(शेठहो, थांबा जरा...!)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
18 Jun 2008 - 8:49 pm

प्रदीप कुलकर्णी ह्यांची 'शब्दहो, थांबा जरा...!' ही गझल वाचून नवीन 'अर्थव्यवस्थेतील' काही दृश्ये आमच्या डोळ्यांसमोर तरळून गेली! ;)

.........................................
शेठहो, थांबा जरा...!
.........................................

शेठहो, थांबा जरा! ते गुंफणे 'अर्था'त गाणे!
आजच्यापुरते तरी घ्या, घ्या तुम्ही थोडे दमाने!!

'व्यक्त' असता नेहमी... 'अव्यक्त'ही थोडे असू द्या !
का अशी खालून थैली? 'येथे' नको 'तेथे' असू द्या !
लक्ष ठेवी का शिपाई? काम करण्याचे बहाणे?

सारखे माझ्यापुढे का 'मागण्या' घेऊन येता?
माझिया 'निःसंग'तेला हा असा का त्रास देता?
भिंतिला इथल्या कुणाचा 'कान' आहे कोण जाणे?

एरवी तुमची तशी 'आराधना' करतोच ना मी?
'काम' देताना तुम्हाला, 'दाम' हा घेतोच ना मी?
आज मज 'लिंपू' नका पण रोजच्या सवयीप्रमाणे !

आज 'हे सारे' तुम्ही न्या परतूनी तुमच्यासवे
आज का ही वामनेत्री पापणी माझी लवे?
रोज मग आहेच अपुले तेच ते 'देणे नि घेणे'!!

..............................................
अनर्थकाल १८ जून २००८
..............................................

चतुरंग

कविताविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

वरदा's picture

18 Jun 2008 - 10:30 pm | वरदा

आणि प्रतिक्रीया नाही?
मस्त आहे चतुरंग....
'व्यक्त' असता नेहमी... 'अव्यक्त'ही थोडे असू द्या !
का अशी खालून थैली? 'येथे' नको 'तेथे' असू द्या !

हे आवडलं... ही थैली लई महत्वाची असते बॉ.....

प्राजु's picture

18 Jun 2008 - 11:12 pm | प्राजु

एरवी तुमची तशी 'आराधना' करतोच ना मी?
'काम' देताना तुम्हाला, 'दाम' हा घेतोच ना मी?
आज मज 'लिंपू' नका पण रोजच्या सवयीप्रमाणे !

हे छान ...

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रमोद देव's picture

19 Jun 2008 - 12:07 am | प्रमोद देव

चतुरंगराव ही कविता-विडंबन मस्तच आहे...अगदी अर्थपूर्ण आहे ह्याबद्दल शंका नाही.
मात्र ही ग़जल नव्हे. ग़जलेत प्रत्येकी दोन ओळींचे किमान पाच शेर असतात(असे कुठे तरी वाचलंय).

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

चतुरंग's picture

19 Jun 2008 - 11:55 pm | चतुरंग

तुमचे बरोबर आहे, ही गजल नाहिये.
प्रमोद कुलकर्णी गजलही फार छान लिहितात त्यामुळे कवितेच्या ओळी वाचताना वृत्तामुळे तसा भास होऊन अनवधानाने गजल असा उल्लेख केला.

विडंबन आवडले हे वाचून छान वाटले! :)

चतुरंग

केशवसुमार's picture

20 Jun 2008 - 3:31 pm | केशवसुमार

रंगाशेठ,
विडंबन झकास..आवडले..
केशवसुमार
अवांतरः प्रमोद कुलकर्णी नाही.. प्रदिप कुलकर्णी

चतुरंग's picture

20 Jun 2008 - 5:04 pm | चतुरंग

धन्यवाद केसु!

अवांतरः प्रमोद कुलकर्णी नाही.. प्रदिप कुलकर्णी
ह्म्म - घाईघाईत प्रतिसाद दिला की असे होते रंगा, चुकीबद्दल क्षमस्व!

चतुरंग

विसोबा खेचर's picture

19 Jun 2008 - 12:24 am | विसोबा खेचर

रंगा,

उत्तम विडंबन केलं आहेस..

'व्यक्त' असता नेहमी... 'अव्यक्त'ही थोडे असू द्या !
का अशी खालून थैली? 'येथे' नको 'तेथे' असू द्या !

हे मस्त!

तात्या.

अरुण मनोहर's picture

19 Jun 2008 - 7:33 am | अरुण मनोहर

चांगले लिहीले आहे. पण काहीतरी अधुरे वाटते आहे.

'व्यक्त' असता नेहमी... 'अव्यक्त'ही थोडे असू द्या !
चा प्रयोग वाचकांवरही केला का रंगा?

चाणक्य's picture

19 Jun 2008 - 9:09 am | चाणक्य

छान जमलंय...!!

बेसनलाडू's picture

20 Jun 2008 - 10:51 am | बेसनलाडू

'अनर्थ'काल ही सगळ्यात मोठी कडी! हाहाहाहा
(हसरा)बेसनलाडू