पानीपत मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्वपुर्ण घटना ,न विसरता येणारी एक शोकांतिका ,किंवा काहींच्या मते पानीपत म्हणजे मराठ्यांच्या पराभवाचा इतिहास नाहिच उलट एक गौरव शाली कालखंड .
या विषया वर आतापर्यंत बरच्न लिहल गेलय,विविध ग्रंथ्,कांदबर्या,लेख,नाटक्.इतिहासातील ही घटना बर्याच जणांना लिहायला उदयुक्त करते,हा लेखही असाच एक प्रयत्न ,
पानीपतच्या पराभवाची कारणमिमांसा करत असताना पानीपत पुर्वीचे उत्तरेतील राजकारण समजुन घेणे अत्यंत महत्वाचे आहे.बर्याच दा आपण काही कथा वा कादंबर्या वाचुन या घटनेला भावनिक द्रुष्टिकोनाने पाहतो,आणी कोणा एकावर या पराभवाचे खापर फोडुन मोकळे होतो.(अर्थात काहि सन्माननीय अपवाद वगळ्ता)
सर्वप्रथम याच्या पाठिमागे असणार्या त्या कालखंडातील प्रशासकीय यंत्रणेतील दोष मोठ्या प्रमाणात पुढे येताना दिसतात.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एककेंद्री व बळ्कट अशी शासनयंत्रणा उभारली गेली ,वतन संस्थेचे दोष लक्षात घेउन्,वतने व सरंजाम बंद करुन पेशव्यापासुन ते बारगीरा पर्यंत रोख पगार देण्याची पध्दत सुरु केली .
पुढे राजारामाच्या काळात तत्कालीन परिस्थीतीमुळे वतन देण्याचि प्रथा पुन्हा सुरु झाली.मराठा स्वातंत्रयुध्दाच्या काळात जो मराठा सरदार मुघलांचा प्रदेश जिंकेल त्याला तो प्रदेश सरंजाम म्हणुन देन्यात येउ लागला.
या महत्वपुर्ण बदलाचे मुख्य कारण म्हणजे सैनिकांच्या निष्ठा आता छत्रपतीं ऐवजी त्या त्या सरदारांप्रती व्यक्त होउ लागल्या.
शाहुच्या कालखंडातच मराठा सत्तेची सुत्रे हळुहळु पेशव्यांच्या हाती एकवटु लागली ,याला कारणीभुत शाहुचा शांत व ऐशारामी स्वभाव तसेच पहील्या बाजीरावाची कर्तबगारी हे पण होते.शाहुची १६ वर्षे मोगली छावणीत गेल्याने तेथील जिवनाचा शाहुवर प्रभाव पडला असण्याची शक्यता नाकारता येते नाही.व त्यामुळे आपल्या सरदारांकडुन राज्य रक्षण्याचे काम करुन घेण्याच्या भुमिकेत शाहु दिसतो,त्याचा फायदा घेउन मराठा सरदारांनी स्वतःला फौजबंद करायला सुरुवात केली.
पुढे पेशवा बाळाजी विश्वनाथ याने या बलाढ्य मराठा सरदारांना एकत्र आणण्यास मराठा मंडळ ही संकल्पना शाहुच्या संमतीने अस्तित्वात आणली . त्यांच्या महत्वाकांक्षेला आवर घालुन स्वराज्याच्या कामाला त्यांना जुंपण्याचे कार्य मराठा मंडळाने निश्चीतपणे केले,या सरदारांनी छत्रपतीला केंद्र स्थानी मानुन मुलुखगिरी करावी असा विचार मांडला गेला.परीणामी जास्तीत जास्त वतन व सरंजाम मिळ्वण्याच्या हेतुने सरदांरानी मोगली मुलुखावर हल्ले करुन बराच प्रदेश आपल्या ताब्यात घेतला.
बाजीरावाच्या काळात मराठी सत्ता विस्तारण्यास सुरुवात झाली ,त्यासाठी त्याने आपल्या बरोबर नव्या सरदारांची निर्मिती केली ,शिंदे,होळकर,पवार्,गायकवाड यासारखे सर्वसामान्य मात्र पराक्रमी शिपाइगडि त्याला मिळाले ज्यांना त्याने नंतर उत्तरेत सरदार बनवले,बाजीराव ही रणात उतरुन झुंजणारा रांगडा गडी असल्याने वरील सहकार्यांच्या मदतीने उत्तरेत मराठ्यांची सत्ता विस्तारु लागली.
बाजीरावाच्या नंतर मात्र त्याचे सहकारी व नानासाहेब पेशवे यांच्यातील संबध तितकेसे चांगले राहीले नाही.सरदारांनीहि आता आपले वतन, सरंजाम याकडे जास्त लक्ष पुरवले व मराठा राज्य हित दुय्यम मानले
क्रमशः
प्रतिक्रिया
3 May 2012 - 7:51 pm | अँग्री बर्ड
हे सगळे ठाऊक आहे, तुम्ही नवीन असा काय प्रकाश टाकलात ? थोडक्यात बाटली आणि दारू पण जुनीच आहेत. पुढच्या वेळेला काही चांगले आणि नवीन संशोधनात्मक लेख प्रसवाल अशी आशा व्यक्त करतो. || जय हिंद जय महाराष्ट्र ||
4 May 2012 - 11:39 am | परिकथेतील राजकुमार
जरा दम धरा की.
हळूहळू ते घटकंचुकी, पेशव्यांची हौस मोज, विषयवासना, ब्राह्मणांची दरबारी कामातील दादागिरी, बाईपायी पेशवाई कशी बुडाली, पेशव्यांचे अधःपतन, पेशव्यांची मुले ही खरी कोणाची मुले इ. इ. विषयांवरती अभ्यासू मते मांडतीलच की. थोडा धिर धरा.
4 May 2012 - 4:29 pm | अँग्री बर्ड
तेच.. विषय कुठे जाणारेय ह्याची कल्पना आहेच.
5 May 2012 - 4:34 pm | प्राध्यापक
किती घाई ?परा विषयाला आताशी कुठे सुरुवात केलीय एव्हडी घाइ नका करु हो?हे फक्त प्रास्ताविक होते,त्यामुळे पुढे लिहीत गेल्यावर प्रतिक्रीया द्या.
दुसरे म्हणजे माझा लेख विषय पानिपत आहे,तुम्ही वरती ज्याचा उल्लेख केलाय तो नाही ,तुम्ही असा ग्रह का करुन घेताय की पानिपत म्हणजे तुम्ही वर जे उल्लेखलेय तेच आहे ,पानिपताच्या पराभवाला आर्थिक सामाजिक राजकिय प्रशासकिय असे बरेच कंगोरे आहेत त्याचाही विचार करावा लागेल पण तुमच्या मनात जर हेच असेल ,तर अश्या पुर्वग्रह दुषित नजरेने तुम्हाला तेच दिसेल.
परा ,मी तुमचेअनेक लेख वाचले आहेत निदान तुमच्या कडुन तरी असल्या (जो मुद्दा मी मांड्लाच नाही त्यावरच्या )प्रतिक्रीयेची अपेक्षा नव्हती ,बाकी याठिकाणी सर्वांना मुक्तपणे प्रतिक्रीया देण्याचे स्वातंत्र्य असल्याने त्या बद्दल न बोललेलेच बरे.
3 May 2012 - 8:09 pm | गणपा
प्रास्ताविक बरच तोकडं आहे. जरा मोठा भाग आला असता तर थोडा फार लेखमाले बद्दल अंदाज आला असता.
असो, इतक्यात न्याय करणे योग्य होणार नाही.
तस्मात पुढिल भागाची वाट पहातो.
3 May 2012 - 9:38 pm | मुक्त विहारि
गणपा ह्यांच्याशी सहमत...
3 May 2012 - 11:15 pm | अशोक पतिल
अजुन येवु द्या ! मीमांसा योग्यच आहे.
4 May 2012 - 5:55 am | ५० फक्त
म्हणजे थोडक्यात सत्तेचे केंद्रिकरण आणि विकेंद्रिकरण असा प्रश्न आहे तर , अरे बापरे आता सुद्धा केंद्र आणि राज्यात यावरुनच वाद चालु आहेत, पुन्हा एक पानिपत होते की काय आता ?
4 May 2012 - 9:56 am | नितिन थत्ते
गणपा यांच्याशी सहमत.
पानिपत बद्दल थोडेसे म्हणजे इतके 'थोडेसे' नसावे.
4 May 2012 - 10:45 am | रमताराम
असेच बोल्तो. बयाजवार येऊं द्या मालक.
12 May 2012 - 8:36 pm | llपुण्याचे पेशवेll
म्हातार्या,
भले क्वाटर मारणार असशील तरी सुरुवात स्मॉलनेच करतोस ना? ;)
4 May 2012 - 2:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तपशिलावर लेखन येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
4 May 2012 - 6:15 pm | किसन शिंदे
पुढच्या भागाच्या प्रतिक्शेत..