अभिनंदन, शुभेच्छाबद्दल सर्व वाचकांचे धन्यवाद.
हा कार्यक्रम ३ वर्षापुर्वी सुरु झाला.
आर्थिक परिस्थितीचा बाउ न करता १० वी तील यश १२वी आणि स्पर्धात्मक परिक्षेत टीकवण्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या भरारी साठी शिष्यवृत्ती देणे हा मुळ उद्देश.
हा कार्यक्रम फक्त मुंबई पुरता मर्यादित होता.
परा आणि प्रसन्न केसकर ह्यांनी पुढाकार घेतला.
कार्यक्रम पुण्यात पोचला.
मग प्रश्न आला जर का पुण्यात पोचु शकतो तर सर्व महाराष्ट्रात का नाही.
पण मुंबई मधे बसुन चंद्रपुर मधल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या आर्थिक परिस्थितीची पडताळणी शक्य नाही.
ह्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यात कार्यकर्त्यांची फळी उभी राहाणे आवश्यक आहे.
म्हणजे नेमके काय करायचे?
अगदी साधे आणि सोप्पे आहे.
आपल्या भागात असलेल्या कॉलेजमधील संबंधीत व्यक्ती पर्यंत माहीती पोचवायची.
प्रत्यक्ष पोचवलीत तर उत्तम.
आणि ती व्यक्ती तुम्ही सांगितलेली माहीती मुलांपर्यत पोचवतील अशी आशा बाळगण्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही करु शकत नाही.
नीरव मोदी फाउंडेशन
कमला मील कंपाउंड,परेल, मुंबई-१३.
०२२-३००१०१३८, ०२२-३००१०१३६
www.niravmodifoundation.org
आर्थिक : कुटुंबाचे उत्पन्न वार्षीक : रुपये-२,५०,०००/-
सी.ई.टी चे मार्क ८५% +
शिष्यवृत्ती: शासकिय अभियांत्रिकी, वैद्यकिय महाविद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थ्यांकरता.
आर्थिक पात्रता पडताळुन पहाण्याकरता एक मुलाखत मुंबईत घेतली जाते.
पगार पत्रक, रेशन कार्ड, विजेचे बील अशी जुजबी कागद्पत्रे जोडावी लागतात.
फाउंडेशन च्या साइट वर सर्व माहीती उपलब्ध आहे.
तरी सुद्धा काही शंका असतील प्रतिक्रिया मधे जरुर विचारा.
............................................................................................................................
हे सर्व करत असताना मी समाजाचे ऋण फेडतो आहे,समाज सेवा वगैरे काहीही भावना नसते. मला आवडते, मला जमते. मी करतो. बस्स....
५ मुलांपासुन सुरु झालेला हा कार्यक्रम आता ५० पर्यंत पोहोचला आहे.
फाउंडेशन वर मी तांत्रिक सल्लागार आहे.
मी कुठलेही मानधन घेत नाही.
वरील पोस्ट कुठल्याही आर्थिक देणगीचे आवाहन नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.
जाता जाता: ट्रिगर आहे. नेमका काय? ते पुन्हा केंव्हा.
प्रतिक्रिया
28 Jun 2012 - 7:54 pm | रेवती
आपले पुन्हा आभिनंदन.
28 Jun 2012 - 8:53 pm | सुनील
दंडवत!
अवांतर - शीर्षकात नेमक ह्याऐवजी नेमकं असा बदल करावा.
28 Jun 2012 - 11:32 pm | शिल्पा ब
एक अत्यंत समाजोपयोगी कार्यक्रम.
देणगी द्यायची झाली तर कशी द्यायची? त्यांचं पेपाल अकाउंट असेल तर उत्तम अन सुरक्षित.
29 Jun 2012 - 12:19 am | संजय क्षीरसागर
या पोस्टची लींक माझ्या जवळच्या प्रिंसिपल मित्राला पाठवून ती महाराष्ट्रात जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचेल अशी व्यवस्था केलीये
29 Jun 2012 - 1:24 am | मुक्त विहारि
मस्त काम...
29 Jun 2012 - 7:50 am | मराठमोळा
तुमचे, परा आणि प्रसन्नदा आणि यात कोणत्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता काम करणार्या सगळ्यांचे अभिनंदनच नाही तर आभार.. :)
29 Jun 2012 - 7:50 am | अमितसांगली
स्तुत्य उपक्रम....मदत करायची असेल तर कशी ?
29 Jun 2012 - 7:59 am | रेवती
तेच तर त्यांनी लिहिले आहे.
29 Jun 2012 - 10:00 am | नितिन थत्ते
प्रभूमास्तर झिंदाबाद.
29 Jun 2012 - 10:32 am | पियुशा
ग्रेट वर्क :)
29 Jun 2012 - 11:27 am | बिपिन कार्यकर्ते
तब्बल १० प्रतिसाद आले आत्ता पर्यंत या धाग्यावर, मास्तर! खूप झालं!
29 Jun 2012 - 12:39 pm | विनायक प्रभू
व्य. नी मधे आलेल्या प्रश्नाला उत्तर.
वरील शिष्यवृत्ती ही ४ वर्षात विभागुन दिली जाते.
स्ट्रिक्ट्ली परफॉरमन्स बेस्ड.
परफॉरमन्स रिव्ह्यु नंतर.
29 Jun 2012 - 12:59 pm | शैलेन्द्र
सुंदर उपक्रम गुरुजी..
29 Jun 2012 - 1:02 pm | जाई.
ग्रेट
29 Jun 2012 - 2:30 pm | गणपा
तुमची परवानगी न घेताच मुंबईतल्या मित्रांना हा लेख व्यनी केला आहे.
पुढल्या महिन्यात माझ्या शाळेतही हा पोहोचेल याची खात्री आहे.
29 Jun 2012 - 5:44 pm | चतुरंग
नगरमधे काही लोकांपर्यंत माहिती पोचवली आहे. एक तरी विद्यार्थी आपल्यापर्यंत पोचावा अशी इच्छा आहे. बघूयात काय होते.
(आशावादी) रंगा
29 Jun 2012 - 5:49 pm | बॅटमॅन
भारी! लग्गेच मिरजेत माहिती पोचवतो.
29 Jun 2012 - 5:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मास्तर, मी प्रयत्न नक्कीच प्रयत्न करीन.
मास्तर, तुम्ही मागे मला शाळांमधे जाऊन विद्यार्थ्यापर्यंत पोहचायचं एक काम सांगितलं होतं आणि ते काम मला नीट जमलं नव्हतं, म्हणुन मला असं काम काहीच जमत नाही. असं वाटतं. :(
-दिलीप बिरुटे
[प्रभु मास्तरांचा लाडका]
29 Jun 2012 - 6:03 pm | नाना चेंगट
प्रभु मास्तरांनी विचारलं आहे नेमक काय कराल?
आम्ही तुमचे अभिनंदन करु.
तुम्ही खुप खुप छान काम करत आहात असं सर्टिफिकेट देऊ.
तुम्हाला काय मदत हवी आहे असे अगदी आपुलकीने विचारु.
तुमच्या सारखं जमत नाही म्हणून टिपं गाळू.
तुमच्या सारखे अनेक जण देशाला हवे आहेत असे ठासुन सांगु.
पुढे? घंटा !
काहीही करणार नाही.
कारण ती आमची जबाबदारी नाही.
सरकारने ते पहावे.
तुमच्या सारख्या वेड्यांनी तसे करावे.
आमचा काडीचाही संबंध नाही.
कारण आम्ही कुणाचेही काही देणे लागतो हेच आमच्या डोक्यात कधी येत नाही, येणार नाही.
आलेच तर आमच्या त्या इच्छेला कसे मारुन टाकायचे आणि त्याला गोंडस जबाबदार्यांचे नाव कसे द्यायचे हे आम्हाला माहित आहे.
तेव्हा प्रभु मास्तर तुम्ही ग्रेट आहात पण आम्ही तुमच्याहून ग्रेट आहोत कारण आमचे प्रशस्तिपत्रक आता तुम्हाला लाभले आहे. :)
असो. यापेक्षा जास्त काही लिहू शकत नाही. उगा माझ्या समजुतीच्या मर्यादा का उघड करु?
29 Jun 2012 - 6:08 pm | बिपिन कार्यकर्ते
माझे विचार नेमक्या शब्दात मांडल्याबद्दल नानासाहेबांचे अनेकानेक आभार!
30 Jun 2012 - 2:12 am | बॅटमॅन
>>>आलेच तर आमच्या त्या इच्छेला कसे मारुन टाकायचे आणि त्याला गोंडस जबाबदार्यांचे नाव कसे द्यायचे हे आम्हाला माहित आहे.
+१०^१००.
30 Jun 2012 - 1:10 pm | मन१
कारण आम्ही कुणाचेही काही देणे लागतो हेच आमच्या डोक्यात कधी येत नाही, येणार नाही.
हे अवलियाचे वाक्य आणि मूळ लेखातील
हे सर्व करत असताना मी समाजाचे ऋण फेडतो आहे,समाज सेवा वगैरे काहीही भावना नसते. मला आवडते, मला जमते. मी करतो. बस्स....
ही वाक्ये लागोपाठ वाचून पहा बरं.
"अशी कशी समाजसेवा करित नाहिस" म्हणून दुसर्याची गचांडी धरणे बरोबर वाटत असेल प्रश्नच मिटला.
शिवाय अशी गचांडी धरायचा अधिकार कुणी कुणाला दिला हाही प्रश्न आहेच. बाकी फुरसतीत.
30 Jun 2012 - 1:12 pm | मन१
मला आवडते, मला जमते. मी करतो. बस्स....
आवडीचे काम करण्यास आपणास दीर्घायुष्य लाभो व आपल्या आवडीच्या निमित्ताने चार अंधार्या खोल्यांत काही प्रकाश येवो ह्या शुभेच्छा.