अधीर तो .. किंचित बावरलेली ती .. हात्तात हात..नयनात चाले रुजवात..अस्फुट अधर ते थरथरतात .. शब्द परी न सुचतात. .. सोनसळी तिची कांती झळाळे जसा मावळतीचा रवी .. उषेचा रक्तिमा गाली पसरला.. बघता हा नजारा तो देहभान हरवला.. क्षणात सावरला... हळूच घेतले कवेत तिजला.. मोहोरली ती .. अंगावर अंगावर फुले शहारा ..विसावला पळभर रवी क्षितिजावरी अनुभवण्या तो अद्बुत देखावा .. दोन देह परी एकची आत्मा..स्पंदने सांगती स्पंदनाना ..भारावली सृष्टी .. स्तब्ध दश-दिशा..जडावले श्वास ..मिठी किंचित सैलावली .. विश्वासाची वचने नयनातून समजली..नाजूक वेल ती जणू वृक्षाला बिलगली.. .
प्रतिक्रिया
11 Mar 2012 - 11:24 am | सांजसंध्या
अधीर तो .. किंचित बावरलेली ती ..
हात्तात हात..नयनात चाले रुजवात..
अस्फुट अधर ते थरथरतात .. शब्द परी न सुचतात. ..
सोनसळी तिची कांती झळाळे जसा मावळतीचा रवी ..
उषेचा रक्तिमा गाली पसरला..
बघता हा नजारा तो देहभान हरवला..
क्षणात सावरला... हळूच घेतले कवेत तिजला..
मोहोरली ती .. अंगावर अंगावर फुले शहारा ..
विसावला पळभर रवी क्षितिजावरी अनुभवण्या तो अद्बुत देखावा ..
दोन देह परी एकची आत्मा..
स्पंदने सांगती स्पंदनाना ..
भारावली सृष्टी ..
स्तब्ध दश-दिशा..जडावले श्वास ..मिठी किंचित सैलावली ..
विश्वासाची वचने नयनातून समजली..
नाजूक वेल ती जणू वृक्षाला बिलगली.. .
छान आहे :)
11 Mar 2012 - 11:33 am | तर्री
नवशृंगार चांगलाच जमलाय.
विसावला पळभर रवी क्षितिजावरी अनुभवण्या तो अद्बुत देखावा ..ऐवजी साधेसे
... विसावला पळभर रवी बघण्या तो अद्बुत देखावा .
चालले असते का ? जरा सहज वाटते मला.
12 Mar 2012 - 11:38 am | मिसळलेला काव्यप्रेमी
छान!
12 Mar 2012 - 12:46 pm | मालोजीराव
सुंदर ....अतिशय सुंदर :)
- मालोजी
12 Mar 2012 - 9:00 pm | गणेशा
कातरवेळ आवडली.