✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खिडकीतुन पाहताना...

म
मदनबाण यांनी
Mon, 04/16/2012 - 18:05  ·  लेख
लेख
काय हाय मंडळी मला कधी कधी लयं म्हणजी लयं कंटाळा येतुया... मग करायचं तरी काय ? मस्त पैकी खिडकी समोर उभ राह्याचं, अन् बाहेरच्या जगात डोकवुनशान पाहायाच... कसं ? तर ते असं... १) खार धावताना टिपली...काय बरं खाण्याचं या निस्पर्ण वॄक्षावर मिळत असेल तिला ? २)हल्ली म्हणे पिंडाला शिवण्यासाठी पण कावळा दिसत नाही ! पण हा नमुना दिसला मला...खारी नंतर हा सुद्धा शोधक नजरेनेच आला... ३)मग ही सुंदर जोडी दिसली... ;) एक गप्प तर दुसरा जांभळ टिपण्यात मग्न. :) ४)गायीला देवळा बाहेर उभे करुन चारा खायला घालणे हा मोठा फायद्याचा उद्योग आहे, हे ठावुक आहे का तुम्हाला ? ५) ही मंडळी रातच्याला लयं बाजार उठवतात ! उन्हाळा वाढल्याने जीभ बाहेर काढुन जरा विचार करतोय वाटतं. ६) रस्त्याची सफाई करणारी महिला कर्मचारी... अगदी प्रामाणिकपणे काम करण्यात मग्न होती. ७)किती उन्हाळा आहे म्हणुन सांगु तुम्हाला... घामाच्या धारा लागतात पहा. ८) सध्या दिवस परिक्षेचे आहेत... ९)काही जणाच्या आयुष्यात अभ्यास तर काहींचा रस्ता हेच आयुष्य ! १०) क्षणभर विश्रांती... ११)आई... हे २ शब्दच पुरे. १२) रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेली स्त्री. १३)चल मेरी लुना,असं म्हणायचे दिवस कधीच गेले ! १४)सोडियम व्हेपरच्या प्रकाशाखाली रिक्षा पुसणारा रिक्षावाला... काहींना परवानगी न-घेता फोटो काढलेले आवडत नाही ! पण मोबाईल कॅमेर्‍याच्या सध्याच्या जगात कोणा कोणाची परवानगी घेणार ? तरी सुद्धा या धाग्यात स्त्रीयांचे चेहेरे टाळण्याचा मी प्रयत्न केला आहे,एकाच फोटोत ते शक्य झालेले नाही. फोटोग्राफरच्या नजरेला फक्त सब्जेक्ट दिसतो असं माझ व्यक्तीगत मत आहे आणि इतरांच्या मताचा आदर आहे. धन्यवाद... कॅमेरा :- निकॉन डी-५१०० (हौशी फोटुग्राफर) ;) मदनबाण..... *टिपः--- फोटो फक्त कंप्रेस केले आहेत्,सॉफ्टवेयर वापरुन कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
11766 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

दंडवत! ११ नंबरच्या फोटोसाठी

स्पंदना
Mon, 04/16/2012 - 18:22 नवीन
दंडवत! ११ नंबरच्या फोटोसाठी सरळ सरळ दंडवत, ६ नंबरचा फोटो साष्टांग! बाकि सारे ही खुपच छान पण हे दोन खुपच भावले.
  • Log in or register to post comments

झक्कास रे मामु मला त्या

पियुशा
Tue, 04/17/2012 - 10:44 नवीन
झक्कास रे मामु :) मला त्या बाळाचा अन आइचा फोटो सगळ्यात जास्ती आवडला आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

+१

प्यारे१
Tue, 04/17/2012 - 17:28 नवीन
मामु ऐवजी मदनबाण वाचावे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

+ १ त्या बाळाचा आणि त्याच्या

घाशीराम कोतवाल १.२
Wed, 07/11/2012 - 09:49 नवीन
+ १ त्या बाळाचा आणि त्याच्या आईच्या मायेचा फोटु खरच झकास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

सगळेच अप्रतिम ! मस्त! सुंदर!

यकु
Mon, 04/16/2012 - 18:24 नवीन
सगळेच अप्रतिम ! मस्त! सुंदर!
  • Log in or register to post comments

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/16/2012 - 18:31 नवीन
शिर्षकाने अपेक्षा वाढवल्या होत्या.. तेवढ्या पूर्ण झाल्या नाहीत.
  • Log in or register to post comments

मस्त रे बाणा.... सर्व फोटो

सुहास झेले
Mon, 04/16/2012 - 18:45 नवीन
मस्त रे बाणा.... सर्व फोटो आवडले, विशेषतः आईचा !! लगे रहो :) :)
  • Log in or register to post comments

मस्त फोटो, फेसबुकावर चोरी

५० फक्त
Mon, 04/16/2012 - 19:07 नवीन
मस्त फोटो, फेसबुकावर चोरी करुन लावले जाणार नाहीत याची काळजी घ्या.
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो!

पैसा
Mon, 04/16/2012 - 19:14 नवीन
सगळेच छान आलेत!
  • Log in or register to post comments

आई/पोरा चा एकच फोटो म्हणजे या

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/17/2012 - 07:25 नवीन
आई/पोरा चा एकच फोटो म्हणजे या धाग्याचं सार्थक,केवळ ग्रेट ग्रेट आणी ग्रेट...! :-)
  • Log in or register to post comments

त्या खिडकीचा फोटो

चित्रगुप्त
Tue, 04/17/2012 - 08:44 नवीन
सर्व फोटो आवडले. तुम्ही ज्या खिडकीतून हे फोटो काढले, त्या खिडकीचा/घराचा आजूबाजुच्या परिसरासह फोटोही द्या ना, म्हणजे जास्त आकलन होइल या विषयाचे.
  • Log in or register to post comments

तुम्ही ज्या खिडकीतून हे फोटो

मदनबाण
Tue, 04/17/2012 - 09:42 नवीन
तुम्ही ज्या खिडकीतून हे फोटो काढले, त्या खिडकीचा/घराचा आजूबाजुच्या परिसरासह फोटोही द्या ना, म्हणजे जास्त आकलन होइल या विषयाचे. धन्यवाद... ह्म्म... हा ही विचार माझ्या मनात आला होता,पण ग्रील लावलेल्या खिडकीचा फोटो द्यायचा का ? असा प्रश्न पडला. तरी सुद्धा आपण म्हणत असाल तर तो फोटो काढुन टाकण्याचा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

ह्म्म... आता ज्या खिडकीतुन

मदनबाण
Tue, 04/17/2012 - 17:08 नवीन
ह्म्म... आता ज्या खिडकीतुन मी डोकावतो ती पहा:- Image removed. Image removed. मुळातच हा धागा टाकण्या आधी विचार केला की ग्रील लावलेले असुन सुद्धा फोटो कसे काढता येतील ते ही ग्रील मधे न येता, आई हा विषय असलेला फोटो पाहिलात तर त्या स्त्रीच्या अवती-भवती जो काळेपणा आला आहे तो याच ग्रील मुळे... फोटो अगदी साधेच काढले कारण जे पाहतो तेच टिपावे असे ठरवले होते,मग साधा कुत्रा का होईना... मला याही स्थितीत कितपत डिटेल्स टिपता येतील / येतात याची पडताळणी करण्यासाठी मी केलेला उद्योग ! या आधी कबुतराचे फोटो देखील याच खिडकीतुन डोकावुन काढले आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

खिडकीचा फोटो

चित्रगुप्त
Tue, 04/17/2012 - 22:45 नवीन
खिडकीचा पहिला फोटो अतिशय आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

११ नंबर लै लै आवडल्या गेला

प्रीत-मोहर
Tue, 04/17/2012 - 09:37 नवीन
११ नंबर लै लै आवडल्या गेला आहे :)
  • Log in or register to post comments

आईचा फोटो क्लास

ऋषिकेश
Tue, 04/17/2012 - 09:44 नवीन
वर अनेकांनी म्हटले आहे तेच म्हणतो. आईचा फोटो क्लास आहे. बाकी ठीक
  • Log in or register to post comments

या वेळी

कुंदन
Tue, 04/17/2012 - 09:44 नवीन
या वेळी काही विशेष लिंका दिसल्या नाहीत.
  • Log in or register to post comments

या वेळी काही विशेष लिंका

मदनबाण
Tue, 04/17/2012 - 09:47 नवीन
या वेळी काही विशेष लिंका दिसल्या नाहीत. कुछ समझ्या नही रे मुझको ? कसल्या लिंका ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

११ नंबर सोडल्यास बाकि ठीक ठाक

स्पा
Tue, 04/17/2012 - 09:50 नवीन
११ नंबर सोडल्यास बाकि ठीक ठाक
  • Log in or register to post comments

मला फोटू नाय दिसत

राजघराणं
Tue, 04/17/2012 - 17:41 नवीन
काय बर करू?
  • Log in or register to post comments

१२ नं

राजघराणं
Tue, 04/17/2012 - 17:47 नवीन
लै भारी १२ नं. दिसल्ए फोटू एकदाचे
  • Log in or register to post comments

आवडेश छान टिपले आहेस !!

जयवी
Tue, 04/17/2012 - 18:04 नवीन
आवडेश :) छान टिपले आहेस !!
  • Log in or register to post comments

झक्कास, छान आहेत फोटो

मी कस्तुरी
Wed, 04/18/2012 - 11:21 नवीन
झक्कास, छान आहेत फोटो :)
  • Log in or register to post comments

बाणा

jaypal
गुरुवार, 04/19/2012 - 18:30 नवीन
फोकसिंग + क्लॅरीटी अजुन हवी होती. :-( या प्रकारच्या फोटोग्राफीला बहुदा "कॅंडीड फोटोग्राफी' म्हणतात. अवांतर : बाण्स तुला घरी येवढ कडी कुलपात आधीपासुनच बंदीस्त ठेवतात का रे? (संदर्भ खिडकीचे फोटो ;-))
  • Log in or register to post comments

मस्त

विकास
गुरुवार, 04/19/2012 - 18:50 नवीन
फोटो आणि त्यांचे मथळे आवडले. ११ नंबरचा ("आई") फोटो खूपच छान आहे.
  • Log in or register to post comments

सर्व मायबाप प्रतिसादकांना

मदनबाण
Fri, 04/20/2012 - 13:22 नवीन
सर्व मायबाप प्रतिसादकांना थांकु बरं का ! :) @ जयपाल. अवांतर : बाण्स तुला घरी येवढ कडी कुलपात आधीपासुनच बंदीस्त ठेवतात का रे? (संदर्भ खिडकीचे फोटो ) ===> खीखीखी ! म्या लयं उचापती करनारा हाय नव्हं म्हणुनशान ! ;)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा