ए मालिक तेरे बंदे हम! (रौशनी - अवांतर..!)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
19 Jun 2008 - 1:43 am

राम राम मडळी,

आज रौशनी -५ हा भाग शैलेन्द्र यांनी प्रतिसाद देऊन वर आणला आणि मी पुन्हा एकदा रौशनीच्या आठवणीत गुंतलो. दिवस थोडासा अपसेटच गेला. मंडळी, रौशनीचं लेखन बरंच म्हणजे बरंच लांबलं आहे हे अगदी कबूल! तसं माझं लेखन सुरू आहे, पूर्णही होत आलं आहे आणि मी ते वेळोवेळी सेव्हही करून ठेवलं आहे. आता लेखन जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच ते प्रसिद्ध करीन म्हणजे वाचकांची गैरसोय होणार नाही.

असो..

मंडळी, रौशनी हा माझ्या आयुष्यातील एक वेगळाच अनुभव. ही बया खूपच वेगळी होती. 'वेश्याबाजारातल्या इतर चार मावश्यांसारखी एक मावशी' एवढीच फक्त ओळख नव्हती तिची, नक्कीच नव्हती! तिच्यात आणि माझ्यात एक भावनिक नातं निर्माण झालं होतं. मी तिला नेहमीच खूप समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि मुंबईच्या त्या भयाण बाजारात हा एकटाच माणूस आपलं म्हणणं ऐकतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो याचं तिला नेहमी खूप समाधान वाटे आणि आमच्या ज्या काही मोजक्या भेटी घडल्या त्यात ती माझ्याशी अगदी भरभरून बोले.

रौशनी गाणं शिकलेली होती आणि अतिशय उत्तम गायची याचा उल्लेख मागील भागात आला आहेच. आज रौशनीची आठवण झाली आणि तिचे काही फोटो माझ्याकडे होते ते मी शोधून काढले!

एकदा बोलण्याच्या ओघात,

"तात्यासाब एकदा वेळ काढून अवश्य या, आपको मुजरा सुनाउंगी. तसं मी आता मुजर्‍यात गाणं केव्हाच सोडलं आहे पण तुमच्याकरता एकदा नक्की गाईन!"

असं रौशनी मला म्हणाली होती!

हो, ना करता करता एक रविवार ठरला. फोरासरोडच्या बनारसी चाळीत दिदीकडे (या दिदी प्रकरणाविषयी रौशनीच्या येत्या भागात विस्तृत लिहिणारच आहे,) रौशनी मुजर्‍याला बसणार होती. नेमका त्याच दिवशी आमच्या फ्यॅमिलीत कुणा एका अगदी जवळच्या नातेवाईकांत दादरला साखरपुडा होता त्यामुळे माझ्यापाशी कॅमेराही होता. साखरपुडा झाल्यावर, 'जरा हापिसचं अर्जंट काम आहे!' ही सबब सांगून मी तिकडून सटकलो आणि सिध्धा फोरासरोडच्या बनारसी चाळीत पोहोचलो. रौशनीचा मुजरा ऐकला, फोटू काढले.

अख्तरीबाईची काफी रागातली एक ठुमरी रौशनीने खरंच खूप छान रंगवली. अजूनही एकदोन ठुमर्‍या म्हटल्या आणि शेवटी लतादिदीचं 'ए मालिक तेरे बंदे हम' हे गाणं फारच सुरेख म्हटलंन! क्या बात है...

आज मुद्दामून वेळात वेळ काढून ते फोटू शोधले. माझ्याकडे स्कॅनर नाही त्यामुळे मोबाईलवरून पुन्हा मी त्या फोटूंचे फोटू काढले आणि ते आज इथे चढवत आहे. रौशनीचं पुढचं लेखन मी लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करीनच, तूर्तास मध्येच हा 'अवांतर' भाग आज अचानक प्रसिद्ध करत आहे.

बघा तरी आमची रौशनी तुम्हाला आवडते का ते! कदाचित हे फोटू पाहून आपल्याला रौशनीच्या सौंदर्याची कल्पना येणार नाही परंतु प्रत्यक्षात मात्र ती दिसायला अतिशय सुरेख, अन् खानदानी होती एवढंच मी सांगू शकेन! मनानंही तेवढीच सुंदर होती. दैवाच्या फेर्‍यात सापडली आणि तवायफबाजारात आणि वेश्याबाजारत पोहोचली!

अख्तरीबाईची ठुमरी सुरू आहे!

ए मालिक तेरे बंदे हम!

बडा कमजोर है आदमी,
अभी लाखो है इसमे कमी
पर तू जो खडा, है दयालू बडा,
तेरी किरपा से धरती थमी!
दिया तूने हमे जब जनम,
तूही झेलेगा हम सबके ग़म,
नेकी पर चले, और बदीसे टले,
ता की हसते हुए निकले दम!

ए मालिक तेरे बंदे हम!

हे गाणं ती खूप मन लावून गायली. वेदनेपोटी खूप चांगलं गाणं जन्माला येतं याचा पुन्हा एकदा अनुभव आला!

-- तात्या अभ्यंकर.

वाङ्मयअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

वरदा's picture

19 Jun 2008 - 1:55 am | वरदा

वेदनेपोटी खूप चांगलं गाणं जन्माला येतं याचा पुन्हा एकदा अनुभव आला!

खरं आहे...
खूप सुंदर आहे रौशनी खरोखरच...
अजून काय लिहू शब्द नाहीत्....पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहे....

लिखाळ's picture

19 Jun 2008 - 2:23 am | लिखाळ

सहमत आहे.

ती दिसायला अतिशय सुरेख, अन् खानदानी होती ....
खरोखरंच!

तिचे फोटो आणि ए मालिक हे गाणे.. यामुळे थोडा चटका लागला मनाला.. कोण कुठे दैववशात जाउन पडेल याचा काही नियम नाही..असो !!

पुढचे भाग वाचण्यास उत्सूक आहे.
-- लिखाळ.

नंदन's picture

19 Jun 2008 - 3:37 am | नंदन

लिखाळरावांशी सहमत आहे. लगेच प्रभाव पडावा असं व्यक्तिमत्व आहे, यात काही शंका नाही. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मुक्तसुनीत's picture

19 Jun 2008 - 2:33 am | मुक्तसुनीत

जोहार रोशनीबाईच्या अम्लान सौंदर्याला. जोहार त्यांच्या गाण्याला , जोहार तुमच्यातल्या रसिकाला - जो बाजारात शोधतो अस्सल गाणे , जो शरीराच्या बाजारात पाहू शकतो खानदानी आयुष्याची फरपट आणि सफर घडवतो वासनांच्या खातेर्‍यात फुललेल्या गाण्याच्या बागेची.

आणि जोहार या आयुष्य नावाच्या गुंत्याला , ज्यात , हजारो मैलांवर बसून , कित्येक वर्षांपूर्वीच्या प्रसंगीच्या कुणाच्या मुद्रांच्या फोटोचे फोटो पाहून आणि शोकांतिकांना वाचून आमच्यासारख्या कुणाचा श्वास अडकतो !

बेसनलाडू's picture

19 Jun 2008 - 2:59 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

प्रियाली's picture

19 Jun 2008 - 3:14 am | प्रियाली

रौशनी भाग ३:

चेहेरा सुरेख होता पण करारी होता, त्यात एक जरब वाटत होती!

व्यक्तिचित्र हा तुमच्या हातचा मळ पण रोशनीचं वर्णन करताना कमी पडलात. बहुधा शब्दांत बांधण्यासारखं नसावंच ते. बाई अतिशय सुंदर आहे. मला चटकन तनुजा (समर्थ) आठवली. तडफदार आणि स्मार्ट, पण तनुजाही पन्नाशीच्या सुमारास अशी दिसत असावी का असा प्रश्न पडला. पन्नाशीच्या आसपासची आणि तरीही नितळ कांतीची, पातळ ओठांची, नाकी-डोळी रेखीव आणि ठसठशीत अंगाची रोशनी खरंच खूप सुंदर आहे. गळ्यात चेन, कानातील छोटेसे इअरिंग्ज, डाव्या हाताचे रिस्टवॉच, साडीचा रंग- टेक्श्चर इ. पाहून बाई खानदानी असावी असेच वाटते. व्यक्तिची आवड आणि पसंती कपड्यांवरून आणि राहणीवरून कळते. साधी पण तरीही टापटीपीची राहणी वाटली.

आता ज्याप्रमाणे रौशनीचे वर्णन करण्यात कमी पडलात हे सांगितलं तसंच आणखी एक स्पष्ट सांगते -

उपक्रमावर रौशनी आला नाही म्हणून तुम्ही खट्टू असता. कोणत्या माहितीपूर्ण शब्दांत तुम्ही लिहिणार होता ते? आणि काही गोष्टी भावनिक रसात सांगितलेल्याच शोभतात. त्यांची दाहकता माहितीपूर्ण लेखांतून उमजून आलीच तरी हृदयाला चटका बसेलच असे नाही. त्यासाठी शब्दांची पखरण लागते, भावनांचे बांध तोडावे लागतात. माहितीपूर्ण शब्दांत रौशनीला न्याय मिळाला नसता असे आज वाटून गेले.

पुढचे भाग वाचण्यास उत्सुक.

विसोबा खेचर's picture

19 Jun 2008 - 3:49 am | विसोबा खेचर

व्यक्तिचित्र हा तुमच्या हातचा मळ पण रोशनीचं वर्णन करताना कमी पडलात.

शक्य आहे, कारण ती प्रत्यक्षात क्लासच दिसायची!

परंतु अगदी प्रथम मला जेव्हा मन्सूर तिच्याकडे घेऊन गेला होता तेव्हा तिच्या चेहेर्‍यात सौंदर्यासोबत करारीपणाही मला दिसला होता, जरबही दिसली होती. जरी तिनं मला बोलावलं होतं तरी प्रत्यक्षात तीदेखील मला प्रथमच भेटत होती. शिवाय ती ज्या जागेवर बसून कारभार हाकत होती ती जागा देखील जरब दाखवण्याचीच जागा होती.

हे फोटू मी काढले तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा आमची एकमेकांशी बर्‍यापैकी ओळख झालेली होती. हा माणूस कसा आहे, काय आहे हे तिला बर्‍यापैकी माहीत झालेलं होतं, आमच्यात मोकळा संवादही प्रस्थापित झाला होता. शिवाय तिनं स्वत:हून मला मुजर्‍याला बोलावलं होतं. थोडक्यात, आम्ही एकमेकांशी बर्‍यापैकी फॅमिलियर झालो होतो. त्यामुळे तिला चेहेर्‍यावर जरब वगैरे ठेवायची काहीच आवश्यकता नव्हती/नसावी. परंतु प्रथम भेटीत परिस्थिती खूप वेगळी होती, माहोलही खूप वेगळ होता हा मुद्दा नाकारता येणार नाही.

असो, तरीही तू म्हणतेस त्याप्रमाणे मी कमी पडणंही शक्य आहे. कारण विश्वास बसणार नाही इतक्या रुपाच्या अन् स्वभावाच्या अनेकविध छटा असणारं तिचं व्यक्तिमत्व होतं त्यामुळे ते शब्दात मांडायला आजही मला अनेकदा कठीण जातं!

बाकी, उपक्रमाविषयी मांडलेला तुझा मुद्दा पटला. रौशनीची भट्टी उपक्रमावर जमली नसती!

सबब, उपक्रमाच्या मुद्द्यावर सपशेल माघार घेतो आणि पुन्हा हा विषय तिथे काढणार नाही असा तुला शब्द देतो! :)

तात्या.

प्रियाली's picture

19 Jun 2008 - 5:29 am | प्रियाली

तात्या, रौशनीच्या चेहर्‍यावर जरब आणि करारीपणा असावा हे खरंच. बाई अतिशय स्मार्ट आहे. मी म्हणत होते तुम्ही तिसर्‍या भागात केवळ एवढंच लिहिलंत तिच्याबद्दल ते खूप अपुरं होतं हे फोटो पाहिल्यावर जाणवलं.

उपक्रमाबद्दल तुम्हाला पटलं, त्याबद्दल धन्यवाद.

अनिल हटेला's picture

19 Jun 2008 - 7:22 am | अनिल हटेला

प्रियाली शी सहमत !!!!!!!!!!!!!!!!!१

अरुण मनोहर's picture

19 Jun 2008 - 7:22 am | अरुण मनोहर

सत्य हे कल्पीतापेक्षाही अदभुत असते. इथे ते सुंदर, संगीतमय देखील आहे. मी मिपावर येण्याच्या पुर्वीचे असलेले पाचही लेख वाचलेले नव्हते. ते आता वाचून काढले. अप्रतीम. तात्याराव तुमच्या प्रतीभेची पुन्हा एकदा ओळख झाली.
आता पुढच्या भागांसाठी सर्वांची उत्कंठा आणखी जास्त ताणलित तर काही मिपाचे कवी कदाचित गाणी तयार करतील.....ज्यातून आमची वेदना तुम्हाला कळेल!
>>>वेदनेपोटी खूप चांगलं गाणं जन्माला येतं

यशोधरा's picture

19 Jun 2008 - 7:57 am | यशोधरा

खरोखर किती सुंदर दिसते रौशनी!! अतिशय देखणी....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2008 - 7:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,
रौशनी सुंदर आहे, कितीतरी वेळ निरखत राहिलो.
नियती माणसाला कुठे घेऊन जाईल याची शाश्वतीच नाही.

रौशनी एक गाणं आहे, रौशनी एक सौंदर्य आहे, रौशनी एक खळखळता वाहणारा झरा आहे, रौशनी अनेक गुंत्यातला एक भाव आहे, आपल्या लेखनातून हे सर्व वाचायला खुप आवडते. आपली लेखनी भावनिक आंदोलने वाढवतात. अधिक काय बोलावे, पुढील भागाच्या प्रतिक्षेत !!!!

- दिलीप बिरुटे

II राजे II's picture

19 Jun 2008 - 9:02 am | II राजे II (not verified)

सरांशी १००% सहमत.

नियती माणसाला कुठे घेऊन जाईल याची शाश्वतीच नाही

<अनुभवी >
राज जैन
माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

मानस's picture

19 Jun 2008 - 8:25 am | मानस

तात्या

फारच सुरेख वर्णन, आज सगळे पाच भाग सलग वाचून काढले. रोशनीच्या सौंदर्याची काय तारीफ करणार? शब्दच नाहीत.

"उमराव जान" ची आठवण झाली. ती नक्की अशीच दिसत असणार.

मार डाला ................

विसोबा खेचर's picture

19 Jun 2008 - 8:47 am | विसोबा खेचर

मानसराव,

कुणाचा पटकन विश्वास बसणार नाही परंतु एकवेळ बॉलिवूडच्या अन् कुठल्या कुठल्या नट्या दिसायला अक्षरश: फिक्या पडतील अश्या काही सौंदर्यवती तवायफ आजही मुंबईच्या बाजारात आहेत. मी पाहिलेल्या आहेत! काही लक्ष्मीपतींना त्यांना लाख्खो रुपये देऊ करताना पाहिलं आहे. कशासाठी? तर शैय्यासोबतीसाठी! पैसा ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे बर्‍याचदा अशक्य गोष्टी अगदी सहज शक्य होतात. मान्य आहे!

परंतु या खानदानी तवायफ बायांच्या बाबतीत पैशांचा जोर चालत नाही. बड्या बड्या शेठियांनी शैय्यासोबतीकरता केलेल्या लाख्खो रुपयांच्या ऑफर्स अगदी सहज धुडकावून लावणार्‍या काही खानदानी सौंदर्यवती तवायफ बायका आजही मुंबईच्या अन् लखनऊच्या बाजारात आहेत. यांचं फक्त गाण्याशी अन् मुजर्‍याशी इमान असलेलं माझ्या पाहण्यात आहे!

कुणी पैशांचा जोर दाखवायला लागला की,

"रख तेरे पैसे तेरीही पास. पैसोका घमंड हमे मत दिखा. तू चीज काय है? आज तक तेरे जैसे कितने आए और चले गये. चल फूट यहासे..!"

अश्या शब्दात सणसणीत अपमान करायलादेखील मागेपुढे पाहात नाहीत!

हां, अगर किसिपे दिल आ गया तो और बात है! वहा पैसोंका सवालही पैदा नही होता! :)

तात्या.

मानस's picture

19 Jun 2008 - 9:12 am | मानस

हां, अगर किसिपे दिल आ गया तो और बात है! वहा पैसोंका सवालही पैदा नही होता!

क्या बात है!!

खरं आहे, उगाच नाही "उमराव जान" अजरामर झाली. खरोखरच मनांत उमराव जानची आठवण झाली. मी असेही ऐकले आहे की या 'तवायफ' अत्यंत सुरेख गझल, ठुमर्‍या, होर्‍या, चैती आणि प्रसंगी "अभंग" ही तितक्याच समर्थपणे सादर करतात. त्यांच्या आवाजात एक वेगळीच जादू असते व मोठ-मोठ्या बुजुर्ग उस्तादांकडे शिकलेल्या ह्या शागिर्द असतात.

एकदा अनुभव घेतलाच पाहीजे.

पुन्हा एकदा ........ मार डाला!

विसोबा खेचर's picture

21 Jun 2008 - 8:34 am | विसोबा खेचर

त्यांच्या आवाजात एक वेगळीच जादू असते व मोठ-मोठ्या बुजुर्ग उस्तादांकडे शिकलेल्या ह्या शागिर्द असतात.

निश्चितच.

अलिकडच्या काळात नाही, परंतु सर्वप्रथम हिराबाईंनी जाहीर मैफलीत अभिजात संगीत मांडून तुमच्याआमच्या घरातल्या गाणं शिकणार्‍या मुलींना जाहीर मैफलीत गाण्यास कुठलाही संकोच वाटणार नाही असं वातावरण निर्माण केलं. मुलींनी जाहीर मैफलीत बसून गाणं, हे त्या काळात इतकं चांगलं मानलं जात नसे. परंतु हिराबाईंच्या अत्यंत खानदानी, सोज्वळ आणि तेवढ्याच शालीन व्यक्तिमत्वाने हे चित्र बदललं. याचं संपूर्ण श्रेय हिराबाईंनाच जातं!

परंतु त्या आधीच्या काळात ज्या मुली गाणं शिकायच्या त्या बहुत करून कोठ्यावर गाण्याकरताच शिकायच्या आणि कोठ्यावरच गायच्या. आपण म्हणता तसं त्यांना एकसे एक बुजुर्ग उस्तादांची तालीमही मिळे. अर्थात, प्रसंगी अनेकदा त्यांना या उस्ताद मंडळींची सर्व प्रकारची(!) सेवाही करावी लागे!

असो, या विषयावर निश्चित केव्हातरी अधिक विस्तृत लिहायचा प्रयत्न करेन...

तात्या.

अवांतर -

बरं का मानसराव,

बनारसी चाळीतल्या दिदीच्या कोठ्यावर रौशनीच्या गाण्यानंतर मीदेखील अजमेरच्या ख्वाजा मोईउद्देन चिस्तीला समर्पित केलेली पुरियाधनाश्रीतली 'मुश्किल करो आसान..' ही बंदिश गायलेली आहे हे आपल्या माहितीकरता इथे जाता जाता नमूद करतो! अभ्यंकरांचा तात्या कोठ्यावरदेखील गायलेला आहे! तो एक वेगळाच अनुभव! :)

आज पुण्याला येतो आहे तेव्हा कदाचित हीच बंदिश आपल्याला ऐकवेन..! :)

आपला,
(कोठेवाला गवई!) तात्या.

मानस's picture

25 Jun 2008 - 9:31 am | मानस

बनारसी चाळीतल्या दिदीच्या कोठ्यावर रौशनीच्या गाण्यानंतर मीदेखील अजमेरच्या ख्वाजा मोईउद्देन चिस्तीला समर्पित केलेली पुरियाधनाश्रीतली 'मुश्किल करो आसान..' ही बंदिश गायलेली आहे हे आपल्या माहितीकरता इथे जाता जाता नमूद करतो! अभ्यंकरांचा तात्या कोठ्यावरदेखील गायलेला आहे! तो एक वेगळाच अनुभव!

-- क्या बात है!!! जियो तात्या, 'जोधा अकबर' सिनेमा कसाही असला तरी "ख्वाजा मेरे ख्वाजा" केवळ अप्रतिम. उगीचच आठवण झाली.

तात्या,

याबद्दल प्रतिसाद द्यायला थोडा विलंब झाला माफ करा, जरा कामानिमित्त अडकलो होतो, पण 'मुश्किल करो आसान..' ही बंदिश ऐकायला नक्कीच आणि फारच आवडेल.

आज पुण्याला येतो आहे तेव्हा कदाचित हीच बंदिश आपल्याला ऐकवेन..!
आता हे जरा जमणं कठिण आहे, कारण अंमळ जरा लांब आहे पुण्यापासून. मी अमेरिकेच्या राजधानीजवळ राहतो. आपल्या 'मुक्तसुनीत' च्या बाजुच्या गावाला. तेव्हा पुढच्या भारतभेटीत एक मैफील नक्की.

अवांतर : नमोगतावरचा "अंतरीक्ष", सध्या एक्सक्लूसिव्ह मिपाकर

मानस

विसोबा खेचर's picture

25 Jun 2008 - 10:27 am | विसोबा खेचर

तेव्हा पुढच्या भारतभेटीत एक मैफील नक्की.

अरे जरूर भरवूया एक मैफल. मजा येईल. पुरियाधनश्री गाउया! :)

नमोगतावरचा "अंतरीक्ष"

ओह! ओळखलं! :)

सध्या एक्सक्लूसिव्ह मिपाकर

जियो...! :)

आपला,
(एकेकाळचा कट्टर मनोगती, आता कट्टर मिपाकर) तात्या.

मानलं तुम्हाला... बाजारातही गाणं शोधणारा तुमच्यासारखा रसिक वेगळाच...

बाकी रौशनीची कहाणी मनाला चटका लावून गेली...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

शैलेन्द्र's picture

19 Jun 2008 - 9:09 am | शैलेन्द्र

तात्या, धन्यवाद...........

भाग्यश्री's picture

19 Jun 2008 - 9:10 am | भाग्यश्री

रौशनी वाचून मनात एक प्रतिमा झाली होती निर्माण.. पण फिकी पडली ती या फोटोंपुढे.. अफलातून खानदानी सौंदर्य आहे रौशनीचे.. तुमची लेखमाला परत वाचून काढावीशी वाटतीय आता..

http://bhagyashreee.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

19 Jun 2008 - 9:24 am | भडकमकर मास्तर

तात्या, हे फोटो त्यांची परवानगी घेऊनच संकेतस्थळावर चढवले असावेत ही अपेक्षा...
तुमच्या वैयक्तिक आठवणींसाठी काढलेले फोटो असे सार्वजनिक ठिकाणी आले असतील ( त्यांच्या परवानगीशिवाय) तर ते मला तरी अयोग्य वाटते...
( सिनेमा नट्या, फॅशन मॉडेल्स यांना पूर्ण कल्पना असते की त्यांचे फोटो सौंदर्य दाखवण्यासाठी आणि सार्वजनिक प्रदर्शनासाठीच आहेत, इथे तसे नसावे असे वाटते )...

सार्वजनिक संकेतस्थळावर एखाद्या अनोळखी स्त्रीचे फोटो पाहून त्यांच्या सौन्दर्याची विविध शब्दांत सर्वांनी चर्चा करणं थोडं अप्रस्तुत वाटलं खरं... मग ती स्त्री कोणीही असो...
आणि त्यांची परवानगी असेल तर मग प्रश्न मिटला... वरील सर्व शब्द मागे घेतो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

II राजे II's picture

19 Jun 2008 - 9:27 am | II राजे II (not verified)

>>सार्वजनिक संकेतस्थळावर ... !

सहमत. कळीचा मुद्दा.

राज जैन
माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

विसोबा खेचर's picture

19 Jun 2008 - 9:33 am | विसोबा खेचर

मास्तर, आपल्या सूचनेबदल मनापासून धन्यवाद. परंतु कृपया निश्चिंत असावे.

या बाबतीत अधिक खुलासा पोष्टकार्ड पाठवून अथवा प्रत्यक्ष भेटीन तेव्हा करेन...

तात्या.

भडकमकर मास्तर's picture

19 Jun 2008 - 9:39 am | भडकमकर मास्तर

ओके..
आपल्यावर विश्वास आहे... :)

आता म्हणतो, "फोटो छान आहेत, गाणेच ऐकू यायला लागले आहे..."...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शेखस्पिअर's picture

19 Jun 2008 - 11:47 am | शेखस्पिअर

अख्तरीबाईची काफी रागातली एक ठुमरी रौशनीने खरंच खूप छान रंगवली.

अजूनही अशा ठिकाणी ठुमरी गायल्या जातात हे वाचून महदाश्चर्य वाटले...
कुठेतरी ही कला जिवंत आहे ...
छान...

अन्या दातार's picture

19 Jun 2008 - 9:52 am | अन्या दातार

खरेच, एकदम सुंदर, नेमके व्यक्तिचित्रण करणे हा तात्यांच्या हातचा मळ आहे. भले ती व्यक्ति रोशनी असो किंवा भीमण्णा, पं. फिरोज दस्तूर असोत.
गाणे,व्यक्ति यांचे असे वर्णन मला अद्यापही कोठेही वाचावयास मिळाले नाहिए. तात्यासाब, लगे रहो ;)

ऋचा's picture

19 Jun 2008 - 9:54 am | ऋचा

किती सुंदर आहेत ह्या,
वाईटही वाटलं(रौशनी-५ वाचलं)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

साती's picture

19 Jun 2008 - 11:06 am | साती

तात्या ,आपली रोशनी खरंच खूप सुंदर आहे.
साती

सुमीत भातखंडे's picture

19 Jun 2008 - 11:13 am | सुमीत भातखंडे

रोशनीतल्या कलाकाराला अणि आपल्या रसिकतेला मनापासून सलाम

मनिष's picture

19 Jun 2008 - 11:19 am | मनिष

तात्या, आगाऊपणाबद्द्ल माफ करा, पण मला वाटते त्या व्यक्तिच्या परवानगी शिवाय असे फोटो सार्वजनि़क ठिकाणी टाकू नये. तिला किंवा तिच्या साथीदारांपैकी (जसा तबलजी, पेटीवाला) एखादया व्यक्तीला अशा प्रसिद्धीमुळे त्रास होऊ शकतो, ह्याचा अवश्य विचार करा.

सगळे प्रतिसाद वाचले नाही, पण पहिल्या काही प्रतिसादात कोणाल हे खटकले नाही हे बघून नवल वाटले.

- मनिष

विसोबा खेचर's picture

20 Jun 2008 - 8:22 am | विसोबा खेचर

मनिषराव,

आपल्या सूचनेबद्दल मनापासून धन्यवाद...!

मी सर्व सारासार विचार करूनच हे फोटू टाकले आहेत. ही सर्व माझी माणसं आहेत, सर्व जबाबदारी माझी आहे. आपण कृपया निश्चिंत असावे.

तात्या.

आनंदयात्री's picture

19 Jun 2008 - 11:23 am | आनंदयात्री

वाइट वाटलं तात्या, त्या भागातल्या बायांची टिपीकल फिल्मी तसवीर मनात बसलेली अशी चारचौघातली बाई म्हणजे ती हे अक्सेप्ट होईना पटकन. आत्तापर्यंत कोणत्यातरी अनोळखी स्त्रीची कर्मकहाणी म्हणुन वाचत होतो. आता तुम्ही फोटो दिलेत, ती कशी दिसते माहित झाले, पुढचे भाग अजुन अजुन हळवे करणार.

उत्तम कादंबरी किंवा नाटक होउ शकते यावर.

स्वाती दिनेश's picture

19 Jun 2008 - 11:33 am | स्वाती दिनेश

तात्या,रौशनीने वाचताना तर चटका लावला होताच पण तिला पाहिल्यावर अधिकच वाईट वाटलं.एक खानदानी स्त्री दैवाचे फासे वेडेवाकडे पडल्यामुळे बाजारात आली..(त्याऐवजी जर सिनेमा इंडस्ट्रीत दैवाने नेले असते तिला तरी प्लास्टीक/कचकड्याच्या कित्येक नट्यांची तिने छुट्टी केली असती .)
(बाकी तिचे फोटो जालावर चढवण्याबाबत मलाही प्रश्न पडला होता पण मास्तरांना दिलेले स्पष्टीकरण वाचले.आता किंतु नाही.)
हा लेख अस्वस्थ करून गेला.
स्वाती

सखी's picture

19 Jun 2008 - 8:30 pm | सखी

स्वातीशी सहमत! आत्ताच मागचे राहीलेले भाग वाचुन काढले. रौशनी अस्वस्थ करून गेली. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

रोशनी भाग ५: तात्यांची प्रतिक्रीया:

जे काही लेखन आहे ते केवळ अन् केवळ सत्य घटनेवर आधारीत आहे. सत्य घटनेवर आधारीत, जे घडलं तसं लिहिलं आहे, ते जर कुणाला अतिरंजित वाटलं तर वास्तव किती भयानक असेल याची कल्पना करा!

खरं आहे तात्या. जबराट आहे तुमचा अनुभव. काटा आला अंगावर वाचताना. 'ते' जग किती वेगळं असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी. कितीही तिरस्कार करायचा नाही म्हणलं तरी आतलं पांढरपेशं मन नाही ऐकत. वेश्यावस्ती किंवा रंडीबाजार म्हणलं की नकळत एक प्रकारची घ्रुणा उत्पन्न होते मनात. 'तिथे' ही काही मनाने चांगले लोक असतील, केवळ परिस्थितीमुळे या ठिकाणी ते आले असतील, हे सगळं कळत असलं तरी 'या लोकांशी जवळीक नको रे बाबा' असाच विचार मनात येतो. पांढरपेशा मनाची ही अवस्था तुम्ही नेमक्या शब्दात मांडली आहे.

असो. पुढचा भाग वाचायला उत्सुक आहे. लवकर लिहा

काळा_पहाड's picture

19 Jun 2008 - 2:24 pm | काळा_पहाड

तात्या तुमची रोशनी ख्ररोख्रर आवडली. त्याबरोबर्च आवडली तुमची बिनधास्त आणि ओघवती लेखनशेलीही .
आजच सारे लेख क्रमाने वाचले.
कोठेही कंटाळा आला नाही किंवा अतिशयोक्तीही जाणवली नाही.
मात्र माझ्या मनात आलेले काही विचार येथे मांडण्याचा नम्र प्रयत्न करीत आहे.
मला वाटते तात्या क्रमशः ने तुमच्या लिखानाचा बाज पाहिजे तसा उतरला नाहीए.
मिपाकरांच्या दबावामुळे 'आता काहीतरी दिले पाहिजे' या भावनेतुन पक्की बेठक न जमवता तुम्ही पुढ्चा भाग टाकल्याचे ५ व्या भागात वाटते. त्याचा हा पुरावा
नाहीतरी हिने मला दहा वेळा आग्रहाने जेवायला बोलावलंच आहे
चॉथ्या भागाच्या शेवटी 'दहा वेळा बोलवल्याचा उल्लेख आहे. तर ५ व्या च्या सुरुवातीला वरील वाक्य आहे.
यावरुन लक्षात येणारी बाब ही की तुम्हाला वेळ न मिळाल्याने मागच्या भागाचा क्लू थोडासा निसटला. मी हे पुराव्यासह मांड्ण्याचे कारण आपली चूक दाखवुन माझा शहाणपणा मिरविणे हा नसुन आपण आपल्यातील लेखकावर करीत असलेला अन्याय आपल्या लक्षात आणुन द्यावा एवढाच आहे. रोशनी चे फोटो दाखवुनही आपण तेच केलेत असेच मला वाटते. ते शेवटी दाखविले असतए तर आम्हाला तात्याभाईच्या शब्दांतुन होणाय्रा रोशनीच्या दर्शनात व्यत्यय आला नसता. आता आम्ही तिला तुमच्या नाही तर आमच्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न आमच्या नकळत करणार आहोत.
फिरभी .......दिलसे..ला इलाज नाही.
कुणीतरी बाबा कदमांची आठवण आल्याचे म्हटले आहे. ते बिर्याणीपुरतेच असेल तर मीही सहमत आहे. अन्यथा तुमच्या लेखनात तोचतोचपणा नाही हे निश्चितच.

संपुर्ण तयार झाल्याशिवाय उर्वरीत कथा प्रकाशित न करण्याच्या आपल्या निर्णयासाठी त्रिवार अभिनंदन.
तो सावकाश पण पुर्ण येऊ द्यात.

चु.भु. क्षमस्व.
काळा पहाड

विसोबा खेचर's picture

20 Jun 2008 - 8:26 am | विसोबा खेचर

चॉथ्या भागाच्या शेवटी 'दहा वेळा बोलवल्याचा उल्लेख आहे. तर ५ व्या च्या सुरुवातीला वरील वाक्य आहे.

वाचकांना मागील भागाची पुढल्या भागात लिंक लागण्याकरता मी ते मुद्दामून उद्घृत केले आहे...

आता आम्ही तिला तुमच्या नाही तर आमच्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न आमच्या नकळत करणार आहोत.

आता त्याला माझा काय इलाज? मी जे घडलं आहे/होतं, तेच माझ्या शब्दात मांडण्याचा यापुढेही प्रय्त्न करणार आहे. फोटूंचं म्हणाल तर मला ते टाकावेसे वाटले म्हणून मी ते टाकले..

असो,

सर्वांचेच आभार...

तात्या.

पद्मश्री चित्रे's picture

19 Jun 2008 - 4:22 pm | पद्मश्री चित्रे

तात्या,
रोशनी खरच सुन्दर आहे ..खानदानी सौंदर्य . आणि तिची कहाणी तितकीच करुण..
आपण किति मोजुन्-मापुन्,सुरक्षित आयुष्य जगतो ते जाणवुन देणारा लेख..

मनस्वी's picture

19 Jun 2008 - 5:03 pm | मनस्वी

तात्या, छान आहे रौशनी.
बाकी शब्द नाहीत..

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विकास्_मी मराठी's picture

19 Jun 2008 - 5:36 pm | विकास्_मी मराठी

िव्कास०१५४
मानलं तात्या तुम्हाला.....
अतिशय देखणी,सुन्दर, खानदानी सौंदर्य.......बाकी शब्द नाहीत..
"रौशनी" आिन "रोशनी िच लेखमाला" खरंच खूप सुंदर आहे.

आप्ला लेख्नाचा एक िनिस्सम चाह्ता....
िवकास िशदे....

चतुरंग's picture

19 Jun 2008 - 5:37 pm | चतुरंग

सलाम, रौशनीबाईला सलाम! काय लिहू? मला गदिमांचे शब्द उसने घेण्यावाचून उपाय नाही -

घटाघटाचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार
विठ्ठला तू वेडा कुंभार!

चतुरंग

केशवसुमार's picture

20 Jun 2008 - 4:25 pm | केशवसुमार

घटाघटाचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार
विठ्ठला तू वेडा कुंभार!

केशवसुमार..

सुवर्णा's picture

18 Feb 2009 - 5:21 pm | सुवर्णा

घटाघटाचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार
विठ्ठला तू वेडा कुंभार!

हेच म्हणते...
आताच सगळे भाग वाचले.. अप्रतिम!!
मनाला चटका लावून गेली रोशनी!! :S

(पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहणारी) सुवर्णा
http://www.suvarnam.blogspot.com/

विसुनाना's picture

19 Jun 2008 - 6:17 pm | विसुनाना

सर्व फोटोतून खरी रौशनी प्रकट होतेय. आजूबाजूच्या वातावरणाला ती विसरली आहे. उरली आहे ती फक्त एक घराणेदार गायिका.

क्षणभर वाटलं की ही स्त्री एखाद्या गंधर्व महोत्सवाच्या मंचकावर गाताना किती शोभली असती! (रौशनीताई ग्वाल्हेरकर!!)

तिसरा फोटू तर वेदनेचाच फोटो वाटला.

तिचं व्यक्तिमत्व इतकं सामर्थ्यवान आहे की वाटतं प्रतिष्ठेची बेगडी झूल पांघरणार्‍या आणि अंधारात पाप करणार्‍या कोत्या आणि खोट्या माणसांपेक्षा तीच जास्त पवित्र वाटते.

मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरं अशी म्हण आहे.

धमाल मुलगा's picture

20 Jun 2008 - 11:25 am | धमाल मुलगा

विसुनानांशी अगदी सहमत!

संदीप चित्रे's picture

19 Jun 2008 - 6:20 pm | संदीप चित्रे

सत्य हे कल्पनेहून विचित्र असतं हेच खरं

धनंजय's picture

19 Jun 2008 - 8:18 pm | धनंजय

"रोशनी"चा पुढचा भाग वाचताना हे उमदे चित्र डोळ्यासमोर येईल.

सुधीर कांदळकर's picture

19 Jun 2008 - 8:55 pm | सुधीर कांदळकर

व्यक्तिचित्र. शब्द आणि प्रकाशचित्रे एकमेकांस पूरक. झकास. मजा आली. यातील तत्वचिंतन वगैरे इतरांकडून वर झालेच आहे.

रोशनी ६ च। वाट पाहातो.

सुधीर कांदळकर.

शेणगोळा's picture

20 Jun 2008 - 11:11 am | शेणगोळा

बाईचे सौंदर्य खरोखरच मादक आहे.

यापूर्वीचे सर्व भागही वाचले. आपण त्या बाजारातल्या एका बाईकडे केवळ एक उपभोगाची वस्तू म्हणून न पाहता तिच्यातले 'माणूसपण' शोधायचा प्रयत्न केलात याचे कौतुक वाटते. एरवी बहुतेक सर्व जण तिथे शेण खायलाच जातात आणि पैसे देऊन शेण खाऊन परत येतात.

लेखनशैली बिनधास्त आणि मोकळीढाकळी आहे तरीही वाचताना कुठेही अश्लील वाटत नाही हे विशेष. बर्‍याच दिवसांनी इतके प्रामाणिक व उत्तम लेखन वाचले. अभिनंदन!

मागील एका भागात 'त्या बाजारातील बर्‍याचश्या मावश्या या काळ्याकुट्ट, बेढब, अवाढव्य व लोंबत्या स्तनांच्या असतात' असा काहीसा उल्लेख आहे. हे वाचून त्या मावश्यांचे एक चित्र डोळ्यासमोर आले. रौशनीमावशी मात्र अर्थातच याला अपवाद आहे. असो.

आपल्या सर्वांचाच,
शेणगोळा.

प्राजु's picture

20 Jun 2008 - 12:05 pm | प्राजु

हे फोटू पाहून आपल्याला रौशनीच्या सौंदर्याची कल्पना येणार नाही परंतु प्रत्यक्षात मात्र ती दिसायला अतिशय सुरेख, अन् खानदानी होती एवढंच मी सांगू शकेन!
हे फोटो पाहून कोणीही नक्कीच सांगेल की रोशनी तुम्ही जशी लिहिली आणि वर्णिली त्यापेक्षा कितीतरी सुंदर आणि खानदानी देखणेपण लाभलेली होती.
दैवाच्या फेर्‍यात सापडली आणि तवायफबाजारात आणि वेश्याबाजारत पोहोचली!
तवायफबाजारात आलेल्या कित्येक मुलिंची आणि स्त्रीयांची कहाणी थोड्याफार फरकाने सारखीच असते. दैव आणि परिस्थितीपुढे मान तुकवण्याशिवाय पर्याय नसतो त्यांच्याजवळ.
तात्या,
आज तुमची रोशनी पाहून खूप बरं वाटलं. आणि तिच्या सौंदर्या इतकाच तुमच्यातल्या धाडसाला आणि कलाकारालाही माझा सलाम!!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे's picture

20 Jun 2008 - 2:05 pm | डॉ.प्रसाद दाढे

जुलालीची आठवण आली तात्या..
आपला बजापा दाढे

विसोबा खेचर's picture

21 Jun 2008 - 8:32 am | विसोबा खेचर

जुलालीची आठवण आली तात्या..

क्या बात है! डॉक्टर, आपनेभी क्या याद दिलाई! :)

आपला,
तात्या तुंबाडकर.

चित्तरंजन भट's picture

20 Jun 2008 - 4:18 pm | चित्तरंजन भट

क्या बात है तात्या!!!

रौशन जमाल-ए- यार से है अंजुमन तमाम
दहका हुआ है आतिश-ए-गुल से चमन तमाम

अल्लाह रे हुस्न-ए-यार की ख़ूबी के ख़ुदबख़ुद
रंगीनियों में डूब गया पैरहन तमाम

देखो तो हुस्न-ए-यार जादू निगाहियाँ
बेहोश एक नज़र में हुई अंजुमन तमाम

उनको मेरा सलाम कहना.

जमाल-सौंदर्य,
आतिश-आग
चमन-बाग, उद्यान, उपवन किंवा इथे मिसळपाव.कॉम असाही अर्थ घेता येईल.
अंजुमन-मैफल किंवा इथे मिसळपाव.कॉम असाही अर्थ घेता येईल.
पैरहन-वस्त्र

विसोबा खेचर's picture

21 Jun 2008 - 8:54 am | विसोबा खेचर

क्या बात है चित्तोबा!

बहोत अच्छी शायरी!

तात्या.

चित्रा's picture

20 Jun 2008 - 6:22 pm | चित्रा

खानदानी देखणेपण.
रौशनी पन्नाशीची वाटत नाही. वयाने लहान असावी असे वाटले.
आता पुढे वाचताना हे चित्र आठवत राहील.

झकासराव's picture

20 Jun 2008 - 7:09 pm | झकासराव

निशब्द झालो.
काश मी तुमच्या सोबत असतो ह्या मैफीलीत अस वाटल बघा.
आता तर तुम्ही रोशनी कधी पुर्ण करता ह्याची उत्कंठा आहे.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

विश्वजीत's picture

21 Jun 2008 - 3:57 pm | विश्वजीत

देखो तो हुस्न-ए-यार जादू निगाहियाँ
बेहोश एक नज़र में हुई अंजुमन तमाम

वाहवा.

प्रगती's picture

21 Jun 2008 - 5:34 pm | प्रगती

खरंच आरस्पानी सौदर्य ! रोशनी चे १ ते ५ भाग पुन्हा वाचून काढले. आता मलाही रोशनीला तसंच त्या वस्तीतल्या बायकांना भेटावसं
वाटतंय, असं वाटतं की खरंच आपण त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्यामुलांसाठी तरी काही तरी करू शकतो बघु कसं जमतंय ते
पण करायचं मात्र नक्की. देव मला नक्कीच काही तरी मार्ग दाखवेल.

फक्त संदीप's picture

26 Jun 2008 - 1:41 am | फक्त संदीप

तात्या प्रथम तुमचे लाख लाख आभार

खरच अतिशय सुन्दर आणि देखणं रुप आहे ,नाही म्हटले तरी दहा वेळा तरी फोटो पाहिला असेन.
आणि तुमची लेखन शैलीही अतिशय उत्तम आहे.

मी संदीप,एक वाचक

वाहीदा's picture

18 Feb 2009 - 9:36 pm | वाहीदा

खानदानी सौंदर्य पण ईतके शापीत का असते ??
देवा ,का रे असे करतोस तु ??? दैवा पुढे ईतके का रे तुझे बंदे लाचार :-(
तिच्या सौंदर्या पे़क्शा तुमच्या धाडसाची च कमाल वाटते !!
सगळं वाचुन पोटात गो ळा आला ... काय आयुष्य जगतात या स्त्रियां, कल्पना ही नाही करवत आणी तरीही हसतमुख ??
~ वाहीदा