नेमक काय कराल?
अभिनंदन, शुभेच्छाबद्दल सर्व वाचकांचे धन्यवाद.
हा कार्यक्रम ३ वर्षापुर्वी सुरु झाला.
आर्थिक परिस्थितीचा बाउ न करता १० वी तील यश १२वी आणि स्पर्धात्मक परिक्षेत टीकवण्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या भरारी साठी शिष्यवृत्ती देणे हा मुळ उद्देश.
हा कार्यक्रम फक्त मुंबई पुरता मर्यादित होता.
परा आणि प्रसन्न केसकर ह्यांनी पुढाकार घेतला.
कार्यक्रम पुण्यात पोचला.
मग प्रश्न आला जर का पुण्यात पोचु शकतो तर सर्व महाराष्ट्रात का नाही.
पण मुंबई मधे बसुन चंद्रपुर मधल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या आर्थिक परिस्थितीची पडताळणी शक्य नाही.
ह्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यात कार्यकर्त्यांची फळी उभी राहाणे आवश्यक आहे.
म्हणजे नेमके काय करायचे?
अगदी साधे आणि सोप्पे आहे.
आपल्या भागात असलेल्या कॉलेजमधील संबंधीत व्यक्ती पर्यंत माहीती पोचवायची.
प्रत्यक्ष पोचवलीत तर उत्तम.
आणि ती व्यक्ती तुम्ही सांगितलेली माहीती मुलांपर्यत पोचवतील अशी आशा बाळगण्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही करु शकत नाही.
नीरव मोदी फाउंडेशन
कमला मील कंपाउंड,परेल, मुंबई-१३.
०२२-३००१०१३८, ०२२-३००१०१३६
www.niravmodifoundation.org
आर्थिक : कुटुंबाचे उत्पन्न वार्षीक : रुपये-२,५०,०००/-
सी.ई.टी चे मार्क ८५% +
शिष्यवृत्ती: शासकिय अभियांत्रिकी, वैद्यकिय महाविद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थ्यांकरता.
आर्थिक पात्रता पडताळुन पहाण्याकरता एक मुलाखत मुंबईत घेतली जाते.
पगार पत्रक, रेशन कार्ड, विजेचे बील अशी जुजबी कागद्पत्रे जोडावी लागतात.
फाउंडेशन च्या साइट वर सर्व माहीती उपलब्ध आहे.
तरी सुद्धा काही शंका असतील प्रतिक्रिया मधे जरुर विचारा.
............................................................................................................................
हे सर्व करत असताना मी समाजाचे ऋण फेडतो आहे,समाज सेवा वगैरे काहीही भावना नसते. मला आवडते, मला जमते. मी करतो. बस्स....
५ मुलांपासुन सुरु झालेला हा कार्यक्रम आता ५० पर्यंत पोहोचला आहे.
फाउंडेशन वर मी तांत्रिक सल्लागार आहे.
मी कुठलेही मानधन घेत नाही.
वरील पोस्ट कुठल्याही आर्थिक देणगीचे आवाहन नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.
जाता जाता: ट्रिगर आहे. नेमका काय? ते पुन्हा केंव्हा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आपले पुन्हा आभिनंदन.
दंडवत!
एक अत्यंत समाजोपयोगी
विनायकश्री अत्यंत अभिमानास्पद कामगिरीबद्दल मन:पूर्वक अभिनंदन
मस्त काम...
तुमचे, परा आणि प्रसन्नदा आणि
अभिनंदन
तेच तर त्यांनी लिहिले आहे.
प्रभूमास्तर झिंदाबाद.
ग्रेट वर्क
तब्बल १० प्रतिसाद आले आत्ता
उत्तर
सुंदर उपक्रम गुरुजी..
ग्रेट
गुड जॉब सर.
मास्तुरे,
भारी! लग्गेच मिरजेत माहिती
मास्तर, मी प्रयत्न नक्कीच
प्रभु मास्तरांनी विचारलं आहे
माझे विचार नेमक्या शब्दात
>>>आलेच तर आमच्या त्या
शंका
मला आवडते, मला जमते. मी करतो. बस्स....