केरळ भटकंती २ - कोचिन ते थेकडी (१)

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in भटकंती
13 Jun 2012 - 12:32 am

केरळमध्ये पाहण्यासारखे खूप काही आहे. पण मला जर कुणी विचारले की केरळात पाहण्यासारखे काय आहे? तर मी सांगेन - 'केरळ'. प्रसिद्ध वा प्रेक्षणिय स्थळांबरोबरच रस्त्याने जाताना वाटेत दिसणारे निसर्गाचे रूप पाहणे हे निश्चितच एक अनुभव आहे. प्रत्येक वळणावर नवे चित्र. म्हणुनच कोचिन ते थेकडी हा पाच तासाचा प्रवास मला एखाद्या पर्वणीसारखा वाटला. कुणालाही कंटाळा आला नाही की कधी एकदा पोचु असेही झाले नाही.

कोचिन शहराचे गजबजलेले रस्ते ओलांडुन जाता जाता अर्ध्या तासाहून अधिक वेळ गेला. मात्र एकदा कोचिन मागे पडल्यावर सगळे कसे निवांत दिसु लागले. रहदारी देखिल जरा कमी वाटली. मुंबईकराला बाहेर कुठेही रहदारी कमीच वाटते म्हणा. केरळचे रस्ते म्हणजे मस्त. बहुधा सर्व वाहतुक रस्त्याने होत असल्याने रस्ते नीट बांधलेले व जत्न केलेले असावेत. रस्ते म्हंणाल तर वीसेक फूट रुंद, फार मोठे नाहीत, रस्ता दुभाजकही दिसले नाहीत. मात्र अपघात फार क्वचितच दिसले.

जसजसे शहरापासून दूर जाऊ लागलो तसे रस्ते आपले वेगळे रूप दाखवु लागले. हा असाच एक रस्ता

rd1

आणि आणखी थोडे गेल्यावर रस्त्याने पुन्हा नवे रूप दाखवले. आता हिरवाई वाढत होती

rd2

वाटेत एका वळणावर गाडी हळु करत आमच्या चक्रधराने म्हणजे सजीने अननसाचा मळा दाखवला. आम्ही गाडी थांबवली आणि उतरलो.

pnpl1

pnpl2

पुन्हा गाडी रस्त्याला लागली आणि मजेशीर प्रकार दिसला. बाजुची सगळी झाडे वार्‍याच्या दिशेनुसार अशी काही वाकली होती की त्यांच्या मस्त कमानी झाल्या होत्या.

swing

गाडी रस्ता कापीत होती आणि मी जमेल तसे रस्ते टिपत होतो.

rd3

rd4

rd5

केरळचे मला पूर्वीपासून जाणवत आलेले वैशिष्ठ्य म्हणजे सलग मोठा असा निर्मनुष्य भाग अजिबात आढळत नाही. लगोलग घरे, वस्त्या, वाड्या रस्त्यालगत दिसतात. मधेच एखादे शहर, जरा मोठे शहर वा बारीकसे गाव लागते आणि गाव ओलांडताच पुन्हा हिरवा रस्ता. अशाच एका शहरातुन जाताना मला गमतीशीर प्रकार दिसला आणि तो म्हणजे अर्धकमानी. कसल्याश्या कार्यक्रमाची जाहिरात करणार्‍या या कमानी. जिथे झाडे स्वतःच कमानी धरतात तिथे या कृत्रिम कमानी कशाला असा प्रश्न मला पडला.

arc

केरळ मध्ये प्रवास करताना प्रकर्षाने जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे ख्रिस्त ध्रर्माचा प्रसार. अक्षरशः सलग दोन मैल देखिल असे जात नव्हते की जिथे चर्च वा मनोरे नाहीत. एखाद्याने केरळातली चर्चेस हा विषय घेतला तर एकाहुन एक अशी सुरेख चर्चेस पाहायला मिळतील. गावागावात आणि दोन गावांमध्ये देखिल ख्रिस्ताचे मनोरे. अशी असंख्य व वैशिष्ठ्यपूर्ण चर्चेस व मनोरे केरळमध्ये पाहायला मिळतात. मला जाता जाता टिपता आलेले हे काही नमुने.

church5

church4

क्रमश:

प्रतिक्रिया

साक्षीराव, मस्त फोटोज् आणि त्यातल्या त्या ते हिरव्या रस्त्यांच्या फोटोंबाबत, क्या कहने....! अप्रतिम!
बाकी वर्णन जरा त्रोटक वाटलं कदाचित कोचिन ते थेकडी प्रवासाचं असल्यामुळे असेल. तरी पुढे आणखी सविस्तर लिखाण येईल याची खात्री आहे.

हे तर नुसते फटु-वर्णन झालेय! तिथेले अनुभवही येऊ द्यात

प्रचेतस's picture

13 Jun 2012 - 1:38 pm | प्रचेतस

अप्रतिम.
नयनरम्य फोटो.

जाई.'s picture

13 Jun 2012 - 8:50 pm | जाई.

मस्त
फोटो आवडले

मुक्त विहारि's picture

13 Jun 2012 - 8:57 pm | मुक्त विहारि

एकदा जायला पाहिजे. पण मल्याळम येत नाही , हा मोठाच प्रॉब्लेम आहे.

खेडूत's picture

13 Jun 2012 - 10:35 pm | खेडूत

अलीकडेच पाहिले आहे.
तिथे हत्तीवर बसून सफर केल्याचे आठवते. पण पेरियार लेक ला त्यावेळी नुकताच एक बोटीचा अपघात झाला होता त्यामुळे ते बंद होते. आता चालू झाले असेल..

पिवळा डांबिस's picture

13 Jun 2012 - 10:48 pm | पिवळा डांबिस

सिंबळी वंडरफुळ फोटोज, स्सार!!
:)

कशाला ते मस्त मस्त रस्त्यांचे फोटो टाकलेत ओ उगाच, आता लगेच निघावं वाटतंय.

बाकी दिवसेंदिवस कंजुष होत चाललाय जणु, असो.

चौकटराजा's picture

14 Jun 2012 - 3:15 pm | चौकटराजा

आता वाट कशाची बघताय ? जरूर जाऊन या ! कोची ते मुन्नार जवळ जवळ ८० किमी चा घाट रम्य आहे. व जगातील जास्त जैव वैविध्यते बाबतीत पाहिल्या चार पाच भागांपैकी.
कधी निघताय?

शिल्पा ब's picture

14 Jun 2012 - 2:48 am | शिल्पा ब

मस्त.

विसुनाना's picture

14 Jun 2012 - 2:47 pm | विसुनाना

ठेक्कडी पेरियार ! स्वर्गीय आठवणी...

खर सांगायच तर दोन्ही भागातले फोटो मला दिसले नाहीत. पण ऑफिस मधुन घरी जावुन नक्की पाहिनच.

बाकी नुकत्याच केलेल्या सदाबहार केरळ ट्रीप डोळ्यासमोर येवुन गेली. अहाहा !

shankarsshinde80's picture

9 May 2018 - 1:19 pm | shankarsshinde80

9 May 2018 - 1:02 pm
मित्रहो,
नमस्कार,
मी मिपा वर प्रथमच काहीतरी लिहित आहे आणि तेही मदत हवी आहे म्हणून
मी दिनांक १४ ते १८ मे असे ५ दिवस केरळमध्ये जात आहे
जाण्याची ठिकाणे
१४ते १५ मे ;- एर्नाकुलम जंक्शन ते मुन्नार
१६ मे थेक्कडी
१७ मे अलेप्पी
१८ मे athirapali व कोची
तरी मला वरील ठिकाणी पाहण्याची ठिकाणे कोणती आहेत यासाठी मदत करावी हि नम्र विनंती
माझ्यसोबत माझी पत्नी व ९ वर्षाचा मुलगा व दुसर्या मित्राची अशीच त्रिकोणी फमिली आहे

श्वेता२४'s picture

9 May 2018 - 1:45 pm | श्वेता२४

खाली दिलेल्या धाग्यावर टिचकी मारा
केरळ