हाऊ टू गेट पेड फॉर यू आर वर्थ

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
7 May 2012 - 12:11 am

परवाच एका मित्राच्या सांगण्यावरुन, मी अ‍ॅमेझॉनवरुन पुढील पुस्तक मागविले - "हाऊ टू गेट पेड फॉर यू आर वर्थ". पुस्तक अजून घरी यायचे आहे. मित्राने पुस्तक चाळले आहे आणि त्याला प्रथमदर्शनी खूप आवडले. या पुस्तकाच्या संदर्भात त्याने मांडलेले मुद्दे अर्थात त्याला का आवडले त्याची कारणे पुढीलप्रमाणे- एक तर पुस्तक वाचनीय आहे तसेच वाचायला सोप्या भाषेत आहे.
पुस्तकात लिहीलेले मुद्दे पुढीलप्रमाणे -
(१) जेव्हा तुमचा एम्प्लॉयर (मालक) तुम्हाला नोकरी देतो तो कमी पगारच नेहमी ऑफर करतो.
(२) खुद्द एम्प्लॉयरची तुमच्याकडून ही अपेक्षा असते की तुम्ही पगार वाढवून मागावा.
(३) तुमचा वेळ, तुमच्याकरता किती महत्त्वाचा आहे, तसेच कंपनीच्या तुम्ही किती उपयोगी पडू शकता याची सुयोग्य जाणीव ठेऊन तदनुसार तुम्ही पगार वाढवून मागावा हीच अपेक्षा असते.
(५) तुम्ही ज्या रीतीने "निगोशिएट" करता त्यातून तुमचे "सॉफ्टस्किल्सच (कौशल्य) दिसून येतात.
(६) सांगीतलेला पगार जसाच्या तसा स्वीकार करणे हे अपेक्षितच नसते.किंबहुना एका सर्व्हेअंती असा निष्कर्ष काढण्यात आला की जे एम्प्लॉयी (कर्मचारी) पगार वाढवून मागतात त्यांच्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीकोनातून पाहीले जाते.
_____________________________________

वरील सर्व माहीती इतक्या वर्षांच्या अनुभवानंतरही माझ्यासाठी नवीनच होती. कारण आपलं काय होतं, नवीन नोकरी लागते वेळी उतावळेपणा, असुरक्षितता नडते. मग एम्प्लॉयर सांगेल ती पूर्वदिशा या न्यायाने देतील तो पगार आपण आनंदाने स्वीकारतो. पुढे प्रत्येक कंपनी बदलताना आधीचा पगार विचारतात. आणि मग पगारवाढ अक्षरक्षः गोगलगाईच्या गतीने होते.
______________________________________
हे पुस्तक वाचण्याची खूप उत्सुकता आहे. पण त्याचबरोबर ही भीतीदेखील वाटते की न जाणो हे पुस्तकदेखील १०० पानात तुमची विचारप्रणाली बदलण्याची हमी घेणारे "क्विक-फिक्स गिमिक" पुस्तक तर नसेल? म्हणजे काही उपयोगी टिप्स मिळाल्या तर हव्या आहेत पण अतिरंजित पॉझिटीव्हीटी (सकारात्मकता) प्रवचन देणारे नको. जरा कॉमन सेन्स असलेल्या टिप्स असाव्यात.
सध्या तरी पुस्तकाची वाट पहाते आहे.

नोकरीशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

पगार थोडासा कमी मिळाला तर चालेल, पण "आपल्याला आपल्या लायकीपेक्षा जास्त पगार मिळतो का?" असा प्रश्न पडणं वाईट. मला असे प्रश्न सारखे पडतात. उलट मनात आलं तर या नोकरीवर लाथ मारून दुसरी मिळवेन हा आत्मविश्वास हवा. त्यासाठी स्किल्स तर वाढवावेतच पण उगाच पगार वाढण्यासाठी खटपटी करू नयेत. माझे अनेक सहकारी आपापसात बोलताना सारखं पगाराविषयी रडगाणं गात वर्षानुवर्षे त्याच कंपनीत काम करत आहेत. आपण ज्या ठिकाणी काम करतो आहोत ते केवळ दुसरीकडे नोकरी मिळत नाही म्हणून का?, हा प्रश्न मी स्वतःला विचारत असतो.

सहसा माझ्या सहचार्‍यांना मी आपण होऊन पगार विचारायला जात नाही पण कोणी विचारला तर लपवतही नाही अर्थात त्याबदल्यात समोरच्या व्यक्तीचा पगारदेखील विचारतेच. कारण या गोष्टी मला वाटते आपल्याला मार्केटची "अप टू डेट" माहीती ठेवण्यास आवश्यक असतात. आतापर्यंत ज्यांनी (दोघा-तीघा कर्मचार्‍यांनी) माझ्याबरोबर त्यांचे पगार (सॅलरी स्केल) शेअर केले आहेत त्यांनी रडगाणे तर गायले नाही पण किंचित असूयेची छटा डोकावलेली जाणवली. ......... अन ते ही कारण नसताना कारणा एकाला पगार कमी होता पण पर्क्स जास्त होते/ स्थैर्य होते. दुसर्‍याला पगार कमी होता पण तो नुकताच कॉलेजमधून बाहेर पडलेला होता.

असो, मला वाटते स्किलसेट वाढविणे हे जितके महत्त्वाचे असते तितकेच महत्त्वाचे पाठपुरावा करुन नियोजनबद्ध रीतीने स्वतःला मार्केट करणे आणि पगारवाढ पदरात पाडून घेणे असते. आणि हे तेव्हाच शक्य होते जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास असेल.

काम/ नोकरी याचा संबंध फक्त पैशाशी लावला जाऊ नये तर आपली सेल्फ्-ग्रोथ (प्रगती), आत्मविश्वास (सेल्फएस्टीम) आदि नक्कीच आपल्या व्यवसायाशी निगडीत पैलू आहेत हे सर्व मान्य पण पैसा हा देखील फार मोठा घटक आहेच

माफ करा माझा प्रतिसाद विस्कळीत झाला आहे पण - पगारवाढीची खटपट करु नये या बाबीशी मी असहमत आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

7 May 2012 - 3:39 pm | परिकथेतील राजकुमार

असो, मला वाटते स्किलसेट वाढविणे हे जितके महत्त्वाचे असते तितकेच महत्त्वाचे पाठपुरावा करुन नियोजनबद्ध रीतीने स्वतःला मार्केट करणे आणि पगारवाढ पदरात पाडून घेणे असते. आणि हे तेव्हाच शक्य होते जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास असेल.

काम/ नोकरी याचा संबंध फक्त पैशाशी लावला जाऊ नये तर आपली सेल्फ्-ग्रोथ (प्रगती), आत्मविश्वास (सेल्फएस्टीम) आदि नक्कीच आपल्या व्यवसायाशी निगडीत पैलू आहेत हे सर्व मान्य पण पैसा हा देखील फार मोठा घटक आहेच

रामाची सिता कोण हे तुला ऑलरेडी माहिती आहे. मग उगाच पुस्तकावरती कशाला खर्च करतेस ? मला पाठवून देत जा ते पैसे. ;)

हाहा :)
नाही परा अशी (कॉर्पोरेट कल्चर्/एटीकेट्स) पुस्तके, लेख मी वाचते याचे कारण , आपल्या विचारांची तशी जडण्-घडण होते. ही एक ऑनगोईंग प्रोसेस असते. आणि खरं सांगते खूप फरक पडतो आपल्या आत्मविश्वासामध्ये. मला जाणवलेली एक गॅप म्हणजे - अन्य मूल्ये / संस्कार हे आई-वडील देतात पण ही खास व्यावसाईक कौशल्ये / बिहेव्हिअरल स्किल्स वाचून, अनुभवा अंतीच आत्मसात होतात.

शुचीताइ पुस्तक ओळ्ख आवड्ली :)
पण
(१) जेव्हा तुमचा एम्प्लॉयर (मालक) तुम्हाला नोकरी देतो तो कमी पगारच नेहमी ऑफर करतो.

अगदी १०० % सहमत !
पण पूस्तकातले काही मुद्दे न पट्ण्यासारखे आहेत (निदान मला तरी )
(२) खुद्द एम्प्लॉयरची तुमच्याकडून ही अपेक्षा असते की तुम्ही पगार वाढवून मागावा.

असे बॉस / मालक ( दुर्मिळ ) असावेत बहुधा ;) भारतात तरी ,नाहीतर पगारवाढी़करिता युनिअन, संप ,ले - ऑफ ची गरज नसती पड्ली कर्मचार्याना !
(३) तुमचा वेळ, तुमच्याकरता किती महत्त्वाचा आहे, तसेच कंपनीच्या तुम्ही किती उपयोगी पडू शकता याची सुयोग्य जाणीव ठेऊन तदनुसार तुम्ही पगार वाढवून मागावा हीच अपेक्षा असते.

इथे १२ - १२ तास राबुनदेखील काही बॉसचे असे म्हणण असत की " तुमचे काम दिलेल्या वेळेत पुर्ण झाले नाही /होत नाही म्हणून तुम्हाला एक्स्ट्रा हवर्स काम करावे लागते त्यात म्यानेजमेन्ट्ची काय चुक ?
(५) तुम्ही ज्या रीतीने "निगोशिएट" करता त्यातून तुमचे "सॉफ्टस्किल्सच (कौशल्य) दिसून येतात.

हे असे कौशल्य दाबुन ठॅवण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो / जाउ शकतो .

(६) सांगीतलेला पगार जसाच्या तसा स्वीकार करणे हे अपेक्षितच नसते.किंबहुना एका सर्व्हेअंती असा निष्कर्ष काढण्यात आला की जे एम्प्लॉयी (कर्मचारी) पगार वाढवून मागतात त्यांच्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीकोनातून पाहीले जाते.

नोप्प , मला तरी नाही वाटत बहुतांशी कंपण्या/सेक्टर मध्ये असे होत नाही उलट्पक्षी त्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष होते किंवा
तुमच्यापेक्षा अमुक - तमुक व्यक्ती आहे त्या स्केलमध्येच तुमच्यापेक्षा चांगल काम करतो/करते आहे असे दाखले देत बसतात ,कधी - कधी फ्रेशर्स एम्पलॉईजची काही कमी नाही असा दम ही दिला जाउ शकतो ईन डायरे़क्टली !

@ दादा कोंड्के
त्यासाठी स्किल्स तर वाढवावेतच पण उगाच पगार वाढण्यासाठी खटपटी करू नयेत. माझे अनेक सहकारी आपापसात बोलताना सारखं पगाराविषयी रडगाणं गात वर्षानुवर्षे त्याच कंपनीत काम करत आहेत.
स्किल्स वाढवन उत्तम ऑप्शन पण ज्या कंपनीकरिता / सेकटर करीता करमचार्यानी आयुश्यातली इतकी वर्ष दीली आहेत ,जरी त्यांना मोबदला मिळ्त असला तरी
कामाच्या ठीकाणी कंपनी , इतर कलिग्स /सहकारी याच्यामधले जे बॉंडिंग असते ,भावनिक गुंतवणु़क असते
" अरे हा जॉब मी डेव्हलप केलाय किंवा ह्या प्रोजेक्ट्मध्ये मी जिवाचे रान केले होते ,
किंबहुना जे आसपासच वातावरण असते त्यात माणुस भावनिक द्रुष्टया गुंतणे साहजिक आहे एकदम " बिजिनेस टायकुन " पणा सगळ्याच्याच रक्तात नसतो .मग जिथे सगळ छान असत पण एक पगार कमी आहे हे कारण ग्राह्य असल तरी ते वर्षानुवर्षे त्याच कंपनीत काम करत बसतात त्याच हे एक महत्वाच कारण आहे ,मी तर म्हणेन अशा लोकांनी पगार वाढण्यासाठी खटपटी अवश्य कराव्यात :)

असे बॉस / मालक ( दुर्मिळ ) असावेत बहुधा भारतात तरी ,नाहीतर पगारवाढी़करिता युनिअन, संप ,ले - ऑफ ची गरज नसती पड्ली कर्मचार्याना !

पियु, मी आंतरजालावर या पुस्तकाची एक छोतेखानी समीक्षा वाचली ज्यात एका बाईने असे मत मांडले आहे की - हे पुस्तक "जssssssस्ट नोकरी लागते वेळी वाचण्यास योग्य असून, एकदा बस्तन बसलेल्या लोकांनी पगारवाढ कशी मागावी किंवा कंपनी बदलते वेळी पगार कसा वाढवून मागावा यासंदरभात हे पुस्तक काहीच टिप्स देत नाही."

तेव्हा हे पुस्तक नवीन नोकरी घेणार्‍या लोकांना समोर ठेऊन लिहीलेले असावे. म्हणजे पहीला इंटर्व्ह्यू (मुलाखत) च क्रॅक करायची.

@ शुची तै
.तेव्हा हे पुस्तक नवीन नोकरी घेणार्‍या लोकांना समोर ठेऊन लिहीलेले असावे. म्हणजे पहीला इंटर्व्ह्यू (मुलाखत) च क्रॅक करायची
ओक्के.........असेलही कदाचीत याचा फायदा फ्रेशर्सना ,पण एक सांगु का , खरेतर फ्रेशर्स लोक्स ना कुठून तरी सुरुवात करायची असते ,आपले पाय रोवायचे असतात अन मुख्य म्हणजे कामाचा अनुभवही घ्यायचा असतो त्यामुळे फ्रेशर्स पगाराबद्द्ल जास्त अपेक्षा ठॅवत नाही अथवा निगोशिएट ही करत नाही :)

पैसा's picture

7 May 2012 - 11:34 am | पैसा

पुस्तक वाचून झाल्यावर इथेच त्याचा सारांश आणि आता तुझं काय मत झालंय ते दे ग!

आमच्या सरकारी बँकांमधे पगारवाढीचे असले काही प्रकार नसतात. सर्कार आणि युनियन्स मिळून पुढच्या ५ वर्षांसाठी पगार ठरवतात. वार्षिक इन्क्रिमेंट्स वगैरे सगळं ठरलेलंच असतं. बँकेत जॉइन होणार्‍याला पुढच्या वर्षांमधे काय पगार असेल हेही ठरलेलं असतं. एका स्केलमधे सगळ्याना एक तर्‍हेचा पगार असतो. फक्त दर वर्षी इन्क्रिमेंट्स मिळत जातात.

त्यामुळे हे सगळं वाचायची उत्सुकता आहे, एवढ्याचसाठी की खाजगी क्षेत्रात कोणाला किती पगार मिळावा हे नेमकं कसं ठरवलं जातं?

खुपच मागासलेलं आहे ब्वॉ तुमचं सेक्टर.

त्यामुळे हे सगळं वाचायची उत्सुकता आहे, एवढ्याचसाठी की खाजगी क्षेत्रात कोणाला किती पगार मिळावा हे नेमकं कसं ठरवलं जातं?

मी थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

खाजगी क्षेत्रात कोणाला किती पगार मिळावा हे नेमकं कसं ठरवलं जातं?
१. तुमचा सध्याचा पगार किती आहे?
आयटीमध्ये जॉब बदलला की आधीच्या पगारात तीस टक्के वाढ डीफॉल्ट समजली जाते. यात परिस्थितीनुसार कमी जास्त होत राहतं.

२. तुमचा एकुण अनुभव तसेच कामाशी निगडीत अनुभव किती?
अमुक एक वर्षाचा अनुभव असेल तर इतकं "पॅकेज" असं ढोबळमानाने ठरलेलं असतं. अर्थात पॅकेज बर्‍याचवेळा कमीत कमी तीन लाख जास्तीत जास्त चार लाख अशा रेंज टाईप असतात.

३. तुमचे निगोशिएशन स्किल्स.
जेव्हा आपण नविन कंपनीत ईंटरव्ह्यूला जातो तेव्हा तांत्रिक चाचणी पुर्ण केली की आपली "एचार" नावाच्या हलकट जातीच्या लोकांशी गाठ पडते. (चुकभुल देणे घेणे). हे लोक समोरच्या व्यक्तीला कमीत कमी पगारात कसं हायर करता येईल एव्हढाच विचार करतात. पगार ठरवताना आपण सावध नसलो तर हे लोक आपल्याला असं काही गुंडाळतात की ज्याचं नाव ते.

४. कंपनीची पत किंवा पगार देण्याची क्षमता.
मोठया बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये पद उतरंडीमध्ये कुणाला किती पगार दयायचा हे ठरलेलं असतं. पण त्यातही स्थळकाळानुरुप बदल केले जातात. आश्चर्याची गोष्ट अशी की कंपनीची पत चांगली असेल तर बरेच वेळा आपण मागितलेल्या पगारापेक्षाही जास्त पगार कंपनी देते. पण असे भाग्यवान खुप कमी असतात.

५. कंपनीला तुमच्यासारखे स्किलसेट असलेल्या माणसाची गरज किती निकडीची आहे
कंपनीच्या एखादया क्रिटीकल प्रोजेक्टमधील रीसोर्स अचानक सोडून गेला तर कंपनीली ती जागा तातडीने भरायची असते. अशावेळी तुम्ही टेक्निकल राउंड क्लियर केल्यानंतर अपेक्षित वेळेत ती कंपनी जॉईन करणार असाल तर मुंहबोला दाम दयायला कंपनी मागेपुढे पाहत नाही.

बाकीची भर घालणं, माझ्या मतांना पुष्टी देणं किंवा माझी मतं खोडून काढणं हे काम इतर सन्माननिय सभासद करतीलच.

नक्की सारांश देईन. :)
धनाजी यांनी उत्तम माहीती दिली आहेच.

(१) जेव्हा तुमचा एम्प्लॉयर (मालक) तुम्हाला नोकरी देतो तो कमी पगारच नेहमी ऑफर करतो.
(२) खुद्द एम्प्लॉयरची तुमच्याकडून ही अपेक्षा असते की तुम्ही पगार वाढवून मागावा.
(३) तुमचा वेळ, तुमच्याकरता किती महत्त्वाचा आहे, तसेच कंपनीच्या तुम्ही किती उपयोगी पडू शकता याची सुयोग्य जाणीव ठेऊन तदनुसार तुम्ही पगार वाढवून मागावा हीच अपेक्षा असते.
(५) तुम्ही ज्या रीतीने "निगोशिएट" करता त्यातून तुमचे "सॉफ्टस्किल्सच (कौशल्य) दिसून येतात.
(६) सांगीतलेला पगार जसाच्या तसा स्वीकार करणे हे अपेक्षितच नसते.किंबहुना एका सर्व्हेअंती असा निष्कर्ष काढण्यात आला की जे एम्प्लॉयी (कर्मचारी) पगार वाढवून मागतात त्यांच्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीकोनातून पाहीले जाते.

एकाचढ एक नॉन स्पेसिफिक वाटले वरचे मुद्दे. अगदी हिलस्टेशनवर नेऊन दिलेल्या जनरलाईज्ड मॅनेजमेंट प्रशिक्षणात असतात तसे.

प्रत्येक मुद्दा वाचून एकच उद्गार मनात येतो.. "ओह रियली?"

हे जर पुस्तकातले हायलाईट केलेले मुद्दे असतील तर पुस्तकात काही काँक्रीट असेलसे दिसत नाही तरीही काही आढळलं तर कृपया शेअर करावे ही विनंती. पगार वाढवण्यासाठी प्रॅक्टिकल उपायबिपाय असेल तर.. :)

अगदी, अगदी!! हे मुद्देच असतील तर पुस्तक मलादेखील पुस्तक अतिरंजीत आणि फुसके वाटते आहे. आले की कळेलच.

पगारवाढ हा कळीचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आमच्याइथे वन-टू-वनच्या वेळेला गुद्दागुद्दी होतेच. पण मी पडलो साधा मनुष्य. म्हणून माझा मॅनेजर मला नेहमीच वाटाण्याच्या अक्षता लावतो. बघूया माझा दिवस कधी येतो?

- (कार्यालयीन राजकारणग्रस्त) पिंगू

चिरोटा's picture

7 May 2012 - 12:16 pm | चिरोटा

एवढ्याचसाठी की खाजगी क्षेत्रात कोणाला किती पगार मिळावा हे नेमकं कसं ठरवलं जातं?

कंपनीकडे भांडवल किती आहे आणि बाजारात तुमच्या कामाला किती किंमत आहे ह्यावरून घासाघीस करायची की नाही हे ठरते.काही मोठ्या कंपन्या/स्टार्ट अप भन्नाट पगार देतात पण अशावेळी कर्मचार्‍यांना दुसरीकडे नोकरी मिळताना प्रॉब्लेम येवू शकतो.

परिकथेतील राजकुमार's picture

7 May 2012 - 1:09 pm | परिकथेतील राजकुमार

असले जड जड विषय आणि चर्चा झेपत नसल्याने नो कॉमेंटस.

शुचि मामी बर्‍याच दिवसांनी लिहिती झाल्याने फक्त पोच म्हणून हा प्रतिसाद.

कवितानागेश's picture

7 May 2012 - 1:48 pm | कवितानागेश

पुढे ही अनभिज्ञ मी, मागे ही अनभिज्ञ मी!

-- उच्च/सु/कुशिक्षित बेकार माउ ;)

नाना चेंगट's picture

7 May 2012 - 2:38 pm | नाना चेंगट

एवढं डोक्याला कल्हई कोण करेल?

साधा हिशोब...
मला गरज असेल तर समोरचा म्हणेल ती किंमत
त्याला गरज असेल तर मी म्हणेल ती किंमत

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे धन्यवाद.

ऋषिकेश's picture

7 May 2012 - 3:34 pm | ऋषिकेश

वेगळा विचार आहे. मात्र फारसा पटत नाही.
प्रत्यक्षात आपण कोणाचे अप्रेझल करत असू आणि त्यात कोणी पगार वाढवून मागितला तर हे 'ऑट ऑफ स्कोप' आहे असे सांगतो ;)

आता आपण आपल्या घरातल्या धुणीभांडीकरणार्‍या मावशींनी पगार वाढवून मागितला तर त्यांना अधिक योग्यतेच्या समजतो का? नाही ना? प्रसंगी वैतागतोच. तसेच आहे हे. ;)

शुचि's picture

8 May 2012 - 7:27 am | शुचि

:)

सहज's picture

7 May 2012 - 4:48 pm | सहज

मिपाकरां एवढे = मिपाकर बघतात्/करतात एवढे
मिपाकरां एवढे
१) सिनेमे सपरिवार मल्टीप्लेक्स मधे बघायचे असतील
२) पुस्तके खरेदी करायची असतील
३) गाड्या, फोन, अन्य गोष्टी विकत घ्यायच्या असतील
४) सहली करायच्या असतील
५) पाकृ - कॉकटेल्स, कट्टे करायचे करायच्या असतील
६) टिव्हीवरचे सर्वच्या सर्व कार्यक्रम व अन्य सार्वजनीक स्थानचे कार्यक्रम आयपीएल, नाटके इ इ बघायचे असतील
७) व इतका वेळ काथ्याकूटासकट चर्चा करायची असेल

तर भले मोठे पे पॅकेज मिळवायला जमलेच पाहीजे हो! अगदी अगदी!!!