मृत्युघंटा

Primary tabs

नाना चेंगट's picture
नाना चेंगट in जनातलं, मनातलं
19 Jun 2012 - 1:39 pm

शह देण्यासाठी लांडग्याला
झालेली कोल्हयांची युती
शेपटाच्या लांब्या कमी पडल्या
म्हणुन कापसाचे पुंजके
टिंबाला जोडुन दाखवले
तरसाने केलेली लांडग्याशी युती
आणि
हत्तीने घेतलेला लांडग्याचा चावा
सहनही होत नाही सांगता येत नाही
हत्ती डुलतोय मांस खावुन
लांडगा मेला तर हत्तीचा घोडा
लांब जायचे तर घोडाच बरा
पण हत्ती असणं म्हणे
भाग्याचे लक्षण
छापकाटा करुन
कुत्रे ठरवतील
तरसाला मारायचे की स्वतः मरायचे
काहीही असो
जंगलाची मृत्युघंटा वाजत आहे
होवुन जावु द्या
खांडववना प्रमाणे अग्नीतांडव
कदाचित
इंद्रप्रस्थ उभे राहिल दग्धभुमीवर

नृत्यआस्वाद

प्रतिक्रिया

कवटी's picture

19 Jun 2012 - 1:45 pm | कवटी

आमच्या कंपनीतल्या १० मुला-मुलींचे यावर नृत्य बसवून मी त्याचा आस्वाद घेत आहे.

उदय के'सागर's picture

19 Jun 2012 - 1:56 pm | उदय के'सागर

कविता वाचुन म्हणजे एकदम प्रायोगीक नाटक पाहिल्यावर जसा 'फिल' येतो तसंच झालं...

पण कवटी ह्यांचा प्रतिसाद वाचुन ... ह.ह.पु.वा..... :D...मेलो!!!

कपिलमुनी's picture

19 Jun 2012 - 2:27 pm | कपिलमुनी

नाना का का ??

नाना चेंगट साहेब, महाभारत तस मिपाभारत की जय हो.

मृत्युन्जय's picture

19 Jun 2012 - 2:46 pm | मृत्युन्जय

तुमच्या लेखनात तात्यासाहेबांची झलक दिसते.

मी आधीही एकदा म्हणालो होतो तसे नानासाहेब म्हणजे मिपाचे एक फाईंड आहे.

ऑस्कर वाइल्डच्या अ‍ॅनिमल फार्ममध्येदेखील मानवी जीवनाचे विविध कंगोरे असेच प्राणीमात्रांच्या रुपकातुन दाखवले होते. एकदम वाइल्ड आठ्वला.

तुमच्या कवितेत एक सूक्ष्म अर्थ दडला आहे जो जाणुन घेण्यासाठी तरल भावनाप्रधान मनाची गरज आहे.

कवितेचा आशय गेयतेपेक्षा जास्त महत्वपुर्ण असतो. अर्थ, शब्द, व्यक्त आणि गेय या चार आधारस्तंभापैकी माझ्यामते अर्थ सर्वात महत्वाचा जो या पद्यात पुरेपुर आढळतो.

ही कविता एका नविन पर्वाची नांदी आहे.

मृत्यु आणि जीवन यांचा अवीट मिलाफ या कवितेतुन प्रतीत होतो आहे.

कविता वाचल्यापासुन एक अस्वस्थ हुंकार मनात भरुन राहिला आहे.

वरीलपैकी आपल्या आवडीची कुठलीली खरी प्रतिक्रिया निवडावी. (खर्‍या प्रतिक्रियेसाठी खवमध्ये संपर्क साधता येइल) ;)

डॉ अशोक कुलकर्णी's picture

19 Jun 2012 - 4:35 pm | डॉ अशोक कुलकर्णी

"अ‍ॅनिमल फार्म" ही कादंबरी जॉर्ज ऑर्वेलची आहे !!

अरुण मनोहर's picture

19 Jun 2012 - 3:00 pm | अरुण मनोहर

नृत्य नव्हे ही
नान्दी आहे
एका शापित नाटकाच्या
पुनर्प्रयोगाची अन्गुलीमाल
विन्गेत उभा आहे
प्रेक्षकानी गाजरे खात
कुठवर वाट पहायची?
????????

आबा's picture

19 Jun 2012 - 4:06 pm | आबा

उपहास किंवा विडंबन असेल तर माहित नाही
पण आपल्याला तर आवडलं बुवा...
पु.ले.शु.

कवितानागेश's picture

19 Jun 2012 - 4:21 pm | कवितानागेश

पुढचे धागा-विषय
मृत्यु योग
मृत्यु षडाष्टक
मृत्यु पंथ
मृत्यु चा दाखला
मृत्युंजय :P

sneharani's picture

19 Jun 2012 - 4:52 pm | sneharani

तु पण क्रिप्टीक लिहायला लागलास की काय?
थोडी समजली, बाकी कविता तुझ्याकडून समजून घेऊच ;)

वाह....महा कवी कालिदासा नंतर च्या काळात "तुकाराम" आणि आता नानासाहेब !

पैसा's picture

19 Jun 2012 - 5:08 pm | पैसा

भूत! भूत! म्हणून इथून लांब धावत सुटावंसं वाटतंय!

शरदिनी तैंच्या कविते इतकी क्लिष्ट नसली तरी एकाही कडव्याचा(?) अर्थ लागेल तर शप्पथ.
मनीच्या बाता : जौ दे गण्या..... कविता करणं सोडं पण ती समजण्याची ही तुझी लायकी नाही हे पुन्हा पुराव्यानी शाबीत झाले.

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Jun 2012 - 7:09 am | llपुण्याचे पेशवेll

खरडवही संशोधनाचे फलित म्हणावे काय? का राजकीय भाष्य ?

नाना चेंगट's picture

20 Jun 2012 - 12:52 pm | नाना चेंगट

सर्व आस्वादकांचे मनापासून आभार :)