वेळेवर झोपलं तरी,नीट झोप लागत नाय...!
देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥
दिवसभराच्या थकव्यात, असं वाटत असतं...
की कधी येकदा रातच्याला,आपलं घर दिसतं...
पोटभर जेवून,एकदाचे पसरावे पाय...॥१॥
देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥
पोटासाठी कामाची वाट,तशिही चुकत नाही...
समजा...आयतं मिळालं,तर मग सुखाची काय ग्वाही?
सालं...असल्याच विचारानी टेंन्शनला,वेगवेगळे फुटतात पाय...॥२॥
देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥
''हे'' म्हणे येणारच...,असं समजुन जगायचं असतं...
नाहि आलं,तर..''अरे व्वा...!'',असंही म्हणुन बघायचं असतं...
नक्की ''हे'' कसं आहे,काही अंदाजच लागत नाय...॥३॥
देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥
हल्ली टेंन्शन रिलिज करायला,वेगवेगळ्या गोळ्या मिळतात...
संध्याकाळी सातला नाहि का???,जश्या काहि ठिकाणी पोळ्या मिळतात...
त्या घेऊन याचा उतारा,मनासारखा मिळतो काय???...॥४॥
देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥
काहिवेळा टेंन्शन उतरायला,कविता आमची कामी येते...
आमच्या अवजड मनाला,टेकण्यासाठी खांदा देते...
मग शब्दांवाटे जातो आळस,जरा मोकळे होतात हात/पाय...॥५॥
देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥
चला...आता मन शांत झालं,कारण खरं उत्तर बाहेर आलं...
मनही आमचं असच हाय,काढू तेवढी निघतात सालं...
पुन्हा ''या'' टेंन्शनमधे, कविता येण्याची गॅरेंटी काय???...॥६॥
देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥
प्रतिक्रिया
22 Oct 2012 - 8:29 pm | तर्री
संध्याकाळी सातला नाहि का???,जश्या काहि ठिकाणी पोळ्या मिळतात... ( कहर )
आवडेश !
22 Oct 2012 - 8:30 pm | लीलाधर
घेता टेन्शन कशाला असता अत्रुप्त कविता ऊशाला :-P
23 Oct 2012 - 1:20 am | श्रीरंग_जोशी
कविता आवडली असे कसे म्हणू कारण अ. आ. टेन्शनमध्ये आहेत हे वाचून बरे नाही वाटले.
23 Oct 2012 - 2:17 am | जेनी...
आत्मा देवाचा धावा करतय ..
=))
गुर्जि लय टेन्शन आलय बग्गा :-/
23 Oct 2012 - 8:21 am | प्रचेतस
अत्रुप्तीच्या हिंदोळ्यावर झोके आलात घेऊन
शाजीच्या अड्ड्यावर आलात पराठे खाऊन
पोट लागले डचमळू रात्रीची झोप येईना काय
देवाधिदेवा यालाच, टेंन्शन म्हणावं काय???
23 Oct 2012 - 8:42 am | अत्रुप्त आत्मा
अत्ता बिझी आहे. त्यामुळे अगोबांस, रात्री जोरात उत्तर देण्यात येईल. :-b
23 Oct 2012 - 7:44 pm | पक पक पक
नाही तिथे चिमटा घेउन खोड त्यांनी काढ्ली,
डचमळ्लेल्या पोटात आता बरीच खळ्बळ वाढली,
काय उत्तर द्यावे ते सुचत नाही काय..?
देवाधी देवा यालाच टेंन्शन म्हणावे काय..? :bigsmile:
23 Oct 2012 - 9:42 am | जेनी...
" ही " घेऊन बघा " हिनं " जातं असं म्हणतात ,
नाहि आलं तरि " थोडी मज्जा !" असहि घेणारे म्हणतात ,
नक्की "हिचा " उपयोग काय ,आपल्या डॉस्क्यात शिरत नाय
देवाधिदेवा यालाच , टेंशन म्हणावं काय?
:D
23 Oct 2012 - 9:57 pm | पक पक पक
नक्की "हिचा " उपयोग काय ,आपल्या डॉस्क्यात शिरत नाय
देवाधिदेवा यालाच , टेंशन म्हणावं काय?
एकदा घेउन बघाच आत्त्याबाई... ;)
24 Oct 2012 - 2:34 am | जेनी...
वीकेंड टू वीकेंड'च' आम्ही " हिचा " उपयोग करतो ,;)
आम्हाला आलेलं " हे " " हिच्या " माथी मारतो , :P
खरं सांगायला ,आमच्या सोडुन आमी कुणाच्या बापाला भित नाय :)
देवाधिदेवा 'ह्या'लाच टेंशन म्हणावं काय ||दु.||
:D
23 Oct 2012 - 9:46 pm | अत्रुप्त आत्मा
अगोबाचा बोरू चवताळल्यावरच तासतो
मग शब्दांना मिळेल,तसे तो रंग फासतो.
निष्कारण माझ्या खोड्या काढून,पळून जातो लाऊन पाय...
देवाधिदेवा या अगोबाला... संपादक म्हणावे काय???
23 Oct 2012 - 9:48 pm | श्रीरंग_जोशी
इतका वेळ वाट पाहिल्याचे सार्थक झाले :-).
23 Oct 2012 - 9:52 pm | पक पक पक
चालु द्या... ;)
23 Oct 2012 - 9:13 am | नाखु
दोस्ताचा सल्ला "लई टेंन्शन घेतलं कि पेन्शन घ्यायला तुम्ही राहात नाही" सबब नो टेन्शन फक्त कधी मधी "अटेन्शन"
23 Oct 2012 - 9:32 am | ज्ञानोबाचे पैजार
गुरुजींनाही टेंसन?
गुरुजी टेन्शन येणारच संध्याकाळी ७ वाजता कोणी पोळ्या घेते का? प्रत्येक कामाची एक वेळ ठरली असते. संध्याकाळी ७ ला ठेंसन कमी करण्याचे औषध घ्या. मग बघा कसे टकाटक वाटते.
या गुरुजीला संध्याकाळी एकदा भेटलेच पाहीजे.
पैजारबुवा,
23 Oct 2012 - 9:44 am | लीलाधर
हे ठेंसन भलतचं दिसतीया पीरमात पडले की काय ब्वॉ ;) त्याशिवाय ठेंसनमध्ये पडनार न्हैत :-P
23 Oct 2012 - 10:57 am | ज्ञानोबाचे पैजार
http://ww.smashits.com/tyagi/kisi-ko-daulat-ki-tension/song-78688.html
TENSION
जाउदे उगाच आपण कशाला ठेंषण घ्या हे गाणं ऐका आणि ठेंषण फ्री व्हा.
पैजारबुवा,
23 Oct 2012 - 9:55 am | स्पा
अतिशय भावूक, करून जाणारी हळवी कविता..
<गवि मोड ऑन> आवंढा दाटून आलाय.. डोळे पाण्याने भरल्याने पुढच धूसर झालंय <गवि मोड ऑफ >
23 Oct 2012 - 10:11 am | स्पा
प्रतिसाद का संपादित केला ब्वा.. कारण काही समजले नाही
23 Oct 2012 - 10:20 am | ५० फक्त
' मन्या फेणे' आयडीवरुन दिला असता तर संपादित झाला नसता,
संपादकांशी जास्त दुश्मनी ठेवु नये
ना ठेवावी जास्त मैत्री
संपादक आहेतच लई खत्री
नेहमी सांगतात आमचे सोत्री.
23 Oct 2012 - 11:21 am | गवि
मेल्या, संपादित कोण कशाला करेल उगाच..?
जेव्हा एचटीएमएल सारखे " < " असे कंस टाकायचे असतील तेव्हा टेक्स्ट फॉर्मॅट फुल एचटीएमएल ठेवून कसे चालेल? मग ते कंस टॅगसारखे मानून गुप्तच नाही का होणार? "प्लेन टेक्स्ट" असा टाईप सिलेक्ट करत जा अशा वेळी..
आता वर प्लेन टेक्स्ट फॉर्मॅट करुन ठेवला आहे.
23 Oct 2012 - 11:53 am | स्पा
एक डाव माफी द्या गविजी :(
23 Oct 2012 - 1:02 pm | विश्वनाथ मेहेंदळे
तुला काय वाटले, तुझ्या प्रतिसादांचे रिअल टाईम स्क्रीनिंग चालू आहे? ;-)
23 Oct 2012 - 11:44 am | कवितानागेश
अतिशय भावूक, करून जाणारी हळवी प्रतिक्रिया.. :(
23 Oct 2012 - 6:23 pm | सूड
आवंढा दाटून आलाय.. डोळे पाण्याने भरल्याने पुढचं धूसर झालंय
काळजी घे हो.
23 Oct 2012 - 10:20 am | स्पा
असो
23 Oct 2012 - 10:28 am | मदनबाण
साला एक टेंशन आदमी को कविता करनेकु मजबुर करता हयं ! ;)
23 Oct 2012 - 11:10 am | तलाठी
कविते मुळे आजचा दिवस टेन्शन लेस....
27 Oct 2012 - 10:43 am | मितभाषी
हाहाहा हे लै भारी बरका आप्पा,
एका पिशवीत आख्खं गाव कोंबून, सगळ्या गावाला टेंशन देणार्यालाही टेंशन असते ही नविन माहीती मिळाली. ;)
23 Oct 2012 - 6:25 pm | सूड
कविता शष्प काही कळली नाय हो गुर्जी!! किती क्लिष्ट लिहिता, समजेल असं तरी लिहा.
24 Oct 2012 - 2:19 am | मोदक
मोठ्या भावाने छोट्या भावाच्या हातावर हात मारला आहे इतके मला समजले...
;-)
27 Oct 2012 - 9:12 am | अत्रुप्त आत्मा
काहिंन्ना आलं,काहिंन्नी दिलं,काहिंन्नी घेतलं... असो येकंदरित टेंन्शनचा सगळ्यांनाच फायदा झाला म्हणायचा ;-)
27 Oct 2012 - 9:21 am | प्रचेतस
पण तुमच्या टेन्शनचे काय?
27 Oct 2012 - 10:00 am | मितभाषी
बुवा फार टेंशन घेवू नका. यंदा बार उअडवून द्या. ;)
27 Oct 2012 - 10:39 am | सूड
त्यांच्या धौतीयोगचूर्णजनित कविता कमीयेत का ? बार उडवायची अजाबात गरज नाय.
27 Oct 2012 - 2:51 pm | अत्रुप्त आत्मा
@वल्ली - Sat, 27/10/2012 - 09:51
पण तुमच्या टेन्शनचे काय?>>>>>>>> ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लू :-p
@धौतीयोगचूर्णजनित कविता कमीयेत का ?>>> या सुडक्याला गाडा रे कुणितरी ;-)
27 Oct 2012 - 2:47 pm | अत्रुप्त आत्मा
@यंदा बार उअडवून द्या. >>> हू आर यू :-p
28 Oct 2012 - 11:11 am | मितभाषी
तुला सासरकडून धनलाभ होईल अशी भविष्यवाणी वर्तवणारा ज्योतीषी..... ;)
28 Oct 2012 - 4:17 pm | अत्रुप्त आत्मा
@अशी भविष्यवाणी वर्तवणारा ज्योतीषी.....>>> ख्याक.....! मांज सासर खैलिकडं असेल??? ;-)
27 Oct 2012 - 5:55 pm | चौकटराजा
सगळं रीतसर झालं गुर्जी, बोले तो यजमान
फक्त केळे खिचडी ठेवून करतो तो सन्मान
दक्षिणेचं नाव मात्र जाम काढत नाय
अत्रुप्त गुर्जी जे येतं त्याला टेन्शन म्हणायचा काय .... ?
27 Oct 2012 - 7:20 pm | अनन्न्या
अबब... केवढी मोठी ही कविता! सगळे मिपाकर सांघिक कविता तयार करतायत. प्रत्येक प्रतिसादागणिक एक एक कडवे वाढ्ते आहे.