जाणार
म्हणून
“आता कशाला उड्याची बात
बघ मारु उड्या रातोरात
भर भरूनी पिऊ
रस रंग नऊ
चल
मारु उड्या रंगात”

चतुरंग

:)

त्या उद्याच्या उड्यांना
आजच्या कोलांट्याच म्हटलं जाईल
आता
आज ज्या उड्या चालू राहिल्यात
त्याच
उद्या कोलांटउड्या म्हणून होणार

हा हा हा! हहपुवा.... Smile

झकास विडंबन...!

बाकी रंगा, तू काही या जन्मात सुधारशील असं मला तरी वाटत नाही! Smile

आपला,
(लहानपणी गाद्या घातल्यावर त्यावर भरपूर कोलांट्याउड्या मारून त्या गुधडणारा!) तात्या.

काय करणार तात्या,

'आमी बी घडलो तुमी बी घडाना' अशी अवस्था आहे! सुधारलो तर 'मिपा'चे सदस्यत्व जाईल ना? Wink

(अवांतर - केसुशेठची विडंबने वाचून विडंबने करण्याचा 'बग' सिस्टिममधे शिरलाय, असा काही फर्मास कच्चा माल मिळाला की तो उड्या मारायला लागतो! Wink

चतुरंग

वा!

रंगाशेठ,
एकदम झकास विडंबन..
(तात्याशेठ प्रमाणेच लहानपणी गाद्या घातल्यावर त्यावर भरपूर कोलांट्याउड्या मारून त्या गुधडणारा!) केशवसुमार.
स्वगतः आता मारून दाखव कोलांट्या बुदगुल साला.. Nerd

:)

आता मारून दाखव कोलांट्या बुदगुल साला..

रे मेल्या केशवा, हे स्वगत आहे की मला उद्देशून म्हटले आहेस? Smile

साला, अलिकडे कोलांटीउडी मारायची अंमळ भितीच वाटते. मान किंवा पाठ यापैकी कुठेतरी जबरदस्त उसंणच भरेल. फोकलिच्यो, तुझं आणि रंगाचं एक बरं आहे. तुम्हाला निदान काव्यात्मक कोलांट्या तरी मारता येतात! Smile

आपला,
(गब्दुल) तात्या.

ह्म्म

तात्याशेठ,
आहो हे स्वगतच आहे.. Tongue
(स्वगत्)केशवसुमार
(स्वगतः चो.म.चा म्हणतात ते हेच कारे शिंच्या) Waiting

अहो तात्या,

शाब्दिक कोलांट्याबरोबरच मी अजूनही खरी कोलांटीही मारु शकतो, कुठेही उसण न भरता, परवाच माझ्या मुलाबरोबर कोलांटी मारली आणि मी अजून नीट आहे! Wink

चतुरंग

हाहा

लहानपणी मारुतीच्या आरतीमधे "उडुगण उच्छेद !" असा उल्लेख वाचला होता. (मारुतीने नक्षत्रांच्या दिशेने घेतलेली झेप असा त्याचा अर्थ आहे. )

थोडा बदल करून असे म्हणाता येईल की , मारुतरायाच्या उडीगणांनी उच्छाद मांडलाय इकडे मिसळपाववर! Big Grin

सही उडी

झकास विडंबन...!

विडंबन

फार छान विडंबन जमलंय
शब्दांना हाताशी घेऊन त्यांच्या कडून कोलांट्या उड्या
मारून घेणं हेच खरं कविचं कसब असतं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

उड्या आणि

उड्या आणि कोलांट्या मस्तच!!

मस्त

झकास विडंबन

आवडलं

चेतन

सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे आभार!

चतुरंग