कोई दिन गर ज़िंदगानी........
ग़ालीब
कोई दिन गर ज़िंदगानी और है
अपनें जी में हमने ठानी और है
असेल अजून आयूष्य कदाचित थोडे
पण आमच्या मनात काही वेगळेच आहे...
(आयूष्य संपवायचे ?.....)
आतश-ए-दोज़ख में, यह गर्मी कहाँ
सोज़-ए-ग़महा-ए-निहानी और है
या नरकातल्या चितेत नाही ती उब थोडी,
माझ्या आंतरिक दु:खाची बातच काही और आहे
(ती नरकातील अग्नीपेक्षा जास्त दाहक आहे )
बारहा देखी हैं उनकी रंजिशें
पर कुछ अबके सरगिरानी और है
त्यांची चिडचिड बर्या वेळा बघितली आहे
पण यावेळचा राग काही आगळाच आहे....
दे के ख़त, मुँह देखता है नामःबर
कुछ तो पैग़ाम-ए-ज़बानी और है
पत्र हातात देतांना माझ्याकडे तो बघत आहे
बहुदा त्याला मला अजून काही सांगायचे आहे.....
क़ाते-ए-आमार, हैं अक्सर नुजूम
वह बला-ए-आसमानी और है
आमच्या नशिबात ग्रह तार्यांचा जुलूमच आहे,
पण ही स्वर्गीय संकटेही काही विचित्रच आहेत.
हो चुकीं 'ग़ालिब' बलाएँ सब तमाम
एक मर्ग-ए-नागहानी और है
हे “गालिब” सगळी संकटे आता टळली आहेत,
नशिबाने फक्त आता एकच बाकी आहे.....
(मृत्यू ?)
मला भावलेला हा अर्थ आहे. कदाचित चूक असेल....
जयंत कुलकर्णी
प्रतिक्रिया
17 May 2012 - 9:53 pm | संजय क्षीरसागर
>कोई दिन गर ज़िंदगानी और है
अपनें जी में हमने ठानी और है
= जबरदस्त नजरीया आहे, आता अजून जर काही दिवस जगणं उरलं असेल तर आमचे पण इरादे काही और आहेत
>आतश-ए-दोज़ख में, यह गर्मी कहाँ
सोज़-ए-ग़महा-ए-निहानी और है
= असं म्हणतात की जहन्नुमची आग (आतश-ए-दोज़ख में) अत्यंत दाहक असते पण माझ्या अंतरातल्या क्लेशाची ( सोज़-ए-ग़महा-ए-निहानी) बातच काही और आहे
>बारहा देखी हैं उनकी रंजिशें
पर कुछ अबके सरगिरानी और है
= तिची प्रतारणा (रंजिशें) तर आम्ही नेहमीच पाहिलीये (उर्दूतली नाजनी प्रियकराशी नेहमी वेवफा असते आणि तरीही प्रियकर इंतजाराला राजी असतो) पण आजचा तिचा रोष (सरगिरानी) काही वेगळाच आहे (आता हा इश्काचा सिलसिला सुरु राहणं मुश्किल वाटतय)
>दे के ख़त, मुँह देखता है नाम:बर
कुछ तो पैग़ाम-ए-ज़बानी और है
= प्रेयसीचं पत्र घेऊन आलेला संदेशवाहक (सहसा थांबत नाही पण) आज तो पत्र देऊन माझ्याकडे पाहतोय, बहुदा पत्रात तीनं (पैग़ाम-ए-ज़बानी ) काही तरी वेगळंच लिहीलय
>क़ातिब-ए-अ'अमाल हैं अक्सर नुजूम
वह बला-ए-आसमानी और है
= आमच्या कर्मांचा लेखाजोखा (की ज्याच्यामुळे आमचं भविष्य (नुजूम) घडतं) तर सदैव चित्रगुप्ताच्या (क़ातिब-ए-अ'अमाल) हाती आहे पण ही प्रेयसी जी काही आसमानी-बला आहे ती काही और आहे
>हो चुकीं 'ग़ालिब' बलाएँ सब तमाम
एक मर्ग-ए-नागहानी और है
= जीवनातल्या सर्व विपदा (अचानक) संपल्या आहेत (काय झालं असेल? कशामुळे इतकं शांत वाटतंय?...नाही, नाही, अजून कुठे काय झालंय?)... एक आकस्मिकपणे येणारा मृत्यू (मर्ग-ए-नागहानी) तर अजून बाकी आहे
_________________
जयंत, एका सुरेख ग़जलच्या आठवणी बद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
17 May 2012 - 2:55 pm | ऋषिकेश
याचा भावनुवादाचा उत्तम प्रयत्न आपले मिपाकर धनंजय यांनी यापूर्वीच केल्याचे आठवते.
तो इथे वाचता येईल
17 May 2012 - 5:18 pm | संजय क्षीरसागर
ग़ालिबाच्या शब्दांचे सर्व यथार्थ मी दिलेत आणि जो काय थोडा फार शायराना अंदाज माझ्याकडे आहे त्यातनं गवसलेला अर्थ दिलाय.
ग़ालिबच्या शायरीचे अर्थ गूढ आहेत, म्हणजे
>बारहा देखी हैं उनकी रंजिशें
पर कुछ अबके सरगिरानी और है
इथे रंजिशेंचा अर्थ बेवफाई असा आहे, मराठीत तो अंदाजच नाही म्हणजे एखाद्या प्रेयसीनं दुसर्यावर प्रेम करणं आणि तरीही प्रियकरानं तिच्या प्रेमाची अभिप्सा करणं फक्त उर्दूत आहे
> दे के ख़त, मुँह देखता है नाम:बर
कुछ तो पैग़ाम-ए-ज़बानी और है
इथे `पैग़ाम-ए-ज़बानी' एक शब्द आहे आणि त्याचा अर्थ तिनं पत्रात पाठवलेला संदेश काही और आहे (आणि त्यामुळे, दे के ख़त, मुँह देखता है नाम:बर) अशी पहिली ओळ आहे
>क़ातिब-ए-अ'अमाल हैं अक्सर नुजूम
वह बला-ए-आसमानी और है
बला-ए-आसमानी म्हणजे स्वर्गातली परी, अर्थात प्रेयसी! क़ातिब-ए-अ'अमाल म्हणजे चित्रगुप्त आणि नुजूम म्हणजे माणसाचं भाग्य (जोतिष या अर्थानं)
त्यामुळे ग़ालिबचा बयां किती अफलातून आहे ते पाहा:
आपल्या गतजन्मीच्या कर्मांच्या चित्रगुप्तानं लिहीलेल्या लेखाजोख्यावरून आपलं या जन्मीच भाग्य ठरतं पण (इथे माझं पूर्वसुकृत कितीही थोर असलं तरी) ही प्रेयसी (बला-ए-आसमानी) इतकी और आहे की तिनं माझं भाग्य ठरवलय!
>हो चुकीं 'ग़ालिब' बलाएँ सब तमाम
एक मर्ग-ए-नागहानी और है
इथे ग़ालिब कहर करतो, असं म्हणतात की मृत्यू आयुष्याची सर्व घालमेल शांत करतो मग तुम्ही कसेही जगले असा
(ये अचानक दिलको कैसे सुकून आ गया?
या वो आ गये या मौत का पयाम आ गया?)
पण ग़ालिब सर्वांना पार करुन जातो, तो म्हणतो माझ्या सर्व विपदा संपल्या याचा अर्थ मृत्यू आला असा नाही कारण तो देखील मला सुखासुखी मरु देणार नाही, तो एका नव्या विपदे सारखा, आकस्मिक (मी थोडं सावरून शांत व्हायच्या आत)- (मर्ग-ए-नागहानी) येणार आहे, ती विपदा अजून यायची आहे आणि त्यामुळे ही तगमग अशीच राहणार आहे!
ग़ालिबची शायरी थोर आहे कारण तिला सूफ़ियाना अंदाज़ आहे आणि सूफ़ियाना अंदाज़ माहिती नसेल तर अर्थांचे सर्वस्तर उलगडणार नाहीत
17 May 2012 - 8:15 pm | पैसा
अस्च आणखी येऊ द्यात! रंजिशें, बारहा, नाम-गर असे काही शब्द इतर शायर्यांमधे वाचलेत पण त्यांचा कधीच पूर्णपणे अर्थ कळत नव्हता. आज गालिब थोडा अधिक समजला!
18 May 2012 - 1:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दे के ख़त, मुँह देखता है नामःबर
कुछ तो पैग़ाम-ए-ज़बानी और है
वाह... खूप काही सांगूनही अजूनही काही बाकीच आहे.
कुलकर्णीसाहेब, अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे