कुत्री आणि टोळ

ए.चंद्रशेखर's picture
ए.चंद्रशेखर in जनातलं, मनातलं
27 Jan 2012 - 1:56 pm

हा लेख लिहायला घेताना का कोण जाणे, मला लुई कॅरॉल (Lewis Carroll) हे टोपणनाव घेतलेल्या लेखकाने लिहिलेल्या 'ऍलिस इन वन्डरलॅन्ड' (Alice in Wonderland) या पुस्तकातल्या काही प्रसिद्ध पंक्तींची खूप आठवण येते आहे. या पंक्ती आहेत
"The time has come," the Walrus said,
"To talk of many things:
Of shoes--and ships--and sealing-wax--
Of cabbages--and kings--
And why the sea is boiling hot--
And whether pigs have wings."
एकमेकाशी काहीही संबध नसलेल्या अनेक गोष्टींचा या पंक्तींच्यात जो असंबद्ध मेळ घातलेला आहे त्याला बहुदा कोठेही तोड नसेल. हॉन्गकॉन्ग शहरात सध्या असाच एक कुत्री-टोळ वाद संवाद चालू आहे त्याला मात्र असंबद्ध मेळ असे खासच म्हणता येणार नाही कारण त्याच्या मागे लोकांच्या तीव्र भावना आहेत. दोन आठवड्यांपूर्वी हॉन्गकॉन्गच्या मेट्रोमधे, चीनहून आलेल्या एका तरूणीला काही खाद्यपदार्थ खाताना एका स्थानिकाने बघितले व असे न करण्याबाबत बजावले. अनेक देशातील मेट्रो प्रमाणे हॉन्गकॉन्गच्या मेट्रोमध्येही खाद्यपदार्थ व पेये यांचे सेवन करण्यास मनाई आहे. हॉन्गकॉन्गमध्ये आता बरेच चिनी लोक चीन मधून काम धंदा मिळवण्यासाठी आलेले आहेत. चिनी मुख्य भूमीवरून आलेल्या या लोकांच्यात, साहजिकच मेट्रोमधील या घटनेने रोष पसरला. पिकिंग युनिव्हर्सिटी मध्ये वाङ्‌मय विभागाचे प्रमुख असलेले कॉन्ग किन्गडॉन्ग यांनी आंतरजालावरील एका मुलाखतीत काही वक्तव्ये करून आगीत तेलच ओतण्याचे काम केले.
या प्रोफेसर महाशयांनी, हॉन्गकॉन्ग रहिवासी चिनी मुख्य भूमीवरील लोकांना कमी दर्जाचे समजतात पण हे रहिवासी खरे तर अजुनही ब्रिटिशांच्या हाताखालची कुत्री आहेत असे सांगितल्याने हॉन्गकॉन्ग रहिवासी अधिकचचिडले आणि आता मुख्य भूमीवरून आलेल्या चिनी लोकांना त्यांनी टोळ म्हणून संबोधण्यास सुरूवात केली आहे. मागच्या आठवड्यात सुमारे 200 हॉन्गकॉन्ग रहिवाशांनी चिनी सरकारच्या हॉन्गकॉन्ग मधील संपर्क कचेरीसमोर (Liaison Office) निदर्शने केली. याच्या आधी गरोदर स्त्रिया व लहान बालकांना घेऊन आलेल्या माता यांच्यासह सुमारे 1500 हॉन्गकॉन्ग रहिवाशांनी चिनी मुख्य भूमीवरून हॉन्गकॉन्गमध्ये येणार्‍या लोकांविरूद्ध, एक मोर्चा काढला होता.
हॉन्गकॉन्ग मधून आंतरजालावर 'लोकस्ट वर्ल्ड' (Locust World) या नावाचा एक व्हिडियो प्रसारित झाला आहे. या व्हिडियोत मुख्य भूमीवरून आलेली ही चिनी मंडळी उपहारगृहात आरडाओरड करतात व आपल्या मुलांना रस्त्यावर घाण करू देतात या बद्दल त्यांना बदडून काढले पाहिजे असे सुचवले आहे.

आंतरजालावरचे एक चर्चास्थळ ' हॉन्गकॉन्ग गोल्डन फोरम' (Hongkong Golden Forum) याचे सभासद हॉन्गकॉन्गच्या रहिवाशांमध्ये या विषयाबद्दल जागृती करण्यासाठी, ऍपल डेली, साउथ चायना मॉर्निंग पोस्ट, सारख्या प्रमुख वृत्तपत्रांत मुखपृष्ठावर जाहिराती देण्याच्या विचारात आहेत. त्यांनी 5 दिवसात 40000 हॉन्गकॉन्ग डॉलर्स आतापर्यंत या साठी जमवले आहेत.
ब्रिटिश वसाहत असलेले हॉन्गकॉन्ग चीनच्या ताब्यात परत दिले गेल्याला 15 वर्षे झाली असली तरी हॉन्गकॉन्गचे रहिवासी व मुख्य भूमी वरील चिनी लोक यांच्यात फारसे सख्य निर्माण होऊ शकलेले नाही. चिनी लोकांना हा हॉन्गकॉन्गवासियांचा अहंगंड आहे व मुख्य भूमीवरील चिनी लोकांबद्दल वर्णभेद दाखवण्याचा हा प्रयत्न आहे असे वाटते. तर हे बाहेरून आलेले चिनी येथे येऊन हॉन्गकॉन्गमधील उत्कृष्ट दर्जाच्या वैधकीय सेवांचा फायदा घेत आपल्या मुलांना येथे जन्माला घालतात व हॉन्गकॉन्गमध्ये वास्तव्य करण्याचा परवाना मिळवतात असे स्थानिकांना वाटते आहे.
हॉन्गकॉन्गवासी चिनी लोकांपेक्षा निराळे आहेत. त्यांच्या आयुष्याची मूल्ये, शिस्तप्रियता, ही चिनी लोकांपेक्षा भिन्न आहेत अशी भावना गेल्या 15 वर्षात कधी नव्हती तेवढी वाढीस लागली आहे. काही लोक तर हॉन्गकॉन्ग स्वतंत्र असले पाहिजे असे मत व्यक्त करत आहेत. हा वाद कमी न होता उफाळून येण्याचीच जास्त चिन्हे दिसत आहेत.
शहरी व ग्रामीण या सारखा भेद प्रत्येक शहरात दाखवला जातोच. पूर्वी पुण्यात सुद्धा " काय पौडावरून आला का?" अशी हेटाळणी होत असे. मुंबईला अजुनही मराठी माणसाला "घाटी" म्हणून हेटाळणीवजा पुकारलेच जाते. त्यातलाच हा वाद आहे. फक्त हॉन्गकॉन्गच्या वैशिट्यपूर्ण " एक राष्ट्र- दोन राजकीय पद्धती" मुळे (One Nation-Two systems) हा वाद लवकर मिटेल असे वाटत नाही.
लोकस्ट वर्ल्ड हा व्हिडिओ बघण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा

प्रवासराजकारणबातमी

प्रतिक्रिया

रमताराम's picture

27 Jan 2012 - 5:22 pm | रमताराम

घरोघरी मातीच्या चुली हो.
चला आणखी एक 'तिबेट' जन्माला येऊ घातलाय म्हणायचा.

अवांतरः चीनचं काय सांगता हो. इथे कुणाला पडलंय त्याचं. ते ओबामाचे या विलेक्षनला किती चान्सेस आहेत ते सांगा की. आणि रिपब्लिकन अध्यक्ष झाला तर आमचे आऊटसोर्सिंगचे काय होणार त्यावर बोला की.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2012 - 6:26 pm | परिकथेतील राजकुमार

आपल्याला काय करायचे आहे ?

बाकी तिथला एखादा यॉंग शाँग मराठी आणि बिहारी वादावरती असा लेख लिहित असेल काय? गेला बाजार बांगलादेशी आणि भारतीय वाद तरी?

रामपुरी's picture

28 Jan 2012 - 12:23 am | रामपुरी

तुमच्या ब्लॉग ची लिंक देण्याऐवजी सरळ यु ट्युब ची लिंक दिली असती तर बरं वाटलं असतं.

{ही ब्लॉगच्या हिट्स वाढविण्याची युक्ती नसावी असा ( फक्त या वेळेपुरता :) ) समज करून घेतल्या गेल्या आहे.}

कोणतीही गोष्ट वाकड्यातून बघण्याची आपली का प्रवृत्ती असते ते कळत नाही. यू ट्यूबची लिंक दिलेली असली आणि त्यावर क्लिक केले की ते पृष्ठ उघडते असा माझा अनुभव आहे. या पृष्ठावर १० चिनी भाषेतील व्हिडिओ आहेत. यापैकी कोणता व्हिडियो सिलेक्ट करणार ते कळत नाही म्हणून ब्लॉगची लिंक दिलेली होती. मिसळपाव वरील वाचकांना यात माझा काही दुसरा फेतु आहे असे वाटत असल्यास माझ्या पुढील लेखात छायाचित्रे किंवा व्हिडियो यांचे कोणतेच दुवे न देण्याची खबरदारी घेता येईल.

रामपुरी's picture

28 Jan 2012 - 7:04 am | रामपुरी

जशी ब्लॉगची लिंक देता येते तशीच यू ट्यूबची लिंक पण देता येते आणि जो हवा तोच व्हिडिओ सुद्धा उघडतो. यात अडचण कसली आहे ते कळले नाही. दुवे द्यायला हरकत नाही पण ते ब्लॉगचे दिले, तेसुद्धा अशाप्रकारे, की वाकड्यातून बघणे भागच पडते.
उदा.

ए.चंद्रशेखर's picture

28 Jan 2012 - 9:10 am | ए.चंद्रशेखर

श्री रामपुरी यांनी दिलेल्या माहितीसाठी त्यांना धन्यवाद. जो हवा तोच व्हिडिओ उघडण्यासाठी दुवा कसा द्यायचा हे त्यांनी मला संदेश पाठवून कळवावे ही त्यांना विनंती म्हणजे पुढील काळात सुधारणा करता येईल. मी केलेल्या प्रयत्नात फक्त पृष्ठ उघडत होते.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jan 2012 - 11:36 am | परिकथेतील राजकुमार

काका येवढे शिरिअसली घेऊ नका.
आपल्याला हव्या त्या व्हिडोची लिंक देणे खूप सोपे आहे. तुम्ही तुमच्या ब्लॉगवरती दिली आहेच की.

यू ट्यूब व्हिडोच्याखाली Share बटन असते, ते दाबले की Embed बटन येते, हे बटन दाबले की एक कोड मिळतो. त्या कोडच्या खाली असलेल्या पर्यायांपैकी use old embed code हा पर्याय घ्यायचा आणि आपल्याला हव्या त्या साईजच्या व्हिडोच्या विंडोवरती खाली क्लिक करायचे. त्यानंतर मिळालेला कोड डायरेक्ट मिपावरती आणून पेस्ट करायचा. इनपूट फॉर्मॅटमध्ये Full HTML सिलेक्ट करायचे आणि आपला प्रतिसाद अथवा धागा प्रकशित करायचा. झाले काम.

हे पहा :-

ए.चंद्रशेखर's picture

28 Jan 2012 - 2:24 pm | ए.चंद्रशेखर

धन्यवाद परीकथेतील राजकुमार. पण खरे म्हणायचे तर नीट समजले नाही. हे फुल एचटीएमएल काय प्रकरण आहे ते! ब्लॉगवर असले काही करायला लागत नाही. ब्लॉगरवर व्हिडिओ अपलोड करायचा म्हटल्यावर यू ट्युब का? असा प्रश्न विचारला जातो. त्याला हो म्हटले की फक्त व्हिडिओ ची यू ट्युब लिंक द्यावी लागते. तेवढे केले की काम झाले. येथे प्रकरण जरा कठिणच आहे.