मुख मूका घ्यायला सरसावते
आणि त्याच वेळी लपवायचे असतात मला पाठीवरचे व्रण
चणे खाऊन, देशी ढोसुन, हवेत विहार करत माझे मन आणि
शरीर तयार असते, परत एकदा गटारात लोळण्याकरता....
आणि काही केल्या , चावणे बंद करत नाहीत हे डास,
हे ढेकूण ,गटारातील किडे आणि उकीरड्यातुन
माझ्या अंगावर येत रहातात ही पिसवे...
खातच रहातो मी गटारातील घाण थोडे पोट भरण्यासाठी
मेकूड शोधत राहतात माझे हात गाढवाच्या नाकामध्ये
एक कच्चा बेडूक सरकवतो घशात, घास म्हणुन, किंवा चकणा म्हणुन देखील
पण मेलेल्या कावळ्याला पिसां सकट गिळायला लाळ गाळत असते तोंड
बिना दाताचे..
गटारात टाकलेली पाने चावत आणि गिळत.
घाणीचे लेप चढतात काखेत आणि सगळीकडे
आणि रोजच्यासारखे माझे मुख सरावने
आतुरतेने तयार होते परत डुक्कराचा मुका घ्यायला...
प्रतिक्रिया
16 Apr 2012 - 5:36 am | स्पंदना
उलिसक स्वच्छ लिव्हा राव, लय घाण आली बगा, न्हाय विडंबन असल तरी कस टाळी घेण्या सारक असाव न्हाय का? इथ नाक दाबावस वाटुन र्हायल नारे भावा.
ह्ये आपल मला खर्र खर्र मनापासुन वाटल म्हणुन नाही तर तुमच चालु द्या. आपला काय बी इरोध न्हाय.
16 Apr 2012 - 11:06 am | मुक्त विहारि
चूक झाली...
परत नाही होणार अशी चूक...