मागे शांतिनिकेतन या धाग्यात वचन दिल्याप्रमाणे आज तिथले काही निवडक फोटो इथे डकवत आहे.
शांतिनिकेतन मध्ये कला विभागात लहान मुलांना संस्कृतीदर्शन व्हावे यासाठी काही भित्तीशिल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. साधारणपणे पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी याचे निर्माण केले गेले असल्याची माहिती मला देण्यात आली.
गुरुदेवांचे एक सहकारी, बंकिमजी यांनीही काही शिल्पे तयार करुन शांतिनिकेतनच्या सौंदर्यात भर घातली आहे.
घर सोडून चाललेले कुटुंबः
महात्मा गांधी
गौतम बुद्ध
कलाविभागाची सुंदर इमारतः
तिथल्या बीएफएच्या विद्यार्थ्यांची काही चित्रे प्रदर्शनास ठेवली होती. त्यातीलच काही निवडक चित्रे:
तिथल्या पौष मेळ्यात लागलेले स्टॉल्स हे मातीपासून बनवलेल्या वस्तुंसाठी प्रसिद्ध आहेत. त्याचे काही फोटो:
बुद्धीदेवता गणपतीचे हे वेगळेच रुप तिथे बघायला मिळाले. गजमुखाबाजूची आरास टीपिकल बंगाली, दुर्गामातेच्या धाटणीची आहे.
प्रतिक्रिया
2 Jan 2012 - 10:36 am | मी-सौरभ
अजून फोटो आहेत का??? ते पण टाक
2 Jan 2012 - 10:41 am | पियुशा
मस्त फोटु रे अन्या :)
2 Jan 2012 - 10:43 am | प्रचेतस
जबरदस्त फोटो रे.
पण लहान आकारात का टाकलेस?
गणपतीचा मुखवटा सुरेखच. मोर आणि आणि खांद्यावर कुंभ पेललेली स्त्री सुरेख चितारली आहे.
2 Jan 2012 - 11:21 am | गवि
आहा.. जियो..
ती पेंटिंग्ज काय सुंदर काढली आहेत..
आभार रे अन्या हे सर्व आमच्यापर्यंत आणल्याबद्दल..
2 Jan 2012 - 11:23 am | प्रास
मस्त रे अन्याभौ,
आवडली ही छायाचित्रंही!
आकाराने काही छोटी झाली आहेत पण छान आहेत.
बीएफए च्या विद्यार्थ्यांनी काढलेली (बहुतेक) जलरंगातली चित्रं सुंदरच आहे.
तुमच्या छायाचित्रणकलेविषयी काय म्हणावं, ती ही उत्तमच!
2 Jan 2012 - 2:34 pm | पैसा
खरं तर फोटो छान आहेत हे सांगायला नकोच! फोटोवरून तिथल्या कलात्मक वातावरणाची कल्पना येतेच आहे, आणि इतक्या भारलेल्या वातावरणात शिकणारी मुलं किती नशीबवान असं राहून राहून वाटतंय.
2 Jan 2012 - 4:09 pm | प्यारे१
वाह्ह्ह! खूप शांत आणि रम्य वातावरण दिसतंय इथलं.
2 Jan 2012 - 4:31 pm | मन१
छान कल्पना आहे की चिमुरड्यांना चित्र आणि शिल्पांमधून शिकवण्याची.
आपल्याला एवढे आता ते जाणवणार नाही, पण त्या वयात उत्सुकता चाळवायला अशा गोष्टी नक्कीच कामाच्या ठरतात.
3 Jan 2012 - 9:40 am | प्रचेतस
प्रकाटाआ
3 Jan 2012 - 10:24 am | मन१
प्रकाटआ -- का?
3 Jan 2012 - 10:27 am | प्रचेतस
चुकून भलताच एक प्रतिसाद तिथे टंकित झाला होता म्हणून काढला तो. :)
2 Jan 2012 - 10:10 pm | गणेशा
एकद मस्त रे
3 Jan 2012 - 10:42 am | झकासराव
वाह!!!
भित्तीशिल्प, पेंटिंग, मातीची कारागिरी सगळच सुंदर आहे.
हे सर्व कला तुझ्या तिसर्या डोळ्यातुन इकडे पोचवल्याबद्दल आभार मित्रा. :)