Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पद्मश्री चित्रे on Sat, 06/07/2008 - 15:45

Submitted by विसोबा खेचर on Sat, 06/07/2008 - 15:55

Permalink

छान

फुलवा, कविता छानच केली आहेस.. कोण आठवे फुल पाहता कोण आठवे सुर लावता भास कुणाचे होती आणिक वाटेवरुनी जाता जाता या ओळी सर्वाधिक आवडल्या... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Sat, 06/07/2008 - 16:38

Permalink

मस्तच...

कविता आवडली. कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक कोण कुणा देणारे उत्तर तरी खरे की नाव कुणाचे आठवता मन होइ कातर... या ओळी खासच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Sat, 06/07/2008 - 18:07

Permalink

छान.

कुणासाठी ही लागे हुरहुर कशासाठी ये भरुन हा उर कुणासाठी अन आनंदाच्या क्षणीही उठते मनात काहुर कोण आठवे फुल पाहता कोण आठवे सुर लावता हे तर मस्तच. काव्य रचना ही छान.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 06/07/2008 - 18:14

Permalink

एकदम सुरेख

एकदम सुरेख लिहिलं आहे!! सगळी कविताच उत्तम!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Sat, 06/07/2008 - 19:40

Permalink

कविता

तुमची कविता आवडली. अत्यंत तालबद्ध आणि त्यामुळे आस्वादामधे अडथळा न आणणारी. तुम्ही रे. टिळकांची "कुणास्तव कुणीतरी" ही कविता वाचली आहे की नाही ते मला माहीत नाही. परंतु त्याकवितेच्या आशयाबद्दलच नव्हे तर धृपदाच्या शब्दांबद्दलही प्रचंड साम्य आहे. (तुमची कविता स्वतंत्र कृतीच आहे ; मी भलतेसलते आरोप करत नाही. पण प्रकर्षाने एका सुंदर कवितेची आठवण झाली म्हणून लिहीले.) टिळकांची कविता खूप जुनी ,पृथ्वी वृत्तातली आहे. त्यातील आशय आणि "कुणस्तव कुणीतरी" हे शीर्षक शब्द पहा ! वाचकाना ही कवितासुद्धा आवडेल अशी आशा करतो. ही ती कविता : सरोष घन वर्षती, तरुलतांशि वारा झुंजे विराम नच ठाउका क्षणहि नाचताना विजे; भयानकचि संचरे, सकल सृष्टि हो घाबरी कुणास्तव कुणीतरी सभय वाट पाहे घरी ! (१) रवप्रतिरवामुळे बधिर जीव सारे जरी, निनाद करिते अहा ! श्रवण चाहुलीचा तरी; उठे दचकुनी तडित दुसरि नर्तनाला करी, कुणास्तव कुणीतरी कितिक येरझारा करी ! (२) खुशाल कर वृष्टिला, तुज न तो भिणारा घना ! पिशाचसम तू खुशाल कर गे विजे ! नर्तना. महीधर समीरणा ! धरुनि लोळवी भूवरी, कुणास्तव कुणीतरी निघत जावयाला घरी ! (३) घनप्रसर माजला, नभि न एक तारा दिसे, परंतु हसरा सदा सुखद चंद्र गेही वसे; अहा द्रवविता कुणा सहज चंद्रकान्ताप्रती कुणास बघुनी कुणितरि हसेल हर्षे किती ! (४) अहा चरणधावना कलशपुर्ण उष्णोदके, रुचिप्रद वरान्न जे करिल हो सुधेला फिके फुलाहुनि मऊ असे शयन रम्य मंचवरी, कुणास्तव कुणीतरी घरि अशी तयारी करी (५) रसाळ वचनावली, विविध तोंडि लावावया मिळेल उपमा उरे मग न भोजनाला तया; पडेल मग विस्मृती सकलही श्रमांची क्षणी, कुणाप्रति कुणीतरी निरखिता प्रसन्नेक्षणी ! (६) तया प्रणयनिर्झरा प्रणयनिर्झरीला तिला सदा सुखद भोवरा विहरण्यास ऐशा मुला बळेच उठवी कुणी ! उभयतास आलिंगुनी कुणीतरि धरील ते विषय अन्य कैंचा मनी ? (७) तमास अपसारुनी उन पडेल त्या मंदिरी, तशांत पडतील हो मधुनि पावसाच्या सरी, कुणीतरि धरोनिया कर करी कुणाचा तरी, स्तवील परमेश्वरा जलद, सूर्य ज्याच्या करी ! (८) ..............रेव्हरंड नारायण वामन टिळक
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मश्री चित्रे on Sat, 06/07/2008 - 22:58

In reply to कविता by मुक्तसुनीत

Permalink

नाही..

मी वाचली नव्हती हे कविता कधिच. साम्य आहे पण थोडे. त्यान्ची भाषा किति छान आहे. >>कविता स्वतंत्र कृतीच आहे - हे नक्कि. एक छान कविता वाचायला मिळाली. धन्यवाद्-शितल्,तात्या ,यशोधरा.
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on Sat, 06/07/2008 - 23:31

Permalink

सुंदर...

कोण आठवे फुल पाहता कोण आठवे सुर लावता भास कुणाचे होती आणिक वाटेवरुनी जाता जाता खुप छान लिहिलं आहेस गं ताई... मला 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या शिर्षकगीताची आठवण झाली... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sun, 06/08/2008 - 00:31

Permalink

अत्यंत सहज, साधी, सोपी

शब्दरचना. सुरेख काव्य, फुलवा. एक खूप छान कविता खूप दिवसांनी वाचायला मिळाली. चतुरंग
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 06/08/2008 - 15:05

Permalink

सुरेख.....

कुठुन येइ असा अचानक प्राजक्ताचा गंध सभोवती कुणासाठी अन हसता हसता नकळत डोळे भरुन येती? हे मस्तच.. कोण आठवे फुल पाहता कोण आठवे सुर लावता भास कुणाचे होती आणिक वाटेवरुनी जाता जाता कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक व्वा..... फुलवाताई सुरेख कविता आहे.....
  • Log in or register to post comments

Submitted by नन्दु on Sun, 06/08/2008 - 15:13

Permalink

वा!!!!

वा!!! खरच सुरेख आहे कोण आठवे फुल पाहता कोण आठवे सुर लावता भास कुणाचे होती आणिक वाटेवरुनी जाता जाता मनाला चट़का लावते मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु
  • Log in or register to post comments

Submitted by pooja kulkarni on Sun, 06/08/2008 - 17:24

Permalink

वा.......

कविता फारच सुरेख आहे
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Mon, 06/09/2008 - 15:02

Permalink

पुन्हा

पुन्हा पुन्हा वाचतोय, सुंदर कविता. छान कशा कशाला म्हणु. फुलवा किती सोपे शब्द वापरुन नेमका भाव उतरवतेस तु कवितेत !
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Mon, 06/09/2008 - 18:27

Permalink

४ वेळा वाचली गं

खूप सुंदर... कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक कोण कुणा देणारे उत्तर तरी खरे की नाव कुणाचे आठवता मन होइ कातर... हे खासच....
  • Log in or register to post comments

Submitted by सुवर्णमयी on Tue, 06/10/2008 - 23:16

Permalink

मस्त

फुलवा, कविता आवडली. मस्त.
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Wed, 06/11/2008 - 12:01

Permalink

कुणासाठी अन हसता हसता.. नकळत डोळे भरुन येती?

फुलवा, खूप आवडली कविता. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on Wed, 06/11/2008 - 12:21

Permalink

अफाट

शेवटच्या चार ओळी अफाट !!!!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीकान्त पाटिल on Wed, 06/11/2008 - 20:50

Permalink

कुणितरी

कोण आठवे फुल पाहता कोण आठवे सुर लावता भास कुणाचे होती आणिक वाटेवरुनी जाता जाता ह्या ओळी खूप आवडल्या .. तसे पहाता सम्पुर्ण कविताच आवडली . फुलवा तुझे मनापसुन अभिनन्दन..!! पाटील काका
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 6486 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com