यांच्या चष्म्यातून - भाग ४ (अ) - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकार

राजघराणं's picture
राजघराणं in जनातलं, मनातलं
5 Sep 2012 - 6:28 pm

त्यांच्या चष्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर - http://www.misalpav.com/node/21602

त्यांच्या चष्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद - http://www.misalpav.com/node/21729

त्यांच्या चष्म्यातून - भाग ३ - जनतेचा प्यारा अश्फाक - http://www.misalpav.com/node/21758

*******************************************************************************************************

पूर्वपिठीका -

अश्फाक उल्ला खान : मात्रुभूमीच्या चरणांवर रक्त सांडून हसत फाशी जाणारा पहिला मुसलमान

त्याला हुसेन नावच्या ब्रिटिशांच्या नोकर पोलिसाने एक मिलियन डॉलर क्वेश्चन विचारला होता.

एक डाव रडीचा. धर्माच्या सौदेबाजीचा. हुसेन म्हणाला - " अश्फाक नीट विचार कर. तू एक मुसलमान आहेस. या देशात ७ करोड मुसलमान रहातात आणी २२ करोड हिंदू. गांधी लोकशाहीच्या बाता मारतो. या कफिर हिंदूंच्या नादी लागून तू ब्रिटिशांविरूद्ध लढतोयस. ...इंडीयातून ब्रिटीश निघून गेले तर ? २२ कोटी हिंदू लोकशाही मार्गानी हिंदू इंडीया बनवतील...."

अश्फाकने हुसेनच्या धार्मिक आवाहनाला भीक घातली नाही. पण ब्रिटिश इंडियातल्या मुस्लिमांपुढे तो मिलियन डॉलर क्वेश्चन आ वासून उभा होता.

इंडीयातून ब्रिटीश निघून गेले तर ? २२ कोटी हिंदू लोकशाही मार्गानी हिंदू इंडीया बनवतील...."

*******************************************************************************************************

यांच्या चष्म्यातून - भाग ४ - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकार
(संदर्भ : काँग्रेस आणी गांधीजींनी अखंड भारत का नाकारला ? प्रा शेषराव मोरे , राजहंस प्रकाशन.)

*******************************************************************************************************

१५ ऑगस्ट १९४७ ला झालेल्या फाळणीला जवाबदार कोण ? हा प्रश्न गेली गेली ६५ वर्षे हिंदुस्थानी विचारवंतांना छळतो आहे. हिंदुत्ववादी अखंड हिंदुस्थानचा जप करत यासाठी गांधींच्या अहिंसक स्वभावाला जवाबदार ठरवतात. तर सेक्यूलर विचारवंत फाळणीसाठी संघाचा आक्रमक हिंदुत्ववाद आणी सावरकरांनी द्वीराष्ट्रवादाला दिलेली मान्यता या गोष्टी दोषपूर्ण मानतात.

प्रा शेषराव मोरेंनी त्यांच्या वास्तववादी चष्म्यातून तब्बल ३२० ग्रंथांचे पुरावे देत - फाळणीचे श्रेय कुणाला द्यायचे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती त्यावेळी गांधिजी शाळकरी वयाचे होते आणी चार वर्षाचे सावरकर नुकतेच बोलायला शिकले होते. द्विराष्ट्रवादाच्या मागणीसाठी या दोन्ही लहानग्यांना जवाबदार ठरवणे हे बालिशपणाचेच ठरेल.

त्याआधी फाळणी आणी द्विराष्ट्रवाद या एकमेकांच्या संपूर्ण विरोधी मागण्या आहेत हे वास्तव समजवून घेतले पाहिजे.

फाळणी हे हिंदूच्या इतिहासातले एक सोनेरी पान होते आणी द्विराष्ट्रवाद हे हिंदूच्या गुलामिचे बायबल होते हेही समजून घ्यावे लागेल.

ज्यांना वाढ्त्या मुस्लिम लोकसंखेची चिंता आहे. बांग्लादेशींच्या घुसखोरी मुळे जे अस्वस्थ आहेत असे हिंदुत्ववादी..... अखंड भारतवादीही असतात... हा एक विनोदच आहे. अखंड भारतात बांग्लादेश तर येतोच पण पाकिस्तान सकट ची सर्व मुस्लिम लोकसंख्या ही येते. अखंड भारतातली मुस्लिम लोकसंख्या ४०% च्या आसपास जाते. आज १२% मुस्लिमांसमोर हतबल झालेले राजकीय हिंदू नेत्रुत्व अखंड भारतात शिल्लक तरी राहिल का?

सावरकर स्वतः पोथीवादी न्हवते. त्यांच्या अखंड भारताच्या पोथीला देव्हार्‍यात ठेवून पूजा करणारे कधी हिंदूच्या वास्तव परिस्थितीकडे डोळे उघडून बघतील काय ?

फाळणीमुळे अखंड भारताच्या धोक्यापासून हिंदूंचे रक्षण झाले. हे वास्तव समजून घेतले पाहिजे.

द्विराष्ट्रवादाची मागणी फाळणीसाठी न्हवतीच ती अखंड भारतासाठी होती. सर सय्यदांची द्विराष्ट्रवादी भुमिका एकदा समजली की फाळणीची अपरिहार्यता चटकन लक्षात यील.

मुस्लिम अल्पसंख्य आहेत. पण ती एक राज्यकर्ती जमात आहे. भारत स्वतंत्र झाला की लोकशाही आलीच. संख्येच्या बळावर हिंदू ही राज्यकर्ती जमात बनेल. डोक्याचे वजन न मोजता डोक्यांची फक्त संख्या मोजणारी भुक्कड लोकशाही सय्यद अहमदांना मान्य न्हवती. हिंदू आणी मुसलमान हे भारत नावाच्या वधूचे दोन सुंदर डोळे आहेत म्हणून राजकीय सत्तेचे वाटप दोन्ही डोळ्यांना समान झाले पाहिजे. आणी म्हणूनच सर्व सत्ताकेंद्रात (लोकसभा ते ग्रामपंचायत) ५० % राखीव जागा मुस्लिमांसाठी असल्या पाहिजेत असे सय्यदांचे म्हणणे होते. ३०% मुस्लिमांसाठी ५०% जागा आणी हिंदूच्या भावनेसाठी अखंड भारत. असा द्विराष्ट्रवादाच्या मागणीचा आशय आहे.

मोहनदास गांधी नावाच्या बनेल म्हातार्‍याने. द्विराष्ट्रवाद कधीच मान्य केला नाही. फाळणी मात्र देउन टाकली !

सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:!

(अर्थः सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली तर शहाणा माणूस अर्ध्याचा त्याग करतो आणी उरलेल्या अर्ध्या चा स्वीकार करतो ! )

हिंदू लोक शेतकरी. जमिनीला माता मानणारे. भूगोलावर त्यांचे लैच प्रेम. त्यांचा मनात अखंड भारतमाता घर करून बसली आहे. पण अखंड भारत म्हण़जे केवळ भुगोलांची बेरीज न्हवे. त्यात लोकसंख्येची बेरीज आहे. इतिहासाची वजाबाकी आहे आणी धर्माचा भागाकार आहे.

गंम्मत म्हणजे अखंड भारतवादी असलेले सावरकर बोलण्याच्या ओघात; हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून म्हणाले होते - हिंदू आणी मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत.

परस्पर बंधुभाव आणी परराष्ट्राविषयी राग हे जर राष्ट्राचे प्रमुख गुणधर्म मानले तर राष्ट्र कोण आहेत ? हिंदू की मुसलमान ?

खरे पाहता हिंदू समाजात आणी धर्मात तुलनेने राष्ट्रवादी गोष्टी कमी आहेत. हिंदूधर्माची मूलभूत शिकवण - परधर्म सहिष्णुता विरुद्ध इस्लामी जिहाद आणी उम्मत( कुराणसिद्ध मुस्लिम बंधुभाव) विरुद्ध हिंदू ची जातिव्यवस्था. ही लढाईच विषम आहे. हिंदुंकडची एकमेव जमेची बाजू म्हणजे त्यांची लोकसंख्या. अखंड भारतात त्या एकमेव जमेच्या बाजूचे महत्व झपाट्याने कमी होणार होते.

फाळणी केवळ भूभागांची झाली नाही. फाळणी मुस्लिम लोकसंख्येची झाली. अन भारतातल्या मुस्लिमांचे सांख्यीकी महत्व झटकन उतरले.

पुढे सावरकरांनी एक व्यक्ती एक मत अशा खर्‍या लोकशाहीचा वारंवार पुरस्कार केला. मुस्लिमांची ५० % ची मागणी धुडकावून लावली. पण लोकसंख्येच्या प्रमाणात मुस्लिमांना राखिव मतदारसंघ देण्याची सावरकरांची तयारी होती. जर भारत अखंड राहिला असता तर...... आज मुस्लिमांना त्यांच्या आजच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती टक्के राखिव मतदारसंघ (सावरकरांच्याच मते) द्यावे लागणार असते ? जवळ जवळ ४० %. इतर अल्पसंख्य आणी हिंदूतले फुटीर गट यांच्या सहाय्याने भारतात लोकशाही मार्गाने इस्लामी राजवट आली असती. आज जर पुन्हा अखंड भारत बनवला तर ते जगातले सर्वात मोठे मुस्लिम राष्ट्र बनेल.

गांधींनी हे ओळखले होते.

मुस्लिमांचे पायचाटे म्हणून गांधींना अहोरात्र शिव्या देणारे हिंदुत्ववादी लोकमान्य टिळकांना मात्र पूजतात. पण टिळकांचा लखनौ करार मात्र विसरतात. काय होता लखनौ करार ?

काँग्रेसच्या मुस्लिम लांगूलचालनाचा पाया टिळकांनी घातला आहे. तो म्हणजे लखनौ करार

(वास्तविक परिस्थिती अशी होती की तत्कालीन हिंदू समाजात लोकमान्य किंवा महात्मा व्हायचे असेल तर वाढीव परधर्म सहिष्णूपणा दाखवणे आवश्यकच होते. अन फाळणीही तत्कालीन राजकीय परिस्थित अपरिहार्य होती कशी ? सावरकरांनी लटका विरोध केला. डॉ. अंबेडकरांनी फाळणीचे उघड समर्थन केले. गांधींनी ती देउन टाकली. का ? ते पुढील भागात)

१) अलिगडचा लखनौ करार आणी देवबंदची सश्स्त्र क्रांती.

क्रमशः

आगामी : यांच्या चष्म्यातून - भाग ४ (ब) - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकार

इतिहासविचार

प्रतिक्रिया

विकास's picture

7 Sep 2012 - 10:05 pm | विकास

प्रत्येक वेळी हिंदुंनी भरपूर मार खाल्ला. शेवटच्या दंगलीत सरकारने हिंदुंचा कैवार घेतला

अजून असा आरोप आहे. हे प्रकरण न्यायालयीन आहे आणि व्यक्ती व्यक्तींवरील आरोप सिद्ध झाले असले (आणि अजूनही होत राहीले) तरी, हे सरकारने ठरवून केले हे सिद्ध झालेले नाही असे मला वाटते.

अजून एक गोष्ट म्हणजे: महाराष्ट्रात पाच वर्षे युतीचे सरकार होते ज्यात हिंदूत्ववादी मंडळी होती, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली, पंजाबमधे अकालीदलाबरोबर युती तर बिहार मधे देखील युतीतील धाकटा पण प्रमुख पक्ष म्हणून भाजपा सत्तेवर राहीली आहे. येथे अशा दंगली झाल्याचे दिसलेले नसताना, केवळ गुजरातच्या दंगलीचा संदर्भ देत, "कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या राजकीय पार्ट्या सत्तेत आल्यानंतर तर सामुहिक कत्तलही घडलीय," असे जनरलायझेशन करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीने, "एखाद्या धर्मात त्या धर्माच्या नावावर दहशतवादी निर्माण झाले म्हणून त्या धर्मालाच दहशतवादी म्हणण्यातला प्रकार आहे", जे माझ्या दृष्टीने अयोग्य आहे. असो.

अर्धवटराव's picture

9 Sep 2012 - 3:36 am | अर्धवटराव

सरकारच्या अजेण्ड्यावर दंगल कधीच नसणार. पण सरकारातल्या बर्‍याच जणांना दंगेखोरांबद्दल सक्रीय सहानुभूती असेलच. शिवाय या दंगलीचा आनंद विरोधकांनी साजरा केलाच केला... सिंपल कारण... अयोध्येसारखा एक आजन्म टिकणारा मुद्दा मिळाला.पण या दंग्याची सुरुवात मुस्लीमांनी केली हे निश्चित. एव्हढी भीषण रिअ‍ॅक्शनची अपेक्षा असती तर एव्हढी हिम्मत ते करते ना. बाकी हिंदु कट्टरवादाबद्दल शिकल्या सवरल्या मुस्लीमांचे एव्हढे विचार वाचुन हसु येतं.

अर्धवटराव

अन्या दातार's picture

6 Sep 2012 - 10:42 pm | अन्या दातार

त्यांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेणारं दमदार राजकीय नेतृत्व ज्यावेळी देशाला मिळेल तो सुदिन.

याचा अर्थ नक्की काय घ्यायचा? ६५ वर्षांचा काळ जाऊनही मुस्लिम राष्ट्रीय प्रवाहात आलेले नाहीत हा कुणाचा दोष? पहिली ३० वर्षे जाऊद्यात. उरलेल्या ३५ वर्षातही मुस्लिमांना राष्ट्रीय प्रवाहात यावेसेच वाटले नाही का? का सामील करुन घेणारं म्हणजे मुस्लिम म्हणतील त्याला हो हो करणारं? तसं जरी मानले तरी या ३५ वर्षांच्या काळात फारफार तर ६ वर्षांचाच काळ (भाजपाप्रणित सरकारचा) बाजूला काढावा लागेल. राहिली २९ वर्षे!
शेवटी तात्पर्य एकचः घोड्याला पाण्यापर्यंत आणता येते, पाणी घोड्यानेच प्यायचे असते.

मन१'s picture

6 Sep 2012 - 10:49 pm | मन१

हारुन शेख, शेवटच्या प्रतिसादात काय म्हणताय ते समजते आहे.पण ते विचित्रचक्र बनले आहे. सध्या failure of state इतके झालेले आहे, की इथून पुढे काहीही चांगले होणे अशक्य वाटावे. "ह्यांनी" "त्यांना" हाणलं तरी न्यायव्यवस्था काय, पोलिस काय, कुठूनच न्याय मिळत नाही. मग "त्यांना" सतत मार खात असल्याची भावना येते. मग म्हणून "त्यांनी" "ह्यांना" झुंडिनं उलट मारणं समर्थनीय मानलं जाउ लागतं. शासन व्यवस्था इथेही कुठेच प्रभावी अस्तित्व दाखवत नाही. चक्र सुरुच राहतं. कायद्यानं जे करायला हवं; ते केलं जात नाही, म्हणून झुंडी आपले कायदे बनवू पाहतात्,कायदे हातात घेतात.
.
मुळात विचार "हे " आणि "ते" असा केला जातो, हे दुर्दैव.
अंधार...

भंकस बाबा's picture

2 Feb 2016 - 9:04 pm | भंकस बाबा

अगदी बालबोध विचार आहेत हे! मुस्लिमबहुत भागात राहणाऱ्या इतर धर्मियाना काय त्रास होतो हे त्यांना जाऊन विचारा. खर म्हणजे मुसलमान हां धर्म नसून एक राष्ट्र आहे असे म्हणायला फार वाव आहे. त्यांचे कायदे वेगळे असतात. त्यांना धर्माच्या विरोधात कोणी बोलले की बिथरायला होते. इस्लाम खतरें में आरोळी दिली की मग शिया सुन्नी वैर विसरले जाते. मी स्वतः मुस्लिम भागात राहतो. मशिद आणि मदरसे याना इथे बेफाम महत्व दिले जाते. मशीदिवरुन बांगच नाही तर गीत म्हटली जातात. यंदाच् नवरात्रि व् मोहरम एकाच वेळी होते. गरबा १०च्या ठोक्याला बंद करणारे आपले मायबाप सरकार तेराशे वर्षापुर्वी मारल्या गेलेल्या इमाम हुसेन च्या नावाने गळे काढण्यात धन्य मानणाऱ्या मौलविकडे दुर्लक्ष करत होते. ते सुद्धा प्रत्येक गल्लीचा वेगळा प्रोग्राम, म्हणजे एक ना धड़ भाराभार....
आज जगात जिथे जिथे मुस्लिम आहेत तिथे समस्या आहेत. असे हिन्दू, जैन, शिख , ज्यू यांच्या बाबतीत का होत नाही?
एक किस्सा खरडतो, इम्रान खानने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधण्यात येणाऱ्या हॉस्पिटलला निधि पाहिजे म्हणुन भारत पाकिस्तान क्रिकेट सामने इग्लेण्ड मधे आयोजित केला होता. हे मैत्रीपूर्ण सामना होते. ९५/९६साल असावे ते, भारतातील दिग्दज खेळाडू या सामन्यात खेलले होते. आता सामन्याचा तपशील आठवत नाही पण तो २०/२० सामना होता. भारतीय आघाडीचे खेळाडू स्वस्तात बाद झाले होते. ५बाद ३५/३६ धावा असा काहीतरी धावफलक होता. जिंकण्यासाठी चार ते पाच षटकात ७०/७२ धावा आवश्यक होत्या . त्यावेळी अचानक समीर दिघे या फलन्दाजाच्या अंगात रिचर्ड्स घुसला व् त्याने धावांचा पाऊस पाडला. शेवटी दोन चेंडूत चार धावा असे काहीसे समीकरण होते. पण हे पाकिस्तानी प्रेक्षकाना रुचले नाही त्यांनी मैदानावर धाव घेऊन सामना उधळला. समीर दिघे ला देखिल फटके बसले. तेव्हा इम्रान खानने वैतागुंन उदगार काढले होते की हे पाकिस्तानी कुठेच् रहायच्या लायकीचे नाही, आणि आता हाच पाकिस्तानचा मार्गदर्शक बनायला बघत आहे.

हारुन शेख's picture

6 Sep 2012 - 6:38 pm | हारुन शेख

एक वेगळा विचार म्हणून लेख रोचक आहे. बरेचसे नाही पटले.

अप्पा जोगळेकर's picture

6 Sep 2012 - 10:20 pm | अप्पा जोगळेकर

प्रा. मोरेंचा लोकसत्तामधला लेख वाचला होताच. या धाग्याच्या निमित्ताने त्याचे स्मरण झाले. राजघराणं यांचे लेख अतिशय अभ्यासपूर्ण असतात.
मागे एकदा 'मन' शी बोलताना फाळणी झाली यात वाईट काय झाले असा प्रश्न मी विचारला होता ? त्या प्रश्नामागचा युक्तिवाद जोरकसपणे मांडण्यासाठी बळ मिळाले. धन्यवाद.

अवतार's picture

6 Sep 2012 - 10:35 pm | अवतार

पाकिस्तान हे मुस्लिम लीगच्या आधुनिक उच्चविद्याविभूषित नेतृत्वाने नाईलाज म्हणून स्वीकारलेले वास्तव आहे.
१९२९ ची नेहरू घटना मुस्लिम लीग म्हणजेच जिन्ना यांनी नाकारली याचे मुख्य कारण म्हणजे त्यात १९१५ च्या लखनौ कराराद्वारे देण्यात आलेले स्वतंत्र मुस्लिम मतदार संघ रद्द करण्यात आले होते. स्वतंत्र मतदार संघांच्या बदल्यात संयुक्त मतदार संघात मुस्लिम लीगला अधिक जागा मिळणार होत्या. तरीही जिन्ना यांनी ही घटना नाकारली याचे एकमेव कारण म्हणजे कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्र मतदार संघ रद्द होणे हे मुस्लिम लीगला परवडण्यासारखे नव्हते. म्हणजे या वेळेपर्यंत तडजोडीने प्रश्न सुटू शकतो अशी काँग्रेसमधील नेत्यांची धारणा असावी. पण त्यानंतर मात्र काँग्रेसने स्वतंत्र मतदार संघ स्वीकारतही नाही आणि नाकारतही नाही अशी भूमिका घेतली. तडजोड केली तर ती मुस्लिम लीगच्या अटींवर करावी लागणार, जे शक्य नव्हते. आणि उघड युद्ध करण्यासाठी हाती सत्ता नाही अशी परिस्थिती असतांना काँग्रेसच्या नेतृत्वाला दुसरे काहीच करता येणे शक्य नव्हते.

केंद्रीय सत्ता दुबळी ठेवणे आणि शक्तिशाली प्रांतिक सरकारे स्थापन करून त्यातील जास्तीत जास्त ठिकाणी मुस्लिम लीगचे सरकार आणणे हा मुस्लिम लीगच्या राजकारणाचा गाभा होता. हे मान्य केल्याशिवाय पूर्व आणि पश्चिम अशा दोन तुकड्यांत विभागलेले इस्लामी राष्ट्र लीगने का स्वीकारावे ह्याचा उलगडा होत नाही. ह्याउलट लीग ज्या प्रांतांत बलवान आहे ते प्रांत वगळून उर्वरित ठिकाणी एका केंद्रीय सत्तेखाली भारत एक राष्ट्र म्हणून निर्माण करावे ही साधारणत: १९३० आणि १९४० च्या दशकात काँग्रेसच्या राजकारणाची मुख्य दिशा होती. म्हणूनच याच काळात काँग्रेस नेतृत्वाच्या भूमिका जास्त संदिग्ध झालेल्या दिसून येतात. दुसरीकडे सत्तांतराच्या वेळी सत्तेत जास्तीत जास्त वाटेकरी निर्माण करून भारतात एक शक्तिशाली केंद्रीय सत्ता निर्माण होऊ न देणे हे ब्रिटीशांचे उद्देश्य होते. पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमन साम्राज्याची जी अवस्था त्यांनी केली तीच भारताची करावी हे त्यांचे लक्ष्य होते.

पण लीगला केंद्रीय सत्ता दुबळी ठेवण्यात इतका रस का होता हे जाणणे महत्वाचे आहे. कारण स्वतंत्र भारतात हिंदूंची बहुसंख्या असल्याने केंद्रीय सत्तेत त्यांचेच वर्चस्व राहणार हे लीगला कळून चुकले होते. 'आम्ही या देशावर हजार वर्षे राज्य केले आहे' ही ज्यांची प्रामाणिक भावना आहे तो समाज हजार वर्षे पराजित असलेल्या समाजाबरोबर केंद्रीय सत्तेत वाटेकरी म्हणून राहणे मान्यच करणार नाही. लीगला मुंबई, मद्रास, बिहार इत्यादी प्रांतांतून भरघोस मते मिळणे ह्याचा दुसरा अर्थ लावता येत नाही. संपूर्ण भारत लीगच्या वर्चस्वाखाली आणणे शक्य नाही हे वास्तव धर्मांध मुस्लिम मौलवी जरी मान्य करत नसले तरी लीगच्या नेत्यांनी मान्य केले होते. त्याऐवजी राजकीय तडजोड म्हणून दोन तुकड्यांत विभागलेले पाकिस्तान त्यांनी स्वीकारले.

खरी लढाई लाहोरची नव्हती, ढाक्याची नव्हती. खरी लढाई दिल्लीसाठी आहे आणि ती होणारच आहे. त्यासाठीच ह्या शांततेच्या काळात कधी ह्याच्या अंगणात तर कधी त्याच्या अंगणात असे करत स्वत:चे सामर्थ्य वाढवणे हाच पर्याय भारतापुढे शिल्लक आहे. राजकारणात माज दाखवण्यापेक्षा शांतपणे स्वत:ची शक्ती वाढवत राहणे महत्वाचे असते. शक्तिशाली राष्ट्रांना वेगळा माज दाखवावा लागत नाही.

अर्धवटराव's picture

6 Sep 2012 - 10:52 pm | अर्धवटराव

>>खरी लढाई लाहोरची नव्हती, ढाक्याची नव्हती. खरी लढाई दिल्लीसाठी आहे आणि ती होणारच आहे.
-- कटु , पण वास्तव विचार. काश्मीर, पुर्वोत्तर राज्ये धगधगते ठेऊन पाकिस्तानने यात अगोदरच आघाडी घेतली आहे. पण त्यांच्याही बुडाखाली बलुच वगैरे प्रश्न जळताहेत (किंवा भारत त्यात तेल ओततोय), शिवाय अत्यंत अस्ताव्यस्त राजकीय व्यवस्था... पण "खरी लढाई" सुरु झाली आहे.

अर्धवटराव

मन१'s picture

6 Sep 2012 - 10:55 pm | मन१

+१

विकास's picture

6 Sep 2012 - 11:07 pm | विकास

काश्मीर, पुर्वोत्तर राज्ये धगधगते ठेऊन पाकिस्तानने यात अगोदरच आघाडी घेतली आहे.

कोण जाणे?... कदाचीत त्यात देखील काहीतरी आत्ताच्या सरकारची नवीन फाळणी करून हिंदूंवर नवीन उपकार करायची स्ट्रॅटेजी असेल. ;)

विकास's picture

6 Sep 2012 - 11:02 pm | विकास

प्रतिसाद आवडला.

खरी लढाई लाहोरची नव्हती, ढाक्याची नव्हती. खरी लढाई दिल्लीसाठी आहे आणि ती होणारच आहे. त्यासाठीच ह्या शांततेच्या काळात कधी ह्याच्या अंगणात तर कधी त्याच्या अंगणात असे करत स्वत:चे सामर्थ्य वाढवणे हाच पर्याय भारतापुढे शिल्लक आहे. राजकारणात माज दाखवण्यापेक्षा शांतपणे स्वत:ची शक्ती वाढवत राहणे महत्वाचे असते. शक्तिशाली राष्ट्रांना वेगळा माज दाखवावा लागत नाही.

ह्या सारांशाशी सहमत!

याउलट लीग ज्या प्रांतांत बलवान आहे ते प्रांत वगळून उर्वरित ठिकाणी एका केंद्रीय सत्तेखाली भारत एक राष्ट्र म्हणून निर्माण करावे ही साधारणत: १९३० आणि १९४० च्या दशकात काँग्रेसच्या राजकारणाची मुख्य दिशा होती.

सहमतच. पुढे असे वाटते, की या सत्ताकेंद्रीकरणाचा अतिरेक तेंव्हापासून कायमच चालत आला. त्याचाच परीणाम म्हणून आधी भाषावार प्रांतरचनेस विरोध केला गेला आणि आजतागायत दिल्लीश्वरांच्या परवानगीशिवाय शिंकता पण येणार नाही असली राज्यांसाठीची राज्यपद्धती तयार केली... असो.

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Sep 2012 - 12:25 pm | llपुण्याचे पेशवेll

खरी लढाई लाहोरची नव्हती, ढाक्याची नव्हती. खरी लढाई दिल्लीसाठी आहे आणि ती होणारच आहे. त्यासाठीच ह्या शांततेच्या काळात कधी ह्याच्या अंगणात तर कधी त्याच्या अंगणात असे करत स्वत:चे सामर्थ्य वाढवणे हाच पर्याय भारतापुढे शिल्लक आहे. राजकारणात माज दाखवण्यापेक्षा शांतपणे स्वत:ची शक्ती वाढवत राहणे महत्वाचे असते. शक्तिशाली राष्ट्रांना वेगळा माज दाखवावा लागत नाही.
सहमत. आणि त्यात भारतीय मुसलमान, बांग्लादेशी, पाकीस्तानी असा फरक नाही. यात मला लोकसत्ता दिवाळी अंकातल्या (मुख्यमंत्री विशेष) बॅ अंतुले यांवर केलेले एक वक्तव्य आठवले. त्याचा आशय थोडासा असा होता की प्रत्येक मुस्लिम नेत्याला असे वाटते की "भारत, पाकीस्तान, बांग्लादेश असे एक संयुक्त मुस्लिम राष्ट्र असावे आणि मी त्याचा एकमेव नेता म्हणून असावं" नेमके वाक्य आता आठवत नाही.

अवतार's picture

7 Sep 2012 - 8:20 pm | अवतार

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार

सुनील's picture

7 Sep 2012 - 2:12 am | सुनील

फाळणीच्या पर्यायाचा विचार करताना, सामुहीक स्थलांतराच्या शक्यतेचा विचार झाला होता काय?

विकास's picture

7 Sep 2012 - 5:26 am | विकास

जर सामुहीक स्थलांतर म्हणजे आपल्याला धर्माधारीत पूर्ण स्थलांतर असा अर्थ असेल (पाकीस्तानातील सर्व हिंदू हिंदूस्थानात आणि भारतातील सर्व मुस्लीम पाकीस्तानात) तर ते केवळ आंबेडकरांनी म्हणले होते असे मला वाटते.

शैलेन्द्र's picture

8 Sep 2012 - 9:21 am | शैलेन्द्र

आंबेड्कर का ग्रेट होते हे समजण्यासाठी इतकंही पुरेसं आहे. काही गोष्टी या जगाची तमा न बाळगता वेळच्या वेळी करायच्या असतात.

दीपक साळुंके's picture

7 Sep 2012 - 12:10 pm | दीपक साळुंके

काही दिवसांपूर्वी मटा मध्ये शेषराव मोरेंच्या ह्या पुस्तकाच्या समारोपातील काही अंश प्रकाशित करण्यात आला होता. तो इथे वाचता येईल.

गणपा's picture

7 Sep 2012 - 4:36 pm | गणपा

चर्चा आणि लेख दोन्ही इंटरेस्टिंग आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Sep 2012 - 11:36 pm | अत्रुप्त आत्मा