मुक्तक..सास्वा विरुद्ध सुना

सस्नेह's picture
सस्नेह in जे न देखे रवी...
21 Apr 2012 - 4:15 pm

सास्वा विरुद्ध सुना वाद आहे जुना
तरीही रंगतो अजुनी जसा पानासवे चुना
अल्लड अवखळ नव्हाळी होऊन येते सून
घरातील हिरवाई मात्र झाली असते जून
थिरकत भिरभिरते सून, तिकडे सासूचा डोळा
मनी शंका का ती येई , 'लेक माझा भोळा' ?
सूनही बोले ऐशी की जैसी सावध हरिणी
वरून साखर पेरणी अन मनी वेगळीच करणी
युक्त्या प्रयुक्त्या, पेच डावपेच सरळ न हा लढा
शस्त्रे अस्त्रे अन वार प्रहारांनी सुटेल का हो तिढा ?
मूक वाद अन प्रकट संवाद कळे न आल्यागेल्याला
ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी हे माहित असे घराला
आज सरशी सासूची तर उद्या असते सुनेची
होता होता एक दिवस सासू होते सुनेची
सुरु होतो नवीन जमाना...
पुन्हा सास्वा विरुद्ध सुना...!

हास्यमुक्तकविडंबन

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

21 Apr 2012 - 4:24 pm | परिकथेतील राजकुमार

माननीय शिल्पा ब ह्यांच्या प्रतिसादाची वाट बघत आहे.

शिल्पा ब's picture

23 Apr 2012 - 10:20 am | शिल्पा ब

अय्या गडे!! माझ्या प्रतिसादाने का काही फरक पडणार आहे? आमच्या सारख्या योद्धीणीने "तुम्ही लढत रहा" यापलिकडे काय सांगणे अपेक्षीत आहे श्री श्री पराकुमार यांना?

पैसा's picture

21 Apr 2012 - 4:44 pm | पैसा

:D

नरेंद्र गोळे's picture

21 Apr 2012 - 6:36 pm | नरेंद्र गोळे

आवडली.

सुरु होतो नवीन जमाना...
पुन्हा सास्वा विरुद्ध सुना...!>>>> म्हणजे नव्या सुनेसोबत ना!

स्पंदना's picture

22 Apr 2012 - 10:25 am | स्पंदना

काय गो? बाय ना तु? आन अस भांड फोडते आपल? ह्ये अस खर खर लिहिण शोभत नाय ना गो आपणास.
आपण कस ,"माझी पुर्व जन्मीची माय्/लेक ती" अस बोलायच, पण आतल खर नाय ना अस उघड उघड सांगायच. मीच बघ आत्ता नुकतीच स्काइप वरुन मझ्झ्या सासुबाईंच्या साडीची किती कौतुक केली.

ओहो ! ते बरिक चुकलंच गं माझं अपर्णाताई...
पण मला नाही वाटत, यात काही 'शिक्रेट' असेल !
हम्म.., कोण्या पु. आयडीनेच ते सांगावं..

पिवळा डांबिस's picture

22 Apr 2012 - 11:26 pm | पिवळा डांबिस

पण मला नाही वाटत, यात काही 'शिक्रेट' असेल !
हम्म.., कोण्या पु. आयडीनेच ते सांगावं..
जरूर, जरूर!!!!!
सर्वप्रथम या अतिशय गहन विषयावर पु.चे मत मागितल्याबद्दल पु.जातीच्या वतीने अनेक अनेक धन्यवाद!!
:)
आता बायकांबायकांमधेच हे शिक्रेट असल्यास ठाऊक नाही!
हे पु. पासून शिक्रेट नक्कीच नाही. कारण त्यांना दोन्ही बाजूंकडून नसती कटकट ऐकत बसावी लागते!!!!

(यज्ञकुंडामध्ये माझ्या वतीने इतके घासलेट ओतून झाल्यावर आता मी निश्चिंत मनाने पॉपकॉर्न आणायला जातो!!!!)
:)

इतरांनी सुद्धा आस्वाद घ्यावा...! म्हणून हा धागा उचकटतो आहे.