जाणवू ना दिल्या वेदना ना कळा
अलगद कापला कराने गळा.
घेतला आळ नाही पवारांवरी
त्यांच्या आडून खाल्ले मी हजारवेळा
मागून शिव्या दिल्या खरे हे जरी
का खाखाकार वाचूनी मी लुळापांगळा
राहतो मी येथे, दिसतो मी बावळा
सापडेना कुणा इरसाल मी खरा.
भाग ओसाड सबसिडी गाळतो तेथे
करा परी कर भरतोय आंधळा.
सबसिडी घेण्या तू वेळ लावू नये
ही हापसून लाव कराचा सापळा.
राजकारणी पक्का, काळा न पडे
राजकारण भाग्यात, पिंडावरी कावळा
मार्ग सारेच धुंडाळतो सारखा
करदात्यांचा पैसा राजरोस लाटण्या
टोपी शाबूत म्हणजे “न्हावी” रिकामे
गप्पा जरी थोर अंतरी नाना कळा.
प्रतिक्रिया
21 May 2012 - 8:19 pm | पैसा
वेगळ्या विषयावरचं विडंबन आवडलं.