सुखाचा शोध

काळा_पहाड's picture
काळा_पहाड in जे न देखे रवी...
23 Jun 2008 - 1:10 pm

न मागता मिळणे
मागुन मिळणे अन
मागुनही न मिळणे
मनाचा खेळ

मिळाल्याची चिकित्सा
पुर्तीची अपेक्षा
आनंदाचा स्तर
भावनांचा कल्लोळ

प्राप्तीचा आनंद
मागण्याची खंत
नाकारल्याचे दु:ख
सारीच अपेक्षा

सुखाचा शोध
अगम्य तो बोध
दु:खाचे भय अन
दु:खाचीच उपेक्षा

काळा पहाड

कविताप्रकटनविचार

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

25 Jun 2008 - 10:41 am | विसोबा खेचर

आयला काळ्या!

तुझ्या कविता वेगळ्याच असतात बघ! आवडतात आपल्याला... :)

तात्या.

चतुरंग's picture

26 Jun 2008 - 12:23 am | चतुरंग

एकदम वेगळाच ढंग आहे कवितांचा, विचारात टाकणारा. आवडली!

चतुरंग

काळा_पहाड's picture

26 Jun 2008 - 1:40 pm | काळा_पहाड

तात्या आणि चतुरंग
मनःपुर्वक आभार.

काळा पहाड