केरळ भटकंती ३ - कोचिन ते थेकडी (२)

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in भटकंती
17 Jun 2012 - 6:59 pm

केरळमध्ये सर्वात अधिक काही आवडले तर प्रवास. निसर्गरम्य परिसर आणि दुतर्फा निरनिराळी झाडे असलेले रस्ते हे खास आकर्षण. मधेच एखादे गाव. अशाच एका पोणकुण्णम नामक गावातुन जाताना दिसलेले हे दृश्य. भाजीच्या दुकानाबाहेरील कट्ट्यावर दोन गावकरी निवांत गप्पा मारत बसले होते.
shop

या रस्त्यांनी प्रवास करतांना जाणवलेले वैशिष्ठ्य म्हणजे ओसाड वा निर्मनुष्य असा भाग अजिबात लागत नाही. मात्र वस्ती तुरळक असो वा बर्‍यापैकी दाट, परिसर हिरवागार दिसला. गावातला गजबजलेला भाग, बाजारपेठ वगैरे भाग सोडता सगळ हिरवगार. बहुधा लोक जवळपास नोकरी करत असावेत वा स्वतःचा व्यवसाय म्हणा किंवा शेती/ बागायत करत असावेत. अनेक घरे अगदी रस्त्यालगत होती.
House 1

अनेक लक्ष्य वेधुन घेणारी घरे सातत्याने दिसत होती. इथे प्रकर्षाने जाणवली ती अनेक प्रकारची घरे. भडक रंगाची घरे, अलिशान बंगले, साधी कौलारु घरे, आधुनिक घरे आणि काही अगदी हेवा वाटावा अशा रमणिय जागी वसलेली घरे.
h2

रस्त्याच्या बर्‍यापैकी वरच्या अंगाला असलेले हे दाट झाडीत लपुन बसलेले घर विशेष आवडले. इथे राहणारे खरे भाग्यवान. खाली उतरुन गेल्याशिवाय जगाशी संपर्कच नाही.
h10

मधेच एखादा निवांत रस्ता लागायचा जिथे दुतर्फा दाट झाडी होती.
landscape2

कुठे गर्द हिरवी झाडी तर कुठे हिरव्या रंगाच्या उठुन करणारा गुलमोहर
landscape 1

रस्ता वळणे घेत जात होता. आता जरा आजुबाजुच्या झाडीत बदल दिसु लागला होता.
rd6
rd8

इतक्या सुंदर निसर्गाला विजेचे खांब आणि तारा मात्र विजोड भासत होते. अनेकदा फोटोमध्ये खांब व तारा येऊ नयेत यासाठी कसरत करावी लागत होती. अनेक घरे वा चर्चेसचे फोटो या तारांमुळे विद्रुप भासले. मात्र एका वळणावर एक मजेशीर दृश्य पाहायला मिळाले. एक झाड आपल्या सर्व फांद्या सरळ रेषेत एकमेकाला समांतर धरुन एका विजेच्या खांबालगत उभे होते आणि त्या फांद्यादेखिल तारांना समांतर होत्या.
tree

थोडे अंतर कापल्यावर घाट सुरू झाल्याचे जाणवले. थेकडी बर्‍यापैकी उंचीवर असावे. घाटात कसलेसे काम सुरु होते मात्र रस्ता मोकळा होता.
rd7

घाटात जरा सपाटीला एका वळणावर डाव्या बाजुला एका कौलारु घराशेजारी एक रंगीबेरंगी ट्रक उभा होता. या भागात असे मागचा भाग लाकडी ओंडके वाहण्यासाठी मोकळा ठेवलेले व भरपूर रंगकाम केलेले ट्रक खूपदा दिसले.
truck 1

जरासे उंचावर येताच रस्त्याच्या बाजुला उंच झाडे दिसु लागली.
rd9

त्या सुंदर रस्त्याने वर चढुन जाताना अचानक समोर एक छोटासा धबधबा लागला. नेहेमी जा ये करणार्‍यांना तो परिचित असावा. इथे चहा, कणसे, खाद्यपदार्थ वगैरे विकणार्‍या टपर्‍या होत्या म्हणजे लोक इथे थांबत असावेत. पावसाळा अजुन सुरु व्हायचा होता तरीही बर्‍यापैकी पाणी होते. काही माणसे धबधब्याच्या धारेखाली अंघोळ करत होती. मात्र जे अनेकदा रस्त्यांच्याबाबतीत जाणवलं तेच इथेही - निस्रगाला विद्रूप करणारे जाहिरात फलक. जाहिरातफलक टाळुन धबधब्याचा फोटो घेणे कौशल्याला आव्हान देणारे होते.
wf0
wf2

घाट चढुन जाता जाता बर्‍यापैकी उंचीवर आल्याची जाणीव करुन देणारे हे दृश्य. एका बाजुला दाट झाडीच्या पलिकडे दरी आणि ढगात गेलेले डोंगर दिसु लागले.
v1

गोल गिरक्या घेत वर चढताना एका जागी डावीकडे अगदी रस्त्यालगत दरी आणि पलिकडे उंच पर्वतरांगा दिसू लागल्या. ढग पर्वतमाथ्यावर उतरले होते तर एकिकडे सोनेरी प्रकाश होता. आता थांबायचा मोह आवरणे कठिण होते. सुदैवाने लगेचच पुढे एक रुंद विस्तार होता. तिथे थांबुन फोटो काढले. आश्चर्य म्हणजे इतक्या उंचावर नारळाची झाडे समुद्रकिनारी असावीत इतक्या दाटीने आकाशाला गवसणी घालत होती.
v2
v3

जरा मागे वळुन पाहिले तर आम्ही वर चढुन आलेला रस्ता आणि त्या रस्त्याला सोडुन आत खाली शिरलेला कच्चा रस्ता डोळ्यात भरला. बहुधा इथे एखादे गांव असावे
v4

एव्हाना दुपारचे दोन वाजुन गेले होते. भूकेने पोटात कावळे कोकलत होते. आता थेकडी कधी येणार असे झाले. आणि लवकरच चहाचे मळे रस्त्यालगत दिसु लागले आणि आम्ही खुष झालो, 'थेकडी आलेच की'
rd10
rd11

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

18 Jun 2012 - 9:13 am | प्रचेतस

अतिशय सुंदर, मोहक फोटो आणि चित्रदर्शी वर्णन.

पुभाप्र.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jun 2012 - 9:26 am | अत्रुप्त आत्मा

व्वाह... फोटो मस्त आहेत :-)

पियुशा's picture

18 Jun 2012 - 9:52 am | पियुशा

मार डाला __/\__
असे स्वच्छ सुंदर रस्ते , मनोहर निसर्ग ,शांतता पाहीली की तिथे राहण्यार्या लोकांचा हेवा वाटतो अगदी :)

५० फक्त's picture

18 Jun 2012 - 10:19 am | ५० फक्त

पुन्हा एकदा जबरदस्तच, धन्यवाद.

जाई.'s picture

18 Jun 2012 - 11:04 am | जाई.

छान वर्णन

अमृत's picture

18 Jun 2012 - 12:13 pm | अमृत

आता हापिसात बसल्या बसल्या थेकडीची सहल घडणार. उत्सुक आहे पुढील भागच्या प्रतिक्षेत.

अमृत

सहज's picture

18 Jun 2012 - 2:55 pm | सहज

नयनसुख घेत आहे. पुढच्या भागात विश्रामगृहाचे फोटो येतीलच..

सुधीर मुतालीक's picture

19 Jun 2012 - 2:39 am | सुधीर मुतालीक
सुधीर मुतालीक's picture

19 Jun 2012 - 2:44 am | सुधीर मुतालीक

मला ते विडीओ मेला चिकट्वता आले नाही अजुन. यु त्युब वर सरळ " केरला सफारी" शोधा. कुणाला जमल्यास इथे चिकटवा. बाकी आपले लिखाण मस्त चालले आहे. येउ द्या अधिक माहिती.

मेली लिंक, जिवंत केली आहे. ;)

सुधीर मुतालीक's picture

20 Jun 2012 - 2:24 am | सुधीर मुतालीक

मित्रा, गणपा, खुप धन्यवाद,.

साक्षीदेवा फोटो खरच सुरेख आहेत.

पैसा's picture

19 Jun 2012 - 5:57 pm | पैसा

फार सुरेख!

प्रभाकर पेठकर's picture

1 Aug 2012 - 7:52 pm | प्रभाकर पेठकर

निसर्ग पाहून डोळे निवले. एकदा केरळ करायचे आहेच. बघूया कधी जमते. तो पर्यंत तुमच्या भ्रमंतीची छायाचित्रंच आधार आहेत.

बहुधा लोक जवळपास नोकरी करत असावेत वा स्वतःचा व्यवसाय म्हणा किंवा शेती/ बागायत करत असावेत.

बहुधा बहुतेक सर्व जणं आखाती प्रदेशात असावेत. अगदी कामगार वर्गापासून उच्चभ्रू आणि यशस्वी उद्योगपतींपर्यंत सर्वच जणं इथे दिसतात.

आत्मशून्य's picture

3 Aug 2012 - 5:23 pm | आत्मशून्य

केरळ आहेच मस्त. जणु मोSSSSSठ्ठ महाबळेश्वर, सोबतीला समुद्र किनारे आणी बहुसंख्य मराठी पर्यटक. एकदम घरच्यासारखंच.