✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मेटामॉर्फिसीस

स — स्पंदना, Sun, 12/09/2012 - 06:00
मी. माझ, मला.... असा पिळदार रेशमाचा भक्कम कोष गुंफायचा स्वत:भोवतीच अन विणायची स्वप्न लपेटदार पंखांची सुरेख रंगावलीन माखलेल्या आयुष्याची. यांन द्याव, त्यानं करावं. शिवाजींन सदाच शेजारी जन्माव. मी मात्र माझ्या कोषात मग्न मनी मानसी पंखांची स्वप्न पण विसर मुख्य मुद्द्याचा स्वत:ला झोकून द्यायचा कुठे एक बोच नको माझ्या पुरती आंच नको कशी लाभावी देण पंखांची जर न सुटती कोषाच्या भिंती? असेलच बदलायचं तर बदल स्वत:ला धुडकाव पहिलं आपल्याच मताला. तरच अपेक्षांना फुटतील पंख सोस क्षणिक दु:खाचा डंख मग होशील मुक्त तू घ्याया भरारी फुटतील आशा दुज्या जीवांना काटेरी सोड आस या रेशीम कोषाची जग असा क्षणभरी की न उरेल खंत मरणाची. __/\__ अपर्णा .

प्रतिक्रिया द्या
6047 वाचन

💬 प्रतिसाद (30)

शीर्षकाला साजेसं !!

सुहास..
Sun, 12/09/2012 - 09:27 नवीन
शीर्षकाला साजेसं !! एक मेटा माझा पण ;) मुळात तु यावीच का आयुष्यात, आधीच अधुरपण तरायला भरपुर होते, अंगार-भरल्या नयनांत जे तेच या पाषाणहृदयात प्रातःकाल च तो, सकाळचा मनोरंग. दिवसाचा रंग ठरवितो अंतरंग का फोन केला असावा मी तुला. मधाळ, केवळ मधाळ नाही नाही, बेधुंद, बेहोश करणारा, कानात हलकेच गुंजारव करीत, मनाला आकृष्ट करणारा, छे छे नाही नाही , ह्रदयतारांवर मारवा छेडणारा, की पाण्यावर स्पष्ट दिसणार्‍या स्व-प्रतिमेला, तरंगा सरशी विरघळविणारा, तुझा तो झोपेतुन उठल्यावरचा मदहोश स्वर !!!! आणि हा दुसरा , एक रेषा आहे तुझ्या माझ्यात जुळविणारी आणि अंतर ही राखणारी शुक्रवारचा दिवस शनीवाराची ओढ लावणारा ते दोन-अडीच तास तुझ्या चेहर्‍यावर पसरलेला भेटीचा आनंद तिच माझी मिळकत घरी सोडताना रिक्षात बसल्यावर तुझ्या तळव्याचा उबदार स्पर्श नजरेतुन तु दिलेला तो ' लुक ' दुर होताना मात्र उदास होती ती नजर मी परतत असताना एकच प्रश्न एकच सवाल बोटांची गुफंण करुन जुळलेल्या त्या हांतावरील अस्ताव्यस्त पसरलेल्या रेषा कधीतरी जुळतील का ?
  • Log in or register to post comments

एक मेटा माझ्याकडून पण :) , कुसुमाग्रजांचा आहे.

हारुन शेख
Sun, 12/09/2012 - 17:41 नवीन
सातवा चमच्यांच्या स्टँडवर सात चमचे होते एक चमचा एक दिवशी गहाळ झाला उरलेल्या सहांच्या गळ्यातून प्रथमच अनावर हुंदका फुटला ‘ ती असती तर’ – ते उद्गारले, तो हरवला नसता मीही अनावरपणे सातवा चमचा झालो आणि त्याची रिकामी जागा घेउन सहांच्या हुंदक्यात सामील झालो – आणि पुटपुटलो; खरं आहे, मित्रांनो ती असती तर मी हरवलो नसतो. -’मुक्तायन’ कुसुमाग्रज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

छान आहे

श्री गावसेना प्रमुख
Sun, 12/09/2012 - 09:32 नवीन
छान आहे राजे पुन्हा जन्माला या पण शेजारी या,ही गोष्ट समाजाची भेकड वृत्ती दर्शवते आपण फक्त तुम लढो हम तुम्हारे कपडे सम्भालते है असेच रहानार
  • Log in or register to post comments

छान आशय आहे कवितेचा.. भावला

ज्ञानराम
Sun, 12/09/2012 - 11:56 नवीन
छान आशय आहे कवितेचा.. भावला
  • Log in or register to post comments

अय्या, हे काय अपर्णा ?

सस्नेह
Sun, 12/09/2012 - 11:59 नवीन
इतकी कल्पकता+आशय अन यमक-छंद बेपत्ता ? शंभरी गाठायचा विचार दिसतोय !
  • Log in or register to post comments

मला वाटते.

हारुन शेख
Sun, 12/09/2012 - 17:29 नवीन
नाही ते शक्य.फारफार तर पंच्याहत्तरी गाठता येते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

इतकी कल्पकता+आशय अन यमक-छंद

स्पंदना
Tue, 12/11/2012 - 16:26 नवीन
इतकी कल्पकता+आशय अन यमक-छंद बेपत्ता ? करा - खल अन मारा याला बत्ता!! जमल जमल. वृत्त नसेल पण यमक हाय की गो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

खूप छान.

प्रचेतस
Sun, 12/09/2012 - 12:40 नवीन
खूप छान.
  • Log in or register to post comments

आवडली फार फार आवडली.

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 12/09/2012 - 13:01 नवीन
आवडली फार फार आवडली. स्वतः मधे अशाच एखाद्या बदलाच्या प्रतिक्षेत असलेला (सध्या रेशमी कोशात बसलेला) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

आयला !

जेनी...
Mon, 12/10/2012 - 22:09 नवीन
आयला ! अजुन कितीदिवस रेशमी कोषात ओ पैबु काका ?? मी त तुमाला सुरवंट समजित व्हते :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

कविता आवडली.

हारुन शेख
Sun, 12/09/2012 - 17:35 नवीन
कविता आवडली. तसे पाहिले तर प्रत्येकजण एका कोशातच अडकलेला आहे. कुणी छोट्या कुणी मोठ्या. कुठल्याही कोशात नसणे हादेखील एक कोशच. कोशातले किडे खाऊन पंखवाले पक्षी आपल्या भरारीसाठी बळ मिळवतात हेही लक्षात घेण्यासारखे.
  • Log in or register to post comments

कविता आवडली !

इष्टुर फाकडा
Sun, 12/09/2012 - 17:53 नवीन
बाकी ते मेटा का काय ते आम्हाला कळणं शक्य नाही. आम्ही प्रीतीला भीती, मायेला छाया जोडणारी माणसं. इस्काडून लिवा वाईच :)
  • Log in or register to post comments

सुरेख कविता.

रेवती
Sun, 12/09/2012 - 17:58 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments

आवडली कविता

पैसा
Sun, 12/09/2012 - 22:13 नवीन
छान! त्याला सुहास आणि हारुन शेख यांनी दिलेल्या प्रतिक्रियासुद्धा खूप आवडल्या!
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Mon, 12/10/2012 - 12:51 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+१.५

प्यारे१
Mon, 12/10/2012 - 14:53 नवीन
संपादकांना पाठिंबा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

फारच सुंदर.

कवितानागेश
Sun, 12/09/2012 - 23:34 नवीन
फारच सुंदर. :)
  • Log in or register to post comments

खुप मस्त, मला तर रेषमी

५० फक्त
Mon, 12/10/2012 - 12:24 नवीन
खुप मस्त, मला तर रेषमी कोषांपेक्षा ते कोष देखील जाडजाड दोरखंडांचे असावेत असं वाटतं, बाहेरुन कुणी धक्का लावु नये आणि आतुन कितीही उर्मी आली तरी आपल्याला देखील तोडता येवु नयेत असे. तरी एकदा बदलायचा विचार करावा यावर विचार करेन म्हणतो.
  • Log in or register to post comments

माझा "पिळदार" शब्द त्या साठीच

स्पंदना
Tue, 12/11/2012 - 16:22 नवीन
माझा "पिळदार" शब्द त्या साठीच आहे ५०.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

छान आहे कविता ...

मनीषा
Mon, 12/10/2012 - 12:34 नवीन
छान आहे कविता ... फक्त, स्वतःच्या मताला धुडकावल्यानंतर मिळणार्‍या पंखात कितपत बळ राहील या बद्दल जरा शंका वाटते .
  • Log in or register to post comments

खरी ताकद लागते ती स्वतःला

स्पंदना
Tue, 12/11/2012 - 16:24 नवीन
खरी ताकद लागते ती स्वतःला पारखुन बघायलाच. स्वतःच्या चुकी मान्य करण्याची ताकद फार कमी माणसात असते. अन दुसर्‍या कुणा बदलण्या ऐवजी आधी स्वतःची मत पारखुन बघावीत. अस स्वतःला सुद्धा पारखुन घेण्याची ताकद असल्यावर पंखातल बळ सह्स्त्रावधीने वाढेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

अगदी अगदी ... +१

मनीषा
Tue, 12/11/2012 - 18:39 नवीन
स्वतःच्या चुकी मान्य करण्याची ताकद फार कमी माणसात असते.
+१०००
दुसर्‍या कुणा बदलण्या ऐवजी आधी स्वतःची मत पारखुन बघावीत.
+१००१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

मस्तच ....

दिपस्तंभ
Mon, 12/10/2012 - 12:48 नवीन
मस्तच आहेत कविता....आणि प्रतिक्रियासुद्धा
  • Log in or register to post comments

कविता

नंदन
Mon, 12/10/2012 - 13:44 नवीन
आवडली. शीर्षक काफ्काच्या त्या प्रसिद्ध लघुकादंबरीची आठवण करून देणारे. (किंचित अवांतर - 'कोसला'चा अर्थही कोश असाच.)
  • Log in or register to post comments

छान कविता...

निरन्जन वहालेकर
Mon, 12/10/2012 - 22:05 नवीन
छान कविता... .आणि सुहास आणि हारुन शेख यान्चा प्रतिसाद........
  • Log in or register to post comments

छान

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 12/10/2012 - 22:23 नवीन
आवडेश. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सार्‍यांना धन्यवाद. एकुण

स्पंदना
Tue, 12/11/2012 - 16:25 नवीन
सार्‍यांना धन्यवाद. एकुण कविता न बांधतासुद्धा भिडते तर!!
  • Log in or register to post comments

हे बघा

इरसाल
Tue, 12/11/2012 - 16:34 नवीन
कविता जास्तीत जास्त साडीत बांधता येवु शकते. ;) भिडली.
  • Log in or register to post comments

कविता आवडली..

चिगो
Tue, 12/11/2012 - 17:46 नवीन
छान कविता.. आवडली.
  • Log in or register to post comments

कविता सुंदर आहेच पण

अनिल तापकीर
गुरुवार, 12/13/2012 - 10:08 नवीन
कविता सुंदर आहेच पण प्रतिक्रिया देखिल छन आहे
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा