चार तुपात भिजलेल्या पुरणपोळ्या आणि चार कटाच्या आमटीच्या वाट्या रिचवून पलंगावर पडलो होतो.
गुंगीची चादर हळू हळू चढत खिडकीतून येणार्या प्रकाशाला मंद करत चालली होती.
सुस्तीच्या वजनाने जबडा उघडाच राहून लाळ गळायला आली असताना आणि बंद डोळ्यांसमोर लाल प्रकाशाचा एकच शेवटचा बिंदू उरला असताना खिडकीबाहेर कलकलाट झाला.
पाण्याने भरलेला चंबू खळ्ळकन् फुटावा तसा सगळ्या झोपेचा चकणाचूर झाला.
कोणाची माय व्याली, तिच्यायला.. स्वतः झोपतात मस्त आणि पोरं सोडतात दुसर्याच्या झोपा मोडायला ***चे.
चडफडत तणतणत उठलो आणि खिडकीच्या तापलेल्या गजाला कपाळ लावून खाली पाहिलं.
झाडूवालीला दिलेल्या पुरणपोळीवरून तिची दोन पोरं खिडकीखाली बसून भांडत होती.
चटका बसल्यासारखं डोकं मागं घेतलं आणि गपगुमान परत फिरलो.
उशीखाली डोकं घालून पडलो, पोटातला अपराध पचवण्याचा प्रयत्न करत....
(प्रेरणा: गवि)
प्रतिक्रिया
13 Apr 2012 - 11:25 am | जाई.
सेन्सिबल
13 Apr 2012 - 11:40 am | गवि
विडंबन म्हणून वाचायला घेतलं आणि झडझडून हलवून सोडलंस रे एकदम.. :(
13 Apr 2012 - 3:39 pm | नगरीनिरंजन
जशास तसे. :)
13 Apr 2012 - 11:43 am | ५० फक्त
एक अर्थपुर्ण आणि वास्तव लेखन, धन्यवाद.
13 Apr 2012 - 11:46 am | स्पंदना
नगरी..
एव्हढ हलवलच पाहिजे का?
13 Apr 2012 - 12:18 pm | स्पंदना
होय . चुकल माझ . भावनेच्या भरात लिहुन गेले , पण हल्ली संपादन करता येत नाही ना इथे.
बाकि प्यारे १ लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद, कधी वाईट विचार केलाच नाही त्यामुळे अर्थ वाईट निघेल हे जाणवलच नाही.
13 Apr 2012 - 12:24 pm | मृत्युन्जय
चष्मा बदला राव...!
हलवणे म्हणजे हेलावुन टाकणे. पण तुमच्या डोक्यात काय आलंय????
असे बरेच शब्द एका विशिष्ट क्रियेशीच निगडीत झालेत दुर्दैवानं.
उदाहरणार्थ बलात्कार म्हणजे बळाचा उपयोग्/दुरुपयोग.
याचा उल्लेख आता नेहमीच बलात्कारी संभोग म्हणून केला गेला तरी मूळ अर्थ निव्वळ तेवढाच नाही ना?
रत होणे म्हणजे रमणे. नेहमीच त्यांचा अर्थ संभोगात मग्न होणे असा नसतो.
असंच 'वासना' शब्दाबद्दल आहे बरं. सांगून ठेवलेलं बरं. नाहीतर याल लगेच धावत.
13 Apr 2012 - 1:01 pm | प्यारे१
प्रकाटाआ
13 Apr 2012 - 12:23 pm | प्रीत-मोहर
:(
हे विडंबन सर्वात जास्त आवडल.
13 Apr 2012 - 5:35 pm | मूकवाचक
+१
13 Apr 2012 - 12:38 pm | पियुशा
भावस्पर्शी !!!!
13 Apr 2012 - 12:58 pm | गणपा
हे बेष्ट आहे.
13 Apr 2012 - 1:01 pm | जेनी...
जे कहि लिहिलय ते मनाला भिडनारं आहे ..
हल्लि विडंबन वाचायलाहि एक उत्सुकता असते,प्रत्येकवेळी विडंबन हे विडंबनच असेल अस नाही ,त्यातुन एक सुंदर लेखन मिळतय ....
एकन्दरित विडंबन ह्या प्रकाराला माझा दंडवत ____/\_______
13 Apr 2012 - 3:38 pm | मी_आहे_ना
विडम्बन ते ही गविन्च्या लेखाच असल्यावर, इतक्या उच्च दर्जाचे नसेल तरच नवल.
ननि - खरोखर मनाला भिडणारे लेखन.
13 Apr 2012 - 1:14 pm | पांथस्थ
असं काहि खणखणीत वाचलं की एकदम निगरगट्टं/बोथट झाल्याची जाणीव जागी होते!!
वास्तवाचा झटका आवडला.
13 Apr 2012 - 1:27 pm | पुरणपोळी
काहिहि बरका,
येवढच जर वाईट वाटत होत, तर द्यायच्या अजुन दोन पोळ्या, पोळ्या संपल्या तर पैसे द्यायचे.
आणि आजकाल कोणा झाडुवालीचि मुल पुरणपोळी वरुन भान्डत असतिल असा वाटत नाहि..
13 Apr 2012 - 3:35 pm | सस्नेह
अगदी खरं. आणखी दोन पुरणपोळ्या दिल्या असत्या तर अपराधही गेला असता अन पचनही झालं असतं. वर मूठभर मांसही चढलं असतं. ४ दिवसापूर्वीची गोष्ट. मोलकरीण म्हणाली, 'ताई, तुमच्या शिळ्या चपातीची वाट बघत नातू माझा जेवायचा थांबतो. आमची भाकरी न्हाई खात त्यो. ' काल १ चपती जादा केली अन दिली तिला. बरं वाटलं.
13 Apr 2012 - 3:41 pm | नगरीनिरंजन
:)
पण (गोष्टीतला) सिंह बोलेलच कसा?
13 Apr 2012 - 3:43 pm | गवि
:)
13 Apr 2012 - 4:08 pm | पुरणपोळी
डोळे पाणावले हो हि हकिकत ऐकुन..
13 Apr 2012 - 1:32 pm | कवितानागेश
ह्म्म.... :(
13 Apr 2012 - 9:51 pm | रेवती
सहमत. :(
13 Apr 2012 - 4:06 pm | स्मिता.
आधीची विडंबनं वाचून तसंच हलकं-फुलकं, विनोदी असेल असं गृहीत धरून वाचायला घेतलं आणि वाचून खरंच काहितरी खळ्ळकन् फुटल्यासारखं झालं :(
13 Apr 2012 - 4:07 pm | किसन शिंदे
हे विडंबन सर्वात जास्त आवडलं.
15 Apr 2012 - 12:39 am | सुहास झेले
ह्येच म्हणतो.... विडंबनाच्या गर्दीत एकदम सुन्न करणारं लेखन !!!
13 Apr 2012 - 5:02 pm | मेघवेडा
गविंचं लिखाण त्यांच्या ताकदीचं नव्हतं पण हे मात्र टिपिकल ननि! आवडलं. विडंबन वगैरे म्हणणार नाही. उत्तम आहे.
13 Apr 2012 - 7:41 pm | गणपा
स्वारी अवांतर करतोय.. पण गविंच्या त्या धाग्यावर बरेच जण हेच म्हणाले म्हणुन
पटल नाही.
सचिनकडुन शंभरच हवेत दर वेळी. ८०-९० म्हणजे एकदम 'झ' दर्जा?
काहीस अस वाटल पुर्वार्ध वाचुन. :)
बाकी उतारार्धाशी सहमत. :)
(किरकेटचा जाणकार आहेस म्हनुन तिथल उदाहरण दिल.) :)
13 Apr 2012 - 8:14 pm | मेघवेडा
उदाहरण चांगलं आहे पण याठिकाणी चपखल नाही. सचिनला एकदा आऊट झाल्यावर पुन्हा ती इनिंग्स सुधारण्याची संधी नसते. इथं तसं नसतं. :)
पुन्हा तिथं काढलेल्या धावा हे स्वतःतच एक परिमाण आहे. इथं लिखाणाचा दर्जा प्रत्येक वाचकाला वेगळा भासू शकतो. तो मोजण्यासाठी कुठलं सेट परिमाण नाही, असलंच तर त्या लेखकाचं पूर्वीचं लिखाण - त्याच्या सापेक्ष तुलना करता हे लिखाण मला नाही आवडलं. मात्र अशी तुलना करू नये असं म्हणत असलास तर ते नॅचरली अवघड आहे. ते होतंच.
13 Apr 2012 - 5:59 pm | इरसाल
!
13 Apr 2012 - 7:21 pm | पैसा
खास निरंजनी स्टाईल लिखाण खूप आवडलं.
13 Apr 2012 - 7:47 pm | मराठे
गविंचं मूळ स्फुट आणि त्यावरची सगळी विडंबनं वाचली.
विडंबन म्हणजे विनोदीच असलं पाहिजे असं नाही... याची आठवण करून दिल्याबद्धल धन्यवाद. (अर्थात विनोदी विडंबनामधेही काही वावगं नाही).
13 Apr 2012 - 8:15 pm | Pearl
एकदम ननि स्टाइल लिखाण आवडलं.
नेहमीप्रमाणे चाबूक... :-)
>>कोणाची माय व्याली, तिच्यायला.. >>
फक्त हे आवडलं नाही... :-/ संताप व्यक्त करायला अशा शिव्या लिखाणात आल्याच पाहिजेत असं वाटतं नाही. असो.
14 Apr 2012 - 1:27 am | विश्वनाथ मेहेंदळे
अण्णा हजारेंनी सरकारबद्दल बोलताना मागे (९० च्या दशकात) "वांझेच्या वेदना" शब्द वापरला म्हणून काही स्त्रीमुक्ती वाल्या संघटना तापल्या होत्या. तुम्ही होता का हो त्यात ?? :-)
स्वगत :- माय व्याली ही शिवी आहे ?? च्यामारी ...बसवला टेम्पोत....
14 Apr 2012 - 3:48 am | Pearl
काय आहे ना विश्वनाथ जी,
आतापर्यंत इतक्या जणांकडून 'बाळ' झाल्याच्या वार्ता ऐकल्या.
पण 'माय व्याली' हे वाक्य मनुष्यासंदर्भात तरी ऐकले नाहिये. ...
त्यामुळे (माझ्या शिव्यांसंदर्भातल्या अतिशय लिमिटेड ज्ञानानुसार ) मला तरी ते अपशब्द वाटतात.
17 Apr 2012 - 10:45 am | विश्वनाथ मेहेंदळे
माय विण्याचे काय घेऊन बसलात, आत्या गाभण राहिल्याचे किस्से पण आहेत मिपावर. थोडे खोदकाम करा, काही रत्ने मिळून जातील.
ही तशी रूढार्थाने शिवी नाही आहे हो.
13 Apr 2012 - 10:12 pm | सोनल कर्णिक वायकुळ
नचिकेतच म्हणुन वाचायल घेतल चटकन. पण हे विडम्बन 'क्लास'. चटका.
14 Apr 2012 - 1:50 am | निनाद मुक्काम प...
अंतर्मुख करणारे मनाला चटका लावणारे लेखन