प्रवास गाडीचा असो वा विमानाचा. रडणारी बाळं नेहेमी आमच्याच वाट्याला का येतात माहित नाही. चांगली दोन तीन पोर सूर लावुन होती. पैकी एक माझ्या पुढ्च्याच रांगेत. आम्ही सात जण, सहा एका ओळीत आणि पुढच्या रांगेत मी एकटा, अर्थातच खिडकीत. त्या रडणार्या पोराच्या गोतावळ्यापैकी एक माझ्या शेजारी होता. पोरानं उच्छाद मांडला होता. एकवेळ रडण बर पर किंचाळण नको. काही पोर अशी किंचाळतात की कोळसा इंजिनाची शिट्टी बासरीसारखी वाटावी. असो. अखेर नाना उपायानंतर ते पोर थांबल. मग माझ्या शेजारी बसलेल्याची हालचाल सुरू झाली. गडी मोठ्या हौसेनं आपल्या मोबाईलने चित्रे टिपत होता. त्याची चुळबुळ ल्क्षात घेत मी मागे सरकलो आणि त्याला खिड्कीजवळ येऊन फोटु काढु दिले. आभार मानत जागेवर बसताना त्याने सहज विचारले, 'खाली पांढरे पांढरे दिसत आहे ते काय आहे?'. 'ढग' मी उत्तरलो. मग अचानक त्याला आठवल की आपण उंचावर आहोत. असा विलक्षण प्रश्न विमानात ऐकायची माझी दुसरी वेळ. पहिला मान माझ्या मावस बहिणीचा. मागे एकदा आम्ही बंगलोरला जात असताना बाईसाहेब खिडकीत बसल्या आणि बाहेर पंखांकडे लक्ष जाताच विचारत्या झाल्या ' दादा, तिथे पंखावर पुढच्या भागात बघ लिहिले आहे - नो स्टेप्स्; आता इथे जर खिडकी उघडत नाही तर आपण कसे काय खाली उतरणार? म्हणजे पाय द्यायचा प्रश्नच येत नाही. मग असे का लिहिले आहे?'
उतरायची सूचना झाली. जरा वेळातच हिरवळ जवळ दिसु लागली.
नारळाची झाडे आणि टुमदार कौलारु घरे स्पष्ट होऊ लागली म्हणजे आता उतरणार.
खरेतर कोचिन मुक्काम केवळ एक रात्रीचा. पहाटे उठा, निघा कोचिनला जा, पुन्हा पाच तास प्रवास करुन थेकडी म्हणजे अति झाले असते. त्यामुळे आदल्या दिवशी निघुन कोचिनला मुक्काम करायचा, संध्याकाळी थोडेफार पाहायचे, फिरायचे असा विचार होता. दुसर्या दिवशी सकाळी थेकडीला रवाना. संध्याकाळी फोर्ट कोचिनला भटकायचे ठरले. मस्त जेवुन आळसावलेल्या पोरांनी निघायला साडेसहा वाजवले आणि आम्ही काहीसे उशिरानेच पोचलो. आकाशात ढग होते, सूर्य अस्ताला गेला होता. मासेमारीची चिनी जाळी पाहायची होती. पाण्यावर पोचलो आणि मस्त रंगकाम पाहायला मिळाले. बांबूंवर दोराने ताणुन बसवलेली आणि मासेमारी संपल्याने वर घेतलेली जाळी मागे रंगीत आकाश व खाली पाणी असे सुरेख दृश्य दिसले.
आम्ही जेट्टीच्या जवळ जायचा प्रयत्न केला पण 'आता संपल, उद्या या' असे म्हणत कोळी लोकांनी आम्हाला फुटवल आणि जाळ्यांच्या जवळ जायला मज्जाव केला. आम्ही पाय फिरवले आणि जरा काठावर भटकलो. मासळीच्या अनेक टपर्या होत्या, समोर रुपेरी मासे पसरले होते.
शेजारी हे मांजर 'आता एखादा तरी मासा उडवाय्चाच' अशा नजरेने माशांकडे पाहत असलेले दिसले.
फोर्ट कोचिन भागाविषयी बरेच ऐकले होते. तिथे मनसोक्त भट्कायचे होते पण उशिर झाला होता. या भागात इंग्रजी, पोर्तुगिज, डच, फ्रेंच अशा अनेक शैलींचा प्रभाव असलेली घरे पाहायला मिळतात. टुमदार व आकर्षक अशा काही बंगल्यांचे रुपांतर आता हॉटेलात झाले असावे.
अशाच एका हॉटेलने लक्ष वेधुन घेतले. 'ओल्ड हार्बर हॉटेल' असे त्याचे नांव. मोठा सुरेख बंगला होता.
आम्ही परत निघालो. बायकांना केरळी साड्या/ ड्रेसचे कापड घ्यायचे होते.
प्रतिक्रिया
6 Jun 2012 - 12:57 am | मुक्त विहारि
पूढचा भाग लवकर येवू द्यात.
6 Jun 2012 - 5:09 am | चौकटराजा
कोची हे एक अरुंद रस्त्यांचे पण टीपटाप शहर आहे . ते भारत देशातील एक उत्तम नैसर्गिक बंदर आहे. फोर्ट कोची भागात पायी चालत भटकत रहाणे हा तर अविस्मरणीय अनुभव आहे.
माझे ही चार आणे धाग्याला-
कोचीची मुख्य बाजार पेठ अशा मोठमोठ्या दुकानानी सजलेली आहे. हे जुवेलरीची तीन मजली
दुकान.
फोर्ट कोची चा निरोप घेताना
सर्वसाक्षी साहेब, आपल्या या धाग्यामुळे माझ्या रम्य आठवणीना उजाळा मिळाला.
6 Jun 2012 - 6:52 am | मोदक
झकास फोटो..
6 Jun 2012 - 7:23 am | नंदन
फोटू आणि वर्णन आवडले. पु. भा. प्र.
6 Jun 2012 - 8:38 am | ५० फक्त
मस्त फोटो आणि वर्णनं, धन्यवाद.
6 Jun 2012 - 8:56 am | प्रचेतस
सुरेख फोटो आणि छान वर्णन.
लेख लवकरच संपवल्यासारखा वाटला.
पुभाप्र.
बाकी ती मांजरी गर्भारशी दिसतीय.
6 Jun 2012 - 3:11 pm | सूड
वर्णन व फोटो छानच !!
अवांतरः >>बाकी ती मांजरी गर्भारशी दिसतीय.
वल्ली, मान गये आपकी नजर.
6 Jun 2012 - 10:22 am | पियुशा
वॉव सगळे फोटो मस्त :)
तो जाळ्याचा फोटो तर अगदी क्लास आलाय रंगसंगतीमुळे ,मला माउचा फोटो भारी आवडला :)
6 Jun 2012 - 10:24 am | अत्रुप्त आत्मा
झ्याक... एकदम झ्याक...! अता पुढचा भाग टाका लवकर... :-)
6 Jun 2012 - 11:10 am | jaypal
फोटो क्र१ आवडला आणि क्र.६ खुपच आवडला
अवांतर = "अखेर नाना उपायानंतर ते पोर थांबल"
नाना पण होते का सोबत ? त्यांनी काय उपाय योजना केली ?
6 Jun 2012 - 11:30 am | मृत्युन्जय
मांजरासाठी आणि रंगांची पखरण असलेल्या सुरमई आकाशासाठी तुम्हाला १०० पैक्की १०० :)
7 Jun 2012 - 1:42 pm | स्वाती दिनेश
केरळचे वर्णन आवडले आणि फोटोंबद्दल तर काय बोलायलाच नको, झकासच !
पु भा प्र
स्वाती
7 Jun 2012 - 5:51 pm | मदनबाण
मस्त...
फोटोतले माऊ आवडले. :) तसही माऊ मला फार आवडते ! :)
मिपावर देखील बरेच माऊ आहेत ! ;)
(बोका) ;)
7 Jun 2012 - 6:01 pm | प्रचेतस
सांभाळ हो.
फिस्कारून येतील.
7 Jun 2012 - 8:18 pm | पैसा
सगळे फोटो आणि वर्णन मस्तच!
7 Jun 2012 - 9:10 pm | सुनील
फोटो मस्तच. वर्णन अजून थोडे हवे होते.
शेवटून तिसरा फोटो - सहसा परदेशातील भारतीय बहुल भागाला लिटल इंडिया म्हणतात. पण भारतातल्या भारतातदेखिल लिटल इंडिया पाहून मौज वाटली!
7 Jun 2012 - 11:56 pm | शिल्पा ब
छानच. केरळ खुपच निसर्गरम्य आहे. रस्त्यावरसुद्धा दोन्ही बाजुंनी भरपुर झाडं, झुडपं आहेत. खुप छान वाटतं. खास करुन मुंबई किंवा रखरखाटी भागातुन अशा ठीकाणी गेल्यावर.
मी अजुन कोकणात गेले नाही त्यामुळे उगाच वाद घालु नये.
12 Jun 2012 - 12:23 am | शुचि
छान प्रवासवर्णन व फोटो.
12 Jun 2012 - 1:54 am | रेवती
विमान खाली येताना काढलेले व कोळ्याच्या जाळ्यांचे फोटू झकास.
बाकी रडणारी पोरं आमच्याही विमानात असतात हो.......आईवडीलांचा इलाज नसतो.
12 Jun 2012 - 10:53 am | श्रीरंग_जोशी
काकासाहेबांचा इयत्ता नववीतील मराठीच्या पुस्तकातील पाठाची आठवण झाली (मी पाहिलेला सूर्यास्त) कारण त्यात केरळचे सुरेख वर्णन केले होते.
12 Jun 2012 - 11:48 am | जागु
वा सुंदर फोटो.
12 Jun 2012 - 12:02 pm | ऋषिकेश
वा! पु.भा.प्र.
12 Jun 2012 - 1:21 pm | गणपा
साक्षीदेवा फोटो-सफर आवडली.
पुढील भाग लौकर येउंद्यात.