प्रेम, स्पर्धा नि व्यसनान, झालाय आयुष्याचा बेरंग
मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग...................
प्रेमभंगात होऊनी निराश
विचलित झाल अभ्यासातील लक्ष
सावरण्यासाठी नाही अजूनही दक्ष
जगण्याची आस मारुनी, टाकितो हा प्रेमभंग
मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग...................
प्रत्येक गोष्टीसाठी देवाकडे धाव
जलद यशाची लागली हाव
कष्ट करण्याचा न राहिला ठाव
अपयशाच्या भीतीने, जाहलो मी निसंग
मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग...................
करिअरची वाट खूप अवघड
जीवघेण्या स्पर्धेत चालू धडपड
प्रत्येक वेळी नवीन गडबड
जिद्द अन चिकाटी विकुनी, लावितो आयुष्याला सुरुंग
मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग...................
कॉलेजच्या कट्ट्यावरी खेलीतो जुगार
अतिताणावर आहे सिगरेटचा उपचार
दारूचाच सभोवताली आहे वावर
सदबुद्धी गंगेत सोडूनी, माती झालीया गुंग
मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग...................
मित्रानो, जीवन खूप सुंदर आहे. सगळच जर फुकट मिळाल तर आयुष्याचा अर्थ कसा कळणार?
संकटांपासून पळण्यापेक्षा त्यावर जिद्द अन चिकाटीने मात करा...आयुष्य फार सुंदर वाटत......
अमित सतीश उंडे, सांगली.