तु

अनिल हटेला's picture
अनिल हटेला in जे न देखे रवी...
18 Jun 2008 - 3:45 pm

!!! पहीला प्रयत्न !!!

( दि.१८/११/१९९७ रोजी लिहीलेली आयुष्यातली पहीली-वाहीली कविता ..)

प्रेमाच्या धुन्दीत जेव्हा
अविट होता गोडवा,
रात्र होती चान्दणी ,
आणी मस्त होता गारवा !!

फुलात राहतो गन्ध ,
तशीच तु मनी सदा,
तुझेच चित्र काढतो,
हाच आहे छन्द मना !!

हसरा चन्द्रमणी
भाव तुझा लाजरा,
म्रूदुला कुन्तलातही ,
माळीलास तु मोगरा !!

हसलीस तु गोड जेव्हा
हा निसर्ग ही लाजला,
रात्र होती चान्दणी
अन मस्त होता गारवा !!

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

अनिल हटेला's picture

18 Jun 2008 - 3:53 pm | अनिल हटेला

उभ्या आयुष्यात मोजक्याच गोष्टी केल्या ...
कुणा एका खास व्यक्ती साठी काही चारोळ्या ,केल्या होत्या..

काळाच्या ओघात सर्व काहे सम्पल....

आज विजुभाऊ चा लेख वाचला ...

सकाळी "झेलम "चा

आणी सगळ्या आठवणी चाळवल्या ..

आणी आठवली ही कविता.......

मि पा परिवारा ला छोटेखानी मेजवानी दयायचा हा प्रामाणीक प्रयत्न~~

चु भु द्या घ्या ......

मनस्वी's picture

18 Jun 2008 - 4:23 pm | मनस्वी

अन्या नावाच्या बैला,
छान आहे पहिला प्रयत्न!

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

धमाल मुलगा's picture

18 Jun 2008 - 4:33 pm | धमाल मुलगा

अन्या,

यार कवितेतलं काय झेपत नाही बघ, मला गाढवाला :(
पण तुझं चालू दे!!!!

काही गद्य लिहिलंस तर सांगेन बाबा छान की उत्तम ते :)

II राजे II's picture

18 Jun 2008 - 4:34 pm | II राजे II (not verified)

हसलीस तु जेव्हा
हा निसर्ग ही लाजला,
रात्र होती चान्दणी
अन मस्त होता गारवा !!

जबरा !!
मस्त ओळी आहेत आवडली कविता.. अजून लिहा !!

राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

सुचेल तसं's picture

18 Jun 2008 - 4:40 pm | सुचेल तसं

आन्या,

छान आहे तुझी पहिली कविता.

http://sucheltas.blogspot.com

शितल's picture

18 Jun 2008 - 4:59 pm | शितल

बैल ही मस्त कविता करतो. (ह.घे.)
सगळीच कविता मस्त.
अजुन लिहा वाचायला आवडेल.

स्वप्निल मन's picture

19 Jun 2008 - 12:07 am | स्वप्निल मन

सुरेख जमलीय कविता

स्वप्निल मन

पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.

अनिल हटेला's picture

19 Jun 2008 - 7:15 am | अनिल हटेला

धन्यवाद ,मि पा !!!

सन्माननिय सभासदाच्या प्रतिक्रिया वाचुन भडभडून आले.....

अक्षरश : बैलाचे डोळे भरून आले....

(आनन्दाश्रू बर !!)

अरुण मनोहर's picture

19 Jun 2008 - 7:34 am | अरुण मनोहर

पहिला प्रयत्न छानच आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2008 - 8:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हसलीस तु जेव्हा
हा निसर्ग ही लाजला,
रात्र होती चान्दणी
अन मस्त होता गारवा

मस्त रे !!!

फटू's picture

19 Jun 2008 - 8:28 am | फटू

छानच लिहिलं आहेस की...

(तू जिला नजरेसमोत ठेवून ही कविता लिहिलीस, तिचं आता कुणा दुसर्‍याबरोबर लग्न झालं आहे ना ??? )

(तुझी कविता वाचून जुन्या आठवणी जाग्या झालेला)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

सुमीत भातखंडे's picture

19 Jun 2008 - 11:44 am | सुमीत भातखंडे

मनापासून आवडली.
अजून येऊद्यात.

चतुरंग's picture

19 Jun 2008 - 9:36 pm | चतुरंग

एकदम मस्त! कोणत्याही पहिल्या गोष्टीचा आनंद शब्दातीत असतो, तो जपून ठेव! :)

चतुरंग

अनिल हटेला's picture

20 Jun 2008 - 5:54 am | अनिल हटेला

पुन्हा एकदा सर्वान्ना धन्यवाद!!!!!!!!!!

विसोबा खेचर's picture

20 Jun 2008 - 7:35 am | विसोबा खेचर

सुंदर कविता...!

तात्या.

केवळ_विशेष's picture

20 Jan 2009 - 4:24 pm | केवळ_विशेष

भावड्या...

अजून येऊंदे

झेल्या's picture

20 Jan 2009 - 5:08 pm | झेल्या
परिकथेतील राजकुमार's picture

20 Jan 2009 - 5:15 pm | परिकथेतील राजकुमार

फुलात राहतो गन्ध ,
तशीच तु मनी सदा,

क्या बात है मामु ! झकासच !
आपला हा छंद आम्हाला माहितच न्हवता हो.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

सर्वसाक्षी's picture

20 Jan 2009 - 8:40 pm | सर्वसाक्षी

एक नवा पैलु समजला!

बहुतेक पुढील महिन्यात भेटीचा योग असावा. आलो की हाक देतोच. तोपर्यंत आणखी तयार ठेवा

मसक्कली's picture

16 Jun 2009 - 4:20 pm | मसक्कली

;;) हुम्म्म्म्म हि कवित तर चनच आहे हो रजे.........

पन प्रजेना रजेन्कदुन आनखि आपेक्शा आहेत....

येउ द्याअ कि आजुन भन्नत कविता.......... ;)