मेटामॉर्फिसीस

स्पंदना's picture
स्पंदना in जे न देखे रवी...
9 Dec 2012 - 6:00 am

मी.
माझ,
मला....

असा पिळदार रेशमाचा
भक्कम कोष
गुंफायचा स्वत:भोवतीच
अन विणायची स्वप्न
लपेटदार पंखांची
सुरेख रंगावलीन माखलेल्या आयुष्याची.

यांन द्याव, त्यानं करावं.
शिवाजींन सदाच शेजारी जन्माव.

मी मात्र माझ्या कोषात मग्न
मनी मानसी पंखांची स्वप्न
पण विसर मुख्य मुद्द्याचा
स्वत:ला झोकून द्यायचा

कुठे एक बोच नको
माझ्या पुरती आंच नको
कशी लाभावी देण पंखांची
जर न सुटती कोषाच्या भिंती?

असेलच बदलायचं तर बदल स्वत:ला
धुडकाव पहिलं आपल्याच मताला.
तरच अपेक्षांना फुटतील पंख
सोस क्षणिक दु:खाचा डंख

मग होशील मुक्त तू घ्याया भरारी
फुटतील आशा दुज्या जीवांना काटेरी

सोड आस या रेशीम कोषाची
जग असा क्षणभरी की
न उरेल
खंत
मरणाची.
__/\__
अपर्णा .

शांतरसकविता

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

9 Dec 2012 - 9:27 am | सुहास..

शीर्षकाला साजेसं !!

एक मेटा माझा पण ;)

मुळात तु यावीच का
आयुष्यात,
आधीच अधुरपण
तरायला भरपुर होते,
अंगार-भरल्या नयनांत जे
तेच या पाषाणहृदयात
प्रातःकाल च तो,
सकाळचा मनोरंग.
दिवसाचा रंग
ठरवितो अंतरंग
का फोन केला असावा मी तुला.
मधाळ, केवळ मधाळ
नाही नाही, बेधुंद, बेहोश करणारा,
कानात हलकेच गुंजारव करीत,
मनाला आकृष्ट करणारा,
छे छे नाही नाही ,
ह्रदयतारांवर मारवा छेडणारा,
की पाण्यावर स्पष्ट दिसणार्‍या
स्व-प्रतिमेला, तरंगा सरशी
विरघळविणारा,
तुझा तो झोपेतुन उठल्यावरचा
मदहोश स्वर !!!!

आणि हा दुसरा ,

एक रेषा आहे
तुझ्या माझ्यात
जुळविणारी
आणि अंतर ही राखणारी

शुक्रवारचा दिवस
शनीवाराची ओढ लावणारा
ते दोन-अडीच तास
तुझ्या चेहर्‍यावर पसरलेला
भेटीचा आनंद
तिच माझी मिळकत

घरी सोडताना
रिक्षात बसल्यावर
तुझ्या तळव्याचा
उबदार स्पर्श
नजरेतुन तु दिलेला
तो ' लुक '
दुर होताना मात्र
उदास होती ती नजर

मी परतत असताना
एकच प्रश्न
एकच सवाल
बोटांची गुफंण करुन
जुळलेल्या त्या हांतावरील
अस्ताव्यस्त पसरलेल्या रेषा
कधीतरी जुळतील का ?


सातवा

चमच्यांच्या स्टँडवर
सात चमचे होते
एक चमचा एक दिवशी
गहाळ झाला
उरलेल्या सहांच्या गळ्यातून
प्रथमच
अनावर हुंदका फुटला
‘ ती असती तर’ – ते उद्गारले,
तो हरवला नसता
मीही अनावरपणे
सातवा चमचा झालो
आणि त्याची रिकामी जागा घेउन
सहांच्या हुंदक्यात
सामील झालो – आणि
पुटपुटलो;
खरं आहे, मित्रांनो
ती असती तर
मी हरवलो नसतो.

-’मुक्तायन’ कुसुमाग्रज

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Dec 2012 - 9:32 am | श्री गावसेना प्रमुख

छान आहे
राजे पुन्हा जन्माला या पण शेजारी या,ही गोष्ट समाजाची भेकड वृत्ती दर्शवते
आपण फक्त तुम लढो हम तुम्हारे कपडे सम्भालते है असेच रहानार

ज्ञानराम's picture

9 Dec 2012 - 11:56 am | ज्ञानराम

छान आशय आहे कवितेचा.. भावला

सस्नेह's picture

9 Dec 2012 - 11:59 am | सस्नेह

इतकी कल्पकता+आशय अन यमक-छंद बेपत्ता ?
शंभरी गाठायचा विचार दिसतोय !

हारुन शेख's picture

9 Dec 2012 - 5:29 pm | हारुन शेख

नाही ते शक्य.फारफार तर पंच्याहत्तरी गाठता येते. :)

स्पंदना's picture

11 Dec 2012 - 4:26 pm | स्पंदना

इतकी कल्पकता+आशय अन यमक-छंद बेपत्ता ?
करा - खल अन मारा याला बत्ता!!

जमल जमल. वृत्त नसेल पण यमक हाय की गो!

प्रचेतस's picture

9 Dec 2012 - 12:40 pm | प्रचेतस

खूप छान.

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Dec 2012 - 1:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली फार फार आवडली.
स्वतः मधे अशाच एखाद्या बदलाच्या प्रतिक्षेत असलेला
(सध्या रेशमी कोशात बसलेला) पैजारबुवा,

जेनी...'s picture

10 Dec 2012 - 10:09 pm | जेनी...

आयला !

अजुन कितीदिवस रेशमी कोषात ओ पैबु काका ??

मी त तुमाला सुरवंट समजित व्हते :-/

हारुन शेख's picture

9 Dec 2012 - 5:35 pm | हारुन शेख

कविता आवडली. तसे पाहिले तर प्रत्येकजण एका कोशातच अडकलेला आहे. कुणी छोट्या कुणी मोठ्या. कुठल्याही कोशात नसणे हादेखील एक कोशच. कोशातले किडे खाऊन पंखवाले पक्षी आपल्या भरारीसाठी बळ मिळवतात हेही लक्षात घेण्यासारखे.

इष्टुर फाकडा's picture

9 Dec 2012 - 5:53 pm | इष्टुर फाकडा

बाकी ते मेटा का काय ते आम्हाला कळणं शक्य नाही. आम्ही प्रीतीला भीती, मायेला छाया जोडणारी माणसं. इस्काडून लिवा वाईच :)

रेवती's picture

9 Dec 2012 - 5:58 pm | रेवती

सुरेख कविता.

पैसा's picture

9 Dec 2012 - 10:13 pm | पैसा

छान! त्याला सुहास आणि हारुन शेख यांनी दिलेल्या प्रतिक्रियासुद्धा खूप आवडल्या!

मूकवाचक's picture

10 Dec 2012 - 12:51 pm | मूकवाचक

+१

प्यारे१'s picture

10 Dec 2012 - 2:53 pm | प्यारे१

संपादकांना पाठिंबा!

कवितानागेश's picture

9 Dec 2012 - 11:34 pm | कवितानागेश

फारच सुंदर. :)

५० फक्त's picture

10 Dec 2012 - 12:24 pm | ५० फक्त

खुप मस्त, मला तर रेषमी कोषांपेक्षा ते कोष देखील जाडजाड दोरखंडांचे असावेत असं वाटतं, बाहेरुन कुणी धक्का लावु नये आणि आतुन कितीही उर्मी आली तरी आपल्याला देखील तोडता येवु नयेत असे.

तरी एकदा बदलायचा विचार करावा यावर विचार करेन म्हणतो.

माझा "पिळदार" शब्द त्या साठीच आहे ५०.

मनीषा's picture

10 Dec 2012 - 12:34 pm | मनीषा

छान आहे कविता ...

फक्त, स्वतःच्या मताला धुडकावल्यानंतर मिळणार्‍या पंखात कितपत बळ राहील या बद्दल जरा शंका वाटते .

स्पंदना's picture

11 Dec 2012 - 4:24 pm | स्पंदना

खरी ताकद लागते ती स्वतःला पारखुन बघायलाच. स्वतःच्या चुकी मान्य करण्याची ताकद फार कमी माणसात असते.
अन दुसर्‍या कुणा बदलण्या ऐवजी आधी स्वतःची मत पारखुन बघावीत. अस स्वतःला सुद्धा पारखुन घेण्याची ताकद असल्यावर पंखातल बळ सह्स्त्रावधीने वाढेल.

मनीषा's picture

11 Dec 2012 - 6:39 pm | मनीषा

स्वतःच्या चुकी मान्य करण्याची ताकद फार कमी माणसात असते.

+१०००

दुसर्‍या कुणा बदलण्या ऐवजी आधी स्वतःची मत पारखुन बघावीत.

+१००१

दिपस्तंभ's picture

10 Dec 2012 - 12:48 pm | दिपस्तंभ

मस्तच आहेत कविता....आणि प्रतिक्रियासुद्धा

नंदन's picture

10 Dec 2012 - 1:44 pm | नंदन

आवडली. शीर्षक काफ्काच्या त्या प्रसिद्ध लघुकादंबरीची आठवण करून देणारे.

(किंचित अवांतर - 'कोसला'चा अर्थही कोश असाच.)

निरन्जन वहालेकर's picture

10 Dec 2012 - 10:05 pm | निरन्जन वहालेकर

छान कविता... .आणि सुहास आणि हारुन शेख यान्चा प्रतिसाद........

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Dec 2012 - 10:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडेश.

-दिलीप बिरुटे

स्पंदना's picture

11 Dec 2012 - 4:25 pm | स्पंदना

सार्‍यांना धन्यवाद. एकुण कविता न बांधतासुद्धा भिडते तर!!

इरसाल's picture

11 Dec 2012 - 4:34 pm | इरसाल

कविता जास्तीत जास्त साडीत बांधता येवु शकते. ;)
भिडली.

चिगो's picture

11 Dec 2012 - 5:46 pm | चिगो

छान कविता.. आवडली.

अनिल तापकीर's picture

13 Dec 2012 - 10:08 am | अनिल तापकीर

कविता सुंदर आहेच पण प्रतिक्रिया देखिल छन आहे