आनंद, सुख, जगणे इ इ

सहज's picture
सहज in जनातलं, मनातलं
22 Mar 2012 - 5:30 pm

नमस्कार मंडळी. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा! सण आनंदाचा जावो. नववर्षात आनंद, सुख, संपत्ती, समृद्धी लाभो.

पैसा व सुख असे शब्द ऐकले की एखाद्याला फक्त पैसा मोजणारी, कालच्यापेक्षा आज आधीक अशी जीडीपीचा उदो उदो करणारी पाश्चात्य संस्कृती आठवत असेल तर एखाद्याला भूतानच्या राजाने प्रसिद्ध केलेली ग्रॉस नॅशनल हॅपीनेस ही संज्ञा पण आठवत असेल. आता आपण तत्त्ववेत्या भारतीयांना सुख हे मानण्यात असते इतके माहीत असतेच. चला मग सुखाचे ते नेमके मानले गेलेले क्षण कोणते त्याची यादी करुया. तुम्हाला ज्या क्षणांच्या असण्याने समाधान / तृप्ती लाभते ते सांगा.

उदाहरणार्थ माझे काही भाग्याचे क्षण.

१) आईच्या हाताने रविवारी डोक्याला तेल मालीश (आईच्या जागी ताई, तुमची लेक, बायको इ. आवडती व्यक्ती लिहू शकता)
२) रेडीओ ऐकताना एका पाठोपाठ एक अशी तीन आपली आवडती गाणी लागणे.
३) गरम गरम पोळी त्यावर चमचा-दोन चमचा तूप व किंचीत मीठ पसरुन अथवा लोणच्याची फोड खायला मिळणे
४) जालावर आल्या आल्या आपल्या आवडत्या लेखकाचा लेख / प्रतिसाद वाचायला मिळणे. अथवा आपल्या नावडत्या आयडीने कुठेतरी केलेल्या पांचटपणाला पब्लीकने धू धू धुतलेले वाचायला मिळणे. ;-)
५) सचिनची सेंच्युरी/ ऑलिम्पीक्स मधे पुरुष १०० मीटर धाव स्पर्धा/ कुठल्या खेळातील विश्वविक्रम होताना बघायला मिळणे.
६) कुठल्याही वेळी (शक्यतो दुपारी/रात्री) आडवे पडताच थोड्याच वेळात झोप लागणे, रोज सकाळी विशेष श्रम न होता पोट साफ होणे.

होउन जाउ द्या.

संस्कृतीजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

गणपा's picture

22 Mar 2012 - 5:31 pm | गणपा

सहजरावांच नाव बोर्डावर दिसलं.... म्हटलं आपला प्रतिसाद पहिला असावा म्हणुन ही घाई . ;)
तुर्तास ही निव्वळ पोच.
यादी करायला घेतोय.

शाळेतल्या जिवलग मितत्रांसोबत जुन्या 'आठवणी' काढत रंगलेला गफ्फांचा फड.
चांदण्या रात्री समुद्राकाठच्या वाळुत अनवाणी शतपावली.
धुंद पावसात आवडत्या व्यक्तीसोबत चिंब भिजणं.
गावच्या अंगणात पेटलेल्या शेकोटीची उब.
शेतात बच्चे कंपनी सोबत (मीठ मसाला मारके) पेरु, आवळे, चिंचा, करवंद खात फेर फटका.

सहज's picture

23 Mar 2012 - 2:54 pm | सहज

क्या बात!!! यादी एकदम भारी आहे.

(गणपाचा पंखा) सहज

पैसा's picture

22 Mar 2012 - 5:34 pm | पैसा

बरीच मोठी यादी आहे! या क्षणी हे गाणं ऐकणं आणि तुमचं लिखाण हेच सुख आहे!

अत्रुप्त आत्मा's picture

22 Mar 2012 - 9:20 pm | अत्रुप्त आत्मा

@या क्षणी हे गाणं ऐकणं आणि तुमचं लिखाण हेच सुख आहे! +++++११११११ पैसा तैंशी सहमत :-)

आणी आमचं अत्ताच्या जिवनातलं एकमेव मनमुराद सुख म्हणजे... आमच्या मामांचा गाडीवर कडकमदी येक तर्रीदार करंट मिसळ लाऊन,नंतर येक कलकत्ता १६० पान लावायचं आणी नंतर दोन तास मस्त आसमंतात तरंगायचं,
...बरोबर मोबॉइलवर किशोरचं ''ये जमी गा रही है,आसमाँ गा रहा है,साथ मेरे ये सारा जहाँ गा रहा है...." असं गाणं लावायचं ...अजुन काय पायजे... बोला..

इरसाल's picture

23 Mar 2012 - 11:53 am | इरसाल

आणि हा घ्या.

प्रास's picture

23 Mar 2012 - 12:16 pm | प्रास

बरोबर मोबॉइलवर किशोरचं ''ये जमी गा रही है,आसमाँ गा रहा है,साथ मेरे ये सारा जहाँ गा रहा है...." असं गाणं लावायचं ...

सदर गाणं अमितकुमार (किशोरकुमारांचे सुपुत्र) यांनी म्हंटल्याचं आठवतंय. चित्रपट - तेरी कसम

बाकी सहजरावांशी सहमतच....

खास भटजीबुवांसाठी,

सहज's picture

23 Mar 2012 - 2:51 pm | सहज

धन्यवाद ज्योतिताई, अ आ गुर्जी, इरसाल, प्रास.

वेळ मिळताच अजुनही यादी येउ द्या :-)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Mar 2012 - 7:59 pm | अत्रुप्त आत्मा

@भरपुर झाले ...आता बदला फटू >>> :-D

नव्या वर्षातली इरसाल प्रतिज्ञा :- फोटो मामांच्या कडलाच लाविन,पण दरवेळचा नविन काढुनच :-p

@सदर गाणं अमितकुमार (किशोरकुमारांचे सुपुत्र) यांनी म्हंटल्याचं आठवतंय. चित्रपट - तेरी कसम >>> हा राव तिच्यायला...! नंतर डोसक्यात आलवत... चुक सुधारल्या बद्दल धन्यवाद... हो प्रास भौ :-)

चिरोटा's picture

22 Mar 2012 - 5:39 pm | चिरोटा

कामाच्या ठिकाणाहून घरी जाताना रिकामी बस आणि ती ही वेगात जाणारी.
रविवार संध्याकाळची बाजारातील कमी गर्दी.

घरात आपण एकटे असणं, त्यामुळे टीव्हीचा रीमोट आपल्या पूर्ण मालकीचा असणं.. त्याचवेळी नॅट जिओवर "नॅट जिओ इन्व्हेस्टिगेट्स" किंवा "एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशन" पैकी एखादा कार्यक्रम लागावा..

बस्स....

इरसाल's picture

22 Mar 2012 - 5:53 pm | इरसाल

तो पाहुन झाल्यावर दुसर्यादिवशी "गविं" चा त्याच विशयावरचा लेख वाचायला मिळणे.

बाकीचे नंतर.

गवी तुम्हाला विमानाची शप्पत आहे, कृपया २६ एप्रिल पर्यंत एअर क्रश हा शब्द कुठे टंकू नका, प्लीज.
काळजात एकदम धस्स होत.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Mar 2012 - 5:57 pm | परिकथेतील राजकुमार

गवी तुम्हाला विमानाची शप्पत आहे, कृपया २६ एप्रिल पर्यंत एअर क्रश हा शब्द कुठे टंकू नका, प्लीज.

आपण विमानाने कुठेतरी बोंबलत जाणार आहोत (अथवा कोणितरी परिचीत विमानाने बोंबलत येणार आहे) हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न !

तुझ म्हणन एकदम करेक्ट आहे.
ते खालाच आईच्या हातची भाजी भाकरी कन्सल.त्याला दुसरा नंबर.
- गाविंच्या त्या लेखमालेची आठवण न होण.अरे मी t.v . सिरीयलला घाबरले नाही तेवढी गाविंच्या लेखनातून घाबरलीये.(तुला नाहि भिति वाटलि?)

सहज's picture

23 Mar 2012 - 2:48 pm | सहज

टीव्हीचा रीमोट आपल्या पूर्ण मालकीचा असणं

हे मात्र खरेच!

बादवे गवि ती मालीका बघताना हे आता लिहून मिपावर टाकायचे असे होते का? मी जेव्हा रेस्टॉरंटात जातो तेव्हा टेबलच्या शेजारुन वेटर डिश घेउन जाताना हा फोटो काढायचा मिपावर टाकायचा असे आठवते पण डिश समोर आली की तो वर काटा-चमच्याने सुरवात झाली असते. :-)

परिकथेतील राजकुमार's picture

22 Mar 2012 - 5:56 pm | परिकथेतील राजकुमार

मार्च एप्रिल च्या महिन्यात सहजमामा बाटलीसह आमच्या छोट्याश्या दुकानात जी हजेरी लावतात तोच आमच्यासाठी भाग्याचा क्षण. ;)

आईच्या हाताची मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी खायाचीये.
आता आईला कितीही बोलले तरी ती काही करणार नाही.लेक येतीये म्हणल्यावर घरी पोहोचण्याआधीच सुरमई,बांगडा तयार असतात. पण आईच्या हातची मेथीची सर त्याला कुठून येणार.

मोहनराव's picture

22 Mar 2012 - 6:14 pm | मोहनराव

सुरमई,बांगडा पण चांगलाच की!! मजा आहे बुवा!!

सहज's picture

23 Mar 2012 - 2:42 pm | सहज

ह्या धाग्यात आवडते पेय चहाप्रमाणे आवडती भाजी मेथी दिसते आहे!
आईच्या हातच्या मेथीला माझा पण +१

छोटा डॉन's picture

22 Mar 2012 - 6:18 pm | छोटा डॉन

तूर्तास आवर्जुन सांगावे असे काही म्हणजे सहजमामांचे लेखन हे आमच्यासाठी आनंद, सुख वगैरे सर्व प्रकारात व ते वाचता वाचता जगणे होते.
हा धागा पाहुन आनंद झाला.
बाकी एकेक सविस्तर नंतर खरडु सवडीने.

- (सहजमामांचा फ्यान) छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

22 Mar 2012 - 6:30 pm | परिकथेतील राजकुमार

बाकी एकेक सविस्तर नंतर खरडु सवडीने.

असे घडल्यास केवळ आम्हालाच नाही तर आमच्या पितरांना देखील स्वर्गसुख, शांती वैग्रे मिळेल असे नमूद करतो आणि मी माझे बावीस शब्द संपवतो.

सहज's picture

23 Mar 2012 - 2:40 pm | सहज

_/\_
मेडीया सम्राट पराजी व वायदेआझम डोन्राव

अन्य सेलेब्रटीप्रमाणे हे दोघेही प्रतिसादाकरता, धाग्यात हजेरी लावायला खच्चून मानधन घेतात असे ऐकले होते पण दोघांनी प्रेमाने हजेरी लावल्याबद्दल आभारी आहे :-)

(दोघांचा फॅन) सहज

यकु's picture

22 Mar 2012 - 6:20 pm | यकु

माझे जालीय सुख :
1. सहज मामासहित इथल्या 'सगळ्याच' मिपाकरांच्या सान्निध्‍यात दिवसरात्र पडिक रहाणे !
:)

सहज's picture

23 Mar 2012 - 2:36 pm | सहज

यक्कू पगला दिवाना - लेखनाला धार चढतीय!! आवडतेय...

मोहनराव's picture

22 Mar 2012 - 6:20 pm | मोहनराव

तुम्हाला ज्या क्षणांच्या असण्याने समाधान / तृप्ती लाभते ते सांगा.

शांत संध्याकाळी मधुर गाणे ऐकत चहाचे झुरके मारणे.
भरपेट जेवण झाल्यावर रविवार दुपारची झोप.
मित्रांच्या सोबत विकांताची भटकंती.

कपिलमुनी's picture

22 Mar 2012 - 6:43 pm | कपिलमुनी

मोहना ..
>>ज्या क्षणांच्या असण्याने समाधान / तृप्ती लाभते ते सांगा.

हे मिळायचे तुझे दिवस जवळ येत चाल्लेत ..तुझी मत बदलतील लौकरच ;)

मोहनराव's picture

22 Mar 2012 - 6:54 pm | मोहनराव

ब्वॉर ब्वॉर!! आपले मत कळाले. आभारी आहे ;)

सहज's picture

23 Mar 2012 - 2:34 pm | सहज

इथे चहाप्रेमी जास्त आहेत काय? :-)

(कॉफीप्रेमी) सहज

एक मस्त पुस्तक, वाफाळता चहा ,गरमा गरम भजी व मी.

जशी गाण्याची सुरेल मैफल ...
जसा गवयान आळवलेला सुरेख राग...
जस तबलजीने धरलेला अप्रतिम ठेका...
एकाहुन एक सरस दाद देणारे रसिक...

वा क्या बात है....

सहज's picture

23 Mar 2012 - 2:32 pm | सहज

आता पुस्तकाचे परिक्षण येउ द्या की!

तिमा's picture

22 Mar 2012 - 6:56 pm | तिमा

'छ्या! आज काय भीमण्णांचं गाणं रंगत नाहीये' अशी पिचकारी टाकून , निघून गेलेल्या पब्लिकमुळे, अर्ध्यापेक्षा जास्त रिकाम्या झालेल्या हॉलमधे, उत्तरार्धात भीमसेनजींनी रंगवलेली अप्रतिम मैफल आणि शेवटी, 'बाबुल मोरा' या भैरवीने आमच्या डोळ्यांत पाणी आणणे.
असे अनेक प्रसंग आमच्या परमोच्च सुखाचे क्षण म्हणून आम्ही जपून ठेवले आहेत.

सहज's picture

23 Mar 2012 - 2:30 pm | सहज

आमची पंडीतजींची आठवण म्हणजे उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही पोर पर्वतीवर फिरायला जायचो व वाटेत ते सकाळी त्यांचे डॉबरमन कुत्रे फिरवत येत असता आम्ही रस्ता क्रॉस करुनही बळचकर दुसर्‍या बाजुने जाताना "कसला हडकुळा आहे" म्हणायचे मग पंडीतजी म्हणायचे, "अस्स का? सोडू का".. :-) की आम्ही पाय लावून पसार...

रम्य ते बालपण!

पांथस्थ's picture

22 Mar 2012 - 7:04 pm | पांथस्थ

सहजराव मस्तच धागा.

१. अचानक एखादे मस्त पुस्तक हाती लागणे
२. छान संगीत कानावर पडणे
३. झक्कास सामीष मसालेदार जेवण :)
४. पावसाळी वातावरण, कांदा भजी, आल्याचा चहा
५. जुन्या आठवणींमधे रमणे
६. मस्त रंगसंगती असलेले चित्र अथवा छायाचित्र बघायला मिळणे
७. मुंबईत (काळा घोडा) परिसरात निवांत भटकणे
८.आई/आज्जीने मायेने डोक्यावर फिरवलेला हात
९. सकाळी सकाळी मी झोपलेला असतो तेव्हा कन्यारत्नं (२) मिठी मारतं, पप्पी घेतं
१०. अनेक दिवसांनी मिळालेली शांत झोप
११. पावसात भटकणं
१२. कविता वाचन
१३. सारसबागेतल्या गणपती मंदिरात शांतपणे बसुन राहणे
१४. पेशवे पार्कात फुलराणी मधे बसणे ...हो मी अजुनही पुण्यात आलो कि फुलराणीत बसतो :)
१५. नातुबाग गणपतीची रोशणाई आणी संगीत ऐकत उभे राहणे
१६. झणझणीत पाव-सँपल ओरपणे
१७. दुर्गा टेकडीवर भटकणे
१८. कोकणात निवांत भटकणे...

ई.ई. तुर्तास इथेच थांबतो...

सहज's picture

23 Mar 2012 - 2:23 pm | सहज

फुलराणी आहे अजुन? गेले पाहीजे पुढच्या वेळी.

१. सकाळी दहा वाजता बालवाडीला, प्राथमिक शाळेला जाणारी मुले पहाणे.. त्यांच्याशी एक दोन ओळी गप्पा मारणे.
२. संध्याकाळी सांज ये गोकुळी हे गाणे ऐकणे.
३. संध्याकाळी टपरीवर चहा पिणे.
४. ए टी एम मधून बाहेर येणार्‍या करकरीत नोटा घेणे.

सहज's picture

23 Mar 2012 - 2:21 pm | सहज

प्राथमिक शाळेला जाणारी मुले पहाणे.. त्यांच्याशी एक दोन ओळी गप्पा मारणे.

हे बेश्ट!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Mar 2012 - 8:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१) सहजरावांना खूप दिवसानंतर मूख्य बोर्डावर पाहून झालेला आनंद. :)
२) आवडती कथा, आवडतं पुस्तक वाचून संपल्यानंतर कितीतरी वेळ तोंडावर पालथं धरलेल्या पुस्तकाचा क्षण.
३) उशिरा निघूनही स्वच्छ बस वेळेवर मिळून खिडकीची सीट मिळण्याचा क्षण.
४) तन्मयतेनं एखादी कथा शिकवल्यानंतर समोरोपाला पोरांना भाऊक होतांना पाहणं.
५) कर्मचारी संस्थेकडून कर्जासाठी केलेल्या अर्जानंतर अर्जंट मिळालेला चेक पाहतांनाचा क्षण.
६)शिक्षक दिनाला आवडत्या विद्यार्थ्यांनी केलेलं कौतुक ऐकतांनाचा क्षण.
७) पप्पाचा मूड बरोबर नाही असे लक्षात आल्यावर लेकीनं शाळेतल्या गप्पा सांगून रंगवण्याचा केलेला प्रयत्न. अंदाज पाहून केलेली डोक्याची मालीश.
८) पोळीबरोबर भाजी म्हणून आईने केलेल्या मेथीला पाहतांनाचा क्षण.
९) मोबाईलला एखादे जब्रा फुकट फूल व्हर्जनचे ऐप्लीकेशन्स मिळाल्याचा क्षण.
१०) पोरांच्या आनंद देणारा रिझल्टचा क्षण.
११)
१२)
१३)
१४)
१५)

बस का ? अजून लै बाकी आहे. :)

-दिलीप बिरुटे

सहज's picture

23 Mar 2012 - 2:20 pm | सहज

तरी क्रमांक ७ व १० ला झुकते माप!

सर्वसाक्षी's picture

22 Mar 2012 - 9:22 pm | सर्वसाक्षी

म्हणजे वर्ष सुखाचेच जाणार. सगळेच सुखाचे क्षण :)

सहज's picture

23 Mar 2012 - 2:17 pm | सहज

असाच लोभ असू द्या. ह्या वर्षी तुमचे अनेक लेख वाचायला मिळो.

चित्रा's picture

22 Mar 2012 - 9:31 pm | चित्रा

गुढी पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा.

आम्ही दहा वर्षे एका घरात बर्‍याच गैरसोयींमध्ये राहून जेव्हा शेवटी एकदा घरात लाँड्री असलेले घर रेंट केले तो भाग्याचा क्षण वाटला होता :-)

सहज's picture

23 Mar 2012 - 2:15 pm | सहज

तो भाग्याचा क्षण वाटला होता - नक्की कोणाला विकासभावोजींना ? ;-)

१. इन्टरनेटवर भांडणं (मजेत)
(भांडणे मित्रामित्रांत मजेत असली, तरच आनंद आहे. नाहीतर नाही.)

२. बेल्जियन पद्धतीने बनवलेली बियर.

३. गोडमिट्ट पदार्थ (कुठलेही. साखरेचे "अच्चू")

सहज's picture

23 Mar 2012 - 2:12 pm | सहज

बियर पिता पिता भांडूच!! होपफुली लवकर!

दररोज सकाळी जाग येते आणि भुक लागल्याची जाणिव होते, हे माझ्यासाठी खुप आनंदाचे क्षण असतात.

सहज's picture

23 Mar 2012 - 2:08 pm | सहज

ब्रेकफास्ट लाईक अ किंग!! :-)

अनेक तासांचा प्रवास करून मी पुण्याला 'आमच्या' घरी येते तो क्षण ....
याची मी वर्षभर वाट बघत असते.

सहज's picture

23 Mar 2012 - 2:04 pm | सहज

>अनेक तासांचा प्रवास करून
स्टार ट्रेक मालीकेत पाहीलेले 'स्कॉटी बिम मी अप' प्रत्यक्षात कधी उतरेल असे होते आजही :-)

प्रकाश घाटपांडे's picture

23 Mar 2012 - 12:22 pm | प्रकाश घाटपांडे

१) भुभुचे गार गार नाक कपाळाला गालाला लावणे व लावील थंट उटी वाळ्याची हा अनुभव घेणे.
२) उशाला एक भुभु पायाशी एक भुभु व अन्य भुभु लोक कान हुंगत आहेत त्यामुळे होणारा गुदगुल्यांच्या सुखाच्या लहरी
३) आपण पहुडले आहोत व भुभु आपले तळपाय चाटत आहे. विशेषतः आंगठ्याच्या बेचक्यात त्याच्या मउ मउ जिभेमुळे होणारा सुखद स्पर्श. आमचा बिट्टू भुभु हे करत असे.
४) भुभुचे कान बोटाच्या चिमटीत पकडणे.

सहज's picture

23 Mar 2012 - 2:01 pm | सहज

डॉग विस्परर बघताना तुमची आठवण येते.

(पोटात चौदा नाही पण तीन इंजेक्शन घेतलेला) सहज

अत्रुप्त आत्मा's picture

23 Mar 2012 - 8:18 pm | अत्रुप्त आत्मा

@आमचा बिट्टू भुभु हे करत असे. >>> :-D व्वा व्वा .. प्रकाशकाका...मजा आली वाचुन. बिट्ट्याचा अठवणी माझ्याजवळही आहेत... (माझ्यालेखी तो एक चतुर माणुसच होता..) तुमच्या इथे रहात असतानाच्या त्याच्या अनंत लीला अजुन अठवतात..

तुमची आइस्क्रीम भरवण्याची पद्धत आणी त्या पेक्षा त्याची तत्परतेनी झेलायची पद्धत...!

समोरच्या बंगल्यातल्या त्या दुसर्‍या महाद्वाड भुभुशी असलेलं स्वच्छ आजन्म वैर...

बाहेरच्या मैदानात हवेत उंच उडवलेले शेंगदाणे तो हवेत येऊन टिपायचा ते...

आणी माझ्या त्या लष्करी :-D वहानाच्या नुसत्या लाइटवरनं हा ओळखायचा..तेही :-)

नंदन's picture

23 Mar 2012 - 12:52 pm | नंदन

आवडत्या क्षणांचा लसावि वरील प्रतिक्रियांप्रमाणेच. रविवारी सकाळी सुरेख जमून आलेले पोहे नि सोबत आलेदार चहा रिचवून पेपराची पुरवणी वाचत पडल्यावर काही काळाने डोळा लागावा व जाग यावी ती माशाच्या तुकडीच्या चर्रर्र आवाजाने व त्या आमोदाने सुनासाला दिलेल्या वर्दीने - तो क्षण किंवा चारी बाजूंना क्षितिजापर्यंत काहीच नसणार्‍या एखाद्या ओसाड रस्त्यावर जवळजवळ निर्मम मनःस्थितीत गाडी चालवत असताना बराच वेळ अडकलेली सीडी अचानक सुरु व्हावी आणि 'घनु वाजे घुणघुणा'च्या सुरूवातीच्या बागेश्रीतल्या तानेने पुन्हा भान यावं ती वेळ, पुस्तक वाचताना काही विसरलेलं जुनं आठवावं आणि त्यात तंद्री लागावी - असे काही मोजके क्षण.

कधी कधी, दस्तुरखुद्द सुखाच्या काळापेक्षा ती वेळ अगदी नजीक येऊन ठेपलेली आहे, ही भावना अधिक आनंदाची असते. वीकेंडची चातकासारखी वाट पाहिल्यावर शुक्रवारी रात्री वाटणारा उल्हास, त्या वेळी मित्रांसोबत रंगणार्‍या गप्पा आणि खादाडी किंवा एखाद्या ट्रिपचं प्लॅनिंग करतानाच वाटणारा उत्साह हे त्यातलेच काही.

१) आईच्या हाताने रविवारी डोक्याला तेल मालीश

सहमत. Thou annointest my head with oil; My cup runneth over ही तेविसाव्या सॉममधली ओळ आठवली.

सहज's picture

23 Mar 2012 - 1:57 pm | सहज

त्या आमोदाने सुनासाला दिलेल्या वर्दीने --

याचा नेमका अर्थ कळला असता 'सुनासाला' तर अजुन आनंद झाला असता :-)

दस्तुरखुद्द सुखाच्या काळापेक्षा ती वेळ अगदी नजीक येऊन ठेपलेली आहे, ही भावना अधिक आनंदाची असते.

हे सहीच!

नंदन's picture

23 Mar 2012 - 11:39 pm | नंदन

याचा नेमका अर्थ कळला असता 'सुनासाला' तर अजुन आनंद झाला असता

स्वारी सहजकाका. आमोद = सुगंध, सुनास = नाक.

बरीच मोठी लिस्ट आहे.सगळ्यात पहिल्या नंबरवर पुरणपोळी आणि त्याला चापूनचोपून लावलेलं तूप आहाहा !!

सहज's picture

23 Mar 2012 - 2:18 pm | सहज

पुपोळी खाउन आत्ता मस्त ताणून द्या पण नंतर लिहाच बाकीचे..

बाळ सुड , तुझी इच्छा लवकरच पुर्ण होईल.

का बरं ?? कोण आणतंय बनवून ?? उगाच अपेक्षा वाढवू नका राव.
@सहजमामा: पुपोळी कसली खातोय, हापिस आहे आज. उद्याचा मेनू बहुधा पुपोळीच !! आज काटदर्‍यांकडचे पाकातले चिरोटे आणि जिलब्या जाम मिस करतोय.

सहज's picture

23 Mar 2012 - 2:55 pm | सहज

ओह! मला वाटलं आज पाडव्याचा बेत पुरणपोळी म्हणून ...

विकास's picture

24 Mar 2012 - 12:37 am | विकास

सहजराव तसेच बाकी सर्व समस्त मिपाकरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

चर्चा प्रस्ताव आणि चर्चा एकदम आवडली आणि आनंद झाला! :-)

सहजरावांनी आणि इतरांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीत आनंद हा साहजीक आहे, शोधावा लागत नाही... म्हणूनच खरा आहे. त्यानिमित्ताने, आज अनेक वर्षांनी "ये जमीन गा रही है..." ऐकले आणि त्याचा पण आनंद झाला. कधी कधी नुसत्या गतकाळातले सुखद प्रसंग आठवूनही आनंद होऊ शकतो.

शाळाकॉलेजातील सखेसवंगडी भेटले की मिळणारे सुख

देशाबाहेर असल्याने जेंव्हा आपले आप्त कस्टम्स मधून बाहेर येऊन दृष्टीस पडतात तेंव्हा होणारे सुख

भारतात येताना - धावपट्टीवर उतरण्याआधी आकाशातून मुंबईच्या माध्यमातून भारताकडे बघताना होणारे सुख

अमेरीकेत, आता अनेकदा पाहून झाला तरी हंगामातील पहील्या वहील्या हिमवर्षावातून आणि नंतर नकोशा झालेल्या थंडीतून मार्च मधे बाहेर आल्यावर झाडांवर दिसणार्‍या पालव्या आणि पक्षांचा किलबिलाट...

अजून बरेच काही.

बाकी आनंद आणि सूख या संदर्भात विचार केल्यास दोन गोष्टी पटकन आठवतात... मला वाटते रविन्द्रनाथांची एक गोष्ट होती: एक माणूस (सुखाला रुपत्माक) परीसाचा शोध घेत हिंडत असतो. एका हातात लोखंडाचे पात्र आणि दुसर्‍या हाताने जो मिळेल तो दगड त्याला स्पर्श करत सोने होते का बघत जाणे असे चाललेले असते. पण तो परीस काही मिळत नसतो...मग तो दगड टाकून पुढे जाणे असे करत हा माणूस असाच विविध दगडांचा स्पर्श करत शोधत शोधत पुढे जात असतो. अचानक त्या लोखंडी पात्राकडे तो बघतो आणि ढसाढसा रडायला लागतो. कारण त्या लोखंडाचे सोने झालेले असते. पण कधी आणि कुठल्या दगडामुळे झाले आहे तेच यांत्रिकपद्धतीने शोधताना लक्षात आलेले नसते. परीसाला (सुखाला) गमवलेले असते.

आणि म्हणूनच तुकोबाने लिहीलेली, "आनंदाचे डोही आनंद तरंग" ही ओळ आठवते...

सहज's picture

24 Mar 2012 - 6:44 pm | सहज

अगदी!

थंडी व कमी सुर्यदर्शन आयुष्यातला आनंद जितका कमी करतो तितकाच नंतर नकोशा झालेल्या थंडीतून मार्च मधे बाहेर आल्यावर झाडांवर दिसणार्‍या पालव्या आणि पक्षांचा किलबिलाट मन अतिशय प्रसन्न करतो.

प्यारे१'s picture

24 Mar 2012 - 4:59 pm | प्यारे१

पूर्वी कधीतरी मीमराठीवर दिलेला प्रतिसाद तसाच उचलतोय....

http://www.mimarathi.net/node/3144#comment-38364

डिस्क्लेमरः बोअर होईल असे वाटणार्‍यानी वाचू नये. तसेच 'तथाकथित' विज्ञानवाद्यांशी याबाबत वाद-संवाद केला/घातला जाणार नाही

>>>>मोक्ष- ४नंतर ३ नंतर २ नंतर १ व शेवटी ० पेग

पकाकाकांनी हसत खेळत रहस्य उलगडले....खरेच साधना लागते. आणि साधना योग्य दिशेने जायला त्यामागची भूमिका ठाऊक असली की जे करतोय ते का करतोय हे कळते, त्यात रस वाटतो आणि कष्ट न वाटता हसत गोष्टी होतात.

मोक्ष ही सापेक्ष कल्पना आहे. मोक्ष म्हणजे मुक्ति,मोकळे होणे,सुटणे.म्हणजे कशात तरी अडकलेले आहोत, कसले तरी बंधन आहे. कशापासून तरी मोकळे व्हायचे आहे.

मोक्ष अथवा आनंद मिळण्यासाठी ४ पेग मारले असे परा म्हणाला. पण खरेच नेहमी तशा प्रकारेच आनंद मिळतो का???? मायाताईच्या दुसर्‍या धाग्यात सुख म्हणजे काय हे विचारल्यानंतर काय केले अथवा झाले की सुख मिळेल ते लिहिले आहे. आनंदी होण्याचे पर्यायाने दु:खापासून मुक्ति, मोक्ष मिळवण्याचे हे मार्ग आहेत अथवा ही सुखी होण्याची साधने आहेत.

एखादा मेवे त्यामुळे ३ पेग वर मोक्ष पावतो. कुणाला गडावरची भजी आणि चहा, कुणाला मोकळ्या वातावरणातला 'मोकळा' श्वास, कुणाला प्रेयसीची/प्रियकराची मिठी ही आनंदाची अत्युच्च अनुभूति असते.

पण खरी गोची ही आहे की आपल्याला वाटते की त्या 'गोष्टी'मधे सुख आहे. खरेच तसे असते तर २कपा नंतर मिळालेला चहा ही सुख देऊन गेला असता, अतिशय छान भज्यांचा वाद येतोय पण एखाद्याला अवघड जागचे दुखणे झालंय, होईल तो आनंदी? लिव्हर खराब झालंय,त्रास होतोय, दारु पिणं म्हणजे मरण असेल तेव्हा. चार तास मिठीत राहून कळाले साले सगळे सांधे दुखू लागले आहेत, एकदा 'तिक्डे' जाऊन यायचे आहे, दोन झुरके घ्यायचे आहेत.पूर्वी कधीतरी त्या गोष्टीच्या माध्यमातून आनंद मिळत होता. पण म्हणून ती गोष्ट म्हणजे आनंद/सुख अथवा मोक्ष नाही हे आता लक्षात आले असेल.

त्यामुळे पकाकाका म्हणतात तसे, मोक्ष ही गोष्ट कुठल्याही पेगशिवाय मिळणारी आहे. विषय रहित आनंद म्हणजेच मोक्ष होय. काहीही विषय,विचार समोर,मनात नसताना मिळणारा आनंद हा मोक्ष आहे. झोपेत आपण आनंदीच असतो म्हणून तर त्या स्मृतिवर आपल्याला आनंद होतो. काय मस्त झोप लागली होती असे आपण म्हणतो. पण हा नकारार्थी आनंद होय.

अशाच प्रकारचा आनंद जागेपणी मिळ्णे रादर सातत्याने त्याच आनंदी अवस्थेत राहाणे हे आपले ध्येय असले पाहिजे. अर्थातच अवघड असले तरी ते तसे साध्य आहे.

खायला काही नसताना तुकाराम महाराज, 'आनंदाचे डोही आनंद तरंग' असे म्हणतात ते उगाच नव्हे. याच तुकारामांच्या पालख्या कोणत्याही धंदेवाईक नव्हे तर श्रद्धेने ३०० हून अधिक वर्षे वाहिल्या जातात, त्या सोहळ्याला कुठलाही भाडोत्री कार्यकर्ता नसतो.(सांगण्याचे कारण म्हणजे कोण तुकाराम असा प्रश्न येऊ शकतो.)

सहज's picture

24 Mar 2012 - 7:02 pm | सहज

आनंद, सुखाचे क्षण, कण वेचण्याचा हा एक प्रयत्न आहे. मोक्ष, चिरंतन आनंद ह्या कल्पना सध्या तरी मला न झेपणार्‍या भांगेच्या गोळ्या की कायसेसे म्हणतात तेच.

सध्याची परमोच्च आनंद सुखाची कल्पना म्हणजे = आपले कुटुंबीय व आपण एकत्र आहोत, सगळे खुश, निरोगी आहेत, रहाते घर कर्जमुक्त आहे, भविष्याच्या सर्व संभाव्य घटनांसाठी तरतूद आहे, पोटापाण्यासाठी कमवायची चिंता नाही.