महात्मा गांधींना १४३ व्या जयंतीनिमित्त आदरांजली

पुण्याचे वटवाघूळ's picture
पुण्याचे वटवाघूळ in जनातलं, मनातलं
2 Oct 2012 - 8:25 am

आज २ ऑक्टोबर २०१२-- महात्मा गांधींची १४३ वी जयंती. महात्मा गांधींच्या खुनानंतर पंडित नेहरू म्हणाले होते: "The light has gone out of our lives and there is darkness everywhere. I do not know what to tell you and how to say it. Our beloved leader, Bapu as we called him, the father of the nation, is no more. Perhaps I am wrong to say that....The light has gone out, I said, and yet I was wrong. For the light that shone in this country was no ordinary light. The light that has illumined this country for these many years will illumine this country for many more years, and a thousand years later that light will still be seen in this country, and the world will see it and it will give solace to innumerable hearts." जोपर्यंत या जगात मनुष्य जमातीचे अस्तित्व आहे तोपर्यंत महात्मा गांधींच्या विचारांचा प्रकाश मार्गदर्शन करत राहिल यात शंकाच नाही. भारताने जगाला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी महात्मा गांधी ही सर्वात महत्वाची देणगी आहे.

ज्यांच्या विचारांनी मार्टिन लुथर किंग, नेल्सन मंडेला, ऑन्ग सू की, बराक ओबामा इत्यादी अनेकांना भारून टाकले, ज्यांच्या मृत्युनंतर इतक्या वर्षांनीही जगातील अनेक देशांमध्ये कोट्यावधी लोक मानतात आणि ज्यांच्यामुळे महात्मा या उपाधीला मोठेपणा प्राप्त झाला त्या गांधीजींना शतशः नमन.

a

हे ठिकाणप्रकटनविचार

प्रतिक्रिया

इरसाल's picture

2 Oct 2012 - 9:06 am | इरसाल

जयंतीनिमित्त आदरांजली.

पिंगू's picture

2 Oct 2012 - 10:05 am | पिंगू

आदरांजली..

बापू मामा's picture

2 Oct 2012 - 11:07 am | बापू मामा

आज महात्माजींच्या जयंती बरोबरच भारताचे थोर सुपुत्र लाल बहादुर शास्त्री यांचीही जयंती आहे. त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !

वेताळ's picture

2 Oct 2012 - 12:25 pm | वेताळ

त्याचे कित्येक फोटो वेगवेगळ्या साईज मध्ये मी माझ्या खिश्यात ठेवतो.कॉग्रेस्चे लोक देखिल खुप गांधी भक्त आहेत. ते तर मिळतील तेव्हढे गांधीजीचे फोटो स्वीस बॅकेत ठेवत असतात.

नितिन थत्ते's picture

2 Oct 2012 - 3:09 pm | नितिन थत्ते

माझ्याकडे ब्राउनिश, लाल आणि जांभळ्या रंगाचे बरेच फोटो आहेत. त्या बदल्यात माझ्याबरोबर तुमच्याकडचे पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचे फोटो एक्स्चेंज करणार का?

(पहा बुवा ब्राउनिश, लाल आणि जांभळ्या रंगाचे फोटो फार दुर्मिळ असतात. पिवळे/गुलाबी काय कोपर्‍याकोपर्‍यावर मिळतात).

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 Oct 2012 - 3:13 pm | निनाद मुक्काम प...

अरे देवा , अरे कर्मा
ऑक्टोबर फेस्टिवल च्या भव्य तंबूत
सोमरसाचे प्राशन करत असतांना भ्रमण ध्वनीवर एक संदेश आला. त्यातून बापुजी ह्यांना विनम्र आदरांजली वाहिली होती.
माझ्या हातून घडलेल्या पातकाची मलाच एक भारतीय म्हणून भयंकर शरम वाटली.
ह्या पापाचे परिमार्जन म्हणून मी दोन मिनिटे मौन धरले आहे.

व आजूबाजूला चाललेल्या सत्याच्या प्रयोगाचा मूक साक्षीदार बनायचे ठरविले आहे.

चिंतामणी's picture

2 Oct 2012 - 11:47 pm | चिंतामणी

:D

मराठी_माणूस's picture

2 Oct 2012 - 3:41 pm | मराठी_माणूस

पंडीत नेहरु जे काही म्हणाले ते ईंग्रजीत का म्हणाले ?

महात्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली.

सुनिल पाटकर's picture

6 Oct 2012 - 10:22 pm | सुनिल पाटकर

उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया....

.
ब्रिटिश साम्राज्याचा पाया ढासळणा-या या महात्म्यास कोटीकोटी प्रणाम

सुनील's picture

7 Oct 2012 - 11:32 pm | सुनील

श्रद्धांजली.