योगेश वैद्य यांची 'येऊ कसा तुमच्यात मी' ही कैफियत ऐकली आणि एकदम वेगळीच तक्रार डोक्यात रुंजी घालून गेली! ;)
घालू कसा शर्टास मी? चालू कसा रस्त्यात मी?
तन भारी माझे मला, मावेन का प्यांटीत मी?
आरशात मावे न मी जाऊ कुठे, जाऊ कसा?
संपेचना हे दोंद, का एवढा बहरात मी?
आवळून पट्ट्यास ह्या पोटास ना जावू दिले
एवढे जमते मला, आहे तसा निष्णात मी
वाटे किती, भेटू तुला, सांगू तुला, का मी असा?
पोट येते आधी जरासे आणि त्या पश्चात मी
'काटे' जरी मी मोडले ना थांबले खाणे तरी
भेट घ्याया येत होतो अडकलो 'केकात' मी
चतुरंग
प्रतिक्रिया
10 Jun 2008 - 10:24 am | प्रमोद देव
विडंबन आवडले!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
10 Jun 2008 - 11:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घालू कसा शर्टास मी? चालू कसा रस्त्यात मी?
तन भारी माझे मला, मावेन का प्यांटीत मी?
आणि
आवळून पट्ट्यास ह्या पोटास ना जावू दिले
एवढे जमते मला, आहे तसा निष्णात मी
हा हा हा, हे लै आवडले !!! :) मस्त विडंबन !!!
-दिलीप बिरुटे
(प्यांटीत न मावनारा )
10 Jun 2008 - 2:17 am | विजुभाऊ
झकास हो
याला म्हाणायचे विडम्बन
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
10 Jun 2008 - 7:10 pm | लडदू
मीटर गंडल्याने काही मजा नाही आली.
असो.
================================
खरंतर लिहायचा कंटाळा आलाय तरी पण लिहिले. लडदू आहे ना मी!
10 Jun 2008 - 7:49 pm | मुक्तसुनीत
मीटर गंडल्याने काही मजा नाही आली.
मीटर-फिक्सिंग करण्याचा एक प्रयत्न.
घालू कसा शर्टास मी? चालू कसा रस्त्यात मी?
भारी तनू झाली मला, मावेन का प्यांटीत मी?
छोटी सकलही दर्पणे, जाऊ कुठे, जाऊ कसा?
संपेचना हे दोंद, आहे "वाढत्या" बहरात मी !
खेचून पट्टा घट्ट मी, पोटास ना जावू दिले
इतुकेच जमते हे मला, आहे तसा निष्णात मी
वाटे किती, भेटू तुला, सांगू तुला, का मी असा?
आधी परी येते उदर अन् येई त्या पश्चात मी
'काटे' जरी मी मोडले ना थांबले खाणे तरी
येई भेटीला गडे , परि अडकलो 'केकात' मी !
10 Jun 2008 - 8:11 pm | चतुरंग
मुक्तसुनीत, तुमच्यातला विडंबनकार मुक्त होऊ पहातोय! ;)
चतुरंग
10 Jun 2008 - 8:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुक्तसुनीत साहेब, मीटर मधील विडंबन लै भारी !!!
-दिलीप बिरुटे
(मुक्तछंदातला )
10 Jun 2008 - 9:27 pm | इनोबा म्हणे
हेच म्हणतो...
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
11 Jun 2008 - 6:09 am | विसोबा खेचर
रंगा आणि मुक्तराव,
तुम्हा दोघांचीही विडंबने आवडली.. :)
आपला,
(शर्टात न मावणारा) तात्या.