टुकारघोडे! (हझल)
उगाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे टुकारघोडे हजार आहे
कशी बघा चालते कचेरी, अशी जशी की दुकानदारी
अनाथ सोडून कायद्याला, विधानमंडळ फ़रार आहे
बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फ़ुगून गेला
मुरूम गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे
गमावतो ना कधीच संधी सफ़ेद कुत्रा पिसाळलेला
डसून लचकेच तोडण्याचा ठरून त्याला ’पगार’ आहे
कुठून आणू नवीन गजरा, दुकान शोधू कुठे नव्याने?
सरून पर्याय सर्व गेले, जुनीच देणी उधार आहे
परंपरा-वंश लाभ ज्यांना, इथे तयांनाच ’अभय’ आहे
फ़िरोजघरचे गिधाड-कुत्रे, नेमून येथे हुशार आहे
- गंगाधर मुटे
---------------------------------------------------
प्रतिक्रिया
10 Mar 2012 - 7:50 pm | सांजसंध्या
मस्तच :)
10 Mar 2012 - 7:53 pm | प्रचेतस
मस्त रचली आहे.
10 Mar 2012 - 7:56 pm | पैसा
मस्त! पण हा हझल काय प्रकार आहे कोणी सांगेल का?
10 Mar 2012 - 8:06 pm | यकु
कॉलींग चौकटराजा आजोबा.
ए सांजसध्ये तु पण बोलाव.. म्हणजे ते आजोबा येतील ;-)
10 Mar 2012 - 9:39 pm | सांजसंध्या
:D
मला तर ते (मनाने) तरूणच वाटतात ब्वॉ ;)
10 Mar 2012 - 10:02 pm | अन्नू
मनाने सगळेच तरुण असतात! ;)
10 Mar 2012 - 10:41 pm | अत्रुप्त आत्मा
@मनाने सगळेच तरुण असतात! >>> नेहेले पे देहेला ;-)
10 Mar 2012 - 8:39 pm | गंगाधर मुटे
हास्य गझल म्हणजे हजल.
(शिवराळ भाषेतील आणि असंस्कृत शब्द असलेल्या गझलेला सुद्धा हझल म्हणता येईल.)
10 Mar 2012 - 8:38 pm | पक पक पक
लै भारी..मस्त्..भन्नाट. :)
10 Mar 2012 - 10:57 pm | अत्रुप्त आत्मा
मुटे काका ...एक नंबर हो... मिश्रण झकास जमलं आहे :-)
11 Mar 2012 - 8:32 am | चौकटराजा
गंगाधर बुवा ,
लचके उगीच घेउ असला स्वभाव नाही
काही तरीच लिहावे तर " भाव " नाही
है , सांजसंध्या, आमचे वृत्त गंडले इथे ही असेल. वृती नाही.
बुवांची " हझल" मस्त ! मस्त! मस्त ! वाचण्यासाठी मस्ट मस्ट मस्ट !
हटके गजल
हसरी गजल
हरकती गजल
कुठून आणू नवीन गजरा, दुकान शोधू कुठे नव्याने?
सरून पर्याय सर्व गेले, जुनीच देणी उधार आहे
सामान्य माणसाची हतबल अगतिक अवस्था मोजकेपणे !
11 Mar 2012 - 2:14 pm | चौकटराजा
लवाजमा भ्रष्ट जमून गेला
मिटून डोळे पुढारी आहे
कशी आणू शिस्त याच देशी
त्यांच्या वरी तर मदार आहे !
12 Mar 2012 - 11:40 am | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त जमलीय.
12 Mar 2012 - 9:23 pm | गणेशा
मस्त एकदम .
गझल आवडली.