बुगडी माझी सांडली गं या लावणीचे विडंबन

कान्होबा's picture
कान्होबा in जे न देखे रवी...
1 Jul 2012 - 6:30 pm

माझ्या मित्राने बुगडी माझी सांडली ग या लावणीचे विडंबन केले आहे अर्थात गीतकारांची माफी मागून. महाविद्यालयीन तरुणीला काही विषयात ए.टी.के.टी. लागल्यावर भावनांचा कल्लोळ या लावणी मधून सादर करण्याचा प्रयत्न.

करीअर लावणी
ए टी के टी मला लागली ग
यंदा निकालाला
खबर नका सांगू ग माझ्या पिताश्रीला

माझ्या वर्गातला तरुण पाहतो
कट्ट्यावर बसून मला तो न्याहाळतो
कधी रोज डे ला गुलाब पाठवितो
काही नाहीच जमले ग बाई, पेपर लिहायला, पेपर लिहायला (१)
ए टी के टी मला लागली ग
यंदा निकालाला
खबर नका सांगू ग माझ्या पिताश्रीला

आज अचानक एसएमएस आला
निकाला मधी झालाय गफला
फार धाडसाने निकाल पहिला
वाहिला अश्रूचा पाट मी बाई
राहिल्या विषयाला, राहिल्या विषयाला
ए टी के टी मला लागली ग
यंदा निकालाला
खबर नका सांगू ग माझ्या पिताश्रीला

कठोर हायत कि माझे बाबा
उपदेश त्यांचा, ठेव जरा ताबा
मिळता पदवी तौबा तौबा
लावतील तरुण रांगा बाई , माझ्या स्वयंवराला
ए टी के टी मला लागली ग
यंदा निकालाला
खबर नका सांगू ग माझ्या पिताश्रीला

कलाकविताविडंबन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 Jul 2012 - 7:14 pm | मुक्त विहारि

पण खरे तर उलट आहे..

मुलींकडे बघता बघता, मुलेच जास्त नापास होतात..