"हॅलो, बीएसएनएल का ? "
" हो, बोला "
" अहो ब्रॉडबँड बंद पडलेय "
" तुमचंच नाही, सगळीकडेच बंद आहे"
" का हो ? "
" टेक्निकल प्रॉब्लेम" खाSSड फोन बंद
*****
" हॅलो, बीएसएनएल ? "
" दोन दिवस झाले नेट बंद आहे हो, कामं अडलीयेत "
" काय करू साहेब ? सगळ्यांची तीच बोंब आहे"
" नक्की काय प्रॉब्लेम आहे हो ? "
" एक्चेंजमधे उंदराने केबल खाल्ल्यात "
" काय सांगता ? तरी किती वेळ लागेल चालू व्हायला ? "
" काही सांगता येत नाही केबल शोधायला वेळ जाणारच " खाSSड फोन बंद
*****
"हॅलो बीएसएनएल ?"
" बोला "
" तुमच्या एक्चेंजमधे प्रॉब्लेम आहे ना "
" हो ना साहेब, केबल खाल्ल्या उंदरांनी "
" मी तुमची काही मदत करू शकतो का ? "
" तुम्ही टेलिकॉम वाले का हो ? "
" नाही, पण मी थोडं सुचवू शकतो "
" सांगा की साहेब "
" तुम्ही ना ! चार-पाच मांजरी पाळा वाटल्यास मी एक देतो.... फुकटात "
खाSSड फोन बंद
*****
"हॅलो बीएसएनएल ? "
" बोला "
" अहो मघाशी फोन केलेला मी ते मांजरीचं तेवढं ..."
" अहो साहेब कशाला मस्करी करता ? मांजरी पाळल्यानं काय होणार आहे ? "
" अहो त्या उंदीर खातील ना ! त्या काही केबल खात नाहीत "
" आणि मग मांजरी बाहेर कशा काढायच्या ? "
" कुत्रे देतो ना दोन, चांगले गलेलठ्ठ "
"च्यायला...... "खाSSड फोन बंद
*****
" हॅलो बीएसएनएल ? "
" हे बघा तुम्हीपण मांजर पाळायचे सल्ले देणार असाल तर.... "
" नाही हो, कुणी दिला होता का असला सल्ला ? "
" नायतर काय साहेब, इथे आमची हालत झालेय आणि लोकांना मस्करी सुचते"
" तुम्ही सध्या काय प्रोटेक्शन घेताय ? "
" आँ, कसलं ओ कसलं ? "
" अहो एक्स्चेंज साठी म्हणतोय मी "
" चालू आहेत प्रयत्न "
" मी सर्व्हिस देऊ का ? "
" काय करता आपण ? टेलिकॉम मध्ये आहात का ? "
" नाही हो, सर्पमित्र आहे " खाSSड फोन बंद
*****
" हॅलो बीएसएनएल का ? "
" तुम्हीपण सर्पमित्र आहात का ? "
" का ? तुम्ही आहात ? "
" नाही हो, मघाशी कुणीतरी त्रास देत होतं, तुमचा काय प्रॉब्लेम आहे ? "
" अहो नेट बंद आहे गेले चार दिवस "
" एक्सचेंजमध्ये उंदरांनी वायर चावल्यानं बंद पडलंय ते, काम चालू आहे"
" पण मी काय म्हणतो, "
" बोला "
" तुम्ही केबलना उंदराचं औषध लावून ठेवा म्हणजे बघा की उंदीर पडलेला असेल तिथेच शोधायची केबल "
" तुम्ही तेच कालचे का हो ? "
" नाही मी उंदीर मारायचं औषध विकतो एकदम जहाल आहे बघा उंदीर फूटभर पण लांब जाऊ शकत नाही "
" ....... " खाSSड फोन बंद
*****
" हॅलो बीएसएनएल ? "
" नेट चालू झालेय "
" मी विचारत होतो तुमच्याकडे एखादी कादंबरी किंवा डीव्हीडी आहे का हो ? "
" हे टेलिफोन एक्सचेंज आहे लायब्ररी नाही "
" नाही त्याचं काय आहे ते नेट ..... "
" सांगितलं ना चालू झालंय "
" हो तेच ते पण ते किंचित स्लो आहे, मला एक मेल पाठवायचंय तर ते लिहून पूर्णं होईपर्यंत तेवढाच टाईमपास एखादी कादंबरी वाचून झाली असती हो "
" आयची.... "
*****
" हॅलो बीएसएनएल ? "
" आता नेट व्यवस्थित चालू आहे "
" ते माहीताय मला पण.. "
" पण काय ? "
" तेवढा उंदीर सापडला का ते विचारायचं होतं "
हल्ली म्हणे बीएसएनएल त्या कॉलरला शोधतायत म्हणे, त्याचं कनेक्शन बंद करण्यासाठी. मला भीती नाही मी बरेच जणांचे फोन वापरलेत.
प्रतिक्रिया
16 May 2012 - 9:23 am | अमृत
अक्षरशः फुटलो वाचता वाचता.... पोटात दुखायला लागलं. :-) :-) :-)
अमृत
16 May 2012 - 9:29 am | जेनी...
झ्याक बर्याच दिवसानि ...पून्हा एकदा मस्त .....:D
16 May 2012 - 9:33 am | लीलाधर
बोले तो झकास :)
16 May 2012 - 9:43 am | कपिलमुनी
एक नंबर !!!
हहपुवा
16 May 2012 - 9:45 am | श्रीरंग_जोशी
बाकी भा. सं. नि. ल. नि आपली वर्षानुवर्षे बरीच सेवा केलेली आहे त्यावर आजकाल पाणी फिरवले जात आहे.
16 May 2012 - 9:47 am | पैसा
खिखिखि खुखुखु खोखोखो ख्याख्याख्या!!!!!!

16 May 2012 - 9:52 am | मी-सौरभ
आईच्ची जय ....
खरच डोक्याला शॉट लावलात. कमीत कमी आधी डीसक्लेमर तर टाका. :)
तुमचं हलक फुलक लिखाण आपल्याला तर लै आवडतं ब्वा!!
16 May 2012 - 10:03 am | प्रास
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ!
लई भारी लिवलंय..... मजा आली वाचताना....
चाफाराव, एकदम झकास!
16 May 2012 - 10:04 am | स्पा
=))
=))
=))
ख्याक
16 May 2012 - 10:08 am | प्यारे१
एकदम उच्च निखळ विनोद...!
सुप्परलाईक. :)
16 May 2012 - 10:09 am | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
16 May 2012 - 10:39 am | उदय के'सागर
येक नंबर. :D
खरंच हे सरकारी, सेमी-सरकारी पब्लीक-सर्वंट्स लई माज करतात फोन वर... म्हणजे नेहमी न सांगताच फोन 'आदळतात'....(शेवटी सर्वंट्सच ते, त्यांना काय 'मॅनर्स' असणार :P)
16 May 2012 - 11:54 am | मृत्युन्जय
हॅ हॅ हॅ. खाजगी क्षेत्रातले उच्चविद्याविभुषित लोक देखील असेच ऐकुन न घेता फोन आपटतात.
२ मिनिटापुर्वीच असा अनुभव घेतलेला असल्याने वाक्य लगेच खोडुन काढावेसे वाटल्याबद्दल क्षमस्व :)
16 May 2012 - 10:43 am | छोटा डॉन
मस्त ...
- छोटा डॉन
16 May 2012 - 10:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लैच खत्रा. :)
-दिलीप बिरुटे
16 May 2012 - 11:13 am | शिल्पा ब
अॅsssssss हॅ हॅ हॅ ss
16 May 2012 - 11:48 pm | जेनी...
हायला हि शिल्पि कसलि खत्रुड हसते :-o
16 May 2012 - 11:16 am | इरसाल
:)
16 May 2012 - 11:22 am | प्रीत-मोहर
=)) =)) =)) =))
एकच नंबर .
16 May 2012 - 11:41 am | sagarpdy
भले शाब्बास!
16 May 2012 - 12:03 pm | Ravindra
अति सुंदर. अगदी असचं करण्याची इच्छा होते.
16 May 2012 - 12:05 pm | परिकथेतील राजकुमार
बर्याच दिवसांनी मनमुराद हसलो.
16 May 2012 - 12:30 pm | नाना चेंगट
=))
16 May 2012 - 12:35 pm | सानिकास्वप्निल
सॉलीड धमाल आली वाचून
16 May 2012 - 1:03 pm | योगेश सुदाम शिन्दे
" हॅलो बीएसएनएल का ? "
" तुम्हीपण सर्पमित्र आहात का ? "
" का ? तुम्ही आहात ? " >>>
मेलोय हो हसुन हसुन. शेजारच बेन म्हने काय झाल बे ? आता त्याला काय सान्गु कप्पाळळळ ???
16 May 2012 - 1:10 pm | स्वातीविशु
ह.ह.पु.वा. लावलीत हो चाफाकाका. अप्रतिम ......... त्यांच्या डोक्याला पुरता शॉट्ट्च लावला की.... ;)
वाचल्यानंतर हसू आवरणे जमलेच नाही. :)
16 May 2012 - 2:43 pm | रमताराम
काका? जीव देतंय आज हे. =)) तुझा एक फोटो लाव रे बाबा.
17 May 2012 - 1:21 pm | चाफा
काय हे ररा, तुम्हाला भेटून दोन दिवस नाही झाले तर बघा माझं काय झालं :D
16 May 2012 - 1:20 pm | स्मिता.
मजा आली वाचून.
16 May 2012 - 1:36 pm | मोहनराव
ह. ह. पु. वा.
16 May 2012 - 2:12 pm | सुत्रधार
खूपच मजेशीर!!!!!!!!!
16 May 2012 - 2:14 pm | अत्रुप्त आत्मा
:-D :-D :-D
"चाफा" रुते कुणाला...! ;-)
16 May 2012 - 2:57 pm | मनराव
एक नंबर.......
16 May 2012 - 3:37 pm | ५० फक्त
मेलो खपलो तिच्यायला काय चाललंय हे ? उंदरं काय, मांजरं काय कुत्रे काय, अरे ते बिएसएनएल आहे का कात्रजचं प्राणि संग्रहालय ? अजुन थोडे दिवस फोन नेट बंद असतं तर पार डायनॉसर पर्यंत गेला असता.
16 May 2012 - 4:13 pm | मेघवेडा
हा हा हा.. झकास!
16 May 2012 - 5:18 pm | भडकमकर मास्तर
।हाहाहाहाहा.. मस्त आहे लेखन...
टाटाइन्डिकॉम ब्रॉडबँड शी असेच अनेक महिने फोनकॉल केले आहेत .... त्यावेळचे असले संवाद आठवले...
16 May 2012 - 7:49 pm | मन१
गोळी आहे काय हसू दाबायची एखादी.
बॉस भुताकडे बघावं तसं हसून खाली पडणार्या मला पाहतोय.
16 May 2012 - 8:30 pm | रेवती
खरच डोक्याला शॉट!
अगदी बरोबर शीर्षक.
16 May 2012 - 9:53 pm | मराठे
खंप्लीट शॉट!
16 May 2012 - 11:36 pm | jaypal
हसुन हसुन फुटलो राव

17 May 2012 - 12:06 am | किसन शिंदे
ह्या ह्या ह्या... :D
पिडायची आयडीया भारीय!
17 May 2012 - 11:46 am | पियुशा
ज. ह. ब . ह. रा. __/\__
लय झ्याक शॉट्ट लावलात बगा तुमी :)
17 May 2012 - 1:25 pm | चाफा
वेळ कमी आहे म्हणून एकाच पोष्टमध्ये सगळ्यांचे आभार मानतो :)
17 May 2012 - 2:39 pm | ऋषिकेश
फु ट लो
18 May 2012 - 5:20 pm | स्पंदना
मस्त ! मस्त! ते काय म्हणतात ते "टेंपोत बसवला " तस झाला बघा आमच.
29 Nov 2012 - 10:36 am | ज्ञानराम
जबरदस्त.....
30 Nov 2012 - 8:42 pm | मदनबाण
:D
30 Nov 2012 - 9:08 pm | जानु
झ.................................का.......................................स
25 May 2016 - 9:40 am | लालगरूड
मुड फ्रेश झाला
25 May 2016 - 9:51 am | असंका
कहर!!!
लैच दिवसांनी एवढं हसलो!!