खिडकीतुन पाहताना...

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
16 Apr 2012 - 6:05 pm

काय हाय मंडळी मला कधी कधी लयं म्हणजी लयं कंटाळा येतुया...
मग करायचं तरी काय ?
मस्त पैकी खिडकी समोर उभ राह्याचं, अन् बाहेरच्या जगात डोकवुनशान पाहायाच...
कसं ?
तर
ते
असं...

१) खार धावताना टिपली...काय बरं खाण्याचं या निस्पर्ण वॄक्षावर मिळत असेल तिला ?

२)हल्ली म्हणे पिंडाला शिवण्यासाठी पण कावळा दिसत नाही ! पण हा नमुना दिसला मला...खारी नंतर हा सुद्धा शोधक नजरेनेच आला...

३)मग ही सुंदर जोडी दिसली... ;) एक गप्प तर दुसरा जांभळ टिपण्यात मग्न. :)

४)गायीला देवळा बाहेर उभे करुन चारा खायला घालणे हा मोठा फायद्याचा उद्योग आहे, हे ठावुक आहे का तुम्हाला ?

५) ही मंडळी रातच्याला लयं बाजार उठवतात ! उन्हाळा वाढल्याने जीभ बाहेर काढुन जरा विचार करतोय वाटतं.

६) रस्त्याची सफाई करणारी महिला कर्मचारी... अगदी प्रामाणिकपणे काम करण्यात मग्न होती.

७)किती उन्हाळा आहे म्हणुन सांगु तुम्हाला... घामाच्या धारा लागतात पहा.

८) सध्या दिवस परिक्षेचे आहेत...

९)काही जणाच्या आयुष्यात अभ्यास तर काहींचा रस्ता हेच आयुष्य !

१०) क्षणभर विश्रांती...

११)आई... हे २ शब्दच पुरे.

१२) रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेली स्त्री.

१३)चल मेरी लुना,असं म्हणायचे दिवस कधीच गेले !

१४)सोडियम व्हेपरच्या प्रकाशाखाली रिक्षा पुसणारा रिक्षावाला...

काहींना परवानगी न-घेता फोटो काढलेले आवडत नाही ! पण मोबाईल कॅमेर्‍याच्या सध्याच्या जगात कोणा कोणाची परवानगी घेणार ?
तरी सुद्धा या धाग्यात स्त्रीयांचे चेहेरे टाळण्याचा मी प्रयत्न केला आहे,एकाच फोटोत ते शक्य झालेले नाही.
फोटोग्राफरच्या नजरेला फक्त सब्जेक्ट दिसतो असं माझ व्यक्तीगत मत आहे आणि इतरांच्या मताचा आदर आहे.
धन्यवाद...
कॅमेरा :- निकॉन डी-५१००
(हौशी फोटुग्राफर) ;)
मदनबाण.....

*टिपः--- फोटो फक्त कंप्रेस केले आहेत्,सॉफ्टवेयर वापरुन कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

छायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

दंडवत!
११ नंबरच्या फोटोसाठी सरळ सरळ दंडवत, ६ नंबरचा फोटो साष्टांग!
बाकि सारे ही खुपच छान पण हे दोन खुपच भावले.

पियुशा's picture

17 Apr 2012 - 10:44 am | पियुशा

झक्कास रे मामु :)
मला त्या बाळाचा अन आइचा फोटो सगळ्यात जास्ती आवडला आहे :)

प्यारे१'s picture

17 Apr 2012 - 5:28 pm | प्यारे१

मामु ऐवजी मदनबाण वाचावे. ;)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

11 Jul 2012 - 9:49 am | घाशीराम कोतवाल १.२

+ १ त्या बाळाचा आणि त्याच्या आईच्या मायेचा फोटु खरच झकास

सगळेच अप्रतिम !
मस्त! सुंदर!

परिकथेतील राजकुमार's picture

16 Apr 2012 - 6:31 pm | परिकथेतील राजकुमार

शिर्षकाने अपेक्षा वाढवल्या होत्या.. तेवढ्या पूर्ण झाल्या नाहीत.

सुहास झेले's picture

16 Apr 2012 - 6:45 pm | सुहास झेले

मस्त रे बाणा.... सर्व फोटो आवडले, विशेषतः आईचा !!

लगे रहो :) :)

५० फक्त's picture

16 Apr 2012 - 7:07 pm | ५० फक्त

मस्त फोटो, फेसबुकावर चोरी करुन लावले जाणार नाहीत याची काळजी घ्या.

पैसा's picture

16 Apr 2012 - 7:14 pm | पैसा

सगळेच छान आलेत!

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2012 - 7:25 am | अत्रुप्त आत्मा

आई/पोरा चा एकच फोटो म्हणजे या धाग्याचं सार्थक,केवळ ग्रेट ग्रेट आणी ग्रेट...! :-)

चित्रगुप्त's picture

17 Apr 2012 - 8:44 am | चित्रगुप्त

सर्व फोटो आवडले.
तुम्ही ज्या खिडकीतून हे फोटो काढले, त्या खिडकीचा/घराचा आजूबाजुच्या परिसरासह फोटोही द्या ना, म्हणजे जास्त आकलन होइल या विषयाचे.

तुम्ही ज्या खिडकीतून हे फोटो काढले, त्या खिडकीचा/घराचा आजूबाजुच्या परिसरासह फोटोही द्या ना, म्हणजे जास्त आकलन होइल या विषयाचे.
धन्यवाद...
ह्म्म... हा ही विचार माझ्या मनात आला होता,पण ग्रील लावलेल्या खिडकीचा फोटो द्यायचा का ? असा प्रश्न पडला.
तरी सुद्धा आपण म्हणत असाल तर तो फोटो काढुन टाकण्याचा प्रयत्न करतो.

ह्म्म...

आता ज्या खिडकीतुन मी डोकावतो ती पहा:-


मुळातच हा धागा टाकण्या आधी विचार केला की ग्रील लावलेले असुन सुद्धा फोटो कसे काढता येतील ते ही ग्रील मधे न येता, आई हा विषय असलेला फोटो पाहिलात तर त्या स्त्रीच्या अवती-भवती जो काळेपणा आला आहे तो याच ग्रील मुळे... फोटो अगदी साधेच काढले कारण जे पाहतो तेच टिपावे असे ठरवले होते,मग साधा कुत्रा का होईना... मला याही स्थितीत कितपत डिटेल्स टिपता येतील / येतात याची पडताळणी करण्यासाठी मी केलेला उद्योग !
या आधी कबुतराचे फोटो देखील याच खिडकीतुन डोकावुन काढले आहेत...

चित्रगुप्त's picture

17 Apr 2012 - 10:45 pm | चित्रगुप्त

खिडकीचा पहिला फोटो अतिशय आवडला.

प्रीत-मोहर's picture

17 Apr 2012 - 9:37 am | प्रीत-मोहर

११ नंबर लै लै आवडल्या गेला आहे :)

ऋषिकेश's picture

17 Apr 2012 - 9:44 am | ऋषिकेश

वर अनेकांनी म्हटले आहे तेच म्हणतो. आईचा फोटो क्लास आहे. बाकी ठीक

कुंदन's picture

17 Apr 2012 - 9:44 am | कुंदन

या वेळी काही विशेष लिंका दिसल्या नाहीत.

मदनबाण's picture

17 Apr 2012 - 9:47 am | मदनबाण

या वेळी काही विशेष लिंका दिसल्या नाहीत.
कुछ समझ्या नही रे मुझको ? कसल्या लिंका ?

११ नंबर सोडल्यास बाकि ठीक ठाक

राजघराणं's picture

17 Apr 2012 - 5:41 pm | राजघराणं

काय बर करू?

राजघराणं's picture

17 Apr 2012 - 5:47 pm | राजघराणं

लै भारी १२ नं. दिसल्ए फोटू एकदाचे

जयवी's picture

17 Apr 2012 - 6:04 pm | जयवी

आवडेश :) छान टिपले आहेस !!

मी कस्तुरी's picture

18 Apr 2012 - 11:21 am | मी कस्तुरी

झक्कास, छान आहेत फोटो :)

jaypal's picture

19 Apr 2012 - 6:30 pm | jaypal

फोकसिंग + क्लॅरीटी अजुन हवी होती. :-( या प्रकारच्या फोटोग्राफीला बहुदा "कॅंडीड फोटोग्राफी' म्हणतात.
अवांतर : बाण्स तुला घरी येवढ कडी कुलपात आधीपासुनच बंदीस्त ठेवतात का रे? (संदर्भ खिडकीचे फोटो ;-))

विकास's picture

19 Apr 2012 - 6:50 pm | विकास

फोटो आणि त्यांचे मथळे आवडले. ११ नंबरचा ("आई") फोटो खूपच छान आहे.

सर्व मायबाप प्रतिसादकांना थांकु बरं का ! :)

@ जयपाल.
अवांतर : बाण्स तुला घरी येवढ कडी कुलपात आधीपासुनच बंदीस्त ठेवतात का रे? (संदर्भ खिडकीचे फोटो )
===>
खीखीखी ! म्या लयं उचापती करनारा हाय नव्हं म्हणुनशान ! ;)