गंध ओला..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
13 Jun 2008 - 1:22 pm

रानातल्या पाखरांची रूणझुण किलबील
वारा ओल्या गंधासवे घुमवीतो गूढशीळ

वळवाचा नादधुंद, मोतियांची गारपीट
धरा जणू मुग्धावते, वैशाखाचा आला वीट

दिप्तीमान वीजधार , मेघांचीही धडपड
दडे पाऊस भिजुनी, तुझ्या पदराच्या आड

निथळते रूप तुझे, रोमांचित देहसारा
केसातूनी वाहताती वितळल्या शुभ्र गारा

थेंब वेडा ओघळतो गालावरूनीया ओठी
ओठ माझे अधिर हे , तया टिपण्यासाठी

आसमंती वाहीला गं, सूरसाज पावसाचा
ओली तू अन ओला मी, क्षण हा संयमाचा

(छातिवरी विसावूनी ऐक श्वास माझे राणी
विश्व माझे तुझ्या ठायी, बोलले ना तुला कोणी??)

भीजवतो क्षणभर, वळवाचा गं पाऊस
फिरूनिया बरसेल, सखे नको गं जाऊस...

- प्राजु

कविताप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

13 Jun 2008 - 1:34 pm | स्वाती राजेश

पावसाचा पुरेपुर उपभोग घेतलेला दिसतो आहे.....
आणि सोबत आता जोडीदार आला म्हटल्यावर तर कविता सुचेल नाहीतर काय होईल...(जगदीशभाउजी भारतात आले आहेत असे गृहीत धरून लिहीले.:))

मस्त कविता....खूप दिवसांनी लिहिली आहेस...:) वाट पाहात होतो तुझ्या कवितेची.....

काळा_पहाड's picture

13 Jun 2008 - 1:42 pm | काळा_पहाड

पावसाचा पुनःप्रत्यय तुझीया कवितेतुन
कॉतुकाचे बोल आले आपसुक धावुन

सुंदर >>अप्रतिम
काळा पहाड

उदय सप्रे's picture

13 Jun 2008 - 2:20 pm | उदय सप्रे

सुंदर आहे काव्य !

विशेषतः ह्या ओळी :

(छातिवरी विसावूनी ऐक श्वास माझे राणी
विश्व माझे तुझ्या ठायी, बोलले ना तुला कोणी??)

मस्तच.....

उदय सप्रे

अरुण मनोहर's picture

13 Jun 2008 - 3:26 pm | अरुण मनोहर

पावसाचे उत्तम भावभरे वर्णन.

वळवाचा नादधुंद, मोतियांची गारपीट
धरा जणू मुग्धावते, वैशाखाचा आला वीट

पुढचा वैशाख एक वर्ष दूर आहे. सर्व मिपाकरांना हा पावसाळा अशाच आणखी कवितांनी नादधुंद करो हीच सदीच्छा.

चेतन's picture

13 Jun 2008 - 3:55 pm | चेतन

वळवाचा नादधुंद, मोतियांची गारपीट
धरा जणू मुग्धावते, वैशाखाचा आला वीट

एकदम मस्त....

निथळते रूप तुझे, रोमांचित देहसारा
केसातूनी वाहताती वितळल्या शुभ्र गारा

सही....

आसमंती वाहीला गं, सूरसाज पावसाचा
ओली तू अन ओला मी, क्षण हा संयमाचा

हे ही सुंदर

दिप्तीमान वीजधार , मेघांचीही धडपड
दडे पाऊस भिजुनी, तुझ्या पदराच्या आड

यातं मला नक्की नाही सांगता येतं पण काही तरी बिघडलयं (बहुतेक नाद / यमक)?
:?

अजुन येउ देत

ओलावलेला चेतन

पद्मश्री चित्रे's picture

13 Jun 2008 - 4:36 pm | पद्मश्री चित्रे

भीजवतो क्षणभर, वळवाचा गं पाऊस
फिरूनिया बरसेल, सखे नको गं जाऊस...

मस्तच..

रामराजे's picture

13 Jun 2008 - 4:54 pm | रामराजे

भीजवतो क्षणभर, वळवाचा गं पाऊस
फिरूनिया बरसेल, सखे नको गं जाऊस...

बढिया है!

कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर निदान कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व
आहे!

शितल's picture

13 Jun 2008 - 4:58 pm | शितल

सर्वच काव्य रचना मस्त
कविता आवडली.

वरदा's picture

13 Jun 2008 - 5:29 pm | वरदा

सुंदर आहेगं प्राजु...अशा वेगळ्या ओळी नाही काढता येणार..
भारतवारी एकदम सुंदर चाल्लेली दिसतेय्...बाकी स्वाती म्हणते तेच....

भाग्यश्री's picture

13 Jun 2008 - 11:06 pm | भाग्यश्री

सहमत !!

खूप आवडली कविता !
http://bhagyashreee.blogspot.com/

बेसनलाडू's picture

13 Jun 2008 - 11:12 pm | बेसनलाडू

आंतरजालीय स्नेही चित्तर यांनी एके ठिकाणी दिलेला एक प्रतिसाद येथे जसाच्या तसा उधृत करावयाचा मोह आवरत नाही -
कविता वाचून गालावरून मोरपीस फिरवल्यागत झाले :)
निथळते रूप तुझे, रोमांचित देहसारा
केसातूनी वाहताती वितळल्या शुभ्र गारा
थेंब वेडा ओघळतो गालावरूनीया ओठी
ओठ माझे अधिर हे , तया टिपण्यासाठी
हे विशेष आवडले. फारच रोम्यान्टिक हो ;)
केसातून गारा वाहणे मात्र जरा खटाकलेच. गारा ऐवजी दुसरे काही वाहू शकले असते काय,याचा विचार करतो आहे.
(आस्वादक)बेसनलाडू

पक्या's picture

13 Jun 2008 - 11:22 pm | पक्या

छान कविता.
भीजवतो क्षणभर, वळवाचा गं पाऊस
फिरूनिया बरसेल, सखे नको गं जाऊस...

हे आवडले.

>>केसातून गारा वाहणे मात्र जरा खटाकलेच. गारा ऐवजी दुसरे काही वाहू शकले असते काय,याचा विचार करतो आहे. -
अहो पण बेसनलाडू , त्या नुसत्या गारा नाहीयेत...वितळल्या शुभ्र गारा असा उल्लेख आहे. म्हणजे गारा वितळून त्यांचे पाणीच वहात आहे. त्यामुळे तसे काही त्यात खटकण्यासारखे नाही.

बेसनलाडू's picture

14 Jun 2008 - 12:10 am | बेसनलाडू

वितळल्यावर त्या गारा राहत नाहीत,असे वाटते;त्यामुळे खटकले.स्थायू अवस्थेत त्यांना गारा म्हणता येईल,पण द्रवावस्थेत गारा(?) पटले नाही (आणि मग खटकले) असो.
(पदार्थवैज्ञानिक)बेसनलाडू

झंप्या's picture

17 Jun 2008 - 9:24 am | झंप्या

पदार्थ वैज्ञानिक लाडवा, तू कविता वगैरे वाचायच्या भानगडीत कसा पडलास रे?
घरचा अभ्यासः 'जे न देखे रवी ते देखे कवी' मधले पदार्थ विज्ञान शोधून दाखव पाहू :)

मुक्तसुनीत's picture

13 Jun 2008 - 11:24 pm | मुक्तसुनीत

कविता आवडली. पहिल्या दर्जाची रेखीव रचना. काही ठिकाणी छंदाचे बोट सुटले आहे ; पण एकूण परिणाम उत्तम साधला आहे. इंदिराबाईंच्या कवितेची आठवण झाली.

चतुरंग's picture

13 Jun 2008 - 11:38 pm | चतुरंग

एका सुंदर प्रणयकाव्याचा आनंद मिळाला!

चतुरंग

सुवर्णमयी's picture

13 Jun 2008 - 11:50 pm | सुवर्णमयी

प्राजु, कविता आवडली. मस्त

विसोबा खेचर's picture

14 Jun 2008 - 12:36 am | विसोबा खेचर

आसमंती वाहीला गं, सूरसाज पावसाचा
ओली तू अन ओला मी, क्षण हा संयमाचा

धत तरीकी! इतकं सुंदर वातावरण असताना जळ्ळा तो संयम करायचा काय? अरे अश्या धुंद वातवरणात संयम नाही सोडायचा तर मग काय मजा? :)

साला, संयमबिय्यम कसला आलाय? असे क्षण भरभरून जगायचे असतात!

असो,

प्राजू, जियो..! पाऊसकविता आवडली, छानच केली आहेस...

तात्या.

प्राजु's picture

14 Jun 2008 - 9:05 am | प्राजु

आपणा सर्वांचे मनापासून अभार..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पद्माकर टिल्लु's picture

16 Jun 2008 - 8:41 pm | पद्माकर टिल्लु

उत्तम कविता !!!!खुप दिवसानी छान वाचायला मिळले. माझ्या अशाच जुन्या आठवणी ना उजाळा मिळाला .

छातिवरी विसावूनी ऐक श्वास माझे राणी
विश्व माझे तुझ्या ठायी, बोलले ना तुला कोणी??)

क्या बात है!!!!

पद्माकर

शेखस्पिअर's picture

16 Jun 2008 - 9:00 pm | शेखस्पिअर

लिहिणार्‍याने लिहीत जावे..
वाचणार्‍याने वाचत जावे...
वाचणार्‍याने एक दिवस...
लिहीणार्‍याचे पेनच घ्यावे...

फारच सुंदर...

प्राजु's picture

16 Jun 2008 - 9:14 pm | प्राजु

पद्माकर, शेकस्पिअर..
आपलेही मनापासून धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुचेल तसं's picture

17 Jun 2008 - 9:02 am | सुचेल तसं

आपली कविता सहज समजणारी आणि सुंदर आहे.

http://sucheltas.blogspot.com

झंप्या's picture

17 Jun 2008 - 9:18 am | झंप्या

पाचवी ते सहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्या सारखी कविता. मुलांना लहानपणापासुनच कवितेची गोडी लावण्यासाठी खूप उपयोगी येईल. फरच छान!

प्राजु's picture

17 Jun 2008 - 5:10 pm | प्राजु

झंप्याशेठ,
आपण माझी स्तुती केली आहे की, माझ्या बाल बुद्धीचे वाभाडे काढले आहेत?? ;)
जरा सविस्तर लिहा.. बाकी माझी कविता समजायला सोपी आहे हे वाचून बरे वाटले.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

17 Jun 2008 - 6:15 pm | विसोबा खेचर

आपण माझी स्तुती केली आहे की, माझ्या बाल बुद्धीचे वाभाडे काढले आहेत??

जाऊ दे गं प्राजू! काही अतृप्त नमोगती आत्मे मिपावर भटकत असतात. तुझी इतकी सुंदर कविता त्यांना पचायला जरा जडच गेली. त्यामुळे मग तिला बालबुद्धीची वगैरे म्हणून हिणवण्यातच मग हे अतृप्त आत्मे सुख मानतात! :)

तात्या.

विवेक काजरेकर's picture

17 Jun 2008 - 1:40 pm | विवेक काजरेकर

प्राजु

छान लिहिलं आहेस.

फक्त खालील ओळींचा अर्थ पाचवी-सहावीच्या मुलांना समजावताना मास्तरांची काय तारांबळ उडेल याची कल्पना करुन स्वत:शीच हसतोय मी =)) (ज्याचे गाल आहेत त्याचेच ओठ आहेत असं काहीतरी सांगून वेळ मारुन न्यावी लागेल मास्तरांना)

थेंब वेडा ओघळतो गालावरूनीया ओठी
ओठ माझे अधिर हे , तया टिपण्यासाठी

आसमंती वाहीला गं, सूरसाज पावसाचा
ओली तू अन ओला मी, क्षण हा संयमाचा

इतक्या रोमॅंटिक कविता जर पाचवी सहावीला शिकवणार असतील तर आपली तयारी आहे परत त्या वर्गात जाऊन बसण्याची :P

राघव's picture

2 May 2010 - 7:23 pm | राघव

सुंदर कविता! पण या ओळी सगळ्यात जास्त आवडल्यात -

निथळते रूप तुझे, रोमांचित देहसारा
केसातूनी वाहताती वितळल्या शुभ्र गारा

राघव

अविनाशकुलकर्णी's picture

3 May 2010 - 12:36 am | अविनाशकुलकर्णी

मस्त