कुणीतरी...

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in जे न देखे रवी...
7 Jun 2008 - 3:45 pm

कसे लागले वेड जीवाला
कुठुन जुळले रेशीमधागे
चांदरातीला चांदण्यांसवे
कोण कुणासाठी हे जागे?
कुठुन येइ असा अचानक
प्राजक्ताचा गंध सभोवती
कुणासाठी अन हसता हसता
नकळत डोळे भरुन येती?
कुणासाठी ही लागे हुरहुर
कशासाठी ये भरुन हा उर
कुणासाठी अन आनंदाच्या
क्षणीही उठते मनात काहुर
कोण आठवे फुल पाहता
कोण आठवे सुर लावता
भास कुणाचे होती आणिक
वाटेवरुनी जाता जाता
कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक
कोण कुणा देणारे उत्तर
तरी खरे की नाव कुणाचे
आठवता मन होइ कातर...

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

7 Jun 2008 - 3:55 pm | विसोबा खेचर

फुलवा,

कविता छानच केली आहेस..

कोण आठवे फुल पाहता
कोण आठवे सुर लावता
भास कुणाचे होती आणिक
वाटेवरुनी जाता जाता

या ओळी सर्वाधिक आवडल्या...

तात्या.

इनोबा म्हणे's picture

7 Jun 2008 - 4:38 pm | इनोबा म्हणे

कविता आवडली.

कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक
कोण कुणा देणारे उत्तर
तरी खरे की नाव कुणाचे
आठवता मन होइ कातर...

या ओळी खासच...

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शितल's picture

7 Jun 2008 - 6:07 pm | शितल

कुणासाठी ही लागे हुरहुर
कशासाठी ये भरुन हा उर
कुणासाठी अन आनंदाच्या
क्षणीही उठते मनात काहुर
कोण आठवे फुल पाहता
कोण आठवे सुर लावता

हे तर मस्तच.
काव्य रचना ही छान.

यशोधरा's picture

7 Jun 2008 - 6:14 pm | यशोधरा

एकदम सुरेख लिहिलं आहे!! सगळी कविताच उत्तम!

मुक्तसुनीत's picture

7 Jun 2008 - 7:40 pm | मुक्तसुनीत

तुमची कविता आवडली. अत्यंत तालबद्ध आणि त्यामुळे आस्वादामधे अडथळा न आणणारी.

तुम्ही रे. टिळकांची "कुणास्तव कुणीतरी" ही कविता वाचली आहे की नाही ते मला माहीत नाही. परंतु त्याकवितेच्या आशयाबद्दलच नव्हे तर धृपदाच्या शब्दांबद्दलही प्रचंड साम्य आहे. (तुमची कविता स्वतंत्र कृतीच आहे ; मी भलतेसलते आरोप करत नाही. पण प्रकर्षाने एका सुंदर कवितेची आठवण झाली म्हणून लिहीले.) टिळकांची कविता खूप जुनी ,पृथ्वी वृत्तातली आहे. त्यातील आशय आणि "कुणस्तव कुणीतरी" हे शीर्षक शब्द पहा ! वाचकाना ही कवितासुद्धा आवडेल अशी आशा करतो.

ही ती कविता :

सरोष घन वर्षती, तरुलतांशि वारा झुंजे
विराम नच ठाउका क्षणहि नाचताना विजे;
भयानकचि संचरे, सकल सृष्टि हो घाबरी
कुणास्तव कुणीतरी सभय वाट पाहे घरी ! (१)

रवप्रतिरवामुळे बधिर जीव सारे जरी,
निनाद करिते अहा ! श्रवण चाहुलीचा तरी;
उठे दचकुनी तडित दुसरि नर्तनाला करी,
कुणास्तव कुणीतरी कितिक येरझारा करी ! (२)

खुशाल कर वृष्टिला, तुज न तो भिणारा घना !
पिशाचसम तू खुशाल कर गे विजे ! नर्तना.
महीधर समीरणा ! धरुनि लोळवी भूवरी,
कुणास्तव कुणीतरी निघत जावयाला घरी ! (३)

घनप्रसर माजला, नभि न एक तारा दिसे,
परंतु हसरा सदा सुखद चंद्र गेही वसे;
अहा द्रवविता कुणा सहज चंद्रकान्ताप्रती
कुणास बघुनी कुणितरि हसेल हर्षे किती ! (४)

अहा चरणधावना कलशपुर्ण उष्णोदके,
रुचिप्रद वरान्न जे करिल हो सुधेला फिके
फुलाहुनि मऊ असे शयन रम्य मंचवरी,
कुणास्तव कुणीतरी घरि अशी तयारी करी (५)

रसाळ वचनावली, विविध तोंडि लावावया
मिळेल उपमा उरे मग न भोजनाला तया;
पडेल मग विस्मृती सकलही श्रमांची क्षणी,
कुणाप्रति कुणीतरी निरखिता प्रसन्नेक्षणी ! (६)

तया प्रणयनिर्झरा प्रणयनिर्झरीला तिला
सदा सुखद भोवरा विहरण्यास ऐशा मुला
बळेच उठवी कुणी ! उभयतास आलिंगुनी
कुणीतरि धरील ते विषय अन्य कैंचा मनी ? (७)

तमास अपसारुनी उन पडेल त्या मंदिरी,
तशांत पडतील हो मधुनि पावसाच्या सरी,
कुणीतरि धरोनिया कर करी कुणाचा तरी,
स्तवील परमेश्वरा जलद, सूर्य ज्याच्या करी ! (८)

..............रेव्हरंड नारायण वामन टिळक

पद्मश्री चित्रे's picture

7 Jun 2008 - 10:58 pm | पद्मश्री चित्रे

मी वाचली नव्हती हे कविता कधिच. साम्य आहे पण थोडे. त्यान्ची भाषा किति छान आहे.
>>कविता स्वतंत्र कृतीच आहे - हे नक्कि.
एक छान कविता वाचायला मिळाली.
धन्यवाद्-शितल्,तात्या ,यशोधरा.

फटू's picture

7 Jun 2008 - 11:31 pm | फटू

कोण आठवे फुल पाहता
कोण आठवे सुर लावता
भास कुणाचे होती आणिक
वाटेवरुनी जाता जाता

खुप छान लिहिलं आहेस गं ताई...

मला 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या शिर्षकगीताची आठवण झाली...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चतुरंग's picture

8 Jun 2008 - 12:31 am | चतुरंग

शब्दरचना. सुरेख काव्य, फुलवा. एक खूप छान कविता खूप दिवसांनी वाचायला मिळाली.

चतुरंग

मदनबाण's picture

8 Jun 2008 - 3:05 pm | मदनबाण

कुठुन येइ असा अचानक
प्राजक्ताचा गंध सभोवती
कुणासाठी अन हसता हसता
नकळत डोळे भरुन येती?

हे मस्तच..
कोण आठवे फुल पाहता
कोण आठवे सुर लावता
भास कुणाचे होती आणिक
वाटेवरुनी जाता जाता
कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक

व्वा.....
फुलवाताई सुरेख कविता आहे.....

नन्दु's picture

8 Jun 2008 - 3:13 pm | नन्दु

वा!!! खरच सुरेख आहे

कोण आठवे फुल पाहता
कोण आठवे सुर लावता
भास कुणाचे होती आणिक
वाटेवरुनी जाता जाता

मनाला चट़का लावते

मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु

pooja kulkarni's picture

8 Jun 2008 - 5:24 pm | pooja kulkarni

कविता फारच सुरेख आहे

आनंदयात्री's picture

9 Jun 2008 - 3:02 pm | आनंदयात्री

पुन्हा पुन्हा वाचतोय, सुंदर कविता. छान कशा कशाला म्हणु. फुलवा किती सोपे शब्द वापरुन नेमका भाव उतरवतेस तु कवितेत !

वरदा's picture

9 Jun 2008 - 6:27 pm | वरदा

खूप सुंदर...
कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक
कोण कुणा देणारे उत्तर
तरी खरे की नाव कुणाचे
आठवता मन होइ कातर...

हे खासच....

सुवर्णमयी's picture

10 Jun 2008 - 11:16 pm | सुवर्णमयी

फुलवा, कविता आवडली. मस्त.

फुलवा, खूप आवडली कविता.

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

गणा मास्तर's picture

11 Jun 2008 - 12:21 pm | गणा मास्तर

शेवटच्या चार ओळी अफाट !!!!

श्रीकान्त पाटिल's picture

11 Jun 2008 - 8:50 pm | श्रीकान्त पाटिल

कोण आठवे फुल पाहता
कोण आठवे सुर लावता
भास कुणाचे होती आणिक
वाटेवरुनी जाता जाता
ह्या ओळी खूप आवडल्या .. तसे पहाता सम्पुर्ण कविताच आवडली .
फुलवा तुझे मनापसुन अभिनन्दन..!!

पाटील काका