परवाच शहरी बसने प्रवास करत होतो. बसच्या आतल्या बाजूने ज्या जाहिराती लावलेल्या असतात त्यापैकी एका जाहिरातीकडे आमचं लक्ष गेंलं. जाहिरातीतलं एक शीर्षकवजा वाक्य होतं -
'निष्णात वैद्य राजगुरू यांच्या मूळव्याधीसारख्या आजारावर उपाय उपलब्ध..'
हे वाक्य वाचल्यावर आमचा थोडा घोटाळाच झाला. वाक्यरचना थोडी चुकीची वाटली. कारण ते वाक्य आम्ही असं वाचलं -
'निष्णात वैद्य सी. के. राजगुरू यांच्या मूळव्याधीसारख्या आजारावर उपाय..'
म्हणजे खुद्द वैद्यबुवांनाच मूळव्याध झाली आहे आणि या जाहिरात्रीद्वारे कुणी आम्हाला त्यांच्या मूळव्यधीवर उपाय करण्याचे आवाहन करत आहे किंवा कसे? :)
परंतु नंतर पूर्ण जाहिरात वाचल्यानंतर वैद्यबुवांकडेच मूळव्याधीवयचे उपाय उपलब्ध आहेत असा अर्थातच उलगडा झाला.
वास्तविक ते वाक्य असं हवं होतं -
'मूळव्याधीसरख्या आजारावर निष्णात वैद्य सी.के. राजगुरू यांचा उपाय'
परंतु जाहिरात देतांना वैद्यबुवांनी वाक्यरचनेत थोडा घोटाळा केला आणि त्यामुळे आमचाही थोडा घोटाळा झाला आणि काही क्षण आमच्या गालावर मिश्किली उमटली! :)
तर लोकहो, या धाग्याद्वारे अशाच काही मजेशीर वाक्यांची, शब्दांच्या अदलाबदलीची उदाहरणं आपण इथे दिलीत तर हा एक अंमळ विरंगुळ्याचा, मौजमजेचा धागा ठरेल असे आम्हास वाटते. गेले काही दिवस अण्णांच्या आंदोलनासंदर्भात काही बोजड लेख लिहून आम्हीही थकलो होतो. परंतु अण्णा आता विश्रांतीकरता राळेगणाला निघून गेलेत त्यामुळे आम्हालाही थोडी उसंत मिळाली आहे ! :)
काय मग? देताय ना अशीच काही मजेशीर उदाहरणं? आम्ही वाट पाहात आहोत. (अर्थात, अशी उदहरणे देतांना भारतीय घटनेने घालून दिलेले सार्वजनिक सभ्यतेचे निकष पाळणे आवश्यक बरं का!)
-- कॉमॅ.
प्रतिक्रिया
30 Dec 2011 - 7:30 pm | पक पक पक
तुझी मागणी पूर्ण केली की तू मला पुरुष म्हणून जे हवं ते देशील अशी अपेक्षा बाळगून मी गोल गोल फिरत राहायचो.
मि पा वरील परवाच प्रसिद्ध झालेल्या 'ब्रेक अप' नामक सुप्रसिद्ध लेखातील नायकाचे एक वाक्य...
30 Dec 2011 - 7:36 pm | परिकथेतील राजकुमार
धाग्यावरुन आम्हाला आमच्या वैद्य डाण्राव आणि त्यांच्या शीलाजीताच्या जाहिरातीची आठवण झाली. आमच्या धम्याचा वाघ वापरतो त्या डायपरच्या जाहिरातीची कथाच वेगळी....
असो..
30 Dec 2011 - 8:24 pm | आदिजोशी
डाण्रावांविषयी आम्ही सामान्य लोक काय बोलणार? धमालपंतांविषयी सुद्धा आम्ही सामान्य लोक काय बोलणार? असो. शीलाजीत, मूळव्याध वगरे वाचून काही जालीम जालीय मित्रांची आठवण झाली.
30 Dec 2011 - 8:37 pm | हारुन शेख
एकदा एका भिंतीवर 'येथे थुंकू नये' ऐवजी ' येथे थुंकून ये ' असं लिहीलं होतं !
-----------------------------------------------------------------------------------------
31 Dec 2011 - 3:20 pm | अरुण मनोहर
A board displayed on a women hospital
"C K Lim's women Hospital "
ह्या लिम ला कीती बायका आहेत, आणि एका वेळी किती जणी हॉस्पीटलमधे असतात ह्याचा विचार करत राहिलो!
31 Dec 2011 - 3:50 pm | अभिज्ञ
एका ढाब्यावर स्त्रियांच्या प्रसाधना बाहेरचा बोर्ड असा होता.
"Ladies To let" ;)
अभिज्ञ.