मुलाखत .. आणखी काही मुक्ताफळे
लेखनप्रकार (Writing Type)
(एका मुलाखतीतील मुक्ताफळे.... दुसरा भाग)
‘कमिंन सर ?’उमेदवार क्र. ४ .. कॉलेजकुमार.
‘या. बसा तिथं.’
उमेदवार बसतो.
‘नाव ?’
‘सुमित अरुण नार्वेकर ‘
‘शिक्षण ?’
‘MSCIT करून आता एस. वाय. बी. कॉमकरतोय. ’
‘कॉम्प्यूटरवर १ ते ३० पाढे बनवायचे आहेत.कोणते Application वापराल ?’ मी.
‘अं..C किंवा जावा..’
‘ते languagesआहेत. Application कोणतं ?’
‘Application ?....’
‘Programming language आणि Application मध्ये काय फरक ?’
‘.......’
‘बरं, अकौंटची बुक्स कोणती ?’ लेखा सदस्य.
उमेदवार बरोबर सांगतो.
‘समजा, आमची कंपनी फायद्यात आहे का तोट्यात ते तुम्हाला बघायचंय...कशात बघणार ?’
‘Balance sheet मधे..’
‘का Profit and Loss statement मधे ?’
‘हो,हो, Profit and Loss statement मधे.’
‘किती बाजू असतात त्यात ?’
‘दोन.. Profit आणि Loss ‘
‘पाहिलंय का कधी Profit and Loss statement ?’
‘हो, वडिलांच्या दुकानात...’
‘कसलं दुकान आहे ?’
‘सोनारकाम. संध्याकाळी वडील घरी जातात तेव्हा मीच पाहतो दुकान.’
‘अहो, मग त्याला नुसती Profit ही एकच बाजू असणार...’ लेखा सदस्यांचा, विनोदाचा तिरकस तीर मारण्याचा प्रयत्न.
‘नाही हो, दोन आहेत..मी पाहिलंय ना.’ उमेदवाराच्या निरागस भाबडेपणामुळे तीर निष्फळ होतो.
‘सध्या आपल्या महापालिकेचे महापौर कोण आहेत ?’ इतका वेळ भ्रमणध्वनीमध्ये गुंग असलेले बॉस आता मुलाखतीकडे मोर्चा वळवतात.
‘......’
‘आपल्या जिल्ह्यात तालुके किती ?’
‘....अं, माहिती आहे ..पण आता आठवत नाही...’
‘हे आपलं शहर कोणत्या तालुक्यात आहे ?’
‘जिल्हा आहे..’
‘मग जिल्ह्याच्या शहराला तालुका नसतो ?’
‘....?..’
‘तुमची कॉलेजची वेळ ?’
‘सात ते अकरा..’
‘मग दहाचं ऑफिस कसं काय attend करणार ?’
‘शेवटचा तास बुडवणार..’
‘रोज ? अन बुडालेला अभ्यास काय इथं करणार काय ?’
‘नाय नाय, घरी करतो की संध्याकाळी...’
‘अन दुकानाकडे कोण पाहणार मग ?’
‘....’
‘ठीक आहे, या तर मग.’
=====
पुढची उमेदवार .१७-१८ वयाची ग्रामकन्या.
‘सर, आत येऊ ?’
‘हं ....बसा.’
उमेदवार खुर्चीचे हात घट्ट धरून खुर्चीच्या एक चतुर्थांश भागात टेकते.
‘अहो, आरामात बसा...’ मी.
एक चतुर्थांशाचा एक द्वितीयांश होतो.
‘नाव ?’
‘दिपाली शिंत्रे’
‘गाव ?’
‘भिलवडी.’
‘भिलवडीचेएखादे वैशिष्ट्य सांगू शकाल ?’ प्रशासन सदस्य.
‘....?’
‘भिलवडीबद्दल चार वाक्ये बोलायची झाली तर काय आधी सांगाल ?’
‘आमच्या गावात म्हसरं लई आहेत..’
‘खुक खॉक..’ लेखा सदस्य हास्याचे रुपांतर आयत्या वेळी खोकण्यात करतात.
‘मग त्यांचं दूध काय सगळं नदीत सोडतात का ?’ प्रशासन सदस्य.
‘नाही, डेअऱ्या आहेत की ढीगभर !’
‘मग तेच विचारले की तुम्हाला आधी ..!’
‘अय्या..!’ आता उमेदवार खुर्चीच्या तीन चतुर्थांश भागात जरा सैलपणे विसावते.
‘काय शिकता ?’ लेखा सदस्य.
‘बी. ए. पहिल्या वर्षाला आहे.’
‘पण ही जागा अकौटसाठी आहे..’
‘बारावीला कॉमर्सलाच होते. आता आर्ट्स घेतलं.’
‘का ?’
‘टायमिंग जमत नाय. सकाळी शेतावर जावं लागतं.’
‘किती शेती आहे ?’
‘दोन एकर..पण जादा काय मिळत नाय त्यातून..’
‘हिशेब कोण बघतं शेताचा ?’
‘वडील.’
‘वडील काय शिकलेत ?’
‘सातवी’
‘मग तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त शिकलाय ना...., तुम्ही का नाही बघत ?’
‘मला काय समजतंय त्यातलं..?’
‘नाही ? मग आमच्या कंपनीच्या अकौंटमधलं कसं काय बुवा समजणार ?’ लेखा सदस्य.
‘अं.......!’
‘कॉलेज किती ते किती असतं ?’ प्र. सदस्य.
‘नऊ ते बारा.’
‘पण आमचं ऑफिस तर दहाला सुरु.’
‘रोजच काय कॉलेजला नाय जावं लागत.... मी एक्स्टर्नल करणारे.’
‘असं का ? ठीक आहे.... या आता.’
=====
उमेदवार क्र. ...? सुबक ठेंगणी कॉलेज कन्यका.
‘’मे आय कमिन ?’
‘हुं....’
उमेदवार थेट जाऊन खुर्चीत बसते. न विचारताच नाव सांगते.
‘मिताली देशमुख.’
‘आं? इथं तर सोनाली वाघमारे लिहिलंय?’
‘ती गेली.. तिचा कॉलेजात प्रोग्राम आहे...’
प्रशासन सदस्य पान उलटतात.
नाव शोधण्यात १ मिनिट जाते.
‘हं, सांगा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण ?’
‘पृथ्वीराज चव्हाण.’
‘आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ?’
‘पतंगराव कदम.’
‘कोणतं खातं आहे त्यांचं ?’
‘....’
‘पालकमंत्री काय करतात ?’
‘....?’
१ मिनिट शांतता.
‘अकौंटची काय माहिती आहे ?’ लेखा सदस्य.
‘बँकेमधे, मोठ्ठ्या कंपन्यांमधे अकौंट ठेवतात..’
‘ते नव्हे, अकौंटचे प्रकार सांगा.’
‘........’
‘अकौंटला किती बाजू असतात ?’
‘बाजू ?...’
‘बरं, ते राहूदे, बारावीला कोणता विषय आवडीचा ? कशात मार्क जास्त आहेत ?’ बॉस अवघड प्रसंगातून सुटकेचा हात देतात.
अकौंटमधला धोका नुकताच ठो देऊन गेला असल्याने असल्याने उमेदवार यावेळी विचार करून धोरणीपणे उत्तर देते.
‘मराठी’
‘कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव काय ?’ मी.
‘......अं.......’ धोरण अंगाशी येते.
‘शार्दूलविक्रीडित हे काय आहे ?’ बॉस.
‘...अं नक्की माहिती नाही पण....’
‘हं....?’
‘.... कर्नाटकातील धरण प्रकल्पाचे नाव असावे......’
‘धरण...?’ बॉसचे अलमट्टी होणे आता दूर नाही.
‘मितालीबाई, तुम्ही आमच्याकडे नोकरी करायचे का ठरवले ?’ याठिकाणी ‘कुठून डोक्यात घेतले’ असे बॉसला म्हणायचे होते हे त्यांच्या व्यग्र मुद्रेवरून स्पष्ट वाचता येते.
‘पप्पाम्हणाले, तुझा शाळेचा खर्च निघेल..’
‘छान. पण मग कॉलेज अन ऑफिस दोन्ही कसं करणार ? कॉलेज अकरापर्यंत ना ?’
‘शेवटचा तास बुडवायला प्रिन्सिपॉलची परवानगी घेणार...!’ आत येण्यापूर्वी मितालीबाईनी आधीच्या उमेदवारांशी सल्लामसलत केली आहे, हे तिच्या तत्पर उत्तरावरून स्पष्ट होते.
‘छान. या आता.’
‘मे आय कम इन ?’ आणखी एक स्मार्ट कन्यका.
‘Yes, take seat ..’
‘नाव ?’
‘मधुबाला देशपांडे’
‘हं, बारावीला मार्क्स किती ?’
’८५.६७ टक्के, सर’
‘अरे वा, इतके मार्क्स असून सायन्सला न जाता कॉमर्स का घेतलं ?’
‘वडिलांची फर्म आहे अकौंटची.’
‘मग त्यांच्याचकडे का नाही काम करत ?’
‘वडील म्हणाले, मोठ्या कंपनीचा अनुभव हवा.’
‘म्हणजे अनुभव घेतला की सोडणार आमची कंपनी ?’
‘...तसं नाही, सर...’
‘मग कसं ?’
‘.........’
‘बारावीतला आवडीचा विषय कोणता ?’ मी.
‘इंग्लिश’
‘एखाद्या इंग्लिश कवीचे नाव सांगता येईल ?’
‘......अं, ..आता नाही आठवत..’
अर्धा मिनिट शांतता.
‘विलियम वर्डस्वर्थ कोण होते ?’
‘......’
‘बोला, बोला लवकर.....’ प्र. सदस्य.वेळ संपत आलीये.
‘...वेस्ट इंडीज क्रिकेट टीमचे भूतपूर्व कॅप्टन .... ?’
‘क्रिकेट पाहता तुम्ही ?’
‘नाही बै..’
‘मग हे कसं माहित ?’
‘जीकेच्या पुस्तकात वाचलं..’
दहा (च) सेकंद शांतता.
‘अकौंट कशासाठी ठेवतात ?’ लेखा सदस्य.
‘profit किंवा loss पाहण्यासाठी.’
‘आणखी कशासाठी ?’
‘...नाही माहिती.’
;आमच्या कंपनीने नवीन कॉम्प्यूटर घेतला, अकौंट एन्ट्री कशी कराल ?’
‘डेबीटला..?’
‘की क्रेडीटला ?’
‘अं..क्रेडीटला. नाही, नाही डेबीटलाच...’
‘कॉलेजचं टायमिंग ?’ बॉस
‘साडेसात ते साडेदहा.’
‘पण ऑफिस दहाला आहे. मग दहाला ऑफिसला येणार ?’ कसं ते एव्हाना बॉसला पाठ झालं आहे.
‘हो..!’
‘आभारी आहे. या.’
पुढची उमेदवार आणखी एक ग्राम कन्या.
‘साहेब, आत येऊ का ?’
‘या, बसा त्या खुर्चीत.’
आत आल्यावर खुर्चीत बसण्यापूर्वी कन्यका एकदम हात जोडून नव्वद अंशात वाकते. एअर इंडीयाच्या महाराजाप्रमाणे.
.नमस्कार साहेब..’
‘आं...? हां हां….नमस्कार बसा बसा.’ नमस्काराच्या अभिनव पद्धतीमुळे अंमळ बावचळलेल्या बॉसला सावरायला काही सेकंद लागतात. त्यामुळे नाव विचारायचं त्यांच्या पटकन लक्षात येत नाही.
प्रशासन सदस्य सरसावतात.
‘नाव काय ?’
‘श्रीदेवी सुरेश माळी’
‘गाव ?’
‘येडे मच्छिंद्र ‘
‘शिक्षण ?’
‘बारावी पास. ‘
‘पुढे शिकत नाही ?’
‘परिस्थिती नाही, साहेब.’
‘काय करतात वडील ?’
‘...नाहीत....!’
‘ओह...’
काही सेकंद शांतता. उमेद्वाराच्या, पूर्वी कधीतरी स्वर्गवासी झालेल्या वडिलांसाठी आम्ही आत्ता शांतता पाळतो आहोत...मी मनातल्या मनात विचार करते.
‘हम्म.., बारावीत काय काय शिकला अकौंट ?’ लेखा सदस्य.
‘जमा खर्च, तेरीज, ताळेबंद, नफा तोटा...’
‘मराठी मिडीयम काय ?’
‘व्हय. पण एक विषय इंग्रजीत होता साहेब.’
‘Balanceला मराठीत काय म्हणतात ?’ इतका सोपा प्रश्न ? बॉसवर ‘नमस्कारा’चा चांगला परिणाम झालेला दिसतो....
‘शिल्लक.’
‘गंगाजळी ला इंग्रजीत काय म्हणतात ?’
‘........’
‘बारावीला मार्क किती ?’
’६४.३७ टक्के’
‘काढा बरं टक्केवारी...’
हाताची बोटे मोजत उमेदवार टक्केवारी काढते.
‘ही तर ६४.३६ आलीय की..!’
‘...राउंड केलंय अर्जात...’
काही सेकंद शांतता.
‘भारताची घटना कुणी लिहिली ?’ मी.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर.’
‘भारतात मागास वर्गासाठी आरक्षण प्रथम कुणी सुरु केले ?’
‘आंबेडकरांनीच...’
‘... शाहू महाराजांचं नाव ऐकलय का ?’
‘अं?..हो, हो, शाहू महाराजांनी सुरु केलं आरक्षण..’
‘मुलींची शाळा प्रथम कुणी सुरु केली ?’
‘सावित्रीबाई फुले .’
‘अन जोतीराव फुल्यांनी काय केलं ?’
‘अं.. त्यांनीच सुरु केल्या मुलींसाठी शाळा....’
‘नक्की महात्मा फुल्यांनी कि सावित्रीबाईंनी ?’
‘...अं... दोघांनी ...’
सौम्य हशा.
‘आता एक शेवटचा प्रश्न. तुम्हाला ही नमस्काराची पद्धत कुणी शिकवली बरं ?’ बॉस मिस्कीलपणे.
‘माझ्या आज्जीने... ती म्हणायची, महादेव असूदे नाहीतर नंदी...., येवस्थित वाकून नमस्कार करावा...’
‘...! ठीक आहे.. या तुम्ही आता.’
नमस्कार महादेवाला का नंदीला याचा विचार करत बॉस बेल दाबतात__चहा मागवण्यासाठी..!
------------****************--------------
प्रतिक्रिया
महादेव असूदे नाहीतर नंदी....,
लेख तर अख्खा भारीच आहे पण
हाहाहाहा
aavadesh....vinodi lekhan
या उलट
नोकरी न मिळण्याचे कारण...
शेवटचा
ह्येच ह्येच!
मुलाखत देण्यअ पेक्षा मुलाखत
मी घेतलेल्या एका मुलाखतीची
भन्नाट आहेत मुलाखतीतले अनुभव.
हा हा हा हा हा
अर्रर्र बिचाऱ्याच फ्लर्टिंगचं
मग काय
अरे काय सांगु गणपा/ ईर्याभौ
बाकीचे मॅनेजर हबकले असतील नां
लै भारी किस्से.
हे लेखनही अगदी भारी झाले आहे.
ठ्ठो.........
आता थोडे अवांतर नंदी वरून
हाही भाग उत्तम
....
(No subject)
+१ !!
पटले. पण...
तसेच
विनोद म्हणून लेख खूप छानच आहे.
विकास यांना अनुमोदन.
मुलाखत / व्हायव्हा कशी अन का
बहुतेक काही तरी गैर समज होतोय
अजिबात गैरसमज नाही!
हम्म कुणी सांगावं चष्मा बदलला
हो/नाही
आम्ही आय आय टी अथवा इतर
आम्ही आय आय टी अथवा इतर मोठ्या तसेच शहरी भागातील संस्थांमधून निवडण्यापेक्षा बहुतेक वेळेस ग्रामिण भागातील उमेदवारांना प्राधान्य देतो.१०० टक्के सहमत. ग्रामीण भागातील उमेदवार शहरीपेक्षा जास्त sincere असतात याचा अनुभव आला आहे.झकास किस्से!
अगदी बरोबर
आधीच्या भागाइतकाच सुरेख .
मजा आली एक एक किस्से वाचताना :)
व्हेअर डू यु स्टे ?
मुळात "व्हेअर डू यु स्टे ?"
यावरुन (बहुधा) अनिल
गोष्ट मुलाखतीतील नाही पण हेच- शब्दांचा घोळ...
लेख मजेशीर!