रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा बेळगावात...

अविनाश ओगले's picture
अविनाश ओगले in जनातलं, मनातलं
22 Jun 2008 - 8:51 pm

रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा बेळगावात...
आजची संध्याकाळ बेळगावकरांच्या आयुष्यातील एक अनोखी, अविस्मरणीय संध्याकाळ ठरली आहे. रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध
निवेदिका पद्मिनी परेरा यांनी आज बेळगावमध्ये एक कार्यक्रम सादर केला. बेळगावात सध्या वास्तव्यास असलेले जुन्या चित्रपट
गीतांचे रसिक संग्राहक विजय नाफडे यांनी हा योग जुळवून आणला. त्यांनी निवडलेली तीस जुनी गाणी पद्मिनी परेरा यांच्या अप्रतिम
निवेदनासह रसिकांनी छोट्या पडद्यावर पाहिली. "ये श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन का विदेश विभाग है..." हे वाक्य परेरांनी उच्चारले आणि रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. वर्षानुवर्षे जो आवाज रेडिओवरून ऐकला तो साक्षात आपल्यासमोर आहे याचा आनंद काही वेगळाच होता. नुकत्याच निवृत्त झालेल्या परेरा यांनी इतक्या लोकांसमोर निवेदन करण्याची किंवा बोलण्याची आपली पहिलीच वेळ आहे असे सांगत कार्यक्रम रंगवला. हा कार्यक्रम शहापूर बेळगावमधील सरस्वती वाचनालयाने आयोजित केला होता. अलीकडेच झालेल्या संशोधनानुसार संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग याच ठिकाणी झाला होता. (म्हणजे ही इमारत बांधण्यापूर्वीच्या मोकळ्या बखळीत.) एक विलक्षण अनुभव...

संगीतचित्रपटअनुभव

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Jun 2008 - 1:55 am | बिपिन कार्यकर्ते

मी कधीही त्यांचा आवाज ऐकला नाही, पण माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत ते रेडिओ सिलोन चे भक्त. त्यांच्याकडून खूप ऐकले आहे. मी कल्पना करू शकतो रेडिओ सिलोन च्या भक्तांसाठी हा अनुभव काय असेल.

बिपिन.

चतुरंग's picture

23 Jun 2008 - 2:14 am | चतुरंग

फक्त 'आकाशवाणी' वरुन ऐकू येणारा आवाज प्रत्यक्ष ऐकायला मिळणे हे तसे रोमांचित करणारेच! :)

(पूर्वी अमीन सयानीचेही निवेदन असेच असे. त्याच्या खास अनुनासिक, उत्साही आवाजात त्याने "आवाज की दुनियां के दोस्तो, अब अगला गाना जो आप सुनने जा रहे है, वो है रफी साहबका चौदवी का चांद"... असे काही म्हटले की जिवाचे कान करुन ऐकणे म्हणजे काय त्याचा प्रत्यय येत असे.)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

23 Jun 2008 - 5:31 am | विसोबा खेचर

वा ओगलेसाहेब!

सुंदर अनुभव..!

तात्या.